मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवी मुंबई येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी

मुंबई, ता. 28 - येत्या एक मे स महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर नवी मुंबई येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षस्थानी असतील. नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पातील ११.१० किमी लांबीच्या व ११ स्थानकांचा समावेश असलेल्या "बेलापुर ते पेंढार" मार्गिका क्रमांक एक चे भूमिपूजन यावेळी करण्यात येणार आहे. सेंट्रल पार्क मेट्रो रेल्वेस्थानक (नियोजित) सेक्टर - २४, खारघर, नवी मुंबई येथे रविवारी (ता. १) संध्याकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असून यावेळी, जलसंपदामंत्री व रायगडचे पालकमंत्री सुनिल तटकरे, राज्य उत्पादन शुल्क व ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, सिडको अध्यक्ष नकुल पाटील, नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्यासह खासदार गजानन बाबर, संजीव नाईक,  आमदार व सिडको चे संचालक सुभाष भोईर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विवेक पाटील, संदीप नाईक, आदी म...

मध्य प्रदेशही तापले...

गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशात दिवसाचे कमाल ३८ अंश सेल्सिअसवर स्थिरावलेले तापमान वाढून काल (ता. २८ एप्रिल) कमाल ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काही भागात पारा ४१ अंश सेल्सिअसवर सरकला आहे. उन्हामुळे दुपारी रस्त्यावर वर्दळ कमी झाली असून अनेक ठिकाणी ऊसाचा रस, कोल्ड्रिंक, शीत पेयांची दुकाने थाटलेली दिसत आहेत. काही भागात दिवसातून अनेकदा विद्युत पुरवठा खंडीत होत असून रात्रीही डासांचा त्रास होत असल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. नागरी वस्त्यांमध्ये डासांचा उपद्रव झाला असून नागरीकांनी प्रशासनाकडे परीसरात स्वच्छता करण्याची मागणी केली आहे.

सुट्टीची भटकंती...(७)

आज सकाळी माझी तब्येत जरा बिघडली होती. पोटही बिघडलं होतं थोडं...। असं वाटलं की काल हॉटेलचं खाल्लेलं पचलं नसावं. आज जेवण न करण्याचा विचार करून मी मामीला तसं सांगितलं. मामी म्हणाली, अरे काही नाही..दुपारपर्यंत सगळं ठीक होईल बघं. इकडे ये बरं जरा...। मी मामीने बोलावल्यानंतर मामीच्या मागोमाग माजघरात गेलो. तिथे कपाटावर एक पेटी ठेवली होती..हीच पेटी माझ्यासाठी जादूची पेटी ठरली आणि मी दुपारी आंब्याच्या रसावर ताव मारला...ही पेटी म्हणजेच आपण ऐकून असलेला "आजीबाईचा बटवा" होता. नेहमी नाही पण केव्हातरी गरज भासत असल्यामुळे पेटीरुपी हा आजीबाईचा बटवा मामीने वर ठेवला होता. मी उंच असल्यामुळे आणि मामासुद्धा शेतावर गेलेला असल्यामुळे मलाच ही पेटी खाली काढायला मामीने सांगितलं. यातलं एक औषध मामीने मला दिलं त्यावर गरम पाणी प्यायलो आणि काय? अकराच्या सुमारास एकदा 'तिकडे' जाऊन फटाक्यांच्या आवाजासह सारं काही मस्त होऊन पोट मोकळं झालं, त्यानंतर थोड्या वेळातच पुन्हा एकदा छान वाटू लागलं. मामीने मला एक चूर्ण दिलं होतं हे चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतलं. नेमकं कोणतं चूर्ण असेल याची उत्कंठा शिगेला पोहोचल्यामु...

नारायण आठवले यांच्या निधनामुळे पत्रकारितेच्या क्षेत्राची मोठी हानी - छगन भुजबळ

मुंबई, दि. 28 : ज्येष्ठ पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक नारायण आठवले यांच्या निधनामुळे पत्रकारिता व साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. व्यक्तिगत पातळीवर माझा एक चांगला मित्र काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, नारायण आठवले यांनी भारतीय स्वातंत्र्यलढयाबरोबरच गोवा मुक्ती संग्रामातही सक्रिय योगदान दिले. 'लोकमित्र', 'लोकसत्ता' या दैनिकांतील पत्रकारितेबरोबरच 'गोमंतक'चे संपादक म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले. विविध सामाजिक, राजकीय विषयांवर त्यांनी सोप्या भाषेत परंतु अत्यंत नि:पक्षपाती व परखड लिखाण केले. सत्तरच्या दशकात आम्ही चालविलेल्या 'प्रभंजन' या साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही नारायण आठवले यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली. या साप्ताहिकात 'अनिरुध्द पुनर्वसु' या टोपणनावाने त्यांनी केलेले ललित लेखन त्या काळात खूप गाजले. 'चित्रलेखा'मधील त्यांचे लेखही चांगलेच गाजले. सन 1996मध्ये शिव...

सुट्टीची भटकंती...(६)

...सकाळी उठून गावात फेरफटका मारावा या उद्देशाने तयार झालो आणि गावात गेलो. अगदी गावाच्या सीमेपर्यंत पोहोचलो. गावाच्या सीमेवर अगदी टिप्पीकल वास येत होता...तसाच उलट पावली परत फिरलो. शासनाची शौचालयासंदर्भात असलेली योजना स्वीकारण्यास अजूनही ग्रामस्थ मंडळी तयार नाहीत असं दिसलं. ठराविक घरांमध्येच किंवा घराबाहेर सिट्स बसविल्याचं लक्षात आलं. खरंतर शासनाच्या अनेक चांगल्या योजना असतात, पण त्या व्यवस्थित राबविल्या जात नसाव्या किंवा पोहोचत नसाव्या. खर्च तर होऊन जातो, हे मी तुम्हांला मागेही सांगितलंच (कदाचित हा उल्लेख अनेकदा होईल). हो, एक मात्र आहे. शासनाने ग्राम स्वच्छता चांगल्या प्रकारे राबविणार्‍या ग्रामपंचायतीला, पालिकेला बक्षिस, पुरस्कार, काही सवलती जाहीर केला असल्यामुळे अनेक गावं ही योजना चांगल्या प्रकारे कशी राबवता येईल, यशस्वी कशी होईल याचा विचार करतात आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीही करतात. या गावात सुद्धा तसंच चित्र होतं. गावात ठिकठिकाणी गल्लीच्या कोपर्‍यावर कचरा-कुंडी ठेवली होती. तसंच कचरा गोळा करण्यासाठी दररोज सकाळी ठराविक वेळेत कचरा उचलणारी गाडी, कर्मचारी किंवा घंटागाडी येत होती. ही घंटागाडी ...

