(नवी मुंबई)- अशोकपुष्प प्रकाशनच्या वतीने गेली सहा वर्षे सातत्याने "सन्मान रजनी" चे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.
या पुर्वी कला,साहित्य,चित्रपट,संगीत,नृत्य,गजल,सहकार,उद्योग क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले. यावर्षी "अशोकपुष्प पुरस्कार सन्मान रजनी" चे आयोजन विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवार, दिनांक २४ जुन २०१६ रोजी रात्री ८ वाजता करण्यात आले आहे.
या सन्मान रजनी पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेता भारत गणेशपुरे यांना विदर्भ आयकॉन हा पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त तसेच गजल नवाज भीमराव पांचाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. अभिनेता भारत गणेशपुरे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले असून त्यांच्या भूमिका विविधरंगी अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
तसेच नाट्यक्षेत्रातील प्रसिद्ध नाव अभिनेता संतोष पवार यांना "विनोद रत्न" पुरस्कार प्रदान करण्यात येईल. केदार शिंदे दिग्दर्शित "तु तु मी मी" या नाटकात एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चौदा विविध रंगी भूमिका साकारून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. उत्कृष्ट सामाजिक संदेश देणारा चित्रपट म्हणून पोलिस लाईन या चित्रपटाच्या निर्मा त्या रुपाली पवार व वैशाली पवार आणि प्रस्तुतकर्ते श्रीधर चारी यांचा सत्कार करण्यात येईल, यावेळी या चित्रपटातील कलावंत, तंत्रज्ञ, दिग्दर्शक उपस्थित राहणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांना "कलारत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या "खुमखूमी" या कार्यक्रमास २५ वर्षे पूर्ण होत असून या कार्याक्रमाचे देश विदेशात प्रयोग गाजलेत. "लोककलारत्न" हा पुरस्कार नंदेश विठ्ठल उमप यांना प्रदान करण्यात येईल. पोलीसदल सेवारत्न पुरस्काराने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे तसेच पत्रकारिता सेवारत्न पुरस्कारने विलास बढे यांना सन्मानित करण्यात येईल.
"विविध क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या मान्यवरांचा अशोकपुष्प सन्मान रजनीच्या माध्यमातून गौरव करणे म्हणजे त्यांना प्रोत्साहन देण्यासारखे असते व इतरांना ती प्रेरणा असते.गेली सहा वर्ष विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात येतात त्यामध्ये नवी मुंबईतील व्यक्तींचा ही समावेश आहे. सन्मान रजनीच्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार असल्याचे आयोजक उमेश चौधरी व अनघा लाड यांनी सांगितले.
यावेळी नवी मुंबई क्षेत्रातील व्यक्तींचा त्यांनी आपआपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये दशरथ शिंगाडे (उद्योगश्री), तुषार गोगरी व विलास खुल्लर (उद्योगश्री जाहिरात क्षेत्र), विनय खडसे (तरुण उद्योजक),आबा रणवरे (पर्यावरण मित्र), मनमीत सिंग (गायक), गंगासिंग राजपूत (युवा पत्रकार),सानिध पुजारी (युवा पत्रकार), अनिस दीन (फॅशन ),किरण सावंत (मनोरंजन).
मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...