मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भर गई थैली...

महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिवस

-    १ डिसेंबर जागतिक एड्स दिन -    ८ मार्च जागतिक महिला दिन -    १५ मार्च जागतिक ग्राहक दिन -    २१ मार्च जागतिक वनदिवस -    २२ मार्च जागतिक जल दिवस -    ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिवस -    २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन -    ५ जून जागतिक पर्यावरण दिवस -    ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिवस -    ८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन -    १६ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन -    २ ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिन

लुधियाना येथील शाळेत वसंत पंचमीनिमित्त विविध कार्यक्रम

लुधियाना, ता. 29 - येथील स्प्रिंग डेल सिनियर सेकंडरी पब्लिक स्कूल मध्ये वसंत पंचमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सरस्वती स्तवन व पूजनाने कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. यावेळी पतंग उडविणे स्पर्धा, डेकोरेशन आणि सूर्यफुल बनविण्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत इ. सातवीतील दमन प्रथम, सहाव्या इयत्तेतील राहुल कोहली दुसरा आणि सहावीतील राजिंदर तिसऱ्या क्रमांकाने यश मिळवले. व्यवस्थापकीय संचालक अविनाश कौर वालिया यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. ग्रीन लँड सिनियर पब्लिक स्कूल ग्रीन लँड सिनियर पब्लिक स्कूलच्या केजी तील विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना सादर केली. यावेळी वसंत ऋतूवर आधारित गाणी म्हणण्यात आली. एव्हरेस्ट पब्लिक सिनियर सेकंडरी स्कूल एव्हरेस्ट पब्लिक सिनियर पब्लिक स्कूलमध्ये वसंत पंचमीनिमित्त वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. शाळेचे संचालक राजिंदर शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याचबरोबर भारतीय विद्या मंदीर स्कूल, एबीसी माँटेसरी स्कूल सह अनेक शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

पुणे येथील 'त्या' बसचालकाची रवानगी वेड्यांच्या रुग्णालयात

पुणे, ता. 28 - गेल्या बुधवारी सकाळी येथे बस पळवून सुमारे 27 लोकांना जखमी करणाऱ्या त्या बसचालकाची रवानगी 1 फेब्रुवारीपर्यंत येरवडा वेड्यांच्या रुग्णालयात करण्यात आली आहे. स्थानिक न्यायालयाने पोलिसांना संबंधित बसचालक संतोष माने याला वेड्यांच्या रुग्णालयात निरीक्षणासाठी पाठविण्याबाबत निर्देश दिले आहेत. माने याने मास्टर-की च्या सहाय्याने स्वारगेट बस स्थानकावरून बस पळवून नेली होती. यानंतर त्याने पादचारी मार्गासह, विरुद्ध दिशेने बस चालवून अनेकांना जखमी केले तर या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला, काही वाहनांचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

Who is powerful...?

Republic Day celebration at NMMC General Hospital Vashi.

Flag hoisting was done at the hands of Shri Vithal More Saheb Leader of the house along with Shri Vikram Shinde Saheb Health Comittee Chairman.Ceremony was duly attented by Medical Superintendent along with his staff from all cadre

Garden at Shirdi...

पुणेः 'त्या' बसचालकावर खुनाचा गुन्हा दाखल होणार

पुणे, ता. 25 - आज सकाळी राज्य परिवहन मंडळाची बसचा ताबा घेऊन सुमारे 40 गाड्या चिरडून तर 9 लोकांना ठार मारून 25 जणांना जखमी करणाऱ्या बसचालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. संबंधित बसचा चालक बसच्या सीटवर नाही हे पाहून दुसरा बसचालक संतोष माने याने बस सुरू केली. त्याने नंतर चुकीच्या दिशेने (राँग साइड) सुमारे अर्धा तास 16 किलोमीटरपर्यंत बस चालवून अनेक वाहनांचे नुकसान केले तसेच काही विक्रेते, पादचाऱ्यांना जखमी केले. शेवटी निलायम थिएटरजवळ माने याने बस थांबविली. सूत्रांनुसार, माने हा मनोरुग्ण असून त्याला उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्यांना देखील शहरातील तीन विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करता येईल- नीला सत्यनारायण

मुंबई, ता. 24 - प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते संबंधित जिल्ह्यात ध्वजारोहण करता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. आचारसंहितेच्या कालावधीत प्रजासत्ताक दिन येत असल्यामुळे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे विचारणा केली जात होती. त्यासंदर्भात हे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यास हरकत नसली तरी नेहमीच्या ध्वजारोहण स्थळात बदल करण्यात येऊ नये, या समारंभात करण्यात येणारी भाषणे देशासाठी हुतात्मे झालेल्यांच्या आणि देशाच्या गौरवापुरतीच मर्यादित असावीत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक प्रचाराची भाषणे होणार नाहीत आणि आचारसंहितेचा भंग होणार नाही याची जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही श्रीमती सत्यनारायण यांनी दिल्या आहेत.