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी डंकन फ्लेचर

झिंबाब्वे चे माजी कसोटीपटू डंकन फ्लेचर यांची भारतीय संघाचा कोच (प्रशिक्षक) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी ही नियुक्ती असेल. श्री. फ्लेचर यांनी यापूर्वी इंग्लंड संघाचे प्रशिक्षकपद सुमारे आठ वर्षे भूषविले आहे. अधिक माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही.

सुट्टीची भटकंती...(५)

आज सकाळी मला जाग आली, ती कोणाच्या तरी भांडणामुळे...। ओसरीवर जाऊन पाहिलं तर, सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून दोन महिलांमध्ये भांडण सुरू होतं. पाण्यासाठी नंबर लावण्यावरून हे भांडण असल्याचं लक्षात आलं...इथे विषय भांडणाचा असला, तरी ग्रामीण भागात अजूनही विशिष्ट वेळेत ग्रामपंचायत पाणी पुरवठा करते. आजकाल शहरांमध्येही असंच चित्र पहायला मिळतं. ग्रामीण भागात मात्र अन्य वेळात पाण्याच्या टाकीखाली असलेल्या नळावरून किंवा पाणवठ्याच्या जागेवरून पाणी आणावं लागतं. आजकाल तसं सगळ्याच ठिकाणी 'ससे' अर्थात समाजसेवक झाले आहेत, ते टँकरद्वारे पिण्याचे पाणी अथवा वापरण्यासाठी पाणी उपलब्ध करून देतात, हे वेगळं. तसंच जमीनीत बोअरिंग करून सुद्धा गेल्या दशकापासून खासगी रितीने स्वतःसाठी पाणी उपलब्ध करून घेतलं जातं. मामाच्या गावात फिरताना काही ठिकाणी गोबर गॅस ही संकल्पना दिसली. गावामध्ये जवळपास प्रत्येकाकडे गाई, म्हशी असतातच. यांच्या शेणापासून गवर्‍या थापून झाल्यानंतर उर्वरित शेण या गॅससाठी वापरलं जातं, तसंच बर्‍याचदा प्लॅस्टिक विरहित कचरा सुद्धा लोक यात टाकताना दिसतात. पण यामुळे पैशाची बचत होते असं म्हणतात. याल...

मलंग गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉली प्रकल्पास अंतिम मंजूरी: कामाला लवकरच सुरवात

हाजी मलंगगड (ता. अंबरनाथ, जि. ठाणे) येथे येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक फ्युनिक्युलर यंत्रणा बसविण्याच्या प्रकल्पास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत काल (ता. २५) अंतिम मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरवात करता येणार आहे. राज्यातील उंचावरील देवस्थानांच्या ठिकाणी फ्युनिक्युलर ट्रॉली बसविण्याची संकल्पना मांडणार्‍या सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा यासाठी मोलाचा ठरला आहे. हाजी मलंगगडासह सप्तशृंगी गड, माहुर गड आणि जेजुरी या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी फ्युनिक्युलर ट्रॉली बसविण्याची कल्पना श्री. भुजबळ यांनी मांडली होती. सप्तशृंगी गडावरही फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम लवकरच सुरू होणार असून उर्वरित दोन गडांवरील कामेही लवकरच मंजूर केली जातील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. हाजी मलंगगड येथे प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी १० मार्च २००८ ला मिळाली असली तरीही हा प्रकल्प माथेरान इकोसेन्सिटीव्ह झोनमध्ये येत असून याला माथेरान मॉनिटरिंग कमिटी तसेच केंद्रीय वन व पर्यावरणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली...

अगोदर भारतीयांचाच विचार करावा...

शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला भारत पेट्रोल आणि डिझेल निर्यात करण्यास तयार आहे. देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेल या इंधनांचे दर वाढत आहेत.सरकारने पाकिस्तानला पेट्रोल आणि डिझेल निर्यात कऱण्याऐवजी देशातील नागरिकांना सुरळीत आणि स्वस्त पुरवठा कसा होऊ शकेल? याचा विचार गांभीर्याने करण्याची आवश्यकता आहे.

सुट्टीची भटकंती...(४)

घरी परतल्यानंतर थोडा वेळ टीव्ही पाहू म्हटलं...। पण तेवढ्यात वीज गेली...झालं...। ग्रामीण भागात सध्या जवळपास दहा तास दररोज वीज (भार-नियमन) जाते. ग्रामीण भागासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना कुठे जातात कुणास ठाऊक? बहुदा फक्त कागदोपत्रीच असाव्यात असं मला वाटतंय. शेवटच्या माणसापर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजे...हे शासनाचं धोरण कुठे गेलं? आणि इतकी वीज घालवून ग्रामीण भागावर कितीतरी अन्याय केला जातोय. बिच्चारे शेतकरी बांधव...खरंच त्यांची कीव करावी असंच वाटतं. वास्तविक गरीब असो, की श्रीमंत...सगळ्यांना भूक तर लागतेच. सगळ्यांना दररोज जेवण लागतंच. केवळ महाराष्ट्रच नाही, संपूर्ण देशच कृषि अर्थातच शेतीसाठी ग्रामीण भागावर अवलंबून आहे. परिणामी शासनाने ही बाब गांभीर्याने इतके दिवस विचारात का घेतली नाही? वीजेचा तुटवडा काही एकदम होत नाही. आपल्याला एखादा मोठा आजार व्हायचा असेल तर शरीर जसे आधी सूचना देतं, त्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र नक्की मोठा असा आजार, विकार जडतो. अगदी तस्सच इथेही आहे, पण तसं झालं तर शासन आणि राजकारण काय ते? अशा नाना प्रश्नांचं काहुर माजलं. शेवटी विचार केला, मिस्टर कूल..होण्य...

सुरेश कलमाडी यांना अटक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा प्रकरणी प्रमुख संशयित म्हणून ठपका ठेवण्यात आलेले खासदार आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना आज (सोमवार ता. २५ एप्रिल) सीबीआय ने अटक केली. सीबीआय ने कलमाडी यांना यापूर्वी अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते. आजही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहीती सूत्रांनी दिली.

