मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

आरोग्य उत्तम राखण्यासाठी मुबलक प्रमाणात झाडे लावावी - सचिनदादा धर्माधिकारी

तुर्भे, ता २३ (प्रतिनिधी) - आरोग्य उत्तम राखण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन व स्वच्छता राखणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मुबलक प्रमाणात झाडे लावली पाहिजे असे प्रतिपादन सचिनदादा धर्माधिकारी यांनी तुर्भे एमआयडीसी येथे आयोजित स्वच्छता अभियानात केले. जागतिक लोकसेवा दिनाचे औचित्य साधून डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता अभियानचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रतिष्ठानचे जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त सदस्य व हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्सचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते, यावेळी त्यांनी तुर्भे एमआयडीसी, शिरवणे, नेरूळ आणि जुईनगर भागात स्वच्छता अभियान राबविले. भविष्यात महाराष्ट्र व देशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध मोहिमा या प्रतिष्ठानच्या सहकार्याने राबविणार असून आगामी काळात या प्रतिष्ठानचीच मदत घेऊन आरोग्य पर्यावरण व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. आपल्या मनातील अहंकाराचा वापर हा माणसा-माणसा मधील अंतर्गत वैमनस्य वाढविण्यासाठी न करता त्याचा उपयोग राष्ट्र...

आरोग्य उत्तम राखण्यासाठी मुबलक प्रमाणात झाडे लावावी - सचिनदादा धर्माधिकारी

तुर्भे, ता २३ (प्रतिनिधी) - आरोग्य उत्तम राखण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन व स्वच्छता राखणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मुबलक प्रमाणात झाडे लावली पाहिजे असे प्रतिपादन सचिनदादा धर्माधिकारी यांनी तुर्भे एमआयडीसी येथे आयोजित स्वच्छता अभियानात केले. जागतिक लोकसेवा दिनाचे औचित्य साधून डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता अभियानचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रतिष्ठानचे जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त सदस्य व हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्सचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते, यावेळी त्यांनी तुर्भे एमआयडीसी, शिरवणे, नेरूळ आणि जुईनगर भागात स्वच्छता अभियान राबविले. भविष्यात महाराष्ट्र व देशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध मोहिमा या प्रतिष्ठानच्या सहकार्याने राबविणार असून आगामी काळात या प्रतिष्ठानचीच मदत घेऊन आरोग्य पर्यावरण व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. आपल्या मनातील अहंकाराचा वापर हा माणसा-माणसा मधील अंतर्गत वैमनस्य वाढविण्यासाठी न करता त्याचा उपयोग राष्ट्र...

अभिनेता भारत गणेशपुरे यांना "विदर्भ आयकॉन" पुरस्कार

(नवी मुंबई)- अशोकपुष्प प्रकाशनच्या वतीने गेली सहा वर्षे सातत्याने "सन्मान रजनी" चे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. या पुर्वी कला,साहित्य,चित्रपट,संगीत,नृत्य,गजल,सहकार,उद्योग क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले. यावर्षी "अशोकपुष्प पुरस्कार सन्मान रजनी" चे आयोजन विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवार, दिनांक २४ जुन २०१६ रोजी रात्री ८ वाजता करण्यात आले आहे. या सन्मान रजनी पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेता भारत गणेशपुरे यांना विदर्भ आयकॉन हा पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त तसेच गजल नवाज भीमराव पांचाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. अभिनेता भारत गणेशपुरे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले असून त्यांच्या भूमिका विविधरंगी अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. तसेच नाट्यक्षेत्रातील प्रसिद्ध नाव अभिनेता संतोष पवार यांना "विनोद रत्न" पुरस्कार प्रदान करण्यात येईल. केदार शिंदे दिग्दर्शित "तु ...

