नाणेफेक जिंकून प्रथम खेळण्याचा संघाचा निर्णय निर्णायक ठरला. मध्यंतरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या सामन्यात अत्यंत ढिसाळ खेळी आणि फलंदाजी करून आफ्रिकेला सहज विजय मिळवून दिल्याबद्दल संघाविरुद्ध सगळीकडेच रोष होता. तर संघाच्या वरिष्ठांनी संघावर ताशेरे ओढून संघाला सक्त ताकीद दिली होती. याचा चांगलाच परिणाम झाल्याचे आज चेन्नई येथे झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडीजच्या एक दिवसीय सामन्यात जाणवले. सचिनचे शतकांचे शतक आजच्या सामन्यात पूर्ण होण्याचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले. काही वेळातच तंबूत परतणाऱ्या सचीनच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट जाणवत होती. आजच्या यशाचा मानकरी ठरलेल्या युवराज सिंह याची कामगिरी खरोखरच प्रशंसनीय होती. संघात नव्यानेच सामील झालेल्या अश्विनी याची कामगिरी देखील लक्षात घेण्यासारखी ठरली. आजच्या विजयामुळे भारताने9 गूण प्राप्त करून दुसरे स्थान टिकवण्यात यश मिळवले असेच म्हणावे लागेल. येत्या गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारताकडून अपेक्षा उंचावल्या असून नाणेफेक जिंकल्यास, धावांचा मोठा डोंगर मात्र आव्हानात्मकरित्या उभा करावा लागणार आहे, हे मात्र निश्चित!
रविवार, २० मार्च, २०११
धूळवडीला विजयी होण्याचे वेस्ट इंडीज् चे स्वप्न धुळीत...
नाणेफेक जिंकून प्रथम खेळण्याचा संघाचा निर्णय निर्णायक ठरला. मध्यंतरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या सामन्यात अत्यंत ढिसाळ खेळी आणि फलंदाजी करून आफ्रिकेला सहज विजय मिळवून दिल्याबद्दल संघाविरुद्ध सगळीकडेच रोष होता. तर संघाच्या वरिष्ठांनी संघावर ताशेरे ओढून संघाला सक्त ताकीद दिली होती. याचा चांगलाच परिणाम झाल्याचे आज चेन्नई येथे झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडीजच्या एक दिवसीय सामन्यात जाणवले. सचिनचे शतकांचे शतक आजच्या सामन्यात पूर्ण होण्याचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले. काही वेळातच तंबूत परतणाऱ्या सचीनच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट जाणवत होती. आजच्या यशाचा मानकरी ठरलेल्या युवराज सिंह याची कामगिरी खरोखरच प्रशंसनीय होती. संघात नव्यानेच सामील झालेल्या अश्विनी याची कामगिरी देखील लक्षात घेण्यासारखी ठरली. आजच्या विजयामुळे भारताने9 गूण प्राप्त करून दुसरे स्थान टिकवण्यात यश मिळवले असेच म्हणावे लागेल. येत्या गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारताकडून अपेक्षा उंचावल्या असून नाणेफेक जिंकल्यास, धावांचा मोठा डोंगर मात्र आव्हानात्मकरित्या उभा करावा लागणार आहे, हे मात्र निश्चित!
शुक्रवार, १८ मार्च, २०११
धन्य ते जपान...
गेल्या आठवड्यात जपानमध्ये रिश्टर स्केल 8.1 तीव्रतेच्या झालेल्या भूकंपात झालेली प्रचंड हानी आणि यानंतर आलेली त्सुनामी यांचा सामना अजूनही जपान करतोय. सुमारे 15 हजार नागरिक बेपत्ता असल्याचा शासकीय आकडा आहे. प्रत्यक्षात ही संख्या निश्चितच फार मोठी असेल. फुकुशिमा शहर जवळपास फुंकलेच गेले असून शिमग्यापर्यंत शिमा शिल्लक राहणार की नाही अशी भीती जगभरातील शास्त्रज्ञांना वाटत असून अभ्यास करून त्यांनी 48 तासांची मुदत दिली. जपानच्या अणूभट्ट्यांमध्ये लागलेली आग यानंतर झालेले रेडिएशन यामुळे तर आता रेडिएशनचे हे ढग अमेरिकेपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जपानच्या अणूभट्ट्या वाचविण्यासाठी अमेरिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. परंतू सदैव सैनिका पुढेच जायचे..या उक्तीप्रमाणे या देशाने आजपर्यंत केलेली प्रगती आणि विकास निश्चितच प्रशंसनीय आहे. वारंवार किरकोळ प्रमाणावर भूकंप होत असल्यामुळे येथील प्रत्येक नागरिकास, लहान मुलांना देखील भूकंपजन्य परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी आणि काळजीचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षणच फार मोठी भूमिका पार पाडत आहे. त्सुनामी येऊन पुढे झालेले नुकसान हा भाग वेगळा...मात्र न डगमगता संपूर्ण देश निसर्गाने घातलेल्या घाल्याविरुद्ध लढतोय, हे कौतुक. मानवतेच्या भूमिकेतून अमेरिकेसारख्या बलाढ्यांनी मदतीचा हात पुढे केला, तरीही स्वतःची लढाई स्वतःच लढू आणि रेडिएशनचे संकट आणि सावट दूर करण्यासाठी पणाने उपाययोजना लवकरात लवकर शोधू..असा निर्धार करण्यात आला आहे. जपानच्या या हिंमतीस मानाचा मुजरा...!!!
