मुंबई, ता. १६- जम्मू येथे झालेल्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या विजेत्या उपविजेत्या संघाचे उपमुख्यमंत्री पवार यांनी कौतुक केले.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची धुरा सांभाळत असतानाच उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दोन्ही संघाने आपल्याला ही विजयाची बहुमोल भेट दिली असल्याचे प्रतिपादन यावेळी पवार यांनी केले. मुलांच्या संघाचे प्रशिक्षक प्रशांत मोकल, कर्णधार अक्षय उघाडे, मुलींच्या संघाचे प्रशिक्षक संतोष शिर्के, कर्णधार प्राजक्ता तापकिर आदी उपस्थित होते. असोसिएशनचे सरकार्यवाह मोहन भावसार यांची चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कबड्डीचे तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.
बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०
मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०१०
मंत्र्यांचा कँपस इंटरव्ह्यू एक चांगला पायंडा...
राज्याच्या मंत्रीमंडळात समाविष्ट करून घेण्यासाठी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये इच्छुक (उमेदवार) मंत्र्यांचे कँपस इंटरव्ह्यू घेण्यात आले. अनेक मंत्र्यांनी आपल्या कार्याची तर काही मंत्र्यांनी आपल्या कामाची, कामगिरीची फाईलच यावेळी दाखविली, काही मंत्र्यांनी बाहेर व्यवस्थित अभ्यास करून प्रवेश केल्यानंतर आपल्या कामांचा पाढा म्हणून दाखवला. काहीही असो...शिक्षणाचा कुठे ना कुठे फायदा तर झाला?
शंभर टक्के शिक्षीत आणि गुन्हे दाखल नसलेल्या उमेदवारासच भविष्यकाळात निवडणुकीत (मग ती गावपातळीपासून थेट दिल्लीपर्यंत, कोणतीही असो) तिकिट देण्याची पद्धत सुरू करणे काळानुसार आवश्यक आहे. परिणामी घाणेरड्या राजकारणापासून दूर राहून देशाचा विकास खर्या अर्थाने करणे सहज शक्य होईल, हीच अपेक्षा.

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०१०
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्र्यांचाही "आदर्श"
आपल्या अभिनंदनाचे होर्डिंग, बॅनर काढण्याच्या सूचना नवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
या सूचनेची त्वरीत अंमलबजावणी कार्यकर्ते आणि महापालिकेने केली असून आतापर्यंत सुमारे पाच हजार होर्डिंग, बॅनर, काढण्यात आले आहेत. ही बाब खरोखर स्तुत्य असून आदर्श ठरली आहे. राज्यातील अन्य नेत्यांनी देखील हे ध्यानात घेऊन तशी कृती करावी.

अशोक चव्हाण यांना मंत्रीमंडळात न घेण्याचा "आदर्श"...?
आदर्श गृहनिर्माण संस्था प्रकरणी राजीनाम द्यावा लागलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नवीन मंत्रीमंडळात समावेश न करण्याचे काँग्रेसने जवळपास निश्चित केले आहे.
नवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्ली येथे काल काँग्रेस मुख्यालयात पक्षश्रेष्ठींशी नूतन मंत्रीमंडळातील समाविष्ट करण्यासंदर्भात मंत्र्यांविषयी चर्चा केली. यामुळे अनेक मंत्री दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात तळ ठोकून होते. परंतु माजी मुख्यमंत्री यांचा नूतन मंत्रीमंडळात समावेश न करण्याचे संकेत मुख्यालयाने दिले आहेत. भ्रष्टाचार करणार्यांची गय नाही, असा आदर्श काँग्रेस घालून आपली प्रतिमा बदलवू इच्छित असल्याचे हे द्योतक असल्याचे मत ज्येष्ठ काँग्रेसजन व्यक्त करीत आहेत.

