गुरुवार, २० जानेवारी, २०११

लाजरी... (एक चारोळी)

"लाजरी" च्या या लाजण्याने लाजाळू ही लाजले..लाजरीशी खेळताना समजलंच नाही, बारा केव्हा वाजले...!
फूल तिच्या लाजण्याने खुदकन हसले..इतक्यात येऊन छोटेसे फुलपाखरू बसले..
लाजता लाजता लाजरी होऊ लागली मोठी...सुचले हो शब्द बघा आणि आले इथे ओठी...
फिरताना बागेत तिला बघून बहरला चाफा..नकळत चिउताईने घेतला तिचा पापा...!!!

माझा मित्र  संदीप पारोळेकर (दै. लोकमत वेबसाइट पुणे- उपसंपादक) त्याच्याकडे एक छानशी चिमुकली पाहूणी आली आहे..तिचे नाव "लाजरी" ठेवले आहे..त्याने ही आनंदवार्ता सांगताना सुचलेल्या-उपरोक्त चार ओळी..!!

आनंदाचा बहर...

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड आणि खासदार समीर भुजबळ नवी दिल्ली येथे प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेटमंत्री पद मिळाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देताना.

बुधवार, १९ जानेवारी, २०११

घनकचरा प्रकल्पाबाबत नव्याने प्रस्ताव सादर करावा

मुंबई, ता. १८ - मीरा-भाईंदर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठीच्या जागेबाबत नव्याने प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिका विविध समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रांतर्गत उत्तन पाली येथील सध्या कार्यरत असलेल्या प्रकल्पाऐवजी वरसावे येथे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव होता. परंतु वरसावे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आरक्षित केलेली जमीन केंद्र शासनाच्या निकषानुरुप नसल्यामुळे प्रस्ताव रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. येथील शाळांच्या थकित भाड्याबाबत शासनाच्या धोरणानुसारच निर्णय घेण्यात यावा असेही पवार यांनी सांगितले.
बैठकीस पाणीपुरवठा स्वच्छतामंत्री लक्ष्मणराव ढोबळे, खासदार संजीव नाईक, राज्यमंत्री सचिन अहिर, राजेंद्र गावित, आमदार गिल्बर्ट मेंडोसा, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या मुख्य सचिव मालिनी शंकर, नगरविकास विभाग सचिव मनुकुमार श्रीवास्तव, जलसंपदा विभाग सचिव एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.

अल्पसंख्यांक समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार - अजित पवार

मुंबई, ता. १८ - अल्पसंख्यांक समाजाच्या विविध समस्यांवर तत्काळ तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सविस्तर चर्चा करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधानांच्या १५ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी, अल्पसंख्यांक समाजातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या, अल्पसंख्यांक समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आज श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्री खान यांनी राज्यात या १५ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी समित्यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत अल्पसंख्यांकांच्या विकासाबाबतच्या योजनांची चर्चा व्हायला हवी अशी मागणी केली. यानुसार श्री. पवार यांनी चर्चेबाबत दुजोरा देऊन आणि त्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित करावे अशा सूचना दिल्या.
बैठकीस शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, शालेय शिक्षण व अल्पसंख्यांक विकास विभागाच्या राज्यमंत्री फौजिया खान, अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष नसीम सिद्दिकी, आमदार नवाब मलिक, शालेय शिक्षण विभाग प्रधान सचिव संजयकुमार, वित्तविभाग प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव, महिला व बालकल्याण विभाग प्रधान सचिव वंदना कृष्णा उपस्थित होते.

पावनखिंड पर्यटन विकासासाठी पहिल्या टप्प्यात सव्वादोन कोटी

मुंबई, ता. १८ - कोल्हापूर जिल्ह्यातील पावनखिंड (ता. शाहूवाडी) या ऐतिहासिक स्थळाचा विकास करण्यासाठी पावनखिंड परीसरात पहिल्या टप्प्यात सुमारे सव्वादोन कोटी रुपयांची विकास कामे करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
शाहूवाडी-पन्हाळा परीसरातील विविध विकास कामांच्या संदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत बांधकाम विभाग सचिव धनंजय धवड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, ऐतिहासिक पावनखिंड परीसराचा विकास करण्याच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्या, सुशोभीकरणासह स्मृतीस्तंभ उभारणी, प्रवेशद्वार ते वाहनतळ रस्ता, वाहनतळ उभारणी, निरीक्षण मनोरा, स्वच्छतागृह व विश्रांतीस्थळ, ओढ्यावर लहान पूल आदी कामे करण्यात येतील. यासाठी २ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात येईल. शिराळा व पन्हाळा तालुक्यांना जोडणारा महत्वाचा रस्ता असलेल्या सावर्डे (जि. कोल्हापूर) ते कांदे (जि. सांगली) या मार्गावर वारणा नदीवर उंच पातळीचा मोठा पूल बांधण्याचे सुमारे साडेसात कोटी रुपयांचे काम नाबार्ड अंतर्गत करावयाच्या कामात प्रस्तावित करण्यात येईल. तसेच पिशवी ते खोतवाडी, करूंगळे ते उदगिरी तसेच शित्तूर ते उदगिरी या रस्त्यांच्या कामासाठीही निधी उपलब्धतेनुसार प्राधान्याने तरतूद केली जाईल.

