रविवार, १ मे, २०११
शुक्रवार, २९ एप्रिल, २०११
नवी मुंबई येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी
मुंबई, ता. 28 - येत्या एक मे स महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर नवी मुंबई येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षस्थानी असतील.
नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पातील ११.१० किमी लांबीच्या व ११ स्थानकांचा समावेश असलेल्या "बेलापुर ते पेंढार" मार्गिका क्रमांक एक चे भूमिपूजन यावेळी करण्यात येणार आहे. सेंट्रल पार्क मेट्रो रेल्वेस्थानक (नियोजित) सेक्टर - २४, खारघर, नवी मुंबई येथे रविवारी (ता. १) संध्याकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असून यावेळी, जलसंपदामंत्री व रायगडचे पालकमंत्री सुनिल तटकरे, राज्य उत्पादन शुल्क व ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, सिडको अध्यक्ष नकुल पाटील, नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्यासह खासदार गजानन बाबर, संजीव नाईक, आमदार व सिडको चे संचालक सुभाष भोईर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विवेक पाटील, संदीप नाईक, आदी मान्यवर उपस्थित राहतील. असे सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे, मुख्य अभियंता व महाव्यवस्थापक (तांत्रिक) सिडको - बिपीनचंद्र मेहता आणि सिडकोचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी कळविले आहे.

मध्य प्रदेशही तापले...
गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशात दिवसाचे कमाल ३८ अंश सेल्सिअसवर स्थिरावलेले तापमान वाढून काल (ता. २८ एप्रिल) कमाल ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काही भागात पारा ४१ अंश सेल्सिअसवर सरकला आहे. उन्हामुळे दुपारी रस्त्यावर वर्दळ कमी झाली असून अनेक ठिकाणी ऊसाचा रस, कोल्ड्रिंक, शीत पेयांची दुकाने थाटलेली दिसत आहेत. काही भागात दिवसातून अनेकदा विद्युत पुरवठा खंडीत होत असून रात्रीही डासांचा त्रास होत असल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. नागरी वस्त्यांमध्ये डासांचा उपद्रव झाला असून नागरीकांनी प्रशासनाकडे परीसरात स्वच्छता करण्याची मागणी केली आहे.
सुट्टीची भटकंती...(७)
आज सकाळी माझी तब्येत जरा बिघडली होती. पोटही बिघडलं होतं थोडं...। असं वाटलं की काल हॉटेलचं खाल्लेलं पचलं नसावं. आज जेवण न करण्याचा विचार करून मी मामीला तसं सांगितलं. मामी म्हणाली, अरे काही नाही..दुपारपर्यंत सगळं ठीक होईल बघं. इकडे ये बरं जरा...। मी मामीने बोलावल्यानंतर मामीच्या मागोमाग माजघरात गेलो. तिथे कपाटावर एक पेटी ठेवली होती..हीच पेटी माझ्यासाठी जादूची पेटी ठरली आणि मी दुपारी आंब्याच्या रसावर ताव मारला...ही पेटी म्हणजेच आपण ऐकून असलेला "आजीबाईचा बटवा" होता.
नेहमी नाही पण केव्हातरी गरज भासत असल्यामुळे पेटीरुपी हा आजीबाईचा बटवा मामीने वर ठेवला होता. मी उंच असल्यामुळे आणि मामासुद्धा शेतावर गेलेला असल्यामुळे मलाच ही पेटी खाली काढायला मामीने सांगितलं. यातलं एक औषध मामीने मला दिलं त्यावर गरम पाणी प्यायलो आणि काय? अकराच्या सुमारास एकदा 'तिकडे' जाऊन फटाक्यांच्या आवाजासह सारं काही मस्त होऊन पोट मोकळं झालं, त्यानंतर थोड्या वेळातच पुन्हा एकदा छान वाटू लागलं. मामीने मला एक चूर्ण दिलं होतं हे चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतलं. नेमकं कोणतं चूर्ण असेल याची उत्कंठा शिगेला पोहोचल्यामुळे मी न रहावून मामीला विचारलं..हे चूर्ण हिंग्वाष्टक चूर्ण होतं. अर्धा चमचा चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतलं होतं. नंतर पोटही थोडं शेकलं. यामुळे जणू काही जादूची कांडीच फिरली होती. डॉक्टरांकडे जाण्याचीही गरज भासली नाही. आपण म्हणतो आयुर्वेदाच्या औषधांमुळे खूप उशीरा बरं वाटतं, पण हा अनुभव मी स्वतः घेतला होता. ऍलोपॅथीचं औषध सुद्धा दोनदा घ्यावच लागतं की...। मग आयुर्वेदाला नावं कशाला ठेवायची? या आजीबाईच्या बटव्यात यासह त्रिफळा चूर्ण, कस्तुरी गोळ्या, त्रिभुवन कीर्ती रस, चंद्रप्रभा वटी, शंखवटी, श्वासकासामृत सिरप, ज्येष्ठमधचूर्ण, सुठ, दालचिनी, थोडी हळद, मिरपूड, जिरपूड, कदली क्षार, जायफळ, वेखंड, पानपिंपळी, वेलदोडा, लवंग, कांदा, दुर्वा अशी कितीतरी सामुग्री होती. यापैकी बर्याच गोष्टी तर दररोज स्वयंपाकात वापरल्या जातात.
