मुंबई, ता. ४ - सिडकोने नवी मुंबईमध्ये बांधलेल्या सदनिका/दुकाने/कार्यालयांचे केवळ करारनामा व कुलमुखत्यारपत्राच्या (पॉवर ऑफ अटर्नी) आधारे सिडकोच्या परवानगीशिवाय करण्यात आलेले हस्तांतरण नियमाधीन करण्यासाठी आखलेली ऍम्नेस्टी योजना ७ जुलैपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत यापूर्वीच या योजनेच्या अंमलबजावणीचा निर्णय झाला आहे. योजनेसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण कर्मचार्यांना देण्यात येत आहे.
सोमवार, ४ जुलै, २०११
शुक्रवार, १ जुलै, २०११
"गुगल प्लस" चा सामना करण्यास फेसबुक तयार...
अल्पावधीतच गुगलच्या 'ऑर्कुट'ला मागे टाकून संपूर्ण जगातल्या विशेषतः तरुणाईच्या पसंतीस उतरलेल्या 'फेसबुक'ने गुगलने नुकत्याच सुरू केलेल्या "गुगल प्लस" या सोशल वेबसाइटचा अर्थातच 'गुगल'चा सामना करण्याची तयारी केली आहे. यानुसार काही दिवसातच 'फेसबुक' "एक खास सेवा" देणार असल्याचे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केले आहे. यासह आणखी काही सुविधा देण्याबाबत काम सुरू असून त्याबाबत मात्र पुढच्या आठवड्यातच माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आज आत्ता...
* रेव पार्टी- रेव पार्टी आयोजक अपराजित मित्तलला अटक- मित्तल अखेर पराजित.
* शनिवारी (ता. १ जुलै) बुढ्ढा होगा तेरा बाप रिलिझ होणार. अमिताभच्या चाहत्यांना अभिषेककडून धन्यवाद.
* बुढ्ढा होगा तेरा बाप...अमिताभच्या चाहत्यांनी अमिताभच्या चाहत्यांसाठी तयार केलेली फिल्म.
* शनिवारी (ता. १ जुलै) बुढ्ढा होगा तेरा बाप रिलिझ होणार. अमिताभच्या चाहत्यांना अभिषेककडून धन्यवाद.
* बुढ्ढा होगा तेरा बाप...अमिताभच्या चाहत्यांनी अमिताभच्या चाहत्यांसाठी तयार केलेली फिल्म.
गुरुवार, ३० जून, २०११
नकुल पाटील यांच्या निधनाने आदरणीय व्यक्तिमत्व हरपले- अजित पवार
मुंबई, ता. ३० - सिडकोचे चेअरमन आणि राज्याचे माजी मंत्री नकुल पाटील यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की राज्याचे माजी मंत्री आणि सिडकोचे चेअरमन म्हणून त्यांनी केलेले कार्य अविस्मरणीय असून सामाजिक, राजकीय आणि क्रिडा क्षेत्रात त्यांनी वावरताना सर्वसामान्य जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या निधनाने युवक कार्यकर्त्यांचा आधार आणि मार्गदर्शक हरपला आहे.

नकुल पाटील यांचे निधन
मुंबई, ता. ३० - सिडकोचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री नकुलपाटील यांचे बुधवारी (ता. २९) रात्री ११.४५ च्या सुमारास हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने डोंबिवली येथे निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी (ता. ३०) डोंबिवली पूर्व येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कार्यकर्तेही माणूसच...
महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, नांदेड आदी शहरांमध्ये इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसात आंदोलनं केली आहेत. काही ठिकाणी प्रत्यक्ष नाही परंतू अप्रत्यक्षपणे या प्रश्नी विरोधकांना सुद्धा सहमती दर्शवून साथ दिली. मुंबईत सुद्धा ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी महागाई आणि इंधन दरवाढीला विरोध करून शासनाला घरचाच आहेर दिला आहे. वास्तविक सामान्य नागरीकांना असे यापूर्वीच होणे अपेक्षित होते. महागाई आणि इंधन दरवाढीस विरोध करणारे जरी सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्तेच असले तरीही आपणही माणसंच आहोत हे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. विशेषतः नेहमीच महागाईची सर्वाधिक झळ मध्यम वर्गीयांनाच बसते. कार्यकर्त्यांनी केलेल्या विरोधावरून, दशकात राजकीय पक्षांमध्ये दाखल झालेले कार्यकर्ते देखील मध्यम वर्गीय असल्याचे आणि सुशिक्षित असून प्रत्येक गोष्टीची जाण त्यांना असल्याचे प्रथम दर्शनी जाणवते. हे खरं सुद्धा आहे. केवळ विरोधाला विरोध करून गलिच्छ राजकारण करण्याऐवजी चांगल्या गोष्टींसाठी, जनतेच्या हितार्थ निर्णय घेण्यासाठी राजकारण करणे केव्हाही चांगले...

मंगळवार, २८ जून, २०११
सोमवार, २७ जून, २०११
या पैशाला काय म्हणतात...?
एकीकडे रामदेव बाबा आणि अण्णा हजारे भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करीत असून लाखो नागरीकांचे याला समर्थन आहे. तर, दुसरीकडे काही संस्था, आश्रमांमध्ये कोट्यवधी, खोर्याने पैसा असल्याचे चित्र समोर येत आहे..या पैशाला नेमकं काय नांव द्यावं...? या प्रश्नाला यक्ष प्रश्न म्हणावं काय? देशातल्या नागरिकांच्या मनातही असा प्रश्न येत असेल काय?
ठळक बातम्या
जे. डे. खून प्रकरणी सात संशयित ताब्यात...
छत्तीसगड: दंतेवाडा येथे भूसुरुंगाच्या स्फोटात ४ जवान ठार १ बेपत्ता...
सिंकदराबाद: अर्जुन कुमार यादव यांच्या पुतणीचा मृतदेह आढळला...
रायगड: पोलिसांचा रेव पार्टीवर छापा- १० युवक ताब्यात...
छत्तीसगड: दंतेवाडा येथे भूसुरुंगाच्या स्फोटात ४ जवान ठार १ बेपत्ता...
सिंकदराबाद: अर्जुन कुमार यादव यांच्या पुतणीचा मृतदेह आढळला...
रायगड: पोलिसांचा रेव पार्टीवर छापा- १० युवक ताब्यात...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला
सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...