शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०१०
लहुजींनी ज्ञानप्रसार केला: प्रा. हरी नरके
मुंबई, ता. १८- महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक चळवळीमध्ये क्रांतीवीर लहुजी साळवे यांनी वस्त्यावस्त्यात जाऊन शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचे काम केले. असे प्रतिपादन प्रसिद्ध संशोधक प्रा. हरी नरके यांनी केले. मुंबई येथे क्रांतीकारक लहुजी साळवे यांच्या २१६ व्या जयंतीनिमित्त भारतीय बहुजन परिषदेच्या वतीने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी प्रा. नरके म्हणाले, की जोतीराव-सावित्रीबाईंना घर सोडावे लागले, तेव्हा लहुजी त्यांच्या मदतीला धावले नसते तर फुले यांचा कार्य बंद पडले असते. आपल्या शैक्षणिक चळवळीचे प्रेरणास्थान म्हणून जोतीराव लहुजींना गुरूस्थानी मानत होते. साहित्यिकांना सध्या देण्यात येणारे वाड्.मय पुरस्कार इंग्रज सरकारला सुरू करायला लावण्यात लहुजींचा मोठा हातभार होता.
मुक्ता साळवे या दलित साहित्यातील आद्य लेखिका असून त्यांचा निबंध दीडशे वर्षांपूर्वी राज्यात गाजला होता. परिक्षेतील पुरस्कार स्वीकारताना आपल्याला खाऊच्या खेळण्याचे बक्षिस नको, तर शाळेला ग्रंथालय द्या अशी मागणी मुक्ताने केली होती. ब्रिडीश राजवटीत दक्षिणा प्राईज कमेटीतर्फे पुरोहितांना दिल्या जाणार्या दक्षिणेतील काही रक्कम ग्रंथ पुरस्कारासाठी केली जावी अशी मागणी लोकहितवादी व त्यांच्या सहकार्यांनी सरकारकडे केली होती.
साहित्य हे संस्कृतीच्या जनुकांचे वाहक असते. सहिष्णुता आणि भलेपणाची वृत्ती जागती ठेवण्याचं काम लेखक करतो. साहित्य संमेलन म्हणजे एक प्रकारे सामुहिक उमदेपणाचा उत्सव असतो. वाचन ही एक कला असून वाचनात मागे असलेले लोक समाज उपद्रवात पुढे जातात. अणूबाँबच्या स्फोटापेक्षाही जगाला निरक्षरतेचा धोका मोठा आहे. निरक्षरता मानवी संस्कृतीला धोक्यात टाकते असे प्रतिपादन प्रा. नरके यांनी यावेळी केले.
कुसुम कपोले यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. बाबासाहेब गोपले यांनी १५ ठराव मांडले. स्वागताध्यक्ष अप्पासाहेब अवचारे, विकास तांबे, साहित्यिक दया हिवराळे, संपत जाधव, शरद जाधव यांनी मनोगत मांडले. प्रास्ताविक व आभार व्यंकट शिंदे यांनी मानले.

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०
कांद्याने न चिरताच रडविले...
गेल्या महिन्यात परतीच्या मान्सून नंतर पावसाळा संपला असल्याचे हवामान खात्याने सांगितले होते. पावसाळा संपून आता हिवाळा सुरू होणार असे वाटत असतानाच पुन्हा एकदा तटवर्ती क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशात अनेक ठिकाणी अकाली पाऊस झाला. परिणामी सर्वाधिक नुकसान कांदा, मिर्ची चे झाले. बाजारपेठेत जाणार असलेला आणि बाजारपेठेत जाऊन विक्रीच्या बेतात असलेला कांदा पावसात भिजला. मुसळधार पाऊस पडेल अशी सुतराम शक्यता, शंका शेतकरी व व्यापार्यांना नसल्यामुळे कांदा ओला होऊन मोठ्या प्रमाणावर कांदा फेकून द्यावा लागला आहे. यातही चांगला कांदा गवसतो का? या आशेने गरीब नागरीक चांगल्या कांद्याच्या शोधात आहेत. तोंडचा घास गेल्यामुळे कांद्याने न चिरताही डोळ्यात पाणी आणल्याची अर्थातच रडविल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०
बकरी ईद, एकादशीनिमित्त शासनाच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बकरी ईद व कार्तिकी एकादशीनिमित्त राज्यातील जनतेस शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान ईदनिमित्त ठिकठिकाणी मुस्लीम बांधवांनी सकाळी नमाज अदा करून देशाच्या विकास आणि एकजुटीसाठी प्रार्थना केली. पंढरपूर येथे दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनातर्फे ध्वनीक्षेपकावरून सूचना देण्यात येत होत्या.
मध्यंतरी अकाली पाऊस पडल्याने पीकाचे नुकसान होऊन अनेक शेतकर्यांच्या तोंडचा घासच जणू ओढला गेला. यामुळे आता तरी पाऊस पडू नये अशी आळवणी काही भाविकांनी यावेळी केली. मंदीर परिसरात गुलाबाच्या फुलांना प्रचंड मागणी होती.

