मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी हाती भरलेली लेखी नामनिर्देशनपत्रेही स्वीकारण्यात येणार

मुंबई दि. 6 – जानेवारी ते एप्रिल 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करताना ती ऑनलाईन पध्दतीने भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तथापि ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधेतील त्रुटीमुळे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र भरु शकत नसेल अशा ठिकाणी तो हाती भरलेले लेखी नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करु शकेल असे राज्य निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आलेल्या प्रसिध्दिपत्रकात पुढे म्हटले आहे की जे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या अंतिम वेळेआधी म्हणजे सोमवार दि.8 डिसेंबर, 2014 रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष हजर असतील अशा उमेदवारांचे लेखी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी स्वीकारु शकतील. तथापि, अशा सर्व लेखी अर्जांची संगणकीकृत माहिती भरण्याची जबाबदारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची असेल.

स्टर्लिंग महाविद्यालयाचे औषध साक्षरता जनजागृती अभियान

नेरूळ- येथील स्टर्लिंग महाविद्यालयाच्या वतीने नुकताच ५३ वा फार्मसी सप्ताह साजरा करण्यात आला. इंडियन फार्मा असोसिएशन व महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या फार्मसी सप्ताहामध्ये महाविद्यालयाच्या वतीने औषध साक्षरता जनजागृती अभियान देखील राबविण्यात आले. यामध्ये डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा कसा वापर करावा, कोणते औषधे सेवन करावी औषध विकत घेताना कोणती काळजी घ्यावी, त्यांची साठवण कशी करावी याविषयीची माहिती नागरिकांना देण्यात आली. या सप्ताहाच्या निमित्ताने फार्मसी विद्यार्थांसाठी महाविद्यालयाच्या वतीने शनिवारी एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उपस्थीत विद्यार्थ्यांना फार्मसी असोसिएशन चे अध्यक्ष डॉ हेमंत मोंडकर, महाराष्ट्र आरोग्य विद्यालयाचे प्र कुलगुरू डॉ शेखर राजदरेकर, प्राचार्य डॉ घाटगे, डॉ बाविस्कर व अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये फार्मसी क्षेत्रातील नामवंत मंडळी, फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच, सबंधित वेळेत याच दिवशी महाविद्यालयाच्या बाहेरील पटांगणात भाभा अणुसंशोधन केंद्रातील तंत्रज्ञानाचे प्रदर्शनही भरवि...

नवी मुंबई सायन्स फाउंडेशन तर्फे ‘जागतिक अणुउर्जा दिवस’

वाशी : नवी मुंबई सायन्स फाउंडेशन, भारतीय किरणोत्सार संरक्षण परिषद आणि महाराष्ट्र अॅकेडमी ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविदयालय येथील बॅरीस्टर पी.जी. पाटील सभागृहात मंगळवार २ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ‘जागतिक अणुउर्जा दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. जागतिक अणुउर्जा दिवसानिमित्त ‘भविष्यातील उर्जा आणि पर्यावरणाचे एकत्रित जतन’ या विषयावर भारत सरकारच्या अणुउर्जा आयोगाचे माजी चेअरमन व पद्मभूषण डॉ. अनिल काकोडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच, इतरही काही मान्यवरांना सबंधित विषयांवर माहिती सांगण्यासाठी आमंत्रित केले असल्याची माहिती नवी मुंबई सायन्स फाउंडेशनचे चेअरमन डॉ. अरुण भागवत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ‘अणुउर्जा निर्मिती आणि किरणोत्साराचा वापर व यातील सुरक्षितता’ या विषयावर भारत सरकारच्या अणुउर्जा विभागातील मान्यवर शास्त्रज्ञ आणि नवी मुंबईच्या महाविदयालयाचे शिक्षक, विद्यार्थी आणि प्राचार्य यांच्यात परिसंवाद स्वरूपाची चर्चा होणार असल्याची माहिती नवी मुंबई सायन्स फाउंडेशनचे संयोजक एस.पी. ...

