रविवार, १५ जानेवारी, २०१२

निवडणुकीत विजय प्राप्त करणे हीच आपल्यासाठी वाढदिवसाची भेट ठरणार-मायावती

नवी दिल्ली - ता. 15: आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा विजय होणे हीच आपल्या वाढदिवसाची भेट ठरेल, असे मत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी व्यक्त केले. आपल्या 56 व्या वाढदिवसानिमित्त त्या बोलत होत्या. आचारसंहितेमुळे वाढदिवसाचा कोणताही कार्यक्रम आयोजित केला नसल्याचे त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री मायावती यांनी सांगितले, की आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून पक्ष यंदा आपल्या वाढदिवसाचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. पक्ष कार्यकर्ते संक्रांत त्यांच्या कुटुंबियांसमवेत साजरी करतील. आगामी विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करणे हेच आपले लक्ष्य असून निवडणुकीत विजय प्राप्त करणे हीच आपल्यासाठी वाढदिवसाची सर्वात मोठी भेट ठरणार आहे. यावेळी त्यांनी सर्व 403 जागांकरिता उमेदवारांची यादी जाहीर केली. निवडणुकीसाठी 88 जागा अल्पसंख्यांक, 103 अन्य मागासवर्गीय, 85 मुस्लीम आणि 117 जागांपैकी 74 जागा ब्राह्मण आणि 33 जागांसाठी क्षत्रिय उमेदवारांना पक्षातर्फे निवडणुकीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. यावेळी त्या म्हणाल्या, की गेल्या निवडणुकीत चुकीच्या उमेदवारांना निवडणुकीत उभे रहाण्याची संधी दिल्यामुळे पक्षाला कठीण परिस्थितीतून जावे लागले. यावेळी विचारपूर्वकच उमेदवार उभे करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाचे काही निर्णय दलित-विरोधी असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते रशिद अल्वी यांनी मायावती यांनी निवडणुक आयोगावर वाटेल तसे आरोप न करण्याचे आवाहन केले.

गुळाची पोळी

शनिवार, १४ जानेवारी, २०१२

शुक्रवार, १३ जानेवारी, २०१२

इंदूरमध्ये शीतलहर- शाळांना सुट्ट्या

मध्यप्रदेशात थंडीचा जोर वाढला असून काही भागात किमान तापमान 4 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. इंदूरमध्ये देखील नुकतेच 5 अंश तापमान नोंदविले गेले. इंदूरचे कलेक्टर राघवेंद्रसिंह यांनी शुक्रवार (ता. 13 जानेवारी) पासून 16 जानेवारीपर्यंत शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. या अंतर्गत सर्व शासकीय व खाजगी शाळांच्या नर्सरीपासून इ. 8 वी पर्यंतच्या वर्गांना सुट्टी देण्यात आली आहे. इ. 8 वी पासून पुढील वर्ग सकाळी नऊ पासून घेण्यात यावेत असे आदेश देण्यात आले आहेत.

मतदार यादीसंदर्भातील हरकती 12 जानेवारीपासून स्वीकारणार- आयोगाची हेल्पलाईन

मुंबई, ता. 11- महानगरपालिका निवडणुकीच्या मतदार यादीसंदर्भातील हरकती आणि सूचना संबंधित महानगरपालिकेत 12 ते 17 जानेवारी 2012 या कालावधीत स्वीकारल्या जाणार आहेत. निवडणूक होत असलेल्या दहा महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांसाठी 9225320011 या क्रमांकावर हेल्पलाईनची आणि 56677 या क्रमांकावर एसएमएसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे दिली.

येत्या 16 फेब्रुवारीस मुंबईसह ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या दहा महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यासाठी 5 जानेवारी 2012 रोजी मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली असून यावरूनच निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 12 जानेवारीस प्रसिद्ध केली जाणार आहे. यावर 17 जानेवारी 2012 पर्यंत संबंधित महानगरपालिका किंवा महानगरपालिकेने निर्देशित केलेल्या ठिकाणी मतदारांना हरकती व सूचना दाखल करता येतील. यानंतर 23 जानेवारीला प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केल्या जातील.

हेल्पलाईन आणि संकेतस्थळ

या दहा महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांना मतदार यादीतील आपले नाव, त्यासंदर्भातील तपशील आणि मतदान केंद्राबाबतची माहिती मिळविण्यासाठी 9225320011 या हेल्पलाईन सुविधेचा लाभ घेता येईल. ही हेल्पलाईन सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत कार्यरत राहील.