गुलमर्ग येथे हिमवृष्टी...

गुलमर्ग येथे शनिवारी (ता. 21 जानेवारी) मोठ्या प्रमाणात हीमवृष्टी (स्नोफॉल) होऊन स्की रिसोर्टमध्ये गोठलेले बर्फ कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह पर्यटकांना आवरता आला नाही...

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार जागृती अभियान - नीला सत्यनारायण

मुंबई, ता. 21 - महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लक्षात घेऊन 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त सप्ताहभर मतदार जागृती अभियान राबवावे, असा सूचना राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या निवडणुकीत पैसे किंवा दारूचा वापर होऊ नये यासाठी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या दक्षता समित्यांच्या मदतीने या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करायची आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसाठी तयार केलेल्या सीडींमध्ये आवश्यक ते बदल करून या सीडी स्थानिक केबल टीव्हीवरून प्रसारित कराव्यात आणि इतर माध्यमांद्वारेही या अभियानाची व्यापक प्रसिद्धी करावी. त्याचबरोबर मतदारांना आवाहन करणारे फलकही लावण्यात यावेत, अशा सूचना देखील श्रीमती सत्यनारायण यांनी दिल्या आहेत. विविध प्रलोभनांचा वापर करून सर्रासपणे मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न काही उमेदवार किंवा राजकीय पक्षांकडून करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे येत आहेत. ते टाळण्यासाठी आ...

दिल्ली येथे विमानसेवा पूर्वपदावर

नवी दिल्ली ता. 21 - येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज विमानसेवा पुन्हा पूर्व पदावर आली. गेले दोन दिवस दाट धुक्यामुळे येथील विमानसेवा विस्कळीत झाली होती. आज धुके होते परंतु दृश्यमानता चांगली असल्यामुळे धुक्याचा विशेष प्रभाव न पडता कोणतीही विमानसेवा विस्कळीत झाली नाही. आज दृश्यमानता सुमारे 200 मीटर होती असे सूत्रांनी सांगितले. विमानोड्डाण सेवा गेले दोन दिवस विस्कळीत होऊन जवळपास 200 विमानांच्या सेवेवर याचा विपरीत परिणाम होऊन विमानांना 2 ते 8 तास विलंब झाला होता, 28 विमाने रद्द करावी लागली होती तसेच 19 विमानांचा मार्ग बदलविण्यात आला होता. दरम्यान इंदूर येथे देखील धुक्यामुळे विमानसेवेवर परिणाम झाला होता.

कॉर्पोरेट खोडी...

प्रत्येक क्षेत्रातच कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत असल्याची ही बोलकी खोडी...

काश्मिरने पांघरली बर्फाची शाल...

LOHRI & MAKAR SANKRANTI CELBERATED AT NAVI MUMBAI

16th Jan 2012 : Both “LOHRI & MAKAR SANKRANTI” were celebrated on 15th Jan 2012 at NMMC Ground, Sector – 04, Vashi, Navi Mumbai with great enthusiasm. It was a rare example of a joint celebration displaying the cultural of Punjab and Maharashtra promising a further boost to the secular sprit. The “LOHRI” fire was lit by the Honorable Shri Ganesh Naik, Guardian Minister Thane in the presence a huge gathering. He distributed “TIL & GUR” as per the traditional greetings on Makar Sakranti. Shri Sanjiv Naik, Honorable Member of Parliament, Shri Sandeep Naik, MLA and Shri Sagar Naik, Honorable Mayor of Navi Mumbai joined him along with presidents of all Gurudwaras of Navi Mumbai, Chairman of Punjabi Cultural & Welfare Association (PCWA) and prominent personalities of Navi Mumbai. . A colorful Punjabi cultural program organized under the banner of “NAVI MUMBAI SAHITYA & SANSKRUTI PARISHAD” and patronage of Shri Sagar Naik, Mayor of Navi Mumbai being the first such cultural...