आज मामाच्या शेतातल्याच आंब्याच्या झाडाच्या कैर्यांचं पन्हं आणि गवतात पिकवलेल्या आंब्यांचा रस, पुरी असं पुन्हा एकदा हेवी जेवण होतं. मामीने जेवणात गरम पाणीच प्यायला सांगितलं होतं. मी सुद्धा तसच करून नंतर पुन्हा एकदा मामीने तयार केलेला दुसर्या औषधाचा डोस घेतला. गावात यात्रा सुद्धा आली होती. सहज यात्रेत फेरफटका मारायला गेलो. यात्रेत डफडी, भोंगा, बासरी, बॅट सगळ्याच वस्तू होत्या. विविध स्टॉल्स होते. काय काय होतं सांगू? एक विशेष म्हणजे गावात जास्त जाड असे कोणीही नव्हते. स्थूल व्यक्तिमत्व होतं पण आजारी असं कोणीही दिसलं नाही किंवा शहरातल्या माणसांसारखी पोटंही कोणाची हातावर नव्हती. याचं कारण म्हणजे दररोज फिरायला जाणं, शेतावर जाऊन काम करणं हे असावं. शहरात आपण एकाच जागेवर तासन् तास बसलेलो असतो, घरी असताना टीव्ही समोर, आणि ऑफिसमध्ये असताना पीसी समोर...परिणामी अनेक विकार आम्हांला जडले आहेत. ग्रामीण भागात भार नियमनामुळे टीव्ही तर कमीच पहायला मिळतो. शेतात न गेल्यास खाणार काय? असा प्रश्न पडतो...खरंच गावाकडचं वातावरण आणि जीवन किती छान आहे...हे मी अनुभवलं आणि दुसर्या दिवशी परत घरी जाण्याचं ठरवलं...

गुरुवार, २८ एप्रिल, २०११
नारायण आठवले यांच्या निधनामुळे पत्रकारितेच्या क्षेत्राची मोठी हानी - छगन भुजबळ
मुंबई, दि. 28 : ज्येष्ठ पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक नारायण आठवले यांच्या निधनामुळे पत्रकारिता व साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. व्यक्तिगत पातळीवर माझा एक चांगला मित्र काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, नारायण आठवले यांनी भारतीय स्वातंत्र्यलढयाबरोबरच गोवा मुक्ती संग्रामातही सक्रिय योगदान दिले. 'लोकमित्र', 'लोकसत्ता' या दैनिकांतील पत्रकारितेबरोबरच 'गोमंतक'चे संपादक म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले. विविध सामाजिक, राजकीय विषयांवर त्यांनी सोप्या भाषेत परंतु अत्यंत नि:पक्षपाती व परखड लिखाण केले. सत्तरच्या दशकात आम्ही चालविलेल्या 'प्रभंजन' या साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही नारायण आठवले यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली. या साप्ताहिकात 'अनिरुध्द पुनर्वसु' या टोपणनावाने त्यांनी केलेले ललित लेखन त्या काळात खूप गाजले. 'चित्रलेखा'मधील त्यांचे लेखही चांगलेच गाजले. सन 1996मध्ये शिवसेनेतर्फे लोकसभेवर खासदार म्हणून त्यांना केवळ अठरा महिने काम करण्याची संधी लाभली तरी, तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांच्यासमोर कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाविषयी आवाज उठविण्याची मोलाची कामगिरी त्यांनी बजावली होती. या विविध क्षेत्रांतले त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे, असेही भुजबळ यांनी शेवटी म्हटले आहे.