सुट्टीची भटकंती...(३)

पहाटे पाच वाजताच मामाने उठवलं. मी फ्रेश होईपर्यंत मामीने चहा टाकला होता. त्या चहाला काय चव होती सांगू? व्वा. कधी नव्हे ते शुद्ध आणि धारोष्ण दूध होते त्या चहात. त्यामुळे तो चहा इतका छान लागत होता, की अगदी ३-४ कप प्यावासा वाटत होता...। शेत गावापासून थोडं दूर असल्यामुळे बाईकने जाऊ या, असं मामाने सांगितल्यानंतर मी बाईकऐवजी बैलगाडीने जाऊ असं म्हटल्यानंतर मामालाही आनंद झाला. जोडी गाडीला जुंपून पांथस्थ झालो. सकाळच्या त्या आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागातल्या त्या रस्त्यावर बैलांच्या गळ्यातली घंटा मंजूळ स्वरांनी भारल्याप्रमाणे वाजत होती, ते छान वाटत होतं. वाटेत भेटणारा जवळपास प्रत्येकजणच मामाला रामराम...। करत होता. शेत जवळ येऊ लागलं तशी कच्ची वाट लागली...आणि पाहता-पाहता आमच्यापुढे नकळत सात-आठ बैलगाड्या दिसल्या आणि मी आवाक झालो. गावाकडचे लोक किती लवकर उठतात आणि शेतावर जातात हे लक्षात येऊन काही अंशी माझी स्वतःची आणि शहराची तुलना करू लागलो...असो। ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी सकाळी सातला शेतात पोहोचलो. शेतात पोहोचल्यानंतर बैलांची जोडी मामाने एका मोठ्या झाडाखाली बांधली. आम्ही पुढे गेलो, परंतू शेत...

चिंतन ग्रुप पुणे तर्फे राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार उत्साहात

पुणे - येथील चिंतन ग्रुपतर्फे आयोजित, राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार वितरण समारंभात पुरस्कार नाशिक विभागातर्फे स्वीकारताना स्नेहलता कोल्हे.

"महाराष्ट्राचं पर्यटन" जागतिक नकाशावर...!

महाराष्ट्र शासनानं सन 2011-12 हे वर्ष 'पर्यटन वर्ष' म्हणून साजरं करण्याचं ठरवलं आहे. राज्यातल्या पर्यटन व्यवसायाला खऱ्या अर्थानं चालना मिळण्यासाठी आणि पर्यटन वर्ष यशस्वी होण्यासाठी राज्याचा पर्यटनमंत्री म्हणून मला पर्यटनाशी संबंधित सर्व घटकांचं उत्स्फूर्त सहकार्य अपेक्षित आहे. पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्या, उद्योजक, टूर ऑपरेटर्स, 'बेड ऍन्ड ब्रेकफास्ट' योजनेचे चालक, बस व टॅक्सीचालक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्व पर्यटक मंडळींचं सहकार्यही मोलाचं ठरणार आहे. सांगत आहेत महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ... (शब्दांकन व सौजन्यः आलोक जत्राटकर) ' लोकराज्य ' मासिकातर्फे यंदा एप्रिलचा अंक हा 'पर्यटन विशेषांक' म्हणून प्रकाशित करण्यात येत असल्याचं समजून अत्यंत आनंद वाटला. या विशेषांकाला मी मनापासून शुभेच्छा देतो. पर्यटन हा आजघडीला आपल्या देशातला एक महत्त्वपूर्ण उद्योग आहे. या क्षेत्रातली रोजगारनिर्मितीही मोठी आहे. पर्यटन क्षेत्रात दहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून किमान 40 प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होत असते. राष्ट्रीय सकल उत्पन्...

ये पब्लिक है...

शनिवारी (ता. २३ एप्रिल) इंदूरचा नवीन बांधण्यात आलेला भंडारी मिलचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पुलाच्या कडेला लावण्यात आलेले व लोकांनी खराब केलेले हे चित्र.

ये पब्लिक है...

शनिवारी (ता. २३ एप्रिल) इंदूरचा नवीन बांधण्यात आलेला भंडारी मिलचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पुलाच्या कडेला लावण्यात आलेले व लोकांनी खराब केलेले हे चित्र.

सुट्टीची भटकंती...(२)

सुट्टीच्या पहिल्या दिवशी ठरल्याप्रमाणे सिनेमा पाहून झाला...आठवडाभर पोटभर झोप झाली...पुढे काय? गावी मामाकडे जायचं की पुण्याला काकांकडे? असा प्रश्न पडला (तसं तर सगळ्याच नातेवाईकांनी सुट्टीत बोलावलं होतं) पण ठरवलं, की गावी जायचं... ठरल्याप्रमाणे गावी मामाकडे गेलो. शहर आणि गावाच्या वातावरणात फरक पडतोच नां..। गावात बस पोहोचल्यानंतर बस-स्टँड पर्यंत जाणार्‍या रस्त्यावर इतक्या सकाळी सुद्धा वर्दळ होती. स्टँडवर मामा घ्यायला आला होता. मामाच्या घरी जाताना वाटेत अनेकजण रामराम, नमस्कार करत होते. मनात विचार आले, खरंच किती छान..त्यानिमित्ताने संवाद तरी साधला जातो एकमेकांशी. नाहीतर, आमच्या मोठ्या शहरात अगदी घराच्या ओट्यावर बाहेर बसलेले शेजारी  तोंडातून चकार शब्द काढायला सुद्धा तयार होत नाहीत. पाहूणे म्हणून आलेल्या एखाद्या व्यक्तीने कोणाचा पत्ता विचारला तर केवळ हातानेच इशारा केला जातो किंवा खुणावले जाते. इथे तर पहा, अगदी सगळं वातावरणच जीवंत असल्यासारखं आणि चैतन्य असल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे मला नकळत हुरुप आला. कदाचित गावाच्या मातीचा आणि वातावरणाचा हा परिणाम असावा. मामाचा मोठ्ठा वाडा होता त्यामु...

गौरव पुरस्काराचा...

नवी दिल्ली येथे गुरूवारी (२१ एप्रिल) अवॉर्ड ऑफ एक्सलन्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा पुरस्कारप्राप्त पुरस्कारार्थी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या समवेत.

विजय नाहाटा यांचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव

नवी दिल्ली येथे डीजीआयपीआर महाराष्ट्र चे महासंचालक विजय नाहाटा यांना आज (२१ एप्रिल) पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, अवॉर्ड ऑफ एक्सलन्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा पुरस्कार देताना.

विहंगावलोकन

उडुनी नभी उन्हात विहंग दमले पहा दमुनी पंख्यावरी अहो बसलो मिनिटे दहा जाहलो उष्म्याने अवघा बावळा.. आहे शुभ्र पंखा..काळा मी कावळा.. .

सुट्टीची भटकंती...