कबड्डी विजेत्या-उपविजेत्या संघाचे उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक
मुंबई, ता. १६- जम्मू येथे झालेल्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या विजेत्या उपविजेत्या संघाचे उपमुख्यमंत्री पवार यांनी कौतुक केले.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची धुरा सांभाळत असतानाच उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दोन्ही संघाने आपल्याला ही विजयाची बहुमोल भेट दिली असल्याचे प्रतिपादन यावेळी पवार यांनी केले. मुलांच्या संघाचे प्रशिक्षक प्रशांत मोकल, कर्णधार अक्षय उघाडे, मुलींच्या संघाचे प्रशिक्षक संतोष शिर्के, कर्णधार प्राजक्ता तापकिर आदी उपस्थित होते. असोसिएशनचे सरकार्यवाह मोहन भावसार यांची चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कबड्डीचे तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०१०
मंत्र्यांचा कँपस इंटरव्ह्यू एक चांगला पायंडा...
राज्याच्या मंत्रीमंडळात समाविष्ट करून घेण्यासाठी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये इच्छुक (उमेदवार) मंत्र्यांचे कँपस इंटरव्ह्यू घेण्यात आले. अनेक मंत्र्यांनी आपल्या कार्याची तर काही मंत्र्यांनी आपल्या कामाची, कामगिरीची फाईलच यावेळी दाखविली, काही मंत्र्यांनी बाहेर व्यवस्थित अभ्यास करून प्रवेश केल्यानंतर आपल्या कामांचा पाढा म्हणून दाखवला. काहीही असो...शिक्षणाचा कुठे ना कुठे फायदा तर झाला?
शंभर टक्के शिक्षीत आणि गुन्हे दाखल नसलेल्या उमेदवारासच भविष्यकाळात निवडणुकीत (मग ती गावपातळीपासून थेट दिल्लीपर्यंत, कोणतीही असो) तिकिट देण्याची पद्धत सुरू करणे काळानुसार आवश्यक आहे. परिणामी घाणेरड्या राजकारणापासून दूर राहून देशाचा विकास खर्या अर्थाने करणे सहज शक्य होईल, हीच अपेक्षा.

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०१०
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्र्यांचाही "आदर्श"
आपल्या अभिनंदनाचे होर्डिंग, बॅनर काढण्याच्या सूचना नवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
या सूचनेची त्वरीत अंमलबजावणी कार्यकर्ते आणि महापालिकेने केली असून आतापर्यंत सुमारे पाच हजार होर्डिंग, बॅनर, काढण्यात आले आहेत. ही बाब खरोखर स्तुत्य असून आदर्श ठरली आहे. राज्यातील अन्य नेत्यांनी देखील हे ध्यानात घेऊन तशी कृती करावी.

अशोक चव्हाण यांना मंत्रीमंडळात न घेण्याचा "आदर्श"...?
आदर्श गृहनिर्माण संस्था प्रकरणी राजीनाम द्यावा लागलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नवीन मंत्रीमंडळात समावेश न करण्याचे काँग्रेसने जवळपास निश्चित केले आहे.
नवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्ली येथे काल काँग्रेस मुख्यालयात पक्षश्रेष्ठींशी नूतन मंत्रीमंडळातील समाविष्ट करण्यासंदर्भात मंत्र्यांविषयी चर्चा केली. यामुळे अनेक मंत्री दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात तळ ठोकून होते. परंतु माजी मुख्यमंत्री यांचा नूतन मंत्रीमंडळात समावेश न करण्याचे संकेत मुख्यालयाने दिले आहेत. भ्रष्टाचार करणार्यांची गय नाही, असा आदर्श काँग्रेस घालून आपली प्रतिमा बदलवू इच्छित असल्याचे हे द्योतक असल्याचे मत ज्येष्ठ काँग्रेसजन व्यक्त करीत आहेत.

रविवार, १४ नोव्हेंबर, २०१०
शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०१०
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ग्वांगझू सज्ज- ४७६ सुवर्ण पदकांचा निर्णय
ग्वांगझू, ता. १२- आजपासून (ता. १२) सुरू होणार्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी चीन सज्ज झाले आहे. ग्वांगझू सह चीन मध्ये स्पर्धा होणार्या सर्व ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे पावसाचे ढग विखुरणारी पाच विमाने देखील यात सामील करण्यात आली आहेत. यासह पाऊसरोधक रॉकेट्स देखील सज्ज ठेवण्यात आली आहेत. नुकत्याच भारतात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या त्रुटींचा देखील अभ्यास करून उणीवा दूर करण्यात आल्या आहेत. १२ ते २७ नोव्हेंबरपर्यंत १५ दिवस स्पर्धा चालणार आहेत. यावेळी एकूण ४७६ सुवर्णपदकांचा निर्णय होईल.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...