मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मुंबईमध्ये वॅक्स म्युझियमच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य: भुजबळ

 हिंदवी स्वराज्याच्या या संस्थापकास विनम्र अभिवादन...!  मुंबई, ता. २ - लंडनमधील मादाम तुसाँ वॅक्स म्युझियमच्या तोडीचे वॅक्स म्युझियम मुंबईमध्ये उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केले. लोणावळा येथील 'सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम' चे आर्टिस्ट सुनील कंदल्लूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मेण पुतळा तयार केला आहे. या पुतळ्याचा अनावरण समारंभ गिरगाव चौपाटीनजीकच्या इक्सिया इव्हेंट लाऊंजमध्ये श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. श्री. भुजबळ म्हणाले की, आपण स्वतः लंडन येथील मादाम तुसाँ म्युझियमला भेट दिली असून विविध देशांच्या महान व्यक्तींचे मेणाचे पुतळे असलेले हे म्युझियम पाहण्यासाठी अक्षरशः रांगा लागलेल्या असतात. तसे म्युझियम जगात कुठेही आपल्या पाहण्यात नाही. परंतू गेल्या आठवड्यात लोणावळा परीसरात कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो असताना मुद्दाम 'सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम' भेट दिली आणि स्तंभित झालो. मादाम तुसाँ इतके हे म्युझियम भव्य नाही, मात्र सुनिल कंदल्लूर या कला...

कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी देशातील तरुण पिढीचे योगदान मोलाचे: भुजबळ

मुंबई, दि. 2 मार्च :  देशातील कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी अत्याधुनिक माहिती व तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या तरूण पिढीचे योगदान अत्यंत मोलाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी काल येथे केले. माटुंगा (पूर्व) येथील 'वेलिंगकर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ऍन्ड रिसर्च'च्या सभागृहात काल सायंकाळी झालेल्या 'कृषी-धन-2011' या कार्यक्रमात ते बोलत होते. द एनर्जी ऍन्ड रिसोर्सेस इन्स्टिटयूट (TERI) आणि वेलिंगकर इन्स्टिटयूट यांच्या संयुक्त सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी 'कृषी-धन' (www.teriin.org/events/krishidhan/) या वेबसाइटचेही श्री. भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला वेलिंगकर इन्स्टिटयूटचे समूह संचालक डॉ. उदय साळुंखे, 'टेरी'च्या पश्चिम प्रादेशिक केंद्राच्या प्रमुख डॉ. अंजली पारसनीस, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे यांच्याबरोबरच देशातील विविध मॅनेजमेंट संस्थांचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. आपल्या पारंपरिक जीवनशैलीचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या कृषी क्...

खाडीपात्रातील गाळ उपसण्यासाठी २० कोटी रुपयांची मदत: अजित पवार

मुंबई, ता. १ - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांच्या खाडी पात्रातील गाळ उपसण्यासाठी २० कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाह्य इंजिनधारक आणि बिगर यांत्रिक नौकांना केरोसीनचा पुरवठा करण्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. श्री. पवार म्हणाले की, कोकणच्या खाडीपात्रातील गाळ उपसण्यासाठी दोन ड्रेझरची खरेदी करण्यात येणार आहे. परंतु ड्रेझर येईपर्यंत शेजारच्या राज्यांमधून भाडोत्री ड्रेझर आणून गाळ उपसण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला पाच कोटी रुपये देण्यात येतील. बाह्य इंजिनधारक आणि बिगर यांत्रिक नौकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून करेसीन पुरवण्यासंदर्भात मत्स्यव्यवसाय विभागाने इतर राज्यांचा अभ्यास करून आठवडाभरात केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्याचे आदेशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. उद्योगमंत्री नारायण राणे, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसायमंत्री मधुकर चव्हाण, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय सचिव अनिल डिग्गीकर, मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. पाटील, स...

नवी मुंबई प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या १२.५ टक्के भूखंड वाटप

मुंबई, ता. २ - नवी मुंबई प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचे प्रकल्पग्रस्त खातेदारांना शासन निर्णयाप्रमाणे १२.५ टक्के भूखंड वाटप करण्यात येत असून, या भूखंड वाटपाच्या संचिकेतील माहिती मिळणेसाठी प्रकल्पग्रस्त खातेदारांना सिडको कार्यालयात वारंवार यावे लागू नये, या उद्देशाने भूमी व भूमापन विभागातर्फे प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या नावांची व संचिका क्रमांकाची यादी तयार करण्यात आली आहे. सिडको भवन येथील माहिती केंद्रात व www.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून या यादीत तालुकानिहाय प्रत्येक गावातील भूधारकाच्या संचिकांचा तपशील जसे संचिका क्रमांक, पात्रता धारकाचे नाव याबाबत माहिती तसेच ज्या भूधारकांची पात्रता शिल्लक आहे त्यांची ज्येष्ठता यादी उपलब्ध असून, यापुढे ज्येष्ठतेनुसार भूखंडांचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ६७९१, ८१०५/८१०६ या क्रमांकावर संपर्क साधून व वरील संकेतस्थळावर आपल्या संचिकेचा तपशील प्राप्त करू शकतात.