खारघर, द्रोणागिरी आणि उलवे परिसरात 19 व 20 जानेवारी दरम्यान पाणीपुरवठा बंद

मुंबई, ता. 17- नवी मुंबईच्या खारघर, द्रोणागिरी आणि उलवे नोड्समध्ये सिडकोद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. हेटवणे येथील मुख्य जलवाहिनीच्या तांत्रिक कामाकरिता गुरूवार (ता. 19) व शुक्रवार (ता. 20) या दोन दिवशी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. नागरीकांनी पाण्याचा पुरेसा साठी करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तीळा-तीळाने बोलणे...

होत आहे कमी तीळा-तीळाने बोलणे.. आहेत याला बरीच कारणे.. फेसबुक सुद्धा यातले एक आहे... नको आता श्लोक अन् नको दोहे... नको आम्हां सुश्रुत, चरक वाग्भट... येतात विचार असे मनात पटपट.. पटपट विचाराचाच वाटतो आहे खेद... मित्रांनो, पण विसरू नका कोणी आपला घरचा "आयुर्वेद"...

निवडणुकीत विजय प्राप्त करणे हीच आपल्यासाठी वाढदिवसाची भेट ठरणार-मायावती

नवी दिल्ली - ता. 15: आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा विजय होणे हीच आपल्या वाढदिवसाची भेट ठरेल, असे मत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी व्यक्त केले. आपल्या 56 व्या वाढदिवसानिमित्त त्या बोलत होत्या. आचारसंहितेमुळे वाढदिवसाचा कोणताही कार्यक्रम आयोजित केला नसल्याचे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री मायावती यांनी सांगितले, की आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून पक्ष यंदा आपल्या वाढदिवसाचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. पक्ष कार्यकर्ते संक्रांत त्यांच्या कुटुंबियांसमवेत साजरी करतील. आगामी विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करणे हेच आपले लक्ष्य असून निवडणुकीत विजय प्राप्त करणे हीच आपल्यासाठी वाढदिवसाची सर्वात मोठी भेट ठरणार आहे. यावेळी त्यांनी सर्व 403 जागांकरिता उमेदवारांची यादी जाहीर केली. निवडणुकीसाठी 88 जागा अल्पसंख्यांक, 103 अन्य मागासवर्गीय, 85 मुस्लीम आणि 117 जागांपैकी 74 जागा ब्राह्मण आणि 33 जागांसाठी क्षत्रिय उमेदवारांना पक्षातर्फे निवडणुकीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. यावेळी त्या म्हणाल्या, की गेल्या निवडणुकीत चुकीच्या उमेदवारांना निवडणुकीत उभे रहाण्याची संधी ...

गुळाची पोळी

नारायण..नारायण...

मकर संक्रांत शुभेच्छा...

हलव्याला असताता काटे...असतो तीळ मऊ... गुळाची पोळी लागते छान..घ्या पटकन अपुले पान.. करूया त्यात तिळ-गुळ मिक्स... राहू द्या स्नेह अमुच्यावर असाच फिक्स...

इंदूरमध्ये शीतलहर- शाळांना सुट्ट्या

मध्यप्रदेशात थंडीचा जोर वाढला असून काही भागात किमान तापमान 4 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. इंदूरमध्ये देखील नुकतेच 5 अंश तापमान नोंदविले गेले. इंदूरचे कलेक्टर राघवेंद्रसिंह यांनी शुक्रवार (ता. 13 जानेवारी) पासून 16 जानेवारीपर्यंत शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. या अंतर्गत सर्व शासकीय व खाजगी शाळांच्या नर्सरीपासून इ. 8 वी पर्यंतच्या वर्गांना सुट्टी देण्यात आली आहे. इ. 8 वी पासून पुढील वर्ग सकाळी नऊ पासून घेण्यात यावेत असे आदेश देण्यात आले आहेत.