मुंबई सानपाडा येथे स्वस्त दरात एलईडी बल्ब वितरण केंद्राचे उदघाटन

मुंबई, सानपाडा - प्रभाग ७७,७८ मधील नागरिकांसाठी स्वस्त दरामधे LED बल्ब वितरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. सानपाडा विभागातील सेक्टर १,१३,१४,१५,१६,१७,१८,१९,२० मधील विभागात मोठमोठ्या उंच इमरती आहेत. म्हणून विजेची बचत ही घराघरामधे व्हावी या उद्देशाने दिनांक १८ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २०१५ पर्यन्त बुद्धेश्वर मंदिर, सानपाडा येथे सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० वजे पर्यन्त नागरिकांसाठी खुला करण्यात आले आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा म्हणून श्री. दशरथ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विजयादशमीच्या मुहुर्तावर ४ लेड बल्ब वर १०० रुपयांची विशेष सूट असणार आहे. हे LED बल्ब केंद्रावर खरेदी करते वेळी आपण आपले ओळखपत्र आणि लाइटबिलची छायांकित प्रत सोबत बाळगणे गरजेचे आहे. यावेळी श्री. दशरथ भगत, अध्यक्ष - नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस, निशांत भगत,अध्यक्ष- ठाणे लोकसभा युवक कॉंग्रेस, नगरसेविका वैजयंती भगत, नगरसेविका रूपाली भगत तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

अनधिकृत बांधकामांविरूध्द कारवाई होणारच – संजय भाटिया

नवी मुंबई, ता. ८ एप्रिल - नवी मुंबईतील ९५ गावठाणांच्या आसपासची अनधिकृत बांधकामे न्यायालयाच्या निर्णयानुसार पाडणे सिडकोला बंधनकारक असल्याने अशा १६५७ बांधकामाविरूध्दची कारवाई सिडको लवकरात लवकर करील अशी स्पष्ट ग्वाही सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय भाटिया यांनी आज दिली. जासई येथील आदर्श ग्राम योजनेअंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी श्री. भाटिया बोलत होते. नवी मुंबईत प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे त्यांच्या सततच्या मागणीनुसार नियमित करण्यासाठी समूह विकास योजनेद्वारे गावठाणांचा पुनर्विकास करण्याबाबतची अधिसूचना २०१४ मध्ये शासनाने प्रसिध्द केली होती. प्रकल्पग्रस्तांच्या हरकती व सूचनांचा विचार करून शासनाने सुधारित योजना तयार केली. पुनर्विकास करण्यात येणाऱ्या बांधकामांना ४ चटईक्षेत्र निर्देशांक देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२ मार्च २०१५ रोजी विधिमंडळात केली होती. सर्व १६५७ अनधिकृत बांधकामे १ जानेवारी २०१३ नंतर बांधण्यात आली आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात अशी १०२१ बांधकामे आहेत तर सिडकोच्या क्षेत्...

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी हाती भरलेली लेखी नामनिर्देशनपत्रेही स्वीकारण्यात येणार

मुंबई दि. 6 – जानेवारी ते एप्रिल 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करताना ती ऑनलाईन पध्दतीने भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तथापि ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधेतील त्रुटीमुळे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र भरु शकत नसेल अशा ठिकाणी तो हाती भरलेले लेखी नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करु शकेल असे राज्य निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आलेल्या प्रसिध्दिपत्रकात पुढे म्हटले आहे की जे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या अंतिम वेळेआधी म्हणजे सोमवार दि.8 डिसेंबर, 2014 रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष हजर असतील अशा उमेदवारांचे लेखी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी स्वीकारु शकतील. तथापि, अशा सर्व लेखी अर्जांची संगणकीकृत माहिती भरण्याची जबाबदारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची असेल.

स्टर्लिंग महाविद्यालयाचे औषध साक्षरता जनजागृती अभियान

नेरूळ- येथील स्टर्लिंग महाविद्यालयाच्या वतीने नुकताच ५३ वा फार्मसी सप्ताह साजरा करण्यात आला. इंडियन फार्मा असोसिएशन व महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या फार्मसी सप्ताहामध्ये महाविद्यालयाच्या वतीने औषध साक्षरता जनजागृती अभियान देखील राबविण्यात आले. यामध्ये डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा कसा वापर करावा, कोणते औषधे सेवन करावी औषध विकत घेताना कोणती काळजी घ्यावी, त्यांची साठवण कशी करावी याविषयीची माहिती नागरिकांना देण्यात आली. या सप्ताहाच्या निमित्ताने फार्मसी विद्यार्थांसाठी महाविद्यालयाच्या वतीने शनिवारी एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उपस्थीत विद्यार्थ्यांना फार्मसी असोसिएशन चे अध्यक्ष डॉ हेमंत मोंडकर, महाराष्ट्र आरोग्य विद्यालयाचे प्र कुलगुरू डॉ शेखर राजदरेकर, प्राचार्य डॉ घाटगे, डॉ बाविस्कर व अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये फार्मसी क्षेत्रातील नामवंत मंडळी, फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच, सबंधित वेळेत याच दिवशी महाविद्यालयाच्या बाहेरील पटांगणात भाभा अणुसंशोधन केंद्रातील तंत्रज्ञानाचे प्रदर्शनही भरवि...

