प्राध्यापक होण्यासाठी यापुढे नेट परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक होणार असून याप्रमाणेच राजकारणात देखील निश्चित स्वरूपाचे शिक्षण अनिवार्य करणे आवश्यक आहे.
देशातील निरक्षरतेचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. पूर्वी केवळ इयत्ता दहावी मॅट्रिक उत्तीर्ण किंवा दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या व्यक्तीकडे आदराने पाहिले जात होते. अर्थात तेव्हा परिस्थिती देखील तशीच होती. परंतु सातत्याने होणारा विकास, शिक्षणासाठी शासनाने उचललेली पावलं, बदललेलं समाज-मन यामुळे आज निरक्षरतेचे प्रमाण कमी होऊन साक्षरता वाढली आहे. काही ठिकाणी आजही रात्रशाळांमध्ये अभ्यासवर्ग घेतले जातात. काळाच्या ओघात दहावीचे शिक्षण म्हणजे नाममात्र शिक्षण झाले असून आता उच्च शिक्षा विभूषित व्यक्तीकडे आदराने पाहिले जाते. पूर्वीचा "गावचा पोर्या" आता गावात साहेब होऊन कर्तव्य बजावतोय, परदेशात सेवा देऊन गावाचे, देशाचे नाव उज्ज्वल करतोय.
पूर्वीची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी सुद्धा आता पूर्णपणे शंभराच्या घरात पोहोचली आहे. ५०% गुण म्हणजे भरपूर झाले... असा समज आता गैर झाला आहे. आता प्रचंड स्पर्धा असून ९०%, ९५%, ९९.९९% गुण प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यासाठी आपल्या पाल्याला वाट्टेल ते शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा पालकांचा, क्वचित प्रसंगी शैक्षणिक संस्थेचा प्रयत्न असतो. अवघ्या पाच वर्षांपूर्वी देखील पीएच. डी. करणारी व्यक्ती म्हणजे प्रचंड विद्वान् असे मत असलेला प्रवाह आज बदलून त्याही पलिकडे गेला आहे. जागतिकीकरणामुळे पीएच. डी. आता मागे पडण्याच्या मार्गावर आहे अर्थात पीएच. डी. करणे म्हणजे पोरखेळ नाही ही बाब वेगळी लिहायची गरज नाही. परंतू हुशारीच आजकाल वाढली असल्याचे आजकाल नवीन पिढीवरून दिसून येते. शाळा, कॉलेजमध्ये शिकवताना शिक्षक, प्राध्यापक काही चुकल्यास विद्यार्थीच त्यांना त्याविषयी सांगतात...इतकी आजकालचे विद्यार्थी तयार असतात.
न्यायालयाने बहुदा अशा विविध गोष्टींचा सखोल अभ्यास करूनच प्राध्यापक होण्यासाठी भविष्यकाळात एम.फील., पीएच. डी. अशा पदव्या पुरेशा न ठरवता राष्ट्रीय चाचणी परीक्षा म्हणजेच 'नेट' परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचा निर्णय दिला असावा.
देशाचे राजकारण आणि राजकारणी जगात विख्यात असून कमी शिकलेली व्यक्ती राजकारण करते असे धोरण आता चुकीचे ठरले आहे. राजकारणातही शिक्षीत मंडळी, युवक प्रवेश करू लागले आहेत. राजकारणावर केवळ एखादे गाव नाही, तर संपूर्ण देशाचे भवितव्य देखील अवलंबून असू शकते. देशासाठी अथवा गावासाठी घेतलेला निर्णय, एखादे सत्कार्य होण्यासाठी, उपक्रम, योजना राबविण्यासाठी अडचणी येत असल्यास शासनासमोर संसद, विधानसभेत चर्चारुपाने मांडून त्यावर उपाययोजना करणे, समस्या सोडविणे आणि निर्णय घेणे महत्वाचे असते. जनतेचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेला राजकारणीच हे करू शकतो. परंतू सोबत शिक्षणाची जोड असल्यास व्यक्तीमत्व विकासासह देशाचा विकास देखील सहज होईल, हाच विश्वास!
बुधवार, ८ डिसेंबर, २०१०
वाराणसी ब्लास्ट- पुन्हा शांत का आहे सरकार?