जानेवारी ते एप्रिल 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई दि. 29 – जानेवारी ते एप्रिल 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार सदर निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करताना ती ऑनलाईन पध्दतीने भरणे अनिवार्य आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या 14 जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी गुरुवार दि. 4 डिसेंबर 2014 ते सोमवार दि. 8 डिसेंबर 2014 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून रविवार दि. 7 डिसेंबर 2014 हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने फक्त ऑनलाईन नामनिर्देशनपत्रे भरता येतील. मंगळवार दि. 9 डिसेंबर 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक गुरुवार दि. 11 डिसेंबर 2014 हा असून मंगळवार दि. 23 डिसेंबर 2014 रोजी मतदान घेण्यात येईल. या निवडणुकांची मतमोजणी संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रत्येक मतदान कें...

जळगावात 28 पासून ‘कृषी व डेअरी’ प्रदर्शन; चार दिवसीय प्रदर्शनात असणार प्रात्यक्षिकांवर भर

जळगाव (प्रतिनिधी) - जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. व पुणे येथील डीएसके मिल्कोट्रॉनिक्स् प्रयोजित ‘कृषी व डेअरी एक्स्पो 2014’या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे येथील शिवतीर्थ मैदानावर 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. अ‍ॅग्रोवर्ल्ड हे या प्रदर्शनाचे आयोजक असून प्लँटो कृषीतंत्र व जलश्री सहप्रायोजक आहेत. या चार दिवसीय प्रदर्शनासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जळगाव जिल्हा परिषद, आत्मा व नाबार्ड या शासकीय संस्थांचे सहकार्य लाभले आहे. जळगावात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ‘डोम स्ट्रक्चर’मध्ये हे प्रदर्शन होत असून 120 स्टॉलधारक सहभागी होत आहेत. सध्याची दुष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई, हवामानाचा लहरीपणा, दरातील चढ-उतार, शेतमजुरांची टंचाई या बाबींमुळे शेतकरी चिंतीत आहे. याचाच विचार करून गरजेवर आधारीत उपाय सुचविण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.थोडक्यात प्रात्यक्षिकांवर भर तसेच नाविन्यपूर्ण बाबींचा समावेश हेच या प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये असेल. मग त्यात अत्याधुनिक सूक्ष्म सिंचन प्रणाली, यंत्र, तंत्र, अवजारे, नवीन वाण, फवारण...

ज. स. सहारिया राज्य निवडणूक आयुक्तपदी विराजमान

मुंबई दि. 5- माजी मुख्य सचिव आणि नवनियुक्त राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आपल्या पदाचा कार्यभार आज सकाळी स्वीकारला. नवीन प्रशासन भवनातील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आज सकाळी श्री.सहारिया यांचे आगमन झाल्यावर राज्य निवडणूक आयोगाचे सचिव मधुकर गायकवाड यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

एकनाथ ठाकूर यांच्या निधनाने बँकिंग व्यवसायाचा मानवी चेहरा हरपला --उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली

मुंबई, दि.7 :- सारस्वत बँकेचे अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ ठाकूर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. देशातील बँकिंग व्यवसायाला मानवी चेहरा देणारं, सामाजिक बांधिलकी जपणारं दिलखुलास व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात पुढे म्हणतात की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या म्हापणसारख्या दुर्गम खेड्यात जन्म झालेल्या ठाकूर साहेबांनी गरिबीशी सामना करत स्टेट बँकेसारख्या अग्रगण्य बँकेत नोकरी मिळविली. बँकिंग व्यवसायाशी आलेला हा पहिला संबंध त्यांच्या अखेरपर्यंत कायम राहिला. महाराष्ट्रातल्या तरुणांना बँकिंग व्यवसायाची दारं खुली करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यांनी स्थापन केलेल्या नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगने लाखो तरुणांना बँकिंग व्यवसायात नोकरी मिळवून दिली. नाशिकचं कुसुमाग्रज प्रतिष्ठान, कोकण मराठी साहित्य परिषदेसारख्या विविध सामाजिक संस्थांच्या जडणघडणीत त्यांचं योगदान मोलाचं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली सारस्वत बँकेने केलेली प्रगती इतर बँकांसाठी मार्गदर्शक आणि प...

