मुंबई, सानपाडा - प्रभाग ७७,७८ मधील नागरिकांसाठी स्वस्त दरामधे LED बल्ब वितरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
सानपाडा विभागातील सेक्टर १,१३,१४,१५,१६,१७,१८,१९,२० मधील विभागात मोठमोठ्या उंच इमरती आहेत. म्हणून विजेची बचत ही घराघरामधे व्हावी या उद्देशाने दिनांक १८ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २०१५ पर्यन्त बुद्धेश्वर मंदिर, सानपाडा येथे सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० वजे पर्यन्त नागरिकांसाठी खुला करण्यात आले आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा म्हणून श्री. दशरथ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विजयादशमीच्या मुहुर्तावर ४ लेड बल्ब वर १०० रुपयांची विशेष सूट असणार आहे. हे LED बल्ब केंद्रावर खरेदी करते वेळी आपण आपले ओळखपत्र आणि लाइटबिलची छायांकित प्रत सोबत बाळगणे गरजेचे आहे.
यावेळी श्री. दशरथ भगत, अध्यक्ष - नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस, निशांत भगत,अध्यक्ष- ठाणे लोकसभा युवक कॉंग्रेस, नगरसेविका वैजयंती भगत, नगरसेविका रूपाली भगत तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.