उन्हाळ्याच्या सुट्ट्या अनेक ठिकाणी लागल्या आहेत. काही ठिकाणी लवकरच लागतील. आता काय? किमान पंचेचाळीस दिवस म्हणजेच दीड महिना मज्जाच मज्जा...। मध्यंतरी वार्षिक परीक्षा असल्यामुळे आम्हाला आई-बाबांनी अभ्यासाव्यतिरिक्त काहीच करू दिलं नव्हतं. तुझी परीक्षा झाल्यानंतर करायचं, ते कर..असं सांगून ते मोकळे झाले होते. परीक्षा संपली आणि काय? दरवर्षाप्रमाणे आम्ही मित्र-मैत्रिणी सिनेमाला गेलो. आजकाल तर मल्टीप्लेक्स असल्यामुळे सगळीच धमाल येते. तिकिटाचे पैसे जास्त द्यावे लागतात हे खरं असलं तरीही तिथे छान एअर-कंडीशन, पॉपकॉर्न, सूप, आईस्क्रीम, शेंगदाणे, चिप्स, कोल्ड्रिंक्स अशा सगळ्या सोयी आतल्या आतच केलेल्या असल्यामुळे मध्यांतरात रस्त्यावर जायची गरज नाही. असंही रस्त्यावर वाहनांची इतकी वर्दळ असते की रस्ता ओलांडताना अपघात झाला नाही म्हणजे सुटलो एकदाचा...असं म्हणून परत येऊन आपल्या चेअरवर बसून सिनेमा पहायचा. हो, एक मात्र आहे..पूर्वी चित्रपटगृहात असलेले उंदीर आजही मल्टीप्लेक्समध्ये आहेत. ए.सी. ची हवा खाऊन ते अजूनच गलेलठ्ठ झाले आहेत. त्यांचीही नवीन पीढी आली असेल... अनेक दिवसांपासून साचलेली झोप मी आता आठवडाभर घ...

वि.आ. बुवा यांच्या निधनामुळे उत्कृष्ट विनोदी साहित्यिक हरपला - छगन भुजबळ

  मुंबई, दि. 17 एप्रिल : ज्येष्ठ साहित्यिक वि.आ. बुवा यांच्या निधनामुळे मराठी विनोदी साहित्यसृष्टी समृध्द करणारा उत्कृष्ट साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, मराठी विनोदी साहित्यात चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे यांच्यानंतर उदयाला आलेल्या रमेश मंत्री, सुभाष भेंडे, बाळ गाडगीळ या विनोदी साहित्यिकांच्या पंक्तीमध्ये वि.आ. बुवा यांचाही अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. खुमासदार शैली, प्रासंगिक विनोद आणि अत्यंत साधी सोपी भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्टये होती. 'बुवा उवाच', 'परमेश्वराला रिटायर करा' आदी अनेक विनोदी कथासंग्रह, लेखसंग्रह, ललितसंग्रह, कादंबरी अशा विविध साहित्यप्रकारांतून त्यांनी विपुल विनोदी लेखन केले. विविध वृत्तपत्रांतून त्यांच्या स्तंभलेखनालाही मोठी वाचकप्रियता लाभली. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्यसृष्टीची मोठी हानी झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Turning Point...

धावत्या गाडीतून मोबाइलद्वारे घेतलेले छायाचित्र

डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतीस छगन भुजबळ यांचे अभिवादन

  मुंबई, दि. 14 एप्रिल : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 120व्या जयंतीनिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी दादरच्या चैत्यभूमीस भेट देऊन त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. चैत्यभूमी येथे आज सकाळपासूनच आंबेडकरी जनतेच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यावेळी चैत्यभूमीचे दर्शन घेणाऱ्या मान्यवरांमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मंत्री जयंत पाटील, मंत्री वर्षा गायकवाड, मुंबईच्या महापौर श्रध्दा जाधव, खासदार एकनाथ गायकवाड, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र वर्मा, डॉ. राजेंद्र गवई, माजी आमदार संजय दत्त, महेंद्र साळवे, चंद्रकांत कसबे, नागसेन कांबळे आदींचा समावेश होता. याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग नाक्यावरील चौकाचे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक चौक' असे नामकरण करण्यात आले. या कार्यक्रमासही मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी आंबेडकर यांच्याविषयी नरेंद्र वाबळे यांनी तयार केलेल्या विशेषांकाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या ...

देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भूमीपुत्रांना विकासातील भागीदार बनविणे आवश्यक - भुजबळ

मुंबई, दि. 14 एप्रिल : महाराष्ट्राची तसेच देशाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी भूमीपुत्रांना विकासातील भागीदार बनविणे अत्यावश्यक आहे, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे व्यक्त केले. महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ (एमईडीसी) आणि अमेरिकास्थित लॅम्ब्डा-अल्फा इंटरनॅशनल (एलएआय) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 'युज ऑफ लँड रिसोर्सेस इन द डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्रा' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय परिषदेचे उद्धाटन केल्यानंतर ते बोलत होते. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात हा उद्धाटन समारंभ झाला. विकासकामांमध्ये राजकारण आणण्याऐवजी विकासासाठी राजकारण करण्यास आपले प्राधान्य असल्याचे सांगून श्री. भुजबळ म्हणाले की, कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी जमीन हा अत्यंत मूलभूत व आवश्यक घटक आहे. शासन अथवा खाजगी विकासक या दोन्ही घटकांनी जमीनमालकांना विश्वासात घेऊन आपल्या सद्हेतूंविषयी त्यांची खात्री पटविली तर कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळे कोणताही प्रकल्प उभारत असताना तो ज्या जमिनीवर उभा करण्यात येत आहे, त्या शेतकरी, अल्...

राज्यात 3 लाख 36 हजार किलोमीटर रस्तेविकासाचे उद्दिष्ट- भुजबळ

मुंबई, दि. 13 एप्रिल : राज्याच्या रस्ते विकास योजना 1981-2001ची मुदत संपली असल्याने रस्ते विकासाचा पुढील 20 वर्षीय आराखडा तयार करण्यात आलेला असून त्यानुसार 3,36,994 किलोमीटर लांबीच्या रस्तेविकासाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत दिली. सार्वजनिक बांधकाम व पर्यटन विभागांच्या सन 2011-12च्या अर्थसंकल्पातील मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 7880.71 कोटी रुपयांच्या 11 मागण्या मंजुरीसाठी असून यापैकी 3812.68 कोटी रुपयांच्या मागण्या योजनांतर्गत तर 4068.03 कोटी रुपयांच्या मागण्या योजनेतर असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. श्री. भुजबळ म्हणाले, राज्याच्या सन 2001-21च्या नूतन रस्ते विकास आराखडयानुसार राज्यातील 100 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली खेडी किमान एका बारमाही रस्त्याने जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा आराखडा पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 1,09,000 कोटी रुपये एवढया निधीची आवश्यकता भासणार आहे. राज्याच्या वार्षिक योजनेतून उपलब्ध होणारा अल्प निधी विचारात घेता हे उद्दिष्...