राज्यात प्रीपेड वीज मीटर बसविणार

मुंबई येथे मंत्रालयात प्रीपेड वीज मीटर योजनेचा शुभारंभ करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जा विभागाचे मुख्यसचिव सुब्रतो रथो, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता आदी. मुंबई, ता. १ - मोबाईल फोनच्या धर्तीवर राज्यात वीज बिलासाठी प्रीपेड मीटर लावण्यास प्रारंभ झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या योजनेस आज सुरवात झाली. मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव सुब्रतो रथो, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात राज्यात सुमारे २५ हजार प्रीपेड वीजमीटर लावले जाणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे वीज मीटर लावणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. सुरवातीस पुणे, नागपूर, औरंगाबाद, पेण, कल्याण, कोल्हापूर परीसर तसेच महाबळेश्वर, माथेरान, चिखलदरा अशा पर्यटनस्थळी प्रीपेड वीजमीटर लावले जातील. प्रीपेड मीटर लावणार्‍या ग्राहकांना वीज बिलात पाच टक्के विशेष सवलत देण्यात येणार आहे. या मीटरमधील वैधता संपल्यानंतर ऑनलाईन रिचार्ज करण्याची सुविधा आहे. कुठल्याही राष्ट्रीय सणांच्या दिवशी किंवा सुटीच्या दिवशी र...

छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती मेण-पुतळ्याचे छगन भुजबळ यांच्या हस्ते बुधवारी अनावरण

मुंबई, ता. १ - अखिल महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मेण-पुतळ्याचे उद्या (ता. २ मार्च) सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. मरिन ड्राइव्ह येथील इक्सिया इव्हेंट लाउंजमध्ये सायंकाळी चारला अनावरण समारंभ होईल. छत्रपती शिवरायांचे जगभरात अनेक पुतळे असले तरी मेणापासून बनविण्यात आलेला हा शिवरायांचा जगातील पहिलाच पुतळा आहे. भारतातील एकमेव वॅक्स आर्टिस्ट असलेलेल तसेच लोणावळा येथील "सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम" चे संकल्पक-कलाकार सुनिल कंदल्लूर यांनी हा पुतळा तयार केला आहे. आजपर्यंत त्यांनी पन्नासहून अधिक व्यक्तींचे मेणाचे पुतळे तयार केले आहेत. शिवाजी महाराजाचा पुतळा त्यांच्या लौकिकास साजेसा असा बनविण्यात आला असून पाहणार्‍यास, शिवाजी महाराज पुन्हा भूतलावर अवतरल्याचा भास झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास वॅक्स म्युझियमचे संचालक ऍड. सुभाष कुमार यांनी व्यक्त केला आहे. उद्या अनावरणानंतर हा पुतळा लोणावळा येथील वॅक्स म्युझियममध्ये स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

शंभरीची शंभरी गाठण्यापासून सचिन केवळ दोन पावले दूर..

क्रमांक एक चा विश्वविख्यात क्रिकेटपटू होऊन देखील आपल्या साध्या राहणी, सुशील स्वभावाची ख्याती प्राप्त केलेला अनेक चाहत्यांचा सुपरहिरो सचिन तेंडुलकर आपल्या शंभर धावांची शंभरी अर्थात शतकांचे शतक गाठण्यापासून केवळ दोन पावले दूर आहे. आजतागायत सचिनने कसोटी सामन्यांमध्ये एकूण ५१ शतके झळकावली असून एक दिवसीय सामन्यांमध्ये ४७ शतके झळकावली आहेत. ९८ वे शतक नुकतेच बंगळूर येथे विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध खेळताना पूर्ण केले आहे. सर ब्रॅडमन यांच्याशी तुलना केली जाणारा सचिन...एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सचिन तेंडुलकरला शाळेपासूनच क्रिकेटची खूप आवड होती. आपल्या 'शारदा विद्यामंदिर' शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असतानाच जीवलग मित्र विनोद कांबळीबरोबर त्याने ६६४ धावांची भागीदारी रचली होती. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्याने मुंबई संघातून गुजरात संघाविरुद्ध खेळून नावलौकिक प्राप्त केला. सचिन तेंडुलकर याच्या कुटुंबियांचे, सचिन देव बर्मन म्हणजेच एस. डी. बर्मन हे आवडते संगीत दिग्दर्शक होते, यांच्या नावावरूनच त्याचे ना...