बुधवार, १६ मार्च, २०११
निघाले देश बुडवायला..
जपानमध्ये काही दिवसांपूर्वीच झालेल्या भूकंप आणि त्सुनामी मुळे सगळीकडे पाणीच पाणी होऊन आणि हजारो घरे, मालमत्ता पुरात वाहून गेल्यामुळे प्रचंड जीवितहानी झाली. जीवंत राहिलेल्यांनी पुन्हा शुद्धीवर आल्यानंतर हे विदारक दृश्य पाहून पाणी-पाणी झाले. संपूर्ण देशच जणू निसर्गाने पाण्यात बुडविल्यासारखी स्थिती जपानमध्ये निर्माण झाली आहे. जपानमध्ये निसर्गानेच देश बुडवला आहे. तर भारतात मात्र विविध घोटाळे, भ्रष्टाचार, काळा पैसा साठविणे, कर चुकवेगिरी आदी विविध प्रकाराने माणसांकडूनच मानव-निर्मित सुनामी येऊन यातच बहुदा देश बुडवला जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मंगळवार, १५ मार्च, २०११
ऍम्युझमेंट क्षेत्रातील कंपन्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज: भुजबळ
मुंबई, ता. १५ - ऍम्युझमेंट क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजक कंपन्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. असे मत राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे व्यक्त केले. इंडियन असोसिएशन ऑफ ऍम्युझमेंट पार्क्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने गोरेगाव (पूर्व) येथे आयोजित अकराव्या "ऍम्युझमेंट एक्स्पो" या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी श्री. भुजबळ बोलत होते.
यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, तंत्रज्ञान जितक्या गतीने विकसित होते तितक्याच गतीने ऍम्युझमेंट (मनोरंजन) उद्योगांनी या तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्या विविध उपक्रमात सुद्धा सातत्याने नाविन्यपूर्णता आणि अभिनवता आणण्याची गरज असते. तसे झाले तरच एकदा येणारा पर्यटक, ग्राहक पुन्हा तिथे येईल. तसेच नवीन ग्राहकांची देखील भर पडेल. ग्राहकांची सुरक्षितता जपण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान अवलंबिण्याची गरज आहे.
सुमारे पाच हजार कोटिंचा ऍम्युझमेंट उद्योगाच्या आशिया-पॅसिफिक विभागातील वृद्धीचा दर ५.५ टक्के प्रतिवर्ष इतका आहे. तोच युरोपसह अन्यत्र ५ टक्के आहे. म्हणूनच अनेक परकीय गुंतवणुकदार कंपन्या भारतात या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. देशात महानगरांसह छोट्या-छोट्या खेड्यांमधील नागरिकांचा ओढाही ऍम्युझमेंट पार्ककडे वाढू लागला आहे. त्यांना आवश्यक त्या मनोरंजन सुविधा उपलब्ध करण्यासाठी देशातील व परकीय उद्योजकांनी गुंतवणुक करण्याची गरजही भुजबळ यांनी प्रतिपादित केली.
कार्यक्रमास एयएएपीएय चे संस्थापक सदस्य अशोक गोयल, अरुणकुमार मुच्छला, बलवंत चावला, एमजीएम आनंद, राजन शाह, ट्रेड शो समितीचे चेअरमन अजय सरीन आदी मान्यवर आणि देशातील उद्योजकांसह १४ देशांमधील उद्योजक उपस्थित होते.
उपनिबंधक राजेंद्र मगर यांचे निधन
सोमवार, १४ मार्च, २०११
chintan...Dr. Nikam Smriti Pusarkar..
Chintan Group's Sevaprabodhini's Dr.Da.Vi.Nikam Smriti Puraskar presented to Nitesh Bansode (Nagar's Savli orgzn working for children hailing from HIV positive families ).Rajjyotishi Puraskar prsntd to Vijaykumar Swami at hands of MP Ranjitsinh Mohite Patil & Prabhat Editor Arun Khore. Also present were Sadanand More,D.V.Atre,Dilip Jagtap,Rahul Shinghavi, Ravi Chowdhary,Pandurang Kolage,Satish Gadale,Sunanda Gadale,Lokmat Pune Editor Vijay Bawiskar Ulhas Latkar,Hari Chikne,etc.Chintan Thorat anchored show. Swati Thorat gave vote of thanks.Abhinandan Thorat envisaged various activities of Chintangroup in his speech. On the dias were MP Ranjitsinh Mohite-Patil,Appa Dingankar, Arun Khore,Leelatai Nikam, and awardees.
रविवार, १३ मार्च, २०११
99 + 1 = 100...बस्स...!!!
शुक्रवार, ११ मार्च, २०११
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...