वाराणसी येथे काल (ता. ७) संध्याकाळी बॉम्बस्फोट होऊन दोन ठार तर सुमारे २५ जखमी झाले. दोन जीवंत बॉम्ब जप्त करण्यात आले. दरम्यान याप्रकरणी दोन संशयितांना सुरक्षा यंत्रणेने ताब्यात घेतले आहे.
या हल्ल्याची जबाबदारी एका अतिरेकी संघटनेने स्वीकारल्यानंतर देखील सरकारने कठोर पावले उचलण्याऐवजी केवळ शांततेचे आवाहन केले आहे. मुंबईवर २६-११ चा भीषण हल्ला होऊन देखील तेव्हा संधी असूनही आणि पुरावे उपलब्ध असून देखील पाकिस्तान विरुद्ध कोणतीही कारवाई झाली नाही. आता पुन्हा एकदा या माध्यमातून संधी आहे. सरकारने शांत न बसता काहीतरी करण्याची गरज आहे.

मंगळवार, ७ डिसेंबर, २०१०
आजपर्यंतचे मुख्य निवडणूक आयुक्त
1. सुकुमार सेन : २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८
2. के.व्ही.के. सुंदरम : २० डिसेंबर १९५८ ते ३० सप्टेंबर १९६७
3. एस.पी. सेन वर्मा : १ ऑक्टोबर १९६७ ते ३० सप्टेंबर १९७२
4. डॉ. नागेन्द्र सिंह : १ ऑक्टोबर १९७२ ते ६ फेब्रुवारी १९७३
5. टी. स्वामीनाथन : ७ फेब्रुवारी १९७३ ते १७ जुन १९७७
6. एक्स.एल. शकधर : १८ जुन १९७७ ते १७ जुन १९८२
7. आर.के. त्रिवेदी : १८ जुन १९८२ ते ३१ डिसेंबर १९८५
8. आर.व्ही.एस. पेरी शास्त्री : १ जानेवारी १९८६ ते २५ नोव्हेंबर १९९०
9. श्रीमती व्ही. एस. रमादेवी : २६ नोव्हेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९०
10. टी.एन. शेषन् : १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६
11. एम. एस. गिल : १२ डिसेंबर १९९६ ते १३ जुन २००१
12. जे. एम. लिंगदोह : १४ जुन २००१ ते ७ फेब्रुवारी २००४
13. टी. एस. कृष्णमूर्ती : ८ फेब्रुवारी २००४ ते १५ मे २००५
14. बी.बी. टंडन : १६ मे २००५ to २८ जुन २००६
15. एन. गोपालस्वामी : २९ जुन २००६ ते १९ एप्रिल २००९
16. नवीन चावला : २० एप्रिल २००९ पासून अद्याप...
यापैकी टी. एन. शेषन् यांनी निवडणूक आयोगाचे महत्व शासन व मतदारांना पटवून दिल्यापासून नागरीक निवडणूक आयोगाबाबत जागरूक झाले. टी. एन. शेषन् यांची कारकीर्द महत्वाची मानली जाते.

मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर
मुंबई, ता. ६- लोकसभेचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार मनोहर जोशी यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी सांगितले आहे. मनोहर जोशी यांच्यावर दोन दिवसांपूर्वी लिलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. कृषिमंत्री शरद पवार, महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायण, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, राज्यसभेच्या माजी उपसभापती नजमा हेपतुल्ला यांनीही दूरध्वनीवरून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी तसेच शिवसैनिकांनी जोशी यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. माजी उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनीही श्री. जोशी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली.
सरबजितसिंग याच्या जगण्याच्या आशेला पालवी
(वृत्तसंस्था)- अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये तुरूंगात जीवंतपणीच जगण्याची आशा मावळलेल्या भारतीय वंशाच्या सरबजितसिंग याच्या जगण्याच्या आणि तुरूंगातून सुटका होण्याच्या आशेला पालवी फुटली आहे. त्याच्या वकीलांनी दिलेल्या माहितीमुळे त्याच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
काही वर्षांपूर्वी लाहोर येथील बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सरबजितसिंग याला न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. संबंधित प्रकरणात मनजितसिंग ही व्यक्ती खरा आरोपी असल्याचे सरबजितसिंग याचे वकील ओवेस शेख यांनी सांगितले असून ते लवकरच तसे पुरावे देखील न्यायालयात सादर करणार आहेत. मनजितसिंग सुमारे तीन वर्षे कॅनडा पोलिसांच्या ताब्यात असून, तो बॉम्बस्फोटाच्या वेळी लाहोरमध्ये होता असे पुरावे सापडल्याचे शेख यांनी सांगितले. सरबजितसिंग याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासाठी भेटवस्तू बनविल्या असून त्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येतील असेही ते यावेळी म्हणाले.