मतदार यादीसंदर्भातील हरकती 12 जानेवारीपासून स्वीकारणार- आयोगाची हेल्पलाईन

मुंबई, ता. 11- महानगरपालिका निवडणुकीच्या मतदार यादीसंदर्भातील हरकती आणि सूचना संबंधित महानगरपालिकेत 12 ते 17 जानेवारी 2012 या कालावधीत स्वीकारल्या जाणार आहेत. निवडणूक होत असलेल्या दहा महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांसाठी 9225320011 या क्रमांकावर हेल्पलाईनची आणि 56677 या क्रमांकावर एसएमएसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे दिली. येत्या 16 फेब्रुवारीस मुंबईसह ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या दहा महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यासाठी 5 जानेवारी 2012 रोजी मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली असून यावरूनच निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 12 जानेवारीस प्रसिद्ध केली जाणार आहे. यावर 17 जानेवारी 2012 पर्यंत संबंधित महानगरपालिका किंवा महानगरपालिकेने निर्देशित केलेल्या ठिकाणी मतदारांना हरकती व सूचना दाखल करता येतील. यानंतर 23 जानेवारीला प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केल्या जातील. हेल्पलाईन आणि संकेतस्थळ या दहा महानगरपालिका क्षेत्राती...

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012

माधुरी गुप्ता यांना जामीन मंजूर

नवी दिल्ली- ता. 10: पाकिस्तानमधील आयएसआय या एजन्सीला माहिती पुरविण्याचा आरोप ठेवून निलंबित करण्यात आलेल्या भारतीय दूतावासातील अधिकारी माधुरी गुप्ता यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दिल्लीच्या न्यायालयाने मंगळवारी (ता. 10 जानेवारी) 25,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. गुप्ता यांना 22 एप्रिल 2010 रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली होती. श्रीमती गुप्ता यांनी 20 महिने तुरुंगवास भोगला आहे. न्यायालयाने त्यांना परवानगीशिवाय दिल्ली सोडण्यास मनाई केली असून कोणत्याही साक्षीदारीशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संपर्क साधण्यास देखील मनाई केली आहे.

सिडकोचे शुक्रवारी (ता. 6) होणारे पारितोषिक वितरण पुढे ढकलले

मुंबई, ता. 5 - सिडकोतर्फे उद्या पनवेल नवी मुंबई येथे होणारे विविध गुणवत्ता यादीतील इ. दहावी, बारावी, सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण पुढे ढकलण्यात आले आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सिडकोतर्फे अनंतसिंग राजपूत यांनी कळविले आहे.

जळगाव येथे शुक्रवारी पत्रकार दिनानिमित्त परिसंवाद

जळगाव, ता. 5 - येथे शुक्रवारी (ता. 6) पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बळीराम पेठेतील जळगाव पत्रकार संघात सकाळी दहा वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी डॉ. कुमार सप्तर्षी, मा. रविराज गंधे मार्गदर्शन करतील.

मुंबई येथे 15 जानेवारीला छात्रभारतीतर्फे एक दिवसीय कार्यशाळा

मुंबई, ता. 5 - मुंबई येथे रविवारी (ता. 15) छात्रभारतीतर्फे युवकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा (वर्कशॉप) आयोजित केली आहे. सकाळी नऊपासून सायंकाळी सहापर्यंत तळमजला, पोयाबावडी म्युनिसिपल स्कूल, कामगार मैदानाजवळ, केईएम समोर, परळ, मुंबई येथे हे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी मार्गदर्शन करतील. नाटक, सिनेमा, मालिका, वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रसासकीय संधी आणि सामाजिक, राजकीय परिस्थितीचे भान आदी विषयांवर यावेळी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. माध्यमं खुणावताहेत या विषयावर सकाळचे संपादक पद्मभूषण देशपांडे, तरुण मित्रांनो - कपिल पाटील (शिक्षक आमदार), मनोरंजनाची न्यारी दुनिया - सचिन गोस्वामी (मालिका आणि सिनेमा दिग्दर्शक), चला प्रशासकीय सेवेत - हाजी जतकर (उपायुक्त विक्रीकर), दिल्ली हादरवणारा फकीर - राजा कांदळकर (लेखक, पत्रकार), समारोप: आपण कोण? - ऍड. अरुण दोंदे (अध्यक्ष छात्रभारती) आदी मान्यवर मार्गदर्शन करतील. कार्यशाळेत प्राध्यापक देखील सहागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी प्रा. जयवंत पाटील, प्रा. ईश्वर आव्हाड (9870329155), प्रा. उत्कर्षा मल्या, प्रा. आर. बी. पाटील, ...