भूकंपांमुळे जपानवर किरणोत्सर्गाचा धोका वाढतोय

११ मार्च २०११ ला जपानमध्ये झालेल्या मोठ्या भूकंपानंतर सावरण्याच्या बेतात असलेल्या जपानवर पुन्हा एकदा निसर्गाची कुर्‍हाड कोसळली आहे. एक महिन्याने म्हणजेच ११ एप्रिलला देखील येथे भूकंप झाला, परंतू ६.३ रिश्टर स्केल झाल्यामुळे त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. परंतू फुकूशिमा मधील किरणोत्सर्गाची पातळी दररोज वाढतच असून आता ७ झाली आहे. विविध अन्नपदार्थ, खाद्यपदार्थ, फळभाज्या, पालेभाज्यांमध्ये देखील किरणोत्सर्ग वाढल्यामुळे नागरीकांचा हा चिंतेचा विषय बनला आहे. विविध कार्यालयांमधील कर्मचार्‍यांची तपासणी देखील विशेष उपकरणांद्वारे करण्यात येत असून बाजारात सुद्धा उपकरणांच्या सहाय्याने भाज्यांची तपासणी केली जात आहे. अणूप्रकल्पाच्या सुमारे चाळीस किलोमीटर परीसरातील लोकांना आणखी दूर पाठविण्याचे नियोजन सरकार करणार आहे.

आता फक्त हल्ला...

26/11 च्या मुंबई हल्ल्यात पाकिस्तान सरकारचाच हात असल्याची कबूली अमेरिकेत सध्या ताब्यात असलेल्या तहव्वूर हुसेन राणा याने दिली आहे. मुंबई हल्ल्याचे कारस्थान पाकिस्तान सरकार आणि "आयएसआय' या गुप्तहेर संघटनेच्या पुढाकाराने रचण्यात आले अशी कबूली राणा याने नुकतीच दिल्याचे सूत्रांनी सांगितले. राणा याच्या विरुद्ध मुंबई हल्ल्याचा कट रचल्याबद्दल खटला अमेरिकेच्या एका न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. आपल्या बचावासाठी तो महत्वाची कागदपत्रं सादर करणार असून येत्या १६ मे स खटला सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. न्यायालयाभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था आतापासूनच उभारण्यात आली आहे.

50th Anniversary of the first Human SpaceFlight (12 Apr. 1961)

  युरी गागारिन युरी अलेक्सेइविच गागारिन ९ मार्च, इ.स. १९३४ - २७ मार्च, इ.स. १९६८ हा सोवियेत संघाचा अंतराळयात्री होता. युरीचा जन्म सोवियत संघाच्या ग्रामीण भागातील एका गरीब कुटंबात झाला. घरच्या परिस्थितीमुळे लहान वयातच धातूच्या ओतकामाच्या कारखान्यात फाउण्ड्रीमन म्हणून युरी काम करू लागला. अविश्रांत कष्ट आणि तीव्र बुद्धिमत्ता असल्याने एक चांगला कामगार म्हणून युरीचे नाव झाले. त्याला विमानाच्या कारखान्यात नोकरीची संधी आली. याही कामात त्याने मेहनत घेऊन नाव कमावल्याने त्याला विमानदलात घेण्यात आले. हळूहळू युरीला अंतराळवीर होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. एप्रिल १२, इ.स. १९६१ रोजी गागारिन अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने ८९ तास ३४ मिनिटे भ्रमण केले. या पराक्रमाबद्दल त्याला अनेक देशांचे पुरस्कार मिळाले. त्यात ऑनर ऑफ लेनिन आणि सोवियत संघाचा नायक या पुरस्कारांचाही समावेश आहे. वयाच्या ३४ व्या वर्षी एका विमान अपघातात युरीचा मृत्यु झाला. (सौजन्य- इंटरनेट)

महात्मा फुले जयंतीनिमित्त मंत्रालयात सुमनांजली

महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विधान भवनाच्या आवारातील पुतळ्याला आज मान्यवारानी सुमनांजलि वाहिली. विधान सभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह उपाध्यक्ष वसंत पुरके, मंत्री छगन भुजबळ, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री मधुकर चव्हाण, मुख्य सचिव अनंत कळसे आदी यावेळी उपस्थित होते.

'दै. विश्वरुप'च्या महात्मा फुले जयंती विशेषांकाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 11 एप्रिल :  महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील 'दै. विश्वरुप'ने काढलेल्या 'महात्मा' या विशेषांकाचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज सकाळी प्रकाशन करण्यात आले. श्री. भुजबळ यांच्या 'रामटेक' निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, तरुण पिढीला महात्मा फुले यांच्या कार्याची महती व माहिती ज्ञात करुन देण्याच्या दृष्टीने 'दै. विश्वरुप'ने हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. या विशेषांकास वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी संपादक सतीश धारप यांनी सांगितले की, 'दै. विश्वरुप'च्या या विशेषांकात मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्री सुनिल तटकरे, प्रा. हरि नरके, नरेंद्र दाभोलकर आदी मान्यवरांचे लेख आहेत.

बाळ देशपांडे यांच्या निधनामुळे ज्येष्ठ, जागरूक पत्रकार हरपला: भुजबळ

मुंबई, ता. ११ - ज्येष्ठ पत्रकार बाळ देशपांडे यांच्या निधनामुळे आपण एका जुन्या स्नेह्याला आणि वृत्तपत्रसृष्टी ज्येष्ठ जागरूक पत्रकाराला कायमची अंतरली आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. बाळ देशपांडे हे पत्रकारितेच्या क्षेत्रातले दीपस्तंभासारखे व्यक्तीमत्व होते. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे अनेक वर्षे सदस्य असलेल्या देशपांडे यांनी विविध वृत्तपत्रांमधून समतोल आणि अभ्यासपूर्ण लेखन केले. पत्रकारांच्या हक्काबद्दल ते अत्यंत जागरूक होते. त्यांच्या निधनामुळे तरूण पिढीला मार्गदर्शन करणारा ज्येष्ठ पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याचे श्री. भुजबळ म्हणाले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानला शासनाकडून ४० लाख रूपयांचा धनादेश प्रदान

कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रतिष्ठानाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते कुसुमाग्रज प्रतिष्ठानला ४० लाख रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. गंगापूररोड वरील कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या कार्यक्रमात प्रतिष्ठानच्या वतीने कार्यवाह लोकेश शेवडे , उपाध्यक्ष रंजना पाटील व कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते हा धनादेश स्विकारला. यावेळी जिल्हाधिकारी पी.वेलरासू , उपविभागीय अधिकारी निलेश सागर , कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास लोणारी , प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे , विश्वस्त विनायक रानडे , उपकार्यवाह विनायक जोशी , आर्किटेक्ट संजय पाटील आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष श्रीमती पाटील यांनी यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांना कुसुमाग्रजांच्या पुस्तकांचा संच भेट दिला तर श्री. लोणारी यांनी जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचे स्मृतीचिन्ह पालकमंत्र्यांना दे...

