अशी खचितच एखादी व्यक्ती असेल, की जिला सोनं आवडत नाही, आकर्षण नाही...। अगदी श्रीमंतांपासून गरीबापर्यंत समाजातील सगळ्याच घटकांना सोन्याची क्रेझ असते. त्यातल्या त्यात महिलांचं तर विचारुच नका। सोनं न आवडणारी महिला शोधूनही सापडणार नाही.
सोन्याचा उपयोग विशेषतः मध्यमवर्गीयांना व्यवहार करण्यासाठी चांगलाच होतो. कोणत्याही अडचणीत पैसा जवळ नसला, कमी पडत असला, ऐनवेळी इमर्जन्सी उद्भवल्यास सोनंच शेवटी पैसा मिळवून देणं हा एकमेव पर्याय असतो. इतकं अमूल्य महत्व सोन्याचं आहे. परंतु दिवसेंदिवस सोन्याचे भाव गगनाला भिडत असून मध्यमवर्गीयांसाठी तरी ते सोन्यासारखेच जणू झाले आहेत. परिणामी आगामी लगीन सराईमध्ये आपल्या मुलीच्या अंगावर सोनं घालण्याबाबत पालक चिंतेत आहेत. सध्या (ही बातमी टाइप होईपर्यंत) सोन्याने वीस हजाराचा टप्पा ओलांडला आहे. थेंबे थेंबे तळे साचे..या उक्तीप्रमाणे एक-एक ग्रॅम सोनं जमवायचा विचार केला तरीही तो सहजासहजी शक्य नाही. कारण सतत वाढणार्या महागाईमुळेच उद्याची चिंता असलेली सामान्य व्यक्ती एकदम दोन हजार रुपये देऊ शकत नाही. आज अनेक देणी द्यायची असल्यामुळे पैशाला जणू पाय फुटले असल्याचे चित्र आहे. दिवाळी देखील तोंडावर येऊन ठेपली आहे.
सोमवार, १८ ऑक्टोबर, २०१०
भुजबळ यांची वेबसाइट...
उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची वेबसाइट तयार करण्यात आली आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेबसाइट तयार करण्यात आली आहे. पुण्याच्या चिंतन ग्रुपने ही वेबसाइट तयार केली असून www.chhaganbhujbal.org असा वेबसाइटचा पत्ता आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकर आणि भाषा संचालक श्रद्धा बेलसरे-खारकर यांच्या हस्ते वेबसाइटचे उदघाटन करण्यात आले. यावेळी भुजबळ कुटुंबियांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्री. भुजबळ यांच्या जीवनकार्याची माहिती उपलब्ध करून देण्याच्या हेतूने चिंतन ग्रुपने हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. यावेळी भुजबळ यांनी सांगितले, की अनेकांनी आपल्याला जीवनकार्य लिहिण्याची विनंती केली. परंतु अद्याप आपल्याला बरेच कार्य करायचे आहे.
ही वेबसाइट नियमित अपडेट केली जाणार असून इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांचा पर्याय उपलब्ध असलेल्या या वेबसाइटमध्ये भुजबळ यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला आहे. भुजबळ यांच्या दैनंदिन कार्यक्रमाच्या बातम्या, छायाचित्रे आणि वृत्तपत्रातील कात्रणांचा येथे समावेश असेल.
ही वेबसाइट नियमित अपडेट केली जाणार असून इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांचा पर्याय उपलब्ध असलेल्या या वेबसाइटमध्ये भुजबळ यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला आहे. भुजबळ यांच्या दैनंदिन कार्यक्रमाच्या बातम्या, छायाचित्रे आणि वृत्तपत्रातील कात्रणांचा येथे समावेश असेल.
उपमुख्यमंत्री भुजबळ यांचा वाढदिवस उत्साहत
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा ६२ वा वाढदिवस (ता. १५) त्यांच्या निवासस्थानी उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यासह राजस्थान, बिहार आदी राज्यातून भुजबळ यांना शुभेच्छा संदेश देण्यात आले. याचबरोबर विविध ज्येष्ठ राजकीय नेत्यांसह, अनेक कार्यकर्ते, हितचिंतक, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०१०
उपमुख्यमंत्री भुजबळ यांच्याकडून राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्यपाल के. शंकरनारायणन यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
भुजबळ यांच्यासमवेत खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ हे सुद्धा होते. या दोघांनीही राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री भुजबळ यांचाही आज वाढदिवस असून त्यांनाही राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या.
दसर्यानिमित्त बाजारपेठ तेजीत
मध्यंतरी पितृपक्ष, श्राद्धपक्षामुळे मरगळलेल्या स्थितीत असलेल्या बाजारपेठेत दसर्यापूर्वीच आज अष्टमीपासूनच तेजी आली आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडले असले तरी देखील दिवाळी व आगामी लगीनसराई पाहता, सोने खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यापारी बांधवांनी व्यक्त केली आहे.
विसाव्या राष्ट्रकुल स्पर्धा २०१४ ला ग्लासगो येथे
एकोणीसव्या राष्ट्रकुल स्पर्धांची सांगता काल दिल्ली येथे झाल्यानंतर राष्ट्रकुलाचा ध्वज ग्लासगो प्रशासनाच्या सुपुर्द करण्यात आला. तत्पूर्वी न भूतो न भविष्यति इतक्या चांगल्या प्रकारे सांगता समारंभ पार पडला.सध्याच्या नियोजित योजनेनुसार सन 2014 मध्ये 3 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत ग्लासगो येथे राष्ट्रकुल स्पर्धा अर्थातच commonwealth games चालतील. यात वेटलिफ्टिंग, जिम्नॅशियम, ऍथेलेटिक्स, रेसलिंग, मॅरेथॉन, रग्बी, टेनिस अशा प्रमुख १७ क्रीडा स्पर्धा होणार आहेत.
गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०१०
राष्ट्रकुल स्पर्धेत अखेर शंभरी पार..स्वप्न साकार
राष्ट्रकुल स्पर्धेचा आज समारोप होत असून, सुरवातीस मनोदय व्यक्त केल्याप्रमाणे भारत द्वितीय स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला. दुसर्या स्थानासाठी इंग्लंडने सुद्धा भारताची बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेर भारतीय खेळाडुंनी आपले स्वप्न खरे ठरवत, मनोदयाला जागून दुसरे स्थान टिकवून ठेवले. भारताला एकूण १०१ पदकं मिळाली असून यात ३८ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३६ ब्राँझ अशी पदकं प्राप्त झाली.
हेही नसे थोडके...अखेर शंभरी गाठली।
राष्ट्रकुल (CWG) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दुपारपर्यंत अखेर पदकांची शंभरी गाठलीच..। भारत सध्या (१४ ऑक्टोबर दुपारी ३.००) तिसर्या स्थानावर असला, तरीही दुसर्या स्थानावर पुन्हा पोहोचण्यासाठी एक संधी अजून हातात आहे. आतापावेतो भारताला ३७ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३६ कांस्य पदकं मिळाली आहेत..पाहू या आणखी काय होते ते..।
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...