मंगळवार, १८ जानेवारी, २०११

नांदगाव व छपन्नखेडी प्रादेशिक योजनेतून नांदगाव पालिकेने स्वतंत्र होण्याची गरज - भुजबळ

 मुंबई, ता. १८ - नांदगाव शहर व छपन्नखेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून नांदगाव नगरपरिषदेने स्वतंत्र व्हावे आणि शहरासाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे व्यवस्थापन व वितरण यंत्रणा ताब्यात घेऊन सुनियोजित पद्धतीने चालवावी. अशी सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केली.
श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज या योजनेच्या समस्यांसंदर्भात सर्व संबंधितांची बैठक झाली. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री लक्ष्मण ढोबळे, आमदार पंकज भुजबळ, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग सचिव मालिनी शंकर, स्थानिक अभियंते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. भुजबळ म्हणाले की, नांदगाव व ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थिती लक्षात घेता ही योजना सुरळीतपणे सुरू राहण्याच्या दृष्टीने तिचे विभाजन करण्याची आवश्यकता आहे. तसेच पाणीपट्टीची मोठी थकबाकी आणि वाढीव पाणीपट्टीचा भार पेलण्याबाबत नांदगाव नगरपरिषदेने व्यक्त केलेली असमर्थता इ. लक्षात घेता नांदगाव परिषदेने शहराची पाणीपुरवठा योजना ताब्यात घ्यावी. चांगल्या कंत्राटदारास देखभाल-दुरुस्ती व पाणीपुरवठ्याची जबाबदारी सोपवावी, आदी सूचना दिल्या.
यो योजनेतील ज्या १६ गावांना गुरुत्वाकर्षणाच्या आधारे पाणी पुरविले जाते, त्यांनाही योजनेतून स्वतंत्र केल्यास त्यांच्या पाणीपट्टीचा प्रश्नही संपुष्टात येईल. याचबरोबर भारत निर्माण योजनेतून जिथे योजना राबविण्यात येत आहेत त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर त्या गावांनाही या योजनेतून स्वतंत्र करता येईल.
आमदार पंकज भुजबळ यांनी योजनेकरिता शासनाकडून २ कोटी १५ लाख ८२ हजार रुपयांचे अनुदान मिळण्याची मागणी केली.

लासलगाव, विंचूर प्रादेशिक योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करावी

लासलगाव व विंचूर १६ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून यानंतरच ही योजना संयुक्त जलव्यवस्थापन समितीकडे हस्तांतरित करण्यात यावी, अशी सूचना देखील छगन भुजबळ यांनी केली.
प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या समित्या प्रांताधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयोग राबविण्यात येईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.

येवला ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या समस्यांवर अधिकार्‍यांनी तोडगा काढावा

येवला तालुक्यातील ३८ गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना निधिअभावी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करणे शक्य नसल्याने सर्व सरपंचांची संयुक्त जलव्यवस्थापन समिती नियुक्त करावी आणि या सदस्यांनी सर्वानुमते खाजगी कंत्राटदाराची नेमणूक करून पाणीपुरवठा योजनेचे नियंत्रण व व्यवस्थापन करावे यासह विविध सूचना केल्या.

Back pain due to use of computer

Back pain due to computer use is a most common problem seen in 4 out of 5 persons at any point of life, caused due to long hours of working in front of computer or bad posture while using the computer and lack of practicing relaxing exercises before using the computers!
Back pain:

* The back is the workhorse of human body carrying the burden of the entire body, and is responsible for almost every move you make. This makes it susceptible to injury, and the resultant back pain can be quite immobilizing

* Back pain relief exercises help most patients. In fact, those who suffer from chronic back pain usually benefit from regular stretches and bends and easy to apply treatments

* When a person suffers from back pain, he or she may take a few days off to rest the back. Most physiotherapist, however recommend back pain relief exercises, that both stretching and relaxation of the area

* Bad posture or sudden jerks or Lack of relaxing exercises, overweight are some of the root causes
Treatment and Preventive measures:
Yoga:
*Doing yoga cultivates a balance between the flexibility and strength of the muscles of the body
    *People with back pain have to be extra careful when trying out exercises
    *Essentially yoga increases the skeletal and muscle strength of the back while correcting the problems. It also builds up the abdominal muscles.
    *The yoga poses need to be held for a few seconds, stretching and relaxing the back.
Stretching and Exercising while at work:

    *Sit properly in a good chair designed for desk work
    *Your back should be straight, your shoulders back, and the top of your monitor should be level with your eyes
    *If you have to look down or up, you need to adjust the height of your screen
    *Keep your legs bent at the knees so that the knees are only slightly higher than your hips
    *Feet should be flat on the floor or on a step stool of some sort
    *Stand up every half hour to stretch or walk around a bit.
    *Stretch your calves, and give your eyes a break from focusing on your computer screen. This will also help prevent blood clots from developing in your legs. Blood clots are very common among middle-aged computer users
    *To stretch your neck, flex your head forward/backward, side to side and look right and left. Never roll your head around your neck. This could cause damage to the joints of the neck

    * When a spinal disk presses on a nerve, it causes a herniated disk
    * Sometimes the herniated disk presses on hard on the sciatic nerve, resulting in sharp shooting pain right across the lower part of the body, this is known as sciatica
    * When the vertebras of the spinal column slip forward, over lapping each other the painful condition of Spondylolisthesis occurs
    * These problems could result in a herniated disk, or Sciatica, Spinal stenosis, Spondylosis and Spondylolisthesis
-----------------(COURTESY with Specialist Doctors)------------------------------------

फायलींच्या स्थितीबाबत माहिती देणारे सॉफ्टवेअर...तरी भ्रष्टाचार थांबणार का?

जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या विविध प्रकरणांच्या फायलींची माहिती देणारे सॉफ्टवेअर डीजेएसएस कार्यान्वित करण्यात आले आहे. फाईलची सद्यस्थिती यामुळे समजू शकणार आहे, परंतु यामुळे भ्रष्टाचार कमी होईल अथवा नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
आधुनिक काळात सतत बदलत्या तंत्रज्ञानामुळे नवीन तंत्रज्ञानाची भर पडत आहे. ही बाब कार्यप्रणालीत सुधारणा करण्यासाठी कार्यभार हलका होणे, विशेषतः शासकीय कार्यालयांमध्ये पेंडिंग असलेली प्रकरणे लवकर निघणे यासाठी फायदेशीर निश्चित ठरणार आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकतीच अशा प्रकारची कार्यप्रणाली सॉफ्टवेअर कार्यान्वित केले आहे हे कौतुकास्पद आहे. जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे संपूर्ण जिल्ह्याच्या विविध प्रकरणे, कामे यांचा निवाडा, निपटारा येथे होतो. खासगी क्षेत्रापासून थेट शासकीय कार्यालयांवर जिल्हाधिकारी कार्यालयाचे बर्‍यापैकी नियंत्रण असते. विविध उतारे, मान्यता, परवानग्या, वादातीत प्रकरणे, भूमिआलेख, कोषागार, आर्थिक बाबी, पुरवठा प्रकरणे, विविध संस्था, ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था व त्यांचे व्यवहार, धोरणे, निवडणुका अशा कित्येक विषयांचे निर्णय येथे निश्चित केले जातात.
भ्रष्टाचारासाठी भारताचे नाव जगाच्या पाठीवर काळ्या यादीत आहेच. शासकीय कार्यालयांमध्ये तर मोठ्या प्रमाणावर याचे आगार असल्याचे दिसून येते. खासगी, वैयक्तीक फायलींपासून शासनाच्या कामांसाठी देखील जिल्हाधिकारी कार्यालयात चिरिमिरी घेतली जातेच. भाऊसाहेब, साहेब, दादा, अण्णा, नाना अशा विविध नावांचा वापर यासाठी केला जातो. अथवा नजीकचे एखादे चहाचे दुकान, पानटपरी, हॉटेल अशा ठराविक ठिकाणी ठराविक संकेतांकासह संबंधित व्यक्ती चिरिमिरीसाठी किंवा व्यवहार होण्यासाठी, फाईल पुढे सरकण्यासाठी ठरलेली रक्कम सुपूर्द करते. रक्कम मिळाल्याचे आणि कोणताही धोका नसल्याचे निश्चित झाल्यानंतर ही रक्कम संबंधित अधिकारी किंवा त्यांचे संबंधित आपल्या ताब्यात घेतात आणि फाईल, फायली पुढे सरकतात.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने कार्यान्वित केलेले सॉफ्टवेअर, राज्यातील अन्य जिल्हाधिकारी किंवा शासकीय कार्यालये देखील कार्यान्वित करतीलच. या सॉफ्टवेअरमुळे एखाद्या व्यक्तीस आपली फाईल नेमकी कोणाच्या टेबलवर आहे? फाईलवर किती प्रक्रिया व्हायची बाकी आहे, हे समजण्यास मदत होईल. मात्र एका टेबलवरून दुसर्‍या टेबलवर (अगदी शेजारीच) फाईल जाण्यासाठी लागणारा कालावधी, वेळ याची कोणतीही शाश्वती नसते. या प्रणालीमुळे भ्रष्टाचार कमी होईल काय? याचा विचार होणे गरजेचे आहे. किंबहुना फाईल लवकरात लवकर साहेबांपुढे जाऊन त्यावर स्वाक्षरी होण्यासाठी चिरिमिरीचे दर बहुदा आणखी वाढतील अशी शक्यता नाकारता येत नाही. ठिकठिकाणच्या जिल्हाधिकारी, शासकीय मुख्य अधिकारी यांनी याचबरोबर भ्रष्टाचाराकडे खर्‍या अर्थाने लक्ष देऊन भ्रष्टाचार देखील कमी होणे ही वाढत्या महागाईमुळे ठरलेली सर्वसामान्यांची गरज आहे.