Good Morning...सुप्रभातम् ।

9 एप्रिल 2011 ला धावत्या बसमधून ओझरनजीक सूर्योदयाचे मोबाईलद्वारे घेतलेले छायाचित्र

आधी हवेत...नंतर पोटात...

  इंदूर म्हणजे मध्यप्रदेशचे पुणेच...इथेही खवैयेगिरीची अजिबात कमतरता नाही..देणाराने देत जावे..घेणाराने घेत जावे..या उक्तीप्रमाणे राजवाडा परीसरात जवळपास दररोज रात्रीचे चित्र दिसते. जसजसा सराफा बंद होण्याची वेळ जवळ येते तसतशी सराफा दुकानांपुढे विविध खाद्यपदार्थांची दुकानं थाटणे सुरू होते. मनच्युरिअन पासून अगदी पाणीपुरी, कचोरी, समोसा, खमण, मसाला डोसा, दहीवडा असे नाना पदार्थ समोर दिसल्यानंतर खाण्यासाठी कोणीही जीभेवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. खिशाचा आणि घशाचा अजिबात विचार न करता खाण्यासाठी हात सरसावतात. बस्स. हाता-तोंडाची गाठ..। सराफा परीसरात अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या जोशी वडेवाल्यांच्या दुकानासमोर तर रीघ लागलेली असते. दहीवडा तयार करताना लहरीप्रमाणे हा वडा किमान पाच ते सहा फूट हवेत उडवून नंतर तळणासाठी तेलात बुडवला जातो. तयार झाल्यानंतर पट्टकन कोणाच्या पोटात नाही गेला, तरच नवल..। ओमप्रकाश जोशी यांचे वडील रामचंद्र जोशी यांनी 1961 मध्ये कचोरीचे दुकान सुरू करून 1978 मध्ये दहीवडे तयार करणे सुरू केले. अल्पावधीतच चोखंदळ ग्राहकांनी सुद्धा त्यांच्या हाताला आणि वडा तयार करण्याच्या हातो...

कर्नाळा अभयारण्याच्या हद्दीत भुयारी मार्ग प्रस्तावित: भुजबळ

मुंबई, ता. ८ (विशेष प्रतिनिधी) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ च्या चोपदरीकरणाच्या कामामध्ये पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील कर्नाळा अभयारण्याच्या हद्दीतून जाणार्‍या रस्त्याबाबत गेले वर्षभर केंद्र शासनाकडे पाठपुरावा करूनही काही निष्पन्न न झाल्याने या वनविभागातील हद्दीपुरता भुयारी मार्ग तयार करण्याचे प्रस्तावित असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत सांगितले. सर्वश्री सुभाष देसाई, भरतशेठ गोगावले, राजन साळवी, सदानंद चव्हाण, रवींद्र वायकर, विनोद घोसाळकर, प्रकाश सावंत, सूर्यकांत दळवी, विजय शिवतारे, महादेव बाबर या सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेसंदर्भात निवेदन करताना श्री. भुजबळ बोलत होते. महाड-संगमेश्वर येथे ट्रॉमा केअर हॉस्पिटलची कामे गतीने सुरू असून लवकरच ती कार्यान्वित होतील अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली. यावेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी ट्रॉमा केअर सेंटरला परवानगी देत असतानाच त्याठिकाणी आवश्यक पदनिर्मिती तसेच आधुनिक यंत्रणा उपलब्ध करण्याची तरतूद करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांना केली. यावर, ट्र...

'धन्य धन्य ज्योतिबा फुले' सीडीचे प्रकाशन

मनमाड येथील वैशाली व महेश खरे निर्मित 'धन्य धन्य ज्योतिबा फुले' सीडीचे प्रकाशन करताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ.

अण्णांच्या आंदोलनास वीक-एन्डचा लाभ होण्याची शक्यता...

लोक-पाल विधेयकाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी दिल्ली येथील जंतरमंतर समोर गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनास या आठवड्याच्या वीक-एन्डचा (ता. ९ व १० एप्रिल) लाभ निश्चित होऊ शकतो. अण्णांचे सपोर्टर्स म्हणून युवक देखील मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. इतकेच नाही, तर बॉलीवुडमधील कलाकार देखील अण्णांना पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. शनिवारी आणि रविवारी अनेक ठिकाणी कार्यालयांना वीक-एन्डची सुटी आहे. परिणामी या कार्यालयात नोकरी करणारे अनेक युवक या दोन दिवसात अण्णा हजारे यांच्या उपोषण स्थळी भेट देऊन आपला पाठिंबा देतील, अशी शक्यता आहे.

आसाम मध्ये सर्वत्र साजरा केला जाणारा "बिहु"..

आमच्या आसामच्या मित्राने दिलेली "बिहू" विषयी थोडक्यात माहिती... प्रत्‍येक बिहू कृषि कलेन्‍डर के विशिष्‍ट अवसर पर पड़ता है। तीनों बिहू उत्‍सवों में सबसे आकर्षक, बसंत ऋतु का उत्‍सव 'बोहाग बिहू' अथवा रंगाली बिहू होता है जो मध्‍य अप्रैल में मनाया जाता है, जिससे कृषि ऋतु का प्रारम्‍भ होता है। बिहू असम के सबसे ज्‍यादा प्रचलित लोक नृत्य को दिया गया नाम है, जिसका सभी जवान व बूढ़े, अमीर व ग़रीब आनन्‍द लेते हैं। नृत्‍य बिहू उत्‍सव का अंग हैं, जो मध्‍य अप्रैल में पड़ता है। जब फ़सल कटाई होती है और जो लगभग एक महीने तक चलती है। इससे असम के कलेन्‍डर की भी शुरूआत होती है। बिहू नृत्‍य युवा लड़के व लड़कियों द्वारा खुले मैदान में किया जाता है, तथापि वे आपस में नहीं मिलते हैं। पूरा गांव नृत्‍य में हिस्‍सा लेता है, चूंकि नर्तक घर-घर में जाते हैं। इस नृत्‍य की पहचान तेजी से क़दम उठाना, हाथों को उछालना व चुटकी बजाना तथा कूल्‍हे मटकाना है जो कि युवाओं के मनोभाव का द्योतक है। कलाकार कभी-कभी गीत गाते हैं। नृत्‍य धीमी गति से आरंभ होता है, और जैसे-जैसे नृत्‍य आगे बढ़ता है इसकी गति तेज़ होती ...