दरम्यान, खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांनीही नारायण आठवले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
एक अत्यंत हुशार व जाणकार पत्रकार, लेखक म्हणून लौकिक असलेल्या आठवले यांच्या निधनामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत खासदार समीर भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
आजच्या पत्रकारांनी आदर्श घ्यावा, अशी पत्रकारिता नारायण आठवले यांनी केली. पत्रकारितेची मूल्ये जोपासत असताना त्यांनी कधीही तडजोड केली नाही, अशा भावना आमदार पंकज भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

सुट्टीची भटकंती...(६)
...सकाळी उठून गावात फेरफटका मारावा या उद्देशाने तयार झालो आणि गावात गेलो. अगदी गावाच्या सीमेपर्यंत पोहोचलो. गावाच्या सीमेवर अगदी टिप्पीकल वास येत होता...तसाच उलट पावली परत फिरलो. शासनाची शौचालयासंदर्भात असलेली योजना स्वीकारण्यास अजूनही ग्रामस्थ मंडळी तयार नाहीत असं दिसलं. ठराविक घरांमध्येच किंवा घराबाहेर सिट्स बसविल्याचं लक्षात आलं. खरंतर शासनाच्या अनेक चांगल्या योजना असतात, पण त्या व्यवस्थित राबविल्या जात नसाव्या किंवा पोहोचत नसाव्या. खर्च तर होऊन जातो, हे मी तुम्हांला मागेही सांगितलंच (कदाचित हा उल्लेख अनेकदा होईल). हो, एक मात्र आहे. शासनाने ग्राम स्वच्छता चांगल्या प्रकारे राबविणार्या ग्रामपंचायतीला, पालिकेला बक्षिस, पुरस्कार, काही सवलती जाहीर केला असल्यामुळे अनेक गावं ही योजना चांगल्या प्रकारे कशी राबवता येईल, यशस्वी कशी होईल याचा विचार करतात आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीही करतात. या गावात सुद्धा तसंच चित्र होतं. गावात ठिकठिकाणी गल्लीच्या कोपर्यावर कचरा-कुंडी ठेवली होती. तसंच कचरा गोळा करण्यासाठी दररोज सकाळी ठराविक वेळेत कचरा उचलणारी गाडी, कर्मचारी किंवा घंटागाडी येत होती. ही घंटागाडी थोडी मोठी असल्यामुळे अरूंद गल्ल्यांमध्ये जाऊ शकत नव्हती. तिथे गल्लीच्या तोंडावर गाडी थांबून कर्मचारी थेट आतमध्ये येऊन कचरा नेताना दिसत होते. सगळा कचरा गोळा करून गावापासून सरासरी पाच ते सहा किलोमीटर दूर नेऊन तिथे स्वतंत्र व्यवस्था केली होती. कचर्यातलं प्लॅस्टिक इथे वेगळं केलं जायचं. प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग्ज वापरण्याची बंदी इथेही घातलेली होती. म्हणून शासनमान्य प्रमाणातील कॅरी बॅग्ज किंवा कागदी पिशव्या वापरण्याचा आग्रह केला जात होता (कॅरी बॅग ला..मी गंमतीने वाहक पिशवी असं म्हटलं आणि आमच्या मामाला हसू आलं).
गावातल्या काही धनाढ्यांकडे खूप गाई होत्या. त्यांनी गावाबाहेर छानसं फार्म हाऊस तयार केलं होतं. इथून दूध शहरांमध्ये पाठवलं जायचं. तसंच गावच्या सरपंचाने तर दुधापासून तयार होणार्या पदार्थांचा छोटासा कारखानाच सुरू केला होता. त्यालाही प्रतिसाद चांगला होता. हा कारखाना बघण्याची मनात इच्छा होती. सरपंच चक्क बी. एस्सी. पीएच. डी. असल्यामुळे संशोधनातही त्याला अभिरूची होती. त्या दृष्टीने तो सुद्धा याव्यतिरिक्त काहीतरी प्रयत्न करतोय असं वाटलं.
