शनिवार, २८ जानेवारी, २०१२

पुणे येथील 'त्या' बसचालकाची रवानगी वेड्यांच्या रुग्णालयात

पुणे, ता. 28 - गेल्या बुधवारी सकाळी येथे बस पळवून सुमारे 27 लोकांना जखमी करणाऱ्या त्या बसचालकाची रवानगी 1 फेब्रुवारीपर्यंत येरवडा वेड्यांच्या रुग्णालयात करण्यात आली आहे. स्थानिक न्यायालयाने पोलिसांना संबंधित बसचालक संतोष माने याला वेड्यांच्या रुग्णालयात निरीक्षणासाठी पाठविण्याबाबत निर्देश दिले आहेत. माने याने मास्टर-की च्या सहाय्याने स्वारगेट बस स्थानकावरून बस पळवून नेली होती. यानंतर त्याने पादचारी मार्गासह, विरुद्ध दिशेने बस चालवून अनेकांना जखमी केले तर या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला, काही वाहनांचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

Who is powerful...?

Republic Day celebration at NMMC General Hospital Vashi.

Flag hoisting was done at the hands of Shri Vithal More Saheb Leader of the house along with Shri Vikram Shinde Saheb Health Comittee Chairman.Ceremony was duly attented by Medical Superintendent along with his staff from all cadre

बुधवार, २५ जानेवारी, २०१२

पुणेः 'त्या' बसचालकावर खुनाचा गुन्हा दाखल होणार

पुणे, ता. 25 - आज सकाळी राज्य परिवहन मंडळाची बसचा ताबा घेऊन सुमारे 40 गाड्या चिरडून तर 9 लोकांना ठार मारून 25 जणांना जखमी करणाऱ्या बसचालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
संबंधित बसचा चालक बसच्या सीटवर नाही हे पाहून दुसरा बसचालक संतोष माने याने बस सुरू केली. त्याने नंतर चुकीच्या दिशेने (राँग साइड) सुमारे अर्धा तास 16 किलोमीटरपर्यंत बस चालवून अनेक वाहनांचे नुकसान केले तसेच काही विक्रेते, पादचाऱ्यांना जखमी केले. शेवटी निलायम थिएटरजवळ माने याने बस थांबविली. सूत्रांनुसार, माने हा मनोरुग्ण असून त्याला उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्यांना देखील शहरातील तीन विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करता येईल- नीला सत्यनारायण

मुंबई, ता. 24 - प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते संबंधित जिल्ह्यात ध्वजारोहण करता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.
आचारसंहितेच्या कालावधीत प्रजासत्ताक दिन येत असल्यामुळे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे विचारणा केली जात होती. त्यासंदर्भात हे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यास हरकत नसली तरी नेहमीच्या ध्वजारोहण स्थळात बदल करण्यात येऊ नये, या समारंभात करण्यात येणारी भाषणे देशासाठी हुतात्मे झालेल्यांच्या आणि देशाच्या गौरवापुरतीच मर्यादित असावीत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक प्रचाराची भाषणे होणार नाहीत आणि आचारसंहितेचा भंग होणार नाही याची जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही श्रीमती सत्यनारायण यांनी दिल्या आहेत.

रविवार, २२ जानेवारी, २०१२

गुलमर्ग येथे हिमवृष्टी...

गुलमर्ग येथे शनिवारी (ता. 21 जानेवारी) मोठ्या प्रमाणात हीमवृष्टी (स्नोफॉल) होऊन स्की रिसोर्टमध्ये गोठलेले बर्फ कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह पर्यटकांना आवरता आला नाही...

शनिवार, २१ जानेवारी, २०१२

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार जागृती अभियान - नीला सत्यनारायण

मुंबई, ता. 21 - महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लक्षात घेऊन 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त सप्ताहभर मतदार जागृती अभियान राबवावे, असा सूचना राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या निवडणुकीत पैसे किंवा दारूचा वापर होऊ नये यासाठी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या दक्षता समित्यांच्या मदतीने या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करायची आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसाठी तयार केलेल्या सीडींमध्ये आवश्यक ते बदल करून या सीडी स्थानिक केबल टीव्हीवरून प्रसारित कराव्यात आणि इतर माध्यमांद्वारेही या अभियानाची व्यापक प्रसिद्धी करावी. त्याचबरोबर मतदारांना आवाहन करणारे फलकही लावण्यात यावेत, अशा सूचना देखील श्रीमती सत्यनारायण यांनी दिल्या आहेत.

विविध प्रलोभनांचा वापर करून सर्रासपणे मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न काही उमेदवार किंवा राजकीय पक्षांकडून करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे येत आहेत. ते टाळण्यासाठी आणि या निवडणुका निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने या अभियानाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत एक सकारात्मक संदेश पोहोचवावा, असे आवाहनही श्रीमती सत्यनारायण यांनी केले आहे.

दिल्ली येथे विमानसेवा पूर्वपदावर

नवी दिल्ली ता. 21 - येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज विमानसेवा पुन्हा पूर्व पदावर आली. गेले दोन दिवस दाट धुक्यामुळे येथील विमानसेवा विस्कळीत झाली होती.

आज धुके होते परंतु दृश्यमानता चांगली असल्यामुळे धुक्याचा विशेष प्रभाव न पडता कोणतीही विमानसेवा विस्कळीत झाली नाही. आज दृश्यमानता सुमारे 200 मीटर होती असे सूत्रांनी सांगितले. विमानोड्डाण सेवा गेले दोन दिवस विस्कळीत होऊन जवळपास 200 विमानांच्या सेवेवर याचा विपरीत परिणाम होऊन विमानांना 2 ते 8 तास विलंब झाला होता, 28 विमाने रद्द करावी लागली होती तसेच 19 विमानांचा मार्ग बदलविण्यात आला होता. दरम्यान इंदूर येथे देखील धुक्यामुळे विमानसेवेवर परिणाम झाला होता.

कॉर्पोरेट खोडी...

प्रत्येक क्षेत्रातच कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत असल्याची ही बोलकी खोडी...

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...