What is "Jan Lokpal Bill"?

So many visitors of "Lekhani" Blog, were demanding that they want to know about "Jan Lokpal Bill". As per this demand, here tried to give few information for the same, through courtesy of internet and sources: Jan Lokpal Bill In India, the Jan Lokpal Bill (Citizen's ombudsman Bill) is a draft anti-corruption bill that would create a Jan Lokpal, an independent body like the Election Commission, which would have the power to prosecute politicians and bureaucrats without government permission. The bill was drafted by Shanti Bhushan, former IPS Kiran Bedi, Justice N. Santosh Hegde, advocate Prashant Bhushan, former chief election commissioner J. M. Lyngdoh in consultation with the leaders of the India Against Corruption movement and the civil society. The bill proposes institution of the office of Lokpal (Ombudsman) at center and Lok Ayukta at state level. The Jan Lokpal Bill is designed to create an effective anti-corruption and grievance redressal systems and t...

कोकणच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन विकासासाठी प्रभावी प्रस्ताव सादर करा: भुजबळ

मुंबई, ता. ७ - कोकणात, विशेषतः सिंधूदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढीची मोठी क्षमता आहे. तसेच कोकणच्या किनारपट्टीवर निसर्ग सौंदर्याने समृद्ध असे समुद्र किनारे आहेत. यामुळे जगभरातून पर्यटक यावेत यासाठी कोकणला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर स्थान मिळावे, यासाठी पर्यटनविषयक मोजकेच परंतू प्रभावी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. बाराव्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या निधी अंतर्गत ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधूदुर्ग या कोकणपट्टीतल्या चार जिल्ह्यांमध्ये प्रस्तावित तसेच प्रगतीपथावरील कामांच्या सद्यस्थितीचा तपशीलवार आढावा घेण्यासाठी संबंधितांची बैठक भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्ह्यातील पर्यटन, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. या आयोगाच्या शिफारसीनुसार महाराष्ट्राला सन २००६ ते २०१० या तीन वर्षांच्या कालावधीत सागरी किनारा विकासाकरिता दरवर्षी ६२ कोटी ५० लाख रुपये यानुसार २२५ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. यापैकी ठाणे रु. १८ कोटी ८९ लाख, रायगड रु. २४ कोटी ८० लाख, रत्नागिरी रु. ५२ कोटी ५७ लाख, सिंधुदुर्ग रु....

तर विश्वचषकाविषयी वास्तव सहज सामोरे येईल...

  नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेच्या चषकाबद्दल सध्या दावे-प्रतिदावे सुरू आहेत. पूर्वविजेत्या श्रीलंकेतून आलेला विश्वचषक अद्याप आपल्याच ताब्यात असल्याचे कस्टम विभागाने म्हटले आहे. तर आयसीसी आणि बीसीसीआय ने विजेत्या भारतीय संघास देण्यात आलेला चषकच खरा विश्वचषक असल्याचे म्हटले आहे. विविध वृत्तवाहिन्यांसह तज्ज्ञ मंडळी याबाबत विविध निष्कर्श काढत असून आयसीसी अध्यक्षांपासून कस्टम विभागाच्या वरिष्ठांपर्यंत सगळेच विविध विधाने करीत आहेत. हा चषक श्रीलंकेतून भारतात आणला गेल्यानंतर याची कस्टम ड्युटी २२ लाख रूपये देऊन चषक नेण्याबाबत सूत्रांना कळविण्यात आले होते. यानंतर विचाराअंती १५ लाख रूपये भरून चषक नेण्याबाबत कळविण्यात आल्याचे कस्टम विभागातर्फे सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. वास्तविक इतका घोळ घालण्याऐवजी गत विश्वचषक विजेत्या श्रीलंका संघाच्या पदाधिकार्‍यांना पाचारण करून विश्वचषकाचे खरे-खोटे सहज करता येणे शक्य आहे. याशिवाय कस्टम विभागाने आपल्या विधानाची सत्यता पडताळून दाखविण्यासाठी चषक श्रीलंकेतून आल्यानंतरची तयार झालेली कागदपत्रं अथवा पावती लोकांसमोर ठेवून वास्तव सामोरे ...

भुजबळांनी गोव्यात पाहिली जीवरक्षक दलाची प्रात्यक्षिके!

म्हापसा, गोवा, दि. 4 एप्रिल : महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांवर (बीचेस) जीवरक्षक सेवा सुरू करण्याचा आमचा मानस असून त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या समता मेळाव्याच्या निमित्ताने गोव्यात आलेल्या श्री. भुजबळ यांनी आज सकाळी येथील सिंकेरी बीचवर कार्यरत असलेल्या 'दृष्टी लाइफगाड्र्स'तर्फे करण्यात येत असलेल्या कामकाजाची, त्यांच्या यंत्रणेची प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती घेतली. त्यावेळी ते बोलत होते. श्री. भुजबळ यावेळी म्हणाले की, बीचवर आनंदासाठी येणाऱ्या पर्यटकांना पाण्याचा अंदाज न आल्यास जीवघेण्या अपघातांना सामोरे जावे लागू शकते. या पार्श्वभूमीवर गोव्यामधील विविध बीचेसवर लाईफगाड्र्सच्या माध्यमातून पर्यटकांची सुरक्षितता उत्तमरित्या जपली जात आहे. महाराष्ट्रातही अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करण्याचा विचार सुरू आहे. त्या दृष्टीने आज या सिंकेरी बीचवरील लाईफगाड्र्सच्या कामकाजाची माहिती घेतली असता यंदाच्या मोसमात एकाही व्यक्तीचा ब...

संगम..शास्त्र - संस्कृतीचा...!!!