देशाच्या सर्वंकष विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प: अजित पवार

मुंबई, ता. २८ - केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सादर केलेल्या २०११-१२ च्या अर्थसंकल्पामुळे देशाच्या सर्वंकष विकासाला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केली. श्री. पवार म्हणाले की, राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठीच्या भरीव तरतुदीबरोबरच डाळी, भाजीपाला, बाजरी, ज्वारीच्या उत्पादन आणि उत्पादकता वाढीसाठीचे प्रयत्न म्हणजे खर्‍या अर्थाने दुसर्‍या हरितक्रांतीच्या दिशेने टाकलेली दमदार पावले आहेत. कृषी पतपुरवठ्यातील एक लाख कोटी रुपयांची भरीव वाढ तसेच मांस, मासे, दूध आदींच्या उत्पादन आणि वितरणात सुलभतेसाठी आखलेल्या योजना शेतीपूरक व्यवसायाला चालना देणार्‍या आहेत. त्याचबरोबर महिला बचत गटांसाठी केलेल्या तरतुदीमुळे ग्रामीण भागाच्या सर्वंकष उन्नतीस हातभार लागेल . अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विविध उपाययोजना केल्या असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, की सध्या अस्तित्वात असलेल्या विशाल किंवा अतिविशाल ऊर्जा प्रकल्पांना भांडवली वस्तूचा पुरवठा करणार्‍या डोमेस्टिक सप्लायर्सनां पॅरलल एक्साईज ड्यूटीतून सवलत मिळणार आहे. तसेच पीपीपी अंत...

छगन भुजबळ यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत

मुंबई, ता. २८ - महागाई नियंत्रणाबरोबरच अन्नधान्य उत्पादन वाढीला चालना देणारा तसेच कृषी क्षेत्राबरोबरच औद्योगिक दर वृद्धीचे सूतोवाच करणारा अर्थसंकल्प 'आम आदमी' ला दिलासा देणारा तसेच परिपूर्ण ठरला आहे. या शब्दात सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी, केंद्रीय वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत सादर केलेल्या सन २०११-१२ च्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. शेती, शिक्षण या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करत असतानाच जीवनावश्यक वस्तू, इंधनाच्या किंमती नियंत्रणात राहण्यासाठी त्यावर कोणताही कर न लावता आणि प्राप्तीकरमर्यादा वाढवून नोकरदार वर्गालाही दिलासा देणार्‍या या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे, असे मत श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, कृषी क्षेत्राने ५.४ टक्क्यांची वृद्धी नोंदविली ही अत्यंत चांगली बाब आहे. ही वाटचाल आगामी वर्षातही कायम रहावी यासाठी अर्थसंकल्पात विचार केला आहे. भाजीपाला, डाळींच्या उत्पादनासाठी भरीव आर्थिक तरतूद, कृषी कर्जमर्यादा ४.७५ लाखांवर, खतांवर रोख सबसिडी, सिंचन उपकरणे व कृषी अवजार स्वस्त, कोल्ड स्टोअरेज प्...

कोकणच्या विकासाला सर्वतोपरी सहाय्य करणार: भुजबळ

  मुंबई, ता. २५ - पर्यटकांना इतर राज्यातील पर्यटन स्थळांचा विसर पडेल इतकी पर्यटन क्षमता कोकणात आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटनाच्या विकासाकरिता राज्य शासनातर्फे सवर्तोपरी सहाय्य करण्यात येईल. असे आश्वासन राज्याचे पर्यटनमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिले. कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने बांद्रा-कुर्ला संकुलातील मैदानावर आयोजित ग्लोबल कोकण आंतरराष्ट्रीय महोत्सवानिमित्त चर्चासत्रात श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी पर्यटनमंत्री असताना कोकणसाठी केलेल्या प्रयत्नांना तेव्हाच्या मानसिकतेमुळे अनुकूल वातावरण नव्हते, परंतू आजच्या या ग्लोबल कोकण आंतरराष्ट्रीय महोत्सवातून मात्र कोकणवासीयांची पर्यटनाबाबतची मानसिकता अनुकूल झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्र किंवा कोकणात येणारा विदेशी पर्यटक सुमारे ८० जणांना रोजगार उपलब्ध करून देतो. कोकणातील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, सागरी महामार्ग व त्यावरील पुलांची बांधकामे प्रगतीपथावर असून लवकरच पूर्णत्वास येत आहेत. रायगड सारख्या ऐतिहासिक किल्ल्याचा व परिसराच्या विकासासाठी खर्च करण्याची राज्य शासनाच...