घरी परत येताना बस स्थानकाशेजारच्या हॉटेलमधून मस्तपैकी वड्यांचा आणि मिसळीच्या रस्श्याचा वास आला. आज वडा-पाव आणि मिसळ खायची असा विचार केला आणि हॉटेलमध्ये शिरलो. पाहिलं तर थोडंस अस्वच्छ असं हॉटेल होतं. इतक्या सकाळी सुद्धा गावातल्या नागरिकांप्रमाणे माशाही उठलेल्या जाणवलं. पण विचार केला, इथले लोक तर इथे खातातच आपण ही खाऊन पाहू...वडा-पाव खायला सुरवात केली, मात्र...पाव वडा खायला सुरवात केली आणि काय विचारता। तिखट पण खावा असाच वाटणारा तो वडा होता. नाकातून पाणी यायला आणि कान खाजवायला सुरवात झाली. ऑर्डर प्रमाणे त्यांनी संगळं दिलं होतं आता खाणं आवश्यकच...। कमी गर्दी असल्यामुळे हॉटेलच्या मालकाला ते लक्षात आलं. जवळ येऊन त्याने, नवीन दिसताय? कुठून आलात? जास्त तिखट लागलं का? अरेरे...अरे, थोडा कलाकंद आण पाहू...असं एका वेटरला(कळकट कपड्यातल्या पोर्याला) सांगितलं. कलाकंद खाल्ल्यानंतर जरा बरं वाटलं. माझ्या समोर बसलेला एक माणूस तर चक्क मिरची कचाकचा खात होता..ते पाहून तर मलाच चर्र झालं. मिसळही खाल्ली, वरून मुद्दामच हॉटेलचा चहा प्यायलो. बिल द्यायला गेलो, मात्र खिशात पैसे थोडे कमी होते. असं कुठे जाऊ याची शक्यता नसल्याने मोजके पैसेच खिशात ठेवले होते. आता काय करावं? या विचारात असताना हॉटेलच्या मालकाने ते ओळखलं आणि तुम्हा पाहूणे आहात, राहू द्या पैसे. असं सांगितलं आणि घेतलेले पैसेही परत केले. मी खूप आग्रह केला तरी घेतले नाहीत...गावच्या माणसांच्या मायेचा ओलावा आणि शहरातील शुष्कता रूक्षपणा यावरून माझ्या लक्षात आला..!

बुधवार, २७ एप्रिल, २०११
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी डंकन फ्लेचर
झिंबाब्वे चे माजी कसोटीपटू डंकन फ्लेचर यांची भारतीय संघाचा कोच (प्रशिक्षक) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी ही नियुक्ती असेल. श्री. फ्लेचर यांनी यापूर्वी इंग्लंड संघाचे प्रशिक्षकपद सुमारे आठ वर्षे भूषविले आहे. अधिक माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही.
सुट्टीची भटकंती...(५)
आज सकाळी मला जाग आली, ती कोणाच्या तरी भांडणामुळे...। ओसरीवर जाऊन पाहिलं तर, सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून दोन महिलांमध्ये भांडण सुरू होतं. पाण्यासाठी नंबर लावण्यावरून हे भांडण असल्याचं लक्षात आलं...इथे विषय भांडणाचा असला, तरी ग्रामीण भागात अजूनही विशिष्ट वेळेत ग्रामपंचायत पाणी पुरवठा करते. आजकाल शहरांमध्येही असंच चित्र पहायला मिळतं. ग्रामीण भागात मात्र अन्य वेळात पाण्याच्या टाकीखाली असलेल्या नळावरून किंवा पाणवठ्याच्या जागेवरून पाणी आणावं लागतं. आजकाल तसं सगळ्याच ठिकाणी 'ससे' अर्थात समाजसेवक झाले आहेत, ते टँकरद्वारे पिण्याचे पाणी अथवा वापरण्यासाठी पाणी उपलब्ध करून देतात, हे वेगळं. तसंच जमीनीत बोअरिंग करून सुद्धा गेल्या दशकापासून खासगी रितीने स्वतःसाठी पाणी उपलब्ध करून घेतलं जातं.