भारतीय क्रिकेट संघाच्या विश्वविजयाने झालेला आनंद शब्दातीत- छगन भुजबळ

मुंबई, दि. 2 एप्रिल : महेंद्रसिंग धोणी याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकून सन 1983च्या विजयाची पुनरावृत्ती केल्यामुळे आपण अत्यंत हर्षभरित झालो असून आपल्याला झालेला आनंद शब्दातीत आहे. या ऐतिहासिक सोनेरी क्षणांचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले, हा माझ्यासाठी लाखमोलाचा ठेवा आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले आहे. आजच्या सामन्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने शतकांच्या शतकाचा टप्पा ओलांडला असता तर हा आनंद शतगुणित झाला असता. मात्र गौतम गंभीर याच्या 97 धावांच्या खेळीमुळे ही उणीव भरून निघाली, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. कर्णधार धोणीला या मोक्याच्या सामन्यामध्ये सापडलेला सूर आणि त्याने झळकावलेल्या मोलाच्या 91 धावा या सुध्दा संघाच्या विजयासाठी महत्त्वाच्या ठरल्या. युवराज सिंगने षटकार ठोकून विवविजेतेपदावर दिमाखात भारताचे नाव कोरले. एकूणच फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या आघाडयांवर...

गोव्यात इतर मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण लागू झालेच पाहिजे

  म्हापसा, गोवा, दि. 3 एप्रिल : गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या घटनेला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. गोवा मुक्तीच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये गोव्यात इतर मागासवर्गीय समाजघटकांचे आरक्षण सध्याच्या 19 टक्क्यांवरुन वाढवून 27 टक्के करण्याची जोरदार मागणी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम तथा पर्यटन मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आज येथे केली. ही मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लावून धरण्याचे आवाहनही त्यांनी केले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा गोव्यातील पहिलाच मेळावा येथील बोडकेश्वर मंदिराच्या मैदानावर झाला. सुमारे पाच हजार समता सैनिकांची उपस्थिती लाभलेल्या या मेळाव्यास गोव्यातील विविध लहानमोठया सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. समता परिषद ही पूर्णत: पक्षविरहित काम करणारी संघटना असून तिच्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय या बहुजन मागासवर्गीय समाजघटकांच्या विकासासाठी लढले पाहिजे, एवढी एकच असल्याची बाब भाषणाच्या सुरवातीलाच श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केली. त्याचप...

विश्वचषक अपेक्षेनुसार भारताकडे- सचिनचं स्वप्न साकार

जल्लोष विजयाचा... विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केल्यानंतर विश्वचषक 2011 चा प्रबळ दावेदार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या भारतीय संघाने आज अपेक्षेप्रमाणे खेळून अखेर देशाला विश्वचषक मिळवून देण्यात कुठलीही कसर सोडली नाही. क्रिकेटचा जगज्जेता सचिन तेंडुलकर याचं विश्वचषक मिळवण्याचं स्वप्न संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि संपूर्ण संघाने पूर्ण केले. प्रत्येक सामन्यातच अभूतपूर्व खेळणाऱ्या युवराजसिंह उर्फ युवी याला मॅन ऑफ द टूर्नामेंट घोषित करण्यात आले. 1983 नंतर प्रथमच 2011 मध्ये भारत विश्वविजेता ठरला आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात आज श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पन्नास षटकात लंकेने 274 धावा करून विजयासाठी भारतासमोर 275 धावांचे लक्ष्य ठेवले. भारत आणि श्रीलंका संघात विश्वचषकासाठी चुरशीच्या स्पर्धेत भारताने श्रीलंकेवर सहा गडी राखून विजय प्राप्त करून विश्वचषक मिळविला. वीरेंद्र सहेवाग आणि सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर, आता पुढे काय? असे वाटत असतानाच गौतम गंभीरने दमदार धावा करून भारताला सुस्थितीत नेले. तत्पूर्वी म...

आला उन्हाळा...मुलांना सांभाळा...

सर्वत्र उन्हाळा सुरू झाला असून, काही भागात मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत तर काही ठिकाणी लवकरच लागणार आहेत. परिक्षा संपल्यानंतर पालक आणि मुलं दोघेही...सुटलो बुवा...असा सुटकेचा निश्वास सोडतात. मुलं सुद्धा दिवसभर खेळतात, हुल्लडबाजी करतात, मस्ती करतात, मामा, काका, आजोळी जाण्याचे प्लॅन होतात आणि जातात. मुलांचं हे वयंच खेळण्याचं आहे, त्यांना बिनधास्त खेळू द्या, त्याशिवाय त्यांच्या शरीराची चांगली वाढ कशी होणार? मुलांना अगदी माती, रेतीतही खेळू द्या, किंबहुना क्रिकेट खेळताना चेंडू घाणीच्या ठिकाणी पडला तरीही तिथून चेंडू काढू द्या...फक्त यानंतर घरात येण्यापूर्वी हात स्वच्छ धुवायला सांगा आणि तशी खात्री करा. दुपारी खेळताना सावलीत अथवा घराच्या पडवीत, ओसरीवर, वाड्यात सावली देणार्‍या झाडाखाली बसून खेळायला, शक्यतो बैठे खेळ खेळायला सांगा. अनेक मुलांना उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याचा त्रास सुद्धा होतो, यासाठी मात्र तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या..उन्हाळ्यात बाजारपेठेत येणारी टरबूज, खरबूज, आंबा, संत्री, मोसंबी अशी वेगवेगळी फळं नक्की द्या...आपण स्वतः सुद्धा मुलांबरोबरच उन्हापासून बचावाची काळजी घ्यायला विसरू ...

रात्री दहा तास अखंडित वीज पुरवठा: अजित पवार

मुंबई, ता. १ - शेतकर्‍यांना शेतीसाठी रात्री दहा तास अखंडितपणे वीज पुरवठा केला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पासंबंधातील विरोधकांच्या शंकांचे निरसन करताना अर्थसंकल्पीय भाषणाच्या दरम्यान व्यत्यय आणणार्‍या विरोधी पक्षाच्या सदस्यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, की शेतकर्‍यांच्या प्रतिनिधीच्या हातात अर्थ आणि उर्जा खाते असल्यामुळे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आघाडी सरकार शेतकर्‍यांच्या भल्याचे निर्णय घेत आहे. आघाडी सरकार शेतकर्‍यांचे हित बघणारे आहे. शेतकर्‍यांना काळ्या आईची इमान-इतबारे सेवा करता यावी याकरिता त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याज दर, तर ५० हजार ते ३ लाख रुपयांपर् यंत फक्त २ टक्के व्याज दर आकारण्यात आला आहे. राज्यातील भारनियमन संपून वीजेचा अखंडित पुरवठा होण्यासाठी जैतापुर सारख्या वीजनिर्मिती प्रकल्पांची उभारणी करताना त्यामध्ये राजकारण आणणे गैर आहे. राज्याने ओव्हरड्राफ्ट घेतला आहे, या विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या आरोपाचे खंडन करताना ते म्ह...