सोमवार, ६ डिसेंबर, २०१०
महापरिनिर्वाण दिनानिमित्त सीडी प्रकाशन
सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र संघाचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
नागपूर, ता. ५- अमृतसर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने सुवर्णपदक पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्री व खोखो असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या मुलींनी या स्पर्धेत कौशल्यपूर्ण खेळ दाखवत आपली चुणूक दाखविली आहे. त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे. कर्णधार निकिता पवार, प्राजक्ता कुचेकर, पौर्णिमा सपकाळ आदींचा संघात समावेश होता. चंद्रकांत कांबळी यांनी मार्गदर्शक म्हणून तर एस. जी. भास्करे यांनी व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.
नवीन पनवेल येथे शहीद तुषार चव्हाण उद्यानाचे पालकमंत्री तटकरे यांच्या हस्ते उदघाटन
नवीन पनवेल, ता. ५- येथील सेक्टर-११ मध्ये लेफ्टनंट तुषार शामराव चव्हाण नूतनीकृत उद्यानाचे राज्याचे जलसंपदामंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल तटकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. सिडकोचे अध्यक्ष नकूल पाटील अध्यक्षस्थानी होते.
यावेळी श्री. तटकरे म्हणाले, की भविष्यातील गरज ओळखून भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर सिडकोचा भर आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होणार असल्यामुळे सिडकोची जबाबदारी भविष्यात वाढणार आहे. नवी मुंबईचा विकास करताना सिडकोने प्रामुख्याने लोकोपयोगी मोकळ्या जागेवर सौंदर्यात भर घालणार्या उद्यानांची निर्मिती केल्यामुळे आजचा क्षण आपण पहात आहोत.
सिडकोचे अध्यक्ष नकूल पाटील म्हणाले, की नवीन पनवेल येथील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाकरिता सकारात्मक विचार केला जात आहे. कार्यक्रमास नगरपरिषद अध्यक्ष सुनिल मोहोड, नगरसेविका शशिकला सिंह, शहीद लेफ्टनंट चव्हाण यांचे आई-वडिल, सिडकोचे मुख्य अभियंता ए. एस. पाटील, अतिरिक्त मुख्य अभियंता संजय चौधरी, जनसंपर्क अधिकारी डॉ. दिलीप वाटाणे, उद्यान अधिकारी टी. आर. कांबळे आदी उपस्थित होते. आभार सिडकोचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी केले.

जैतापूर प्रकल्पामुळे कोणतीही हानी नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर, ता. ५- जैतापूर प्रकल्पामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. विधान परिषद अधिवेशन प्रसंगी पत्रकारांच्या सुयोग या निवासस्थानी पवार यांनी दिलेल्या सदिच्छा भेटीत एका प्रश्नावर आपले मत व्यक्त केले.
जैतापूर प्रकल्पामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नसून नागरीकांचा फायदाच होणार आहे. अणू ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांनीही या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. राज्याला डिसेंबर २०१२ पर्यंत भारनियमनमुक्त करण्याचे शासनाचे नियोजन आहे. राज्याच्या विविध भागात कार्यान्वित होणार्या नवीन ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमुळे राज्याला वीज उपलब्ध होईल. याचबरोबर वाढीव वीज मिळण्याची विनंती देखील केंद्राकडे करण्यात आली आहे. साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पातून वीज निर्मिती केली जात आहे. फीडर सेपरेशन, सिंगल फेजिंग आदी सुधारणाही केल्या जात आहेत. दरवर्षी होणारी विजेची मागणी ध्यानात ठेवूनच नियोजन करण्यात आले आहे.
आपले मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी चांगले ट्यूनिंग असून त्यांच्या संसदेच्या अनुभवामुळे राज्यातील जनतेला चांगला रिझल्ट मिळेल असे पवार यांनी सांगितले. यावेळी सुयोग शिबिर प्रमुख प्रविण पुरो, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक शिवाजी मानकर उपस्थित होते.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...