रविवार, १४ नोव्हेंबर, २०१०
शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०१०
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ग्वांगझू सज्ज- ४७६ सुवर्ण पदकांचा निर्णय
ग्वांगझू, ता. १२- आजपासून (ता. १२) सुरू होणार्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी चीन सज्ज झाले आहे. ग्वांगझू सह चीन मध्ये स्पर्धा होणार्या सर्व ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे पावसाचे ढग विखुरणारी पाच विमाने देखील यात सामील करण्यात आली आहेत. यासह पाऊसरोधक रॉकेट्स देखील सज्ज ठेवण्यात आली आहेत. नुकत्याच भारतात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या त्रुटींचा देखील अभ्यास करून उणीवा दूर करण्यात आल्या आहेत. १२ ते २७ नोव्हेंबरपर्यंत १५ दिवस स्पर्धा चालणार आहेत. यावेळी एकूण ४७६ सुवर्णपदकांचा निर्णय होईल.
वक्तव्य करताय..? जरा जपून...!
गेल्या काही दिवसात काँग्रेस आणि संघ दोघांनी एकमेकांविरुद्ध केलेल्या वक्तव्यांचे पडसाद देशभरात उमटले आहेत. कोणतेही वक्तव्य जपून करणे गरजेचे आहे.
राजकारण म्हटले म्हणजे त्यात पक्ष, व्यक्ती अथवा संबंधित विषय, घटनेच्या थोडक्यात उल्लेख करायचा झाल्यास एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडणे, वक्तव्ये करणे, पदच्युत होणे, पक्षातून हकालपट्टी, निलंबन हे ओघाने आलेच. अनेकदा केवळ कारणासाठी, पैशासाठी, विरोधक म्हणून किंवा विरोधकाने विरोध केलाच पाहिजे या भूमिकेतून विरोध केला जातो. बर्याचदा संबंधित पदाधिकारी, कार्यकर्त्याची पक्षातून हकालपट्टी, निलंबन होणे असे प्रकार सर्रासपणे होतात. यात क्वचित विरोधक बघ्याची भूमिका सुद्धा पार पाडतात. पक्षातून हकालपट्टी झालेला कार्यकर्ता, पदाधिकारी अथवा संबंधित व्यक्ती नंतर जाहीर सभा, पत्रकार परिषद, वर्तमानपत्रातून लेखी निवेदनाद्वारे, स्वतःच निषेधाच्या माध्यमातून विविध आरोप करताना दिसतात. अनेकदा त्याच पक्षात, ठिकाणी चाललेल्या गैरव्यवहार, दुरुपयोग, भ्रष्टाचार, दंडूकेशाही, दडपशाही, धाक-दपटशा इत्यादीविषयी नंतर अगदी घसा फुटेपर्यंत माहिती सांगितली जाते.
पक्षात किंवा त्या क्षेत्रात कार्यरत असताना देखील सुरू असलेला भ्रष्टाचार अशा लोकांना दिसत नसेलच. मात्र तिथून निघाल्यावरच हे सर्वकाही दिसत असावे. कदाचित सावली अथवा छत्रछाया दूर झाल्यामुळे, अवकृपा झाल्यामुळे हे होत असावे. मध्यंतरी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपानंतर प्रचंड गदारोळ झाला. यानंतर संघाचे के. सुदर्शन यांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद देशभर उमटले असून आंदोलन, निषेध करण्यात आला. कोणीही वैयक्तीक किंवा संघटनात्मक, पक्षाविरुद्ध, संस्थेविरुद्ध निषेध नोंदविण्यासाठी वक्तव्य करताना विषय संवेदनशील होणार नाही, प्रसंगी अघटित घटना देखील घडून देशाचे नुकसान, हानी होणार नाही याचे भान ठेवणे ही काळाची गरज ठरली आहे. ।।..वादे वादे जायते लठ्ठ-लठ्ठी...।। हे ब्रीद समाजातल्या प्रत्येक घटकाने, त्यातल्या त्यात बुद्धीजीवी मंडळींनी तरी लक्षात ठेवल्यास लाभच आहे, हे ही नसे थोडके.!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला
मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०१०
महाराष्ट्रात ४० वर्षात २० मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस १ मे १९६० पासून ११ नोव्हेंबर २०१० पर्यंत राज्याने एकूण २० (वीस) मुख्यमंत्री पाहिले..कारकीर्द पुढीलप्रमाणे:
१) यशवंतराव चव्हाण - १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२
२) मारोतराव कन्नमवार - २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३
३) वसंतराव नाईक - ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५
४) शंकरराव चव्हाण - २१ फेब्रुवारी १९७५ ते १७ मे १९७७
५) वसंतदादा पाटील - १७ मे १९७७ ते १८ जुलै १९७८
६) शरद पवार - १८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८०
७) अ. र. अंतुले - ९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२
८) बाबासाहेब भोसले - २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३
९) वसंतदादा पाटील - २ फेब्रुवारी १९८३ ते १ जून १९८५
१०) शिवाजीराव निलंगेकर - ३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६
११) शंकरराव चव्हाण - १२ मार्च १९८६ ते २६ जून १९८८
१२) शरद पवार - २६ जून १९८८ ते २५ जून १९९१
१३) सुधाकरराव नाईक - २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३
१४) शरद पवार - ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५
१५) मनोहर जोशी - १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९
१६) नारायण राणे - १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९
१७) विलासराव देशमुख - १८ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३
१८) सुशील कुमार शिंदे - १८ जानेवारी २००३ ते ३० ऑक्टोबर २००४
१९) विलासराव देशमुख - १ नोव्हेंबर २००४ ते ५ नोव्हेंबर २००८
२०) अशोक चव्हाण - ४ डिसेंबर २००८ ते आज (ता. ११ नोव्हेंबर) पर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री
२१) पृथ्वीराज चव्हाण - शपथविधी होणे बाकी (११ नोव्हेंबर २०१०) ते

बुधवार, १० नोव्हेंबर, २०१०
चव्हाण, पवार - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस पृथ्वीराज चव्हाण यांची तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची वर्णी लागली आहे. चव्हाण यांची प्रतिमा अद्याप स्वच्छ असल्यामुळे आणि पक्षात त्यांचे वजन असल्यामुळे त्यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. अशोक चव्हाण हे आदर्श गृहनिर्माण संस्था घोटाळ्यात अडकल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद गमवावे लागले. आज सकाळी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. उपमुख्यमंत्री पदावर राज्याचे जलसंपदा व ऊर्जामंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे अजितदादा पवार यांची निवड करण्यात आली.
काहीही असले तरीसुद्धा पुन्हा एकदा आणखी एका "चव्हाण" यांचीच वर्णी लागली आहेच..।

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...