मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Overwhelming response for Talent hunt at UAFT

Thane, December 22, 2013: As the Christmas is around the corner, Santa Claus is gifting a big surprise to the Thaneites with UPVAN ARTS FESTIVAL. The Upvan Art Festival is organizing the biggest Talent hunt at Thane in the performing arts involving vocals (gaayan), dance(Nritya) and playing of musical instruments (vaadan). Shripad Bhalerao, Director of Performing Arts, Upvan Arts Festival speaking at the auditions said, “We have received more than 400 entries from Thane, Mumbai, Nashik, Ahmednagar, and Ambernath. It took us 15-20 days to plan and organize this, with participants in the age group of 11 to 16 years, 16 to 25 years and more than 25 years categories. This has been the largest registration of participants in Thane district till date. Entries are for non-Bollywood performing arts, pure classical and semi-classical art forms.” For the talent hunt, the organizers bottom to top approach helped to reach out to all schools, and colleges across Thane and neighboring districts

प्रदेशाच्या विकासात काँग्रेसने सहकार्य करावे- शिवराज

इंदूर- ता. ८ डिसेंबर- मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत अपेक्षानुरुप विजयाचा आनंद ओसंडून वाहणार्‍या मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी प्रदेशाच्या विकासात काँग्रेसने सहकार्य करण्याचे आवाहन आज आपल्या आभारप्रदर्शनात केले. श्री. चव्हाण यांनी देखील गुजराथचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच हॅटट्रिक केली आहे. मध्यप्रदेशात तिसर्‍यांदा कमळ फुलल्याचा आनंद श्री. चव्हाण यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. आज संध्याकाळी श्री. शिवराज चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक २०१३ मध्ये प्रदेशातील मतदारांनी भाजपास बहुमताने विजय मिळवून दिल्याबद्दल मतदारांचे, पक्षकार्यकर्ते, पदाधिकारी, पक्षाचे केंद्रीय नेतृत्व, ज्येष्ठ-श्रेष्ठांचे आभार मानले. निवडणुकीत आरोप-दोषारोप होतच असतात, माझा कोणावरही राग नाही. निवडणुका पार पडल्या. व्हायचे तेवढे राजकारण झाले. आता काँग्रेसने देखील प्रदेशाच्या विकासासाठी आपल्याला सहकार्य करण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले. यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, जनता जनार्दनाच्या स्नेह आणि प्रेमामुळेच पक्षास बहुमत प्राप्त झाले आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी व

चहास्तोत्रम्...

शीण सुस्ती महानिद्रा, क्षणात पळवी चहा प्रभाते तोंड धुवोनी, घेता वाटे प्रसन्नता... अर्धांगिनी हस्ते घेता, निद्रा तात्काळ विरघळे पुन्हा स्नानांतरे घेता, अंगी चैतन्य सळसळे... लिंबुयुक्त विना दुग्ध, अरुची पित्त घालवी शर्करेविना घेता, मधुमेह न गांजवी... शितज्वर शिरःशूळा, खोकला नाक फुरुफुरा गवतीपत्र अद्रकयुक्त, प्राशित जाई सत्वरा... भोजनपूर्व प्राशिता, मंदाग्नी, पित्तकारका घोटता घोटता वाढे, टॅनिन जहरकारक... चहाविना आप्त स्नेह्यांचे, स्वागतासी अपूर्णता यास्तव भूतल जन म्हणती ह्याची अमृता... इति सुहासविरतिम् चहास्तोत्रम् चहाबाजप्रित्यर्थम् संपूर्णम्...।।। (संग्रहित...)

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत समाधान घोडकेचे आव्हान संपुष्टात

पिंपरी (3 डिसेंबर 2013) : महाराष्ट्र केसरीचा दुसरा मुख्य दावेदार असलेला सोलापूरचा समाधान घोडके याचे आव्हान मुंबई उपनगरच्या सुनिल साळुंके याने एक गुणाने कुस्ती जिंकून संपुष्टात आणले. महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या मान्यतेने व महेशदादा स्पोटर्स फाउंडेशनच्या वतीने पै. किसनराव लांडगे यांच्या 71 व्या वाढ दिवसानिमित्त भोसरी येथे कै. पै. मारुती रावजी लांडगे क्रिडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी व 57 वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या तिस-या दिवशीच्या पहिल्या सत्रात हे सामने घेण्यात आले. यावेळी उपमहापौर राजू मिसाळ, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, स्पर्धा प्रमुख विलास कथुरे, संयोजक व नगरसेवक महेश लांडगे, ऑलिम्पीक मारुती आडकर, सितारामभाऊ भोतमांगे, पिंपरी चिंचवड कुस्तिगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे, हिंद केसरी अमोल बराटे, योगेश दोडके, भारत केसरी विजय गावडे, महाराष्ट्र केसरी शिवाजी केकान, मुन्नालाल शेख, रावसाहेब मगर, विजय बनकर,

