मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भगवान को मुझे पास करवानें को कहेना, नंदीजी...।

मनातली इच्छा नंदीच्या कानात सांगताना मुलगा...परिक्षा जवळ आली की हे असं होतंच...

निवडणूक याचिका विहित मुदतीत न्यायालयात दाखल करणे आवश्यक- राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई, ता. २३ - महानगरपालिका, जिल्हा परिषद किंवा पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या ग्राह्यतेविषयी वाद किंवा शंका असल्यास अशा निवडणुकीतील उमेदवाराने किंवा मतदाराने कायद्यातील तरतुदींनुसार निकालानंतर विहित मुदतीच्या आत संबंधित सक्षम न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करणे आवश्यक आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. या निवडणुका पार पडल्यानंतर मतमोजणीनंतर राज्य निवडणूक आयोगाकडे निवडणूकीच्या वैधतेबाबत तक्रारी येत आहेत निकालानंतर संबंधित कागदपत्रे सील केली जातात. सील केलेली कागदपत्रे सक्षम न्यायालयाच्या आदेशाशिवाय उघडता येत नाहीत. तसा अधिकार राज्य निवडणूक आयोगास नाही. यामुळे महानगरपालिका संदर्भातील निवडणूक याचिका निकालानंतर १० दिवसांच्या आत संबंधित सक्षम न्यायालयात दाखल कराव्यात. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या बाबतीत निवडणूक याचिका १५ दिवसांच्या आत संबंधित सक्षम न्यायालयात दाखल कराव्या लागतात, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

pollution...?

दहा महानगरपालिकांसाठी प्राथमिका अंदाजानुसार ५४ टक्के मतदान

मुंबई, ता. १६ : बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या दहा महानगरपालिकांसाठी आज सुमारे ५४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. सकाळी साडेसातला मतदानाससुरवात झाली. ठाणे, नागपूर आणि अकोला येथे सकाळपासून मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. राज्य निवडणूक आयुक्त यांनी स्वतः मतदान केल्यानंतर काही मतदान केंद्राची पाहणी केली.   दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी योगदान देणारे सर्व मतदार, अधिकारी, कर्मचारी, पोलिस आणि प्रसार माध्यमांचे श्रीमती सत्यनारायण यांनी आभार मानले आहेत.   प्राथमिक अंदाजानुसार महानगरपालिकानिहाय मतदानाचे प्रमाण असे- बृहन्मुंबई- ४६, ठाणे- ५२, उल्हासनगर- ४३, नाशिक- ५८, पुणे-५३, पिंपरी-चिंचवड- ५६, सोलापूर-५८, अमरावती- ५८, अकोला- ५७, नागपूर- ५५, एकूण- ५४.

दहा महानगरपालिकांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान - साडेनऊहजार उमेदवार रिंगणात

मुंबई, ता. १५ - बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या दहा महानगरपालिकांसाठी उद्या (ता. १६) मतदान होणार असून १ हजार २४४ जागांसाठी ९ हजार ५३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. सर्व यंत्रणा सज्ज झाली असल्याचे सांगून श्रीमती सत्यनारायण यांनी म्हटले आहे की, दहा महानगरपालिका क्षेत्रातील एकूण २० हजार ४४१ मतदान केंद्रावर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. यातील २ हजार ६३९ मतदान केंद्र संवेदनशील तर १२२ अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ४, तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ११८ अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांसह अन्य सर्व ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक तेवढी उपाययोजना करण्यात आली आहे. एकूण २ कोटी २ लाख ७१ हजार ९२७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात १ कोटी १० लाख ३ हजार ८१९ पुरुष तर ९२ लाख ६८ हजार १०८ स्त्री मतदारांचा समावेश आहे. महानगरपालिकानिहाय तपशील असा - बृहन्मुंबई-  ...