नवी मुंबईने पाडला स्वेच्छा सीसीटीव्ही कॅमेरा देखरेखीचा नवा पायंडा

नवी मुंबई, (प्रतिनिधी) - सीसीटीव्ही देखरेखीसाठी स्वेच्छेने आचारसंहिता राबविणारे नवी मुंबई हे देशातील पहिलेच शहर ठरले आहे. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता संभाव्य गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी छुप्या कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सिडकोने स्वेच्छा सीसीटीव्ही कॅमेरा देखरेखीची आचारसंहिता तयार केली. सिडको अधिकारकक्षेतील खाजगी तसेच सरकारी आस्थापनांनी या आचारसंहितेला मान्यता दिली आहे. सीसीटीव्ही प्रकल्पासाठी सिडकोने सुकाणू समिती स्थापन केली होती. राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्री. राजेश अग्रवाल हे या समितीचे अध्यक्ष आहेत. प्राइसवॉटरहाऊसकूपर्स हे सिडकोचे या प्रकल्पासाठी सल्लागार आहेत. समितीने नवी मुंबईतील सर्व खाजगी आणि सरकारी संघटना, संस्था आणि कंपन्यांच्या वरिष्ठांशी या संहितेबाबत चर्चा करून ती निश्चित केली. या संहितेनुसार रेल्वे स्थानके, दुकाने, मॉल्स, चित्रपटगृह, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण प्रकल्प, कारखाने, गोदामे अशा विविध सार्वजनिक स्थळी छुपे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ही...

नवी मुंबईकरांना टोलचा भार लावणार नाही – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

मुंबई - (प्रतिनिधी) - सायन ते कळंबोली हा दहा पदरी रस्ता मोकळा करण्यात आला आहे. या रस्त्याचा ९५ टक्के भाग सिडकोच्या कार्यक्षेत्रात येतो. सिडकोच्या उभारणीत येथील स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या रस्त्यावरील टोलचा भार नवी मुंबईकरांवर पडू नये, यासाठी आपण आजच्या कॅबिनेट बैठकीत सिडकोतर्फे १२०० कोटी देण्याची मागणी करणार असल्याचे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विष्णूदास भावे नाट्यगृह,वाशी येथे पार पडलेल्या नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. ठाणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात टोलनाके आहेत. हे टोलनाके कसे कमी करता येतील, यावरही विचारविमर्श चालू असल्याचे अजित पवार म्हणाले. MMRDA, सिडको आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यांचा समन्वय साधून हे टोलनाके बंद करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच Light Motor Vehicle ला दुचाकी, तीन चाकी आणि एसटीप्रमाणे टोलमधून वगळता येऊ शकते का? याचीही चाचपणी चालू केल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांना भावपूर्ण निरोप

मुंबई दि. 5 (प्रतिनिधी) - राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांना कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांतर्फे आज भावपूर्ण निरोप देण्यात आला. राज्य निवडणूक आयुक्त पदाची पाच वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण करुन श्रीमती सत्यनारायण आज निवृत्त होत आहेत. यानिमित्त आज आयोगाच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातर्फे त्यांना एका अनौपचारिक समारंभात भावपूर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव, मधुकर गायकवाड यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देण्यात आला. कोणत्याही प्रकारे आपला औपचारिक निरोप समारंभ करु नये अशा प्रकारच्या सूचना श्रीमती सत्यनारायण यांनी आधीच कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांनी निरोप घेतला आणि सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. हा आगळावेगळा निरोप समारंभ भाषणाविनाच पार पडला.