मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

What is "Visa"?

A visa is a form of permission for a non-citizen to travel to, enter, transit or remain in a particular country. A visa does not guarantee entry. That remains the right of the immigration officials of the country concerned. Some countries may ask visitors to present return tickets and evidence of means to cover their intended stay. Some countries may refuse entry to visitors who do not comply with their requirements regarding general appearance and clothing. Some countries have compulsory currency exchange regulations on first entry. Only the country/countries you plan to visit can provide up-to-date information about visa requirements for South African passport holders. Types of Visa: Tourist Visa       A Tourist Visa is given to those visiting India for tourism or other non-business related purposes and is generally valid up to 6 months. Business Visa       A Business Visa is given those who are doing business in India such as m...

भारतीय हत्ती तुर्कमेनिस्तानात- सरकारकडूनच कायद्याची पळवाट!

भारतीय हत्तींची एक जोडी तुर्कमेनिस्तानमध्ये पाठविण्यात येणार आहे, असे पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी सांगितले. तुर्कमेनिस्तान सरकारच्या विनंतीवरून ही जोडी पाठविण्यात येणार आहे. भारत सरकारकडून दोन हत्ती भेट मिळावे अशी अपेक्षा तु्रकमेनिस्तान सरकारने केली होती. परंतु वन्यजीवांना भेट देण्यावर भारतात बंदी असल्यामुळे ते शक्य नव्हते. आता, दोन्ही देशांमधील प्राणिसंग्रहालयां दरम्यान देवाण-घेवाण करण्याच्या प्रस्तावाखाली दोन भारतीय हत्ती तिकडे पाठविण्यात येतील. याचाच अर्थ सरकारने स्वत:चा कायद्याची पळवाट शोधून काढली आहे. कायदे करणार्‍यांनीच शक्कल लढवून कायद्याची पळवाट शोधून काढली आहे, इतरांनी अशा पळवाटा शोधण्यात वाईट काय..? म्हणतात नां, कायदे तितक्या पळवाटा...!

सांग दर्पणा कशी मी दिसते..

                                                      ।..सांग दर्पणा कशी मी दिसते..।                                                     ।।..माझ्यामुळे रूप तुझे रे खुलते..।।

विजयी उमेदवारांनी शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे: भुजबळ

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी गोरगरीब शेतकर्‍यांच्या हितालाच सर्वाधिक प्राधान्य द्यावे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. श्री. भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने अठरा पैकी सोळा जागा जिंकून विजय मिळवला. यानिमित्त विजयी उमेदवारांनी त्यांची रामटेक निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी भुजबळ म्हणाले, की बाजार समितीमधील प्रत्येक घटकाला आपल्या कष्टाचा मोबदला मिळणे आवश्यक आहे. परंतु प्राधान्य गोरगरीब शेतकर्‍यांच्या हिताला असावे. सर्वांनी एकत्रितरित्या काम करावे. नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणाव्या, राबवाव्या. यावेळी आमदार अनिल कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, भास्करराव बनगर, जगदीश होळकर, भाऊसाहेब भवर आदी उपस्थित होते

मुंबई येथे "बर्ड्स अँड बिग कॅट्स" छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन

"बर्ड्स अँड बिग कॅट्स" प्रदर्शन उदघाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, किरण शांताराम, अ‍ॅड. अधिक शिरोडकर आदी जहांगिर आर्ट गॅलरी मुंबई येथे "बर्ड्स अँड बिग कॅट्स" या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. नामवंत कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. अधिक शिरोडकर यांनी काढलेल्या छायाचित्रांचे हे प्रदर्शन आहे. अ‍ॅड. शिरोडकर यांच्या छायाचित्रणाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून निसर्ग आणि वन्यजीवांमध्ये रमले आहेत. त्यांनी काढलेली दुर्मिळ छायाचित्रे "बर्ड्स अँड बिग कॅट्स" या प्रदर्शनात आहेत. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, शिरोडकर यांनी पर्यावरण संवर्धनात मोलाचे योगदान दिले असून, हे प्रदर्शन मनाला आनंद आणि निसर्गाच्या वैविध्याचा परिचय करून देणारे आहे. डिजिटल युगात छायाचित्रणाची कला बरीच सुलभ झाली आहे. परंतु जुन्या कॅमेर्‍यांनी छायाचित्रण करताना खूप कसरत आणि मेहनत करावी लागते. मनासारख्या छायाचित्रासाठी विशिष्ट क्षणाची वाट पहावी लागत असून, संयमाच्या या परीक्षेत शिरोडकर यांनी अद्वितीय यश संपादन केले आहे. त्यांचा अभ्यास विचारात घेऊन त्यां...