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१२ - महिला उमेदवारांसाठी केवळ अडीच हजार रुपये अनामत रक्कम

मुंबई, ता. १३ - महानगरपालिका निवडणुकीतील महिला उमेदवारांना नियमाप्रमाणे केवळ अडीच हजार रुपयेच अनामत रक्कम म्हणून जमा करणे आवश्यक असते, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी महिला उमेदवारांना केवळ अडीच हजार रुपयेच अनामत रक्कम भरणे आवश्यक असताना काही ठिकाणी पाच हजार रुपये अनामत रक्कम म्हणून घेण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामुळे हे स्पष्टीकरण करण्यात आले. त्यानुसार ज्या महिला उमेदवारांकडून पाच हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात आली आहे त्यांना अडीच हजार रुपये तात्त्काळ परत करण्यात यावेत. तसेच यापुढे होणार्‍या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये नियमातील तरतुदीनुसारच अनामत रक्कम घेतली जाईल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना देण्याबाबत सर्व महानगरपालिका आयुक्तांना कळविण्यात आले आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर जाहीर प्रचार करता येत नाही. परंतु घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर बंदी नाही. याचबरोबर प्रचार समाप्तीनंतर किंवा मतदानाच्या दिवशी के...

Growing Baby

I am growing now...I can write, make design...I collect chalks from my classroom..my mam also gives me chalks!!!

आठ मतदान केंद्रावर फेरमतदान जि.प., पं.स. क्षेत्रातील निवडणूक आचारसंहिता शिथिल

मुंबई, ता. 8 - राज्यातील 27 जिल्हा परिषदा व 305 पंचायत समिती क्षेत्रातील निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. याचबरोबर 8 मतदान केंद्रांवर 12 फेब्रुवारी 2012 रोजी फेरमतदान घेण्याचा निर्णय देखील राज्य निवडणूक आयोगाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत लागू असते. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या मतदानाची प्रक्रिया संपली असली तरीही मतमोजणी 17 फेब्रुवारी 2012 रोजी होणार आहे. यामुळे मतदान आणि मतमोजणीतील बराच कालावधी लक्षात घेऊन आणि विकास कामांमद्ये अडथळा येऊ नये यासाठी संबंधित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रातील आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या चार तालुक्यात 12 फेब्रुवारी रोजी मतदान असल्यामुळे तेथे मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आचारसंहिता लागू राहील. तसेच महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता मात्र 17 फेब्रुवारीपर्यंत लागू राहील...

शुभं भवतु।

युवराज सिंग याला कॅन्सर...

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - युवराज सिंग याला कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले आहे. त्याच्यावर अमेरिकेत उपचार सुरू आहेत. भारताचा ज्येष्ठ फलंदाज युवराज सिंग याला कॅन्सर झाला असून तो अजून पहिल्या चरणातच असून यामुळे घाबरून जाण्यासारखी स्थिती नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये त्याच्या डाव्या फुप्फुसात ट्यूमर असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तथापि परिस्थिती फारशी गंभीर नसल्याचे देखील सांगण्यात आले. मात्र अष्टपैलू युवराज याला वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचे पाच कसोटी सामने आणि एक दिवसीय मालिकेस मुकावे लागले. त्याच्यावर अमेरिकेत सध्या केमोथेरपि सुरू आहे. दरम्यान, काही बातम्यांमध्ये युवराज अमेरिकेस शस्त्रक्रियेसाठी गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. परंतु 1 फेब्रुवारीला युवराजने ट्विटरवर, आपण कोणतीही शस्त्रक्रिया केली नसल्याचे ट्विट केले होते. विश्वचषकापासूनच युवराज याच्या प्रकृती स्वास्थ्याविषयी तक्रारी सुरू झाल्या होत्या. यानंतर तो केवळ इंग्लंडविरुद्ध एक कसोटी सामनाच खेळू शकला होता.

we are wise than Guys'...

See them! How wise those cows are..! Surely they are wise than Guys/human beings. They are ready to cross the second lane of road. They are waiting for pass the vehicle.