नवी मुंबई सायन्स फाउंडेशन तर्फे ‘जागतिक अणुउर्जा दिवस’

वाशी : नवी मुंबई सायन्स फाउंडेशन, भारतीय किरणोत्सार संरक्षण परिषद आणि महाराष्ट्र अॅकेडमी ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविदयालय येथील बॅरीस्टर पी.जी. पाटील सभागृहात मंगळवार २ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ‘जागतिक अणुउर्जा दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. जागतिक अणुउर्जा दिवसानिमित्त ‘भविष्यातील उर्जा आणि पर्यावरणाचे एकत्रित जतन’ या विषयावर भारत सरकारच्या अणुउर्जा आयोगाचे माजी चेअरमन व पद्मभूषण डॉ. अनिल काकोडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच, इतरही काही मान्यवरांना सबंधित विषयांवर माहिती सांगण्यासाठी आमंत्रित केले असल्याची माहिती नवी मुंबई सायन्स फाउंडेशनचे चेअरमन डॉ. अरुण भागवत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ‘अणुउर्जा निर्मिती आणि किरणोत्साराचा वापर व यातील सुरक्षितता’ या विषयावर भारत सरकारच्या अणुउर्जा विभागातील मान्यवर शास्त्रज्ञ आणि नवी मुंबईच्या महाविदयालयाचे शिक्षक, विद्यार्थी आणि प्राचार्य यांच्यात परिसंवाद स्वरूपाची चर्चा होणार असल्याची माहिती नवी मुंबई सायन्स फाउंडेशनचे संयोजक एस.पी. ...

जानेवारी ते एप्रिल 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई दि. 29 – जानेवारी ते एप्रिल 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार सदर निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करताना ती ऑनलाईन पध्दतीने भरणे अनिवार्य आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या 14 जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी गुरुवार दि. 4 डिसेंबर 2014 ते सोमवार दि. 8 डिसेंबर 2014 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून रविवार दि. 7 डिसेंबर 2014 हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने फक्त ऑनलाईन नामनिर्देशनपत्रे भरता येतील. मंगळवार दि. 9 डिसेंबर 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक गुरुवार दि. 11 डिसेंबर 2014 हा असून मंगळवार दि. 23 डिसेंबर 2014 रोजी मतदान घेण्यात येईल. या निवडणुकांची मतमोजणी संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रत्येक मतदान कें...

जळगावात 28 पासून ‘कृषी व डेअरी’ प्रदर्शन; चार दिवसीय प्रदर्शनात असणार प्रात्यक्षिकांवर भर

जळगाव (प्रतिनिधी) - जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. व पुणे येथील डीएसके मिल्कोट्रॉनिक्स् प्रयोजित ‘कृषी व डेअरी एक्स्पो 2014’या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे येथील शिवतीर्थ मैदानावर 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. अ‍ॅग्रोवर्ल्ड हे या प्रदर्शनाचे आयोजक असून प्लँटो कृषीतंत्र व जलश्री सहप्रायोजक आहेत. या चार दिवसीय प्रदर्शनासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जळगाव जिल्हा परिषद, आत्मा व नाबार्ड या शासकीय संस्थांचे सहकार्य लाभले आहे. जळगावात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ‘डोम स्ट्रक्चर’मध्ये हे प्रदर्शन होत असून 120 स्टॉलधारक सहभागी होत आहेत. सध्याची दुष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई, हवामानाचा लहरीपणा, दरातील चढ-उतार, शेतमजुरांची टंचाई या बाबींमुळे शेतकरी चिंतीत आहे. याचाच विचार करून गरजेवर आधारीत उपाय सुचविण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.थोडक्यात प्रात्यक्षिकांवर भर तसेच नाविन्यपूर्ण बाबींचा समावेश हेच या प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये असेल. मग त्यात अत्याधुनिक सूक्ष्म सिंचन प्रणाली, यंत्र, तंत्र, अवजारे, नवीन वाण, फवारण...