"व्हाइटवॉश" मुळे होताहेत जुने शब्द "वॉश"

ठराविक अंतरानंतर भाषा बदलते असे म्हणतात...काळाच्या ओघात काळाच्या प्रवाहाबरोबर जावे, असे म्हणतात...! टप्प्याटप्प्याने प्रवास करणार्‍या पथिकांना तर बदललेली भाषा लगेच जाणवते. एके काळी अस्खलित असणारी मराठी भाषाही याला अपवाद कशी असणार? गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेत इंग्रजी शब्द रूढ होत असल्याचा (मिंग्लीश) प्रत्यय सध्या येत आहे. दीडशे वर्ष ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले, यामुळे भारत आणि भारतीयांवर स्वाभाविकच इंग्रज आणि इंग्रजीचा पगडा बसला. तेव्हाची आणि आजची मराठी भाषा...यात बरेच अंतर असल्याचे दिसून येते. मराठी भाषेत इंग्रजीचा प्रवेश बहुदा "सॉरी.." या शब्दापासून झाला असावा. क्षमा करा, माफ करा, माफी असावी हे पूर्वीचे शब्द आजकाल अगदी बोटावर मोजण्याइतके लोक वापरताना दिसतात. यापेक्षा 'सॉरी' म्हणा आणि 'कामाला लागा' अशी विचारसरणी तयार झाली आहे. यापेक्षाही जास्त महत्वाचे असल्यास, एखादी घोडचूक झालेली असल्यास सहसा कार्यालये, नोकरी, उद्योग, कामाचे ठिकाण अर्थातच जॉबचा कॅम्पस् अशा ठिकाणी तर बहुतेक कामे होण्यासाठी 'चहा' हे पेय उपयोगी ठरते हा भाग वेगळा. चहा देखील आण...

Om..ओम्...!!!

इंडो-चायना फटाके: यंदाचा आनंद ठरणार उद्याची डोकेदुखी...!

न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा बहुसंख्य ठिकाणी 125 डेसिबलपेक्षा कमी आवाजाचे फटाके बाजारपेठेत उपलब्ध करण्यावर निर्मात्यांचा भर आणि विक्रेत्यांचा कल आहे. फटाक्यांच्या उत्पादनासाठी फटाके उत्पादकांनी चिनी फटाके उत्पादकांच्या सहकार्याने यंदा इंडो-चायना फटाके दिसतील. कमी आवाजाचे आणि या फटाक्यांमधून विविध रंग ओसंडून असल्यामुळे ग्राहकांना आणि शासनाला दोघांनाही आनंद होईलच. मात्र नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे लवकरच हा आनंद मावळून ही डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनने भारताचा किती मोठा भूभाग बळकावला आहे याची कल्पना देखील न करता येईल असे या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या लेख, बातम्यांवरून वाटते. सध्या देशातले इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मार्केट चीनने अक्षरशः कॅप्चर केले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. मोठ्या शहरांपासून छोट्या गावापर्यंत चायना मार्केट च्या वस्तुंना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या वस्तू आपल्या देशात तयार झालेल्या तशाच वस्तूच्या तुलनेत स्वस्त मिळतात, अनेकदा यात नावीन्य देखील असल्याचे दिसते. भारतातील ग्राहकाची मानसिकता आपल्यापेक्षा चीननेच चांगली ओळखलेली दिसतेय. इंडो-चायना फटाके त...

Ye hai India...

निसर्गाने स्वतःच भारताचा नकाशा तयार करण्याचा प्रयत्न...आपल्या देशावर मानवासह निसर्ग सुद्धा प्रेम करतो, हेच तर या माध्यमातून सांगायचे नसेल नां?

जादू चालणार..फक्त मतदारांची!

बिहारमध्ये सध्या निवडणुकांमुळे विविध आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी प्रचार सभांमध्ये झाडल्या जात आहेत. सत्तेवर येण्यासाठी सत्ताधारी अथवा विरोधक..कोणीही असले तरीही विविध युक्त्या, क्लुप्त्या केल्या जातात. दिवसा एकमेकांविरुद्ध तोफा डागून रात्री एकाच थाळीत जेवणारे..असा विचार राजकारण्यांबद्दल केला जातो. काही अंशी हे खरंही आहे. मतदारांना एकाच प्याल्यात उतरवून, स्वतः मात्र कुठेतरी काळोखात, किंवा उजेडातही एकमेकांचे प्याल्यांची भेट घालुन मेळ घालायचा असा प्रकार अनेक जण सर्रासपणे करतात. नीतिश कुमारांसह, लालुप्रसाद यादव, सुषमा स्वराज, छगन भुजबळ यांच्यासारखी दिग्गज मंडळी यासाठी प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. नुकताच सुषमा स्वराज यांनी, "गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची जादू सगळीकडे चालेलच असे नाही" असे विधान करून मोदी यांना घरचा आहेर दिला आहे. तर राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी, राहुल गांधी यांना गंगेत बुडवा असे सांगून त्यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल देखील चुकीचे उद्गार काढून संघाचे मन दुखावले आहेच....