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

वाशिम जिल्हा परिषद व 6 पंचायत समित्यांसाठी 22 डिसेंबर रोजी मतदान

मुंबई दि. 29 – वाशिम जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या 6 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज जाहीर केला आहे. यानुसार वाशिम जिल्हा परिषदेबरोबरच कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव, रिसोड आणि वाशिम या पंचायत समित्यांसाठी 22 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या कार्यक्रमानुसार मंगळवार दि. 3 डिसेंबर 2013 ते शनिवार दि. 7 डिसेंबर 2013 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून सोमवार, दि. 9 डिसेंबर 2013 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक जेथे अपिल नाही तेथे शनिवार दि.14 डिसेंबर 2013 व जेथे अपिल आहे तेथे बुधवार दि. 18 डिसेंबर 2013 हा असून रविवार दि. 22 डिसेंबर 2013 रोजी मतदान घेण्यात येईल. मतमोजणी दि. 23 डिसेंबर 2013 रोजी करण्यात येऊन निवडून आलेल्या सदस्यांची नावे मंगळवार दि. 24 डिसेंबर 2013 रोजी प्रसिध्द करण्यात येतील. सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समिती क्षेत्रात आज रात्री 12.00 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल व

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरणार: सोनिया गांधी

नागपूर, दि. 21 नोव्हेंबर 2013: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. आई जन्म देते तर ही योजना गरजूंना पूनर्जन्म देईल, असे प्रतिपादन यूपीए आणि काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांनी केले आहे. नागपूर येथील कस्तूरचंद पार्कवर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे विस्तारीकरण आणि राज्यपातळीवरील लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. श्रीमती सोनिया गांधी यांनी गुरुवार दि. 21 नोव्हेंबर 2013 लाखो नागरिकांच्या साक्षीने या योजनेचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री श्री प्रफुल्ल पटेल, आरोग्य मंत्री श्री सुरेश शेट्टी आणि आरोग्य राज्य मंत्री श्रीमती फौजिया खान कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे, खा.श्री मुकूल वासनिक, नागपूरचे पालकमंत्री श्री शिवाजीराव मोघे, रोहयो मंत्री श्री नितीन राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री अनिल देशमुख, राज्यमंत्री श्री राजेंद्र मुळक, खा.श्री विलास मुत्तेमवार आदी नेते देखील य

भोसरी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन

पिंपरी (20 नोव्हेंबर 2013) : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत तुकाराम महाराज, महासाधू मोरया गोसावी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पिंपरी चिंचवड नगरीत दुस-यांदा भोसरी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा मान आयोजक महेश लांडगे यांना व भोसरीकरांना देण्यात आाला. या स्पर्धा भोसरीतील ज्येष्ठ पै. किसनराव शंकरराव लांडगे यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन व समस्त भोसरी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष पिं.चिं. मनपा कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष विद्यमान नगरसेवक महेश किसनराव लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन व समस्त भोसरी ग्रामस्थांच्या वतीने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मान्यतेने महाराष्ट्र केसरी 2013 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी महापौर नानासाहेब शितोळे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांनी (19.11.2013) पिंपरी येथे पत्रकार परिषदेत

कल्याणी यांच्या निधनाने उद्योगजगताचे प्रेरणास्थान हरपले- अजित पवार

मुंबई, ता. 25 : जागतिक उद्योगविश्वात भारताची शान वाढविणारे द्रष्टे उद्योजक डॉ. नीळकंठराव कल्याणी यांच्या निधनाने उद्योगजगताचे प्रेरणास्थान हरपले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. डॉ. कल्याणी यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. भारत फोर्ज कंपनीला जागतिक पातळीवर नावलौकिक प्राप्त करून देऊन त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासाठी ते दिशादर्शक होते. उद्योग संस्कृती रुजवण्याचे काम त्यांनी मोठ्या कल्पकतेने केले. त्याचवेळी त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या उद्योगांचा विस्तार केला. आपल्या समूहाच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांशी त्यांनी संवादाचा सेतू साधला होता. कर्मचाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, हे त्यांच्या प्रेमळ स्वभावाचे प्रतीक होते. कर्मचाऱ्यांनाही कुटुंब प्रमुखासारखा त्यांचा आधार वाटायचा. कर्मचारी आणि त्यांच्यात केवळ औपचारिक संबंध नव्हते तर आपुलकीचे नाते होते. हेच त्यांचे बळ होते. त्याच जोरावर त्यांनी आपल्या उद्योग समूहाला मानवी चेहरा दिला. त्यांच्या निधनाने

सिडको संचालक मंडळाची बैठक उत्साहात: वाळूज, द्रोणागिरी, नेरुळ विविध पायाभूत सुविधांच्या अंदाजपत्रकीय खर्चास मान्यता

मुंबई, ता. 31 मे- सिडको संचालक मंडळाची विविध योजने अंतर्गत पायाभूत सुविधा अंदाजपत्रकीय बैठक नुकतीच झाली. बैठकीत विविध योजनांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. प्रमोद हिंदुराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक उत्साहात संपन्न झाली. नवी मुंबईतील 12.5 टक्के योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अंदाजपत्रकीय खर्चास मान्यता, प्रकल्पगस्तांच्या पाल्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण, विद्यावेतनात वाढ आणि समुदाय सामाजिक बांधिलकी धोरणास मंजुरी असे महत्वपूर्ण निर्णय सिडको संचालक मंडळाने घेतले. बैठकीस श्री. संजय भाटिया, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, श्री. मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव (नगर विकास-1) श्री. यु.पी.एस. मदान, महानगर आयुक्त, एमएमआरडीए, श्री. नामदेव भगत, संचालक, सिडको, श्री. वसंत भोईर, संचालक, सिडको उपस्थित होते. सर्व विषयासंदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. नवी मुंबई प्रकल्पगस्तांच्या सामाजिक संस्थांतर्फे आयोजित उपकमांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणार असलेल्या सिडकोच्या समुदाय सामाजिक बांधिलकी धोरणास संचालक मंडळाने मंज