सिडकोच्या प्रकल्पांना नगरविकास राज्यमंत्र्यांची भेट

 
मुंबई, ता. १८ - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाकरिता संपादित करण्यात येणार्‍या जमिनीसंदर्भात येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना त्यांचे समाधान होईल, असे पुनर्वसन आणि पुनःस्थापना धोरण अवलंबिण्यात येईल तसेच या प्रकल्पग्रस्तांचे १२.५ टक्के भूखंड वाटपाबाबतचे अधिकारही अबाधित राहतील. अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी दिली आहे. सिडकोच्या विविध प्रकल्पांना भेटी दरम्यान  पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली.
सिडको अध्यक्ष नकुल पाटील, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे उपस्थित होते. सिडकोच्या विविध प्रकल्पांना भेट देऊन त्यांची सद्यस्थिती जाणून घ्यावी तसेच सिडकोच्या कार्यप्रणालीची माहिती जाणून घेण्याच्या दृष्टीने आपण नवी मुंबईस भेट देत आहोत. नवी मुंबई विमानतळ लवकरात लवकर आकारास यावे तसेच येथून स्थलांतरीत होणार्‍या प्रकल्पग्रस्तांची योग्य काळजी घेतली जावी या अनुषंगाने सिडको आणि शासन स्तरावर योग्य निर्णय घेतले जातील असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. सिडकोच्या कार्यपद्धतीविषयी समाधान व्यक्त करताना ते म्हणाले की, १९७० साली केवळ १.१७ लक्ष लोकसंख्या असणारा हा परीसर आज १८ लक्ष लोकांचे निवासस्थान असून हीच सिडकोच्या चांगल्या कार्याची पोचपावती आहे.
श्री. जाधव यांनी यासह विमानतळ प्रकल्प, उन्नती गृहनिर्माण योजना, गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क, आगरी कोळी संस्कृती भवन आणि एक्झिबिशन सेंटर या प्रकल्पांना भेट दिली. प्रकल्पाच्या विकासासंदर्भात सूचना देखील केल्या. सिडकोच्या विभाग प्रमुखांशी विविध प्रकल्पांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्ष नकुल पाटील, संचालक सुभाष भोईर, नामदेव भगत यांनी प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के भूखंडाचे वाटप, गरजेपोटी बांधलेल्या घरांचे प्रश्न इ. विषयी चर्चा करण्यात आली. सिडकोचे मागील ४० वर्षातील विविध प्रकल्प आणि विकसनशील प्रकल्पांविषयी माहिती देणारे सादरीकरण मुख्य नियोजक एम. व्ही. लेले यांनी केले. श्री. सत्रे यांनी प्रकल्पांविषयी विस्तृत माहिती दिली.

सोमवार, १७ जानेवारी, २०११

'केसरी हाऊसिंग' च्या कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई, ता. १७ - पर्यटन उद्योगात ज्याप्रमाणे "केसरी" ने मराठी माणसाचा विश्वास संपादन केला आहे, त्याचप्रमाणे गृहनिर्माण क्षेत्रातही 'केसरी हाऊसिंग' ला निश्चित यश मिळेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
हिमांशू केसरी पाटील आणि शशी जाधव यांनी 'केसरी हाऊसिंग' या गृहबांधणी उद्योगास प्रारंभ केला आहे. एल. जे. रोडवर (माहिम पश्चिम) केसरी हाऊसिंगच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी त्र्यंबकेश्वरच्या सत्यानंद योगपीठाचे स्वामी शिवराजानंद सरस्वती यांच्यासह केसरी पाटील, सुनिता पाटील, वीणा पाटील, आदी उपस्थित होते. कार्यालयास सौ. रश्मी ठाकरे, किरण शांताराम, अतुल परचुरे आदींनी भेट दिली.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...