सिडको प्रदर्शन संकुलाचे विकासकार्य प्रगतीपथावर

मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भविष्यात येथे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे सहाय्यभूत व्यवसायांना चालना आणि रोजगार निर्मिती होऊन शहराच्या लौकिकात भर पडेल असे मत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी व्यक्त केले. येथील प्रदर्शन संकुल, पामबिच मार्गाच्या विस्तारातत समाविष्ट उड्डाण पूल आणि आंतरराष्ट्रीय राजदूतावास प्रकल्पांच्या विकास कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी मुख्य अभियंता केशव वरखेडकर, प्रकल्पांवर नियुक्त स्थापत्य, विद्युत, वास्तुशास्त्र विभागातील अभियंते व अधिकारी, वास्तुतज्ज्ञ सल्लागार, कंत्राटदार, यासह काही कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. प्रदर्शन संकुलाचा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून येथील सर्व स्थापत्य, विद्युत, वातानुकूलन, अंतर्गत सजावट या कामांच्या विकास प्रक्रियांमध्ये समाविष्ट सर्व साहित्य उत्तम प्रतीचे असावे, यात कोणतीही तडजोड करण्यात येऊ नये, मूळ काम उच्च दर्जाचे झाल्यास देखभाल दुरुस्तीवरील खर्च आटोक्यात ठेवता येऊ शकेल आणि चांगला दर्जा राखून नवीन...

NAVI MUMBAI SANMAN FESTIVAL, AIROLI FROM 05th FEBRUARY 2012 AT AIROLI, CELEBRITIES LINED UP FOR THE SHOW

Film stars Sonu Sood, Vindu Dara Singh, Nishigandha Wad, Mukesh Rishi, Pankaj Dheer among others are roped in to entertain the crowd at the much-awaited 8 days long Navi Mumbai Sanman Festival, scheduled to be held at Chinchwali Ground, Sector - 05, Airoli, Navi Mumbai from 05th February 2012 at 05.00 P.M. onwards till 10.00 P. M.. The show will continue till 12th February 2012 from 07.00 P. M. to 10.00 P. M. For the 2nd Edition, City-based Socio-Cultural Organization Sanman Pratisthan, Airoli is bringing these celebrities to this part of the town to treat an expected crowd of over one lakh at a stretch of eight days. The festival will take off on 05th February 2012 at the hands of local MLA Shri Sandeep Naik in the presence of dignitaries from various spheres of life. Entering into second year the show is getting bigger and better. “We have meticulously planned something or the other for everyone cutting across caste affiliations to showcase their talents and skills. Stalls will h...

जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिकांची मतमोजणी एकाच दिवशी: नीला सत्यनारायण

मुंबई, ता. 2 - राज्य निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्षांची मागणी लक्षात घेऊन जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महानगरपालिकांची मतमोजणी एकाच दिवशी 17 फेब्रुवारी 2012 रोजी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. येथील सचिवालाय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले की, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होईल. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची मतमोजणी 17 फेब्रुवारीला होईल. एकत्रित मतमोजणीच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 1 लाख 81 हजार यंत्रांची व्यवस्था केली आहे. यात भारत निवडणूक आयोगाच्या 1 लाख 30 हजार, इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (ईसीआयएल) मागवलेली 24 हजार आणि राज्य निवडणूक आयोगाकडील सुमारे 27 हजार मतदान यंत्रांचा समावेश आहे. भारत निवडणूक आयोगाच्या यंत्राचा उपयोग पुणे, नागपूर जिल्हा परिषद वगळून अन्य सर्व जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मतदान यंत्रांचा वापर केला ज...

सुर-तालांची सुरेख मैफल झाली सुनी...अजित पवार

मुंबई, ता. 1 - ज्येष्ठ संगीतकार अनिल मोहिले यांच्या निधनाने सुर आणि ताल यांची सुरेख मैफल सुनी झाली आहे, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री म्हणतात की, संगीत दिग्दर्शक आणि संगीत संयोजक म्हणून अनिल मोहिले यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट संगीतावर आपला अमीट ठसा उमटवला होता. स्वरांवरची त्यांची हुकूमत विलक्षण होती. अरूण पौडवाल यांच्या साथीने त्यांनी स्वरबद्ध केलेली अनेक मराठी गाणी चिरकाल स्मरणात राहण्याजोगी आहेत. त्यांनी संगीत संयोजन केलेल्या अनेक मैफली अजरामर ठरल्या आहेत. मराठी आणि हिंदी संगीतसृष्टीतील त्यांचे योगदान माझ्यासारखे संगीतप्रेमी कधीही विसरणार नाहीत.