मामाच्या गावात फिरताना काही ठिकाणी गोबर गॅस ही संकल्पना दिसली. गावामध्ये जवळपास प्रत्येकाकडे गाई, म्हशी असतातच. यांच्या शेणापासून गवर्या थापून झाल्यानंतर उर्वरित शेण या गॅससाठी वापरलं जातं, तसंच बर्याचदा प्लॅस्टिक विरहित कचरा सुद्धा लोक यात टाकताना दिसतात. पण यामुळे पैशाची बचत होते असं म्हणतात. याला जागा मात्र जास्त लागते. नाहीतरी, शहरात जवळपास बाराही महिने घरगुती गॅसची टंचाई भासते (भासवली जाते). घरगुती गॅसच्या किंमतीही दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालताहेत.
आज शेजारीच लग्नं होतं त्यामुळे मामाकडे घरी स्वयंपाक होणार नव्हता. लग्न लागल्यानंतर अगदी टाळी वाजल्यानंतर म्हटलं तरी चालेल, लगेच पानं वाढण्याची तयारी सुरू झाली. वाढण्यासाठी म्हणून चक्क केळीच्या पानांचा उपयोग केला जातो. छान, वरण, पोळी आणि वांग्याची भाजी..। पोळी कुस्करून झाल्यानंतर आळं करून त्यात गरम-गरम वरण वाढतात आणि तूप ओतून मनसोक्त खातात, सोबत वांग्याची घोटलेली भाजी..असं हे जेवण म्हणजे पक्वान्नच असतं. जेवून घरी आल्यानंतर केव्हा झोप लागली कळलंही नाही...

मंगळवार, २६ एप्रिल, २०११
मलंग गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉली प्रकल्पास अंतिम मंजूरी: कामाला लवकरच सुरवात
हाजी मलंगगड (ता. अंबरनाथ, जि. ठाणे) येथे येणार्या भाविकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक फ्युनिक्युलर यंत्रणा बसविण्याच्या प्रकल्पास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत काल (ता. २५) अंतिम मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरवात करता येणार आहे.
राज्यातील उंचावरील देवस्थानांच्या ठिकाणी फ्युनिक्युलर ट्रॉली बसविण्याची संकल्पना मांडणार्या सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा यासाठी मोलाचा ठरला आहे.
हाजी मलंगगडासह सप्तशृंगी गड, माहुर गड आणि जेजुरी या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी फ्युनिक्युलर ट्रॉली बसविण्याची कल्पना श्री. भुजबळ यांनी मांडली होती. सप्तशृंगी गडावरही फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम लवकरच सुरू होणार असून उर्वरित दोन गडांवरील कामेही लवकरच मंजूर केली जातील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
हाजी मलंगगड येथे प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी १० मार्च २००८ ला मिळाली असली तरीही हा प्रकल्प माथेरान इकोसेन्सिटीव्ह झोनमध्ये येत असून याला माथेरान मॉनिटरिंग कमिटी तसेच केंद्रीय वन व पर्यावरणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता मिळणे देखील आवश्यक होते.
प्रत्येकी ६० प्रवासी क्षमता असलेल्या दोन ट्रॉलींची ही यंत्रणा उभारण्यासाठी विक्रोळी येथील सुप्रिम सुयोग यशिता कन्सोर्टियम या कंपनीला २४ वर्षे ५ महिने (बांधकाम कालावधीसह) मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पात ११७४ मीटर लांबीच्या मार्गावर फ्युनिक्युलर ट्रॉली बसविण्याबरोबरच ८०० मीटर जोडरस्ता चौपदरी काम करणे, प्रत्येकी ६० प्रवासी क्षमतेच्या दोन ट्रॉली, पायथ्याशी व डोंगरावरील ट्रॉली स्टेशन्स. पार्किंगची सोय, भाविकांसाठी स्वागत कक्ष, स्वच्छतागृह इ. सुविधा, रॉक फॉल प्रोटेक्शन सिस्टीम (दरडरोधक सुरक्षा यंत्रणा) तसेच वृक्षारोपण व परीसर सुशोभीकरण यांचाही समावेश आहे.

अगोदर भारतीयांचाच विचार करावा...
शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला भारत पेट्रोल आणि डिझेल निर्यात करण्यास तयार आहे. देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेल या इंधनांचे दर वाढत आहेत.सरकारने पाकिस्तानला पेट्रोल आणि डिझेल निर्यात कऱण्याऐवजी देशातील नागरिकांना सुरळीत आणि स्वस्त पुरवठा कसा होऊ शकेल? याचा विचार गांभीर्याने करण्याची आवश्यकता आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...