आयोगाने निवडणुकांच्या दृष्टीने www.mahasec.com हे अद्ययावत संकेतस्थळही तयार केले आहे. येथे संबंधित महानगरपालिकांच्या निवडणूकविषयक संकेतस्थळाचीही लिंक उपलब्ध आहे. याद्वारेही मतदारांना मतदारयादीतील आपले नाव शोधता येईल. तसेच या संकेतस्थळांवर प्रभागाचा नकाशा आणि अन्य तपशीलही उपलब्ध असल्याचे श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.
मतदारांना एसएमएसद्वारे माहिती

मतदारांना मतदार यादीतील आपल्या नावाबाबतची माहिती 56677 क्रमांकावर मिळू शकेल. प्रत्येक महापालिकेसाठी स्वतंत्र कोड तयार करण्यात आले असून मुंबई- mcgm, पुणे- pmc, नागपूर- nmc, पिंपरी-चिंचवड- pcmc, नाशिक- nsmc, अकोला- akmc, अमरावती- ammc, सोलापूर- smc, ठाणे- tmc आणि उल्हासनगर- umc इ.

माहिती मिळविण्यासाठी मतदाराचे नाव आणि वय इंग्रजीत टाइप करून 56677 या क्रमांकावर एसएमएस पाठवल्यास आपल्याला माहिती मिळू शकेल. उदा. voter <स्पेस> mcgm <स्पेस> rahul ramcjandra rane <स्पेस> 35 असे टाईप करून 56677 क्रमांकावर एसएमएस पाठविल्यास माहिती मिळेल.

गडचिरोलीत दोन टप्प्यात मतदान

सुरक्षिततेच्या दृष्टीने गडचिरोली जिल्हा परिषदेची निवडणूक दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चार्मोशी आणि मुलचेरा या 8 तालुक्यातील जिल्हा परिषद गटांसाठी आणि पंचायत समित्यांसाठी पूर्वनियोजनानुसार 7 फेब्रुवारीस मतदान होईल. अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या चार तालुक्यातील जि. प. गटांसाठी आणि सिरोंचा या चार तालुक्यातील जिल्हा परिषद गटांसाठी आणि पंचायत समित्यांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार 12 फेब्रुवारीस मतदान होईल. जिल्ह्यातील सर्व ठिकाणी एकाच दिवशी 14 फेब्रुवारी 2012 रोजी मतमोजणी होईल.

मंगळवार, १० जानेवारी, २०१२

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012

माधुरी गुप्ता यांना जामीन मंजूर

नवी दिल्ली- ता. 10: पाकिस्तानमधील आयएसआय या एजन्सीला माहिती पुरविण्याचा आरोप ठेवून निलंबित करण्यात आलेल्या भारतीय दूतावासातील अधिकारी माधुरी गुप्ता यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दिल्लीच्या न्यायालयाने मंगळवारी (ता. 10 जानेवारी) 25,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. गुप्ता यांना 22 एप्रिल 2010 रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली होती. श्रीमती गुप्ता यांनी 20 महिने तुरुंगवास भोगला आहे. न्यायालयाने त्यांना परवानगीशिवाय दिल्ली सोडण्यास मनाई केली असून कोणत्याही साक्षीदारीशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संपर्क साधण्यास देखील मनाई केली आहे.

गुरुवार, ५ जानेवारी, २०१२

सिडकोचे शुक्रवारी (ता. 6) होणारे पारितोषिक वितरण पुढे ढकलले

मुंबई, ता. 5 - सिडकोतर्फे उद्या पनवेल नवी मुंबई येथे होणारे विविध गुणवत्ता यादीतील इ. दहावी, बारावी, सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण पुढे ढकलण्यात आले आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सिडकोतर्फे अनंतसिंग राजपूत यांनी कळविले आहे.

जळगाव येथे शुक्रवारी पत्रकार दिनानिमित्त परिसंवाद

जळगाव, ता. 5 - येथे शुक्रवारी (ता. 6) पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बळीराम पेठेतील जळगाव पत्रकार संघात सकाळी दहा वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी डॉ. कुमार सप्तर्षी, मा. रविराज गंधे मार्गदर्शन करतील.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...