मंगळवार, २१ जून, २०११

प्रा. सुरेश तेंडुलकर यांच्या निधनाने अर्थव्यवस्थेचा एक अध्याय अस्तंगत

मुंबई, ता. २१ - प्रा. सुरेश तेंडूलकर यांच्या निधनाने भारतीय अर्थव्यवस्थेचा एक अध्याय अस्तंगत झाला आहे. या शब्दात राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
श्री. पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे, की प्रा. तेंडूलकर यांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान अत्यंत मोलाचे आहे. देशातील दारिद्र्य निर्मूलनासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या पार्श्वूभूमीवर देशाची विकासविषयक धोरणे ठरविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेस चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जागतिक किर्तीचा अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांचा लौकिक होता.

सांडपाणी व्यवस्थापनासाठी संयुक्त प्रकल्प राबवावा: अजित पवार

मुंबई, ता. २१ - शहरानजीकच्या गावांमधील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामविकास आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने संयुक्त प्रकल्प राबवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आज बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी श्री. पवार म्हणाले, की ग्रामीण भागात तसेच शहरांनजीकच्या गावांमध्ये सांडपाण्याच्या व्यवस्थापनाची फारशी सोय नाही. त्यामुळे नगरपालिका तसेच महानगरपालिकांनी सांडपाणी व्यवस्थापन केले तरी शेजारच्या गावांमधून येणार्‍या सांडपाण्यामुळे पाणी प्रदूषित होते. हे टाळण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी जुलैअखेरपर्यंत संयुक्त प्रकल्प तयार करून तो केंद्र शासनाकडे पाठवावा. असा प्रकल्प राबविण्यासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग कसा घेता येईल, याचा देखील विचार केला जावा, असेही ते म्हणाले.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री लक्ष्मणराव ढोबळे, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मुख्यसचिव मालिनी शंकर, नियोजन विभागाचे सचिव सीताराम कुंटे, ग्रामविकास विभागाचे सचिव सुधीर ठाकरे आदी उपस्थित होते.

राक्षस

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community

शुक्रवार, १७ जून, २०११

दहावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई, ता. १७: माध्यमिक शालांत परीक्षेत (इ. दहावी) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. आपल्या आवडीनुसार करिअर निवडण्याचे आवाहन करत त्यांनी भावी वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता जिद्दीने पुन्हा प्रयत्न करावा. तसेच उपलब्ध संधीचा शोध घेऊन त्यात यश मिळवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

तळ्यात नव्हती बदके दोन...

तळ्यात नाही..मळ्यात तर नाहीच नाही...तर...अन्नासाठी चक्क रस्त्यावर आलेली बदकं

बाळ-गोपाळ मंडळी

गुरुवार, १६ जून, २०११

तमाशा कलावंतांसाठी वृद्धाश्रम बांधणार: उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. १६ - राज्यातील तमाशा कलावंतांसाठी वृद्धाश्रम बांधण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज तमाशा कलावंतांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी श्री. पवार म्हणाले की, अत्यंत खडतर परिस्थितीत तमाशा जिवंत ठेवण्याचे काम करणार्‍या या कलावंतांना आयुष्याच्या संध्याकाळी आधाराची आवश्यकता असते. यासाठी त्यांच्यासाठी वृद्धाश्रम उभारण्यात येईल. तमाशा कलेला चालना देण्यासाठी कायमस्वरूपी निवासी प्रशिक्षण शाळा उभारण्याचा शासन विचार करीत आहे. याबरोबरच या कलावंतांसाठी निवासी संकुल उभारण्यासाठी पुण्याजवळ भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवी मुंबईत तमाशासाठी थिएटर उभारण्यासाठी सिडकोमार्फत लवकरच कार्यवाही केली जाईल.

ते पुढे म्हणाले की, तमाशा कलावंतांना स्वतःचा फड तसेच थिएटर उभारण्याकरिता कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सामाजिक न्याय विभागातर्फे लवकरच निर्णय घेतला जाईल. तमाशा कलावंतांना संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले इतर मागासवर्गीय विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळावर प्रतिनिधित्व दिले जाईल.

बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, शिक्षण विभागाच्या सचिव व्ही. राधा, वित्त विभागाचे सचिव प्रदीप व्यास, सांस्कृतिक कार्य संचालक दिलीप शिंदे, अखिल महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत महासंघाचे अध्यक्ष अरुण मुसळे, उपाध्यक्ष यशवंत गाडे, प्रदीप पवार, कांताताई काळे, मंदाबाई मुसळे, शारदा मुसळे आदी उपस्थित होते.

Rainbow: Chrosome of Nature.

green

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...