आचारसंहितेसंदर्भात तक्रारी महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे कराव्यात- निवडणूक आयोग

मुंबई, ता. 4 - आचारसंहिता संदर्भातील तक्रारी संबंधित महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले आहे. राज्यातील 10 महानगरपालिका, 27 जिल्हा परिषदा आणि 309 पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या घोषणेनंतर संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचा भंग होत असल्याबाबत अनेक तक्रारी राज्य निवडणूक आयुक्तांकडे आणि आयोगाच्या कार्यालयाकडे करण्यात येत आहेत. त्याऐवजी महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेसंदर्भातील तक्रारी असल्यास त्या संबंधित महानगरपालिका आयुक्तांकडे सादर कराव्यात, तसेच जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आचारसंहितेसंदर्भातील तक्रारी असल्यास त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे द्याव्यात, असेही श्रीमती नीला सत्यनारायण यांनी आवाहन केले आहे.

अद्वितीय व्हा आणि चांगला विचार करा- कलाम

भुवनेश्वर, ता. 4 - अद्वितीय व्हा आणि चांगला विचार करा तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यात स्वतःस झोकुन द्या. असे आवाहन माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी आज येथे शाळेच्या विद्यार्थ्यांना केले. येथील केआयआयटी विद्यापीठाच्या प्रांगणात 99 व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनकार्यक्रमात ते बोलत होते. मंगळवारी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पाच दिवस (7 जानेवारीपर्यंत) चालणाऱ्या या कार्यक्रमात नोबेल विजेत्यांसह 15,000 प्रतिनिधींपेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी होत आहेत. यावेळी श्री. कलाम म्हणाले की युवकांनी आपल्या स्वप्नातील कल्पनेनुसार कार्य करावे. सध्याचा काळ जोखीम पत्करण्याचा आहे. येणाऱ्या पीढीचे भविष्य उज्ज्वल असून त्यांचीही विशिष्ट स्वप्न आहेत. कठोर परीश्रम करा आणि सर्व समस्यांचे निराकरण स्वतःच करण्याचा प्रयत्न करा. चांगली पुस्तकं लिहा, चांगला माणूस बना आणि आपला मित्र वाटावा असे चांगले शिक्षक व्हा, असेही श्री. कलाम म्हणाले. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की विज्ञानासाठी भरपूर पैसा लागतो आणि पैसा हा राजकारण्यांकडून येतो.

दहा महानगरपालिका- 16 फेब्रुवारी; जिल्हापरिषदा, पं.स.- 7 फेब्रुवारीला मतदानः आचारसंहिता लागू

मुंबई, ता. 3 - बृहन्मुंबईसह दहा महानगरपालिका तसेच 27 जिल्हापरिषदा आणि 309 पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे जाहीर केला. यानुसार महानगरपालिकांसाठी 16 फेब्रुवारी 2012 ला मतदान होईल. तर, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होईल. यासर्व ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. येथील सचिवालय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती सत्यनारायण यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर मुख्य सचिव चाँद गोयल उपस्थित होते. यावेळी श्रीमती सत्यनारायण म्हणाल्या की, आम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2012 आणि इ. दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होत आहे. परीक्षांचा कालावधी लक्षात घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही आणि निवडणुका वेळेवर घेण्याची जबाबदारी देखील व्यवस्थित पार पाडेल. महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम महानगरपालिका निवडणुकीसाठी 24 जानेवार...

सचिन...सिडनी येथे महाशतक झळकण्याची अपेक्षा!

क्रिकेट जगताचा बादशहा...अगदी पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या प्रतिस्पर्ध्यांना सुद्धा खुर्चीला खिळवून ठेवणारा सचिन क्रिकेट खेळण्यासाठी कोणत्याही देशात गेला, तरीही मैदानावर जाताना मॅचचे प्रत्यक्ष वर्णन करणाऱ्यापासून अम्पायरसुद्धा खुश होणारच. शतकाचे महाशतक झळकवण्यासाठी योग्य संधीच्या शोधातल्या सचीनने गेल्या काही दिवसात संयम मात्र अजिबात सोडला नाही. सिडनी येथे सचिनचे हे शतक नक्की झळकणार असल्याची अपेक्षा अनेक चहाते व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे क्रिकेटमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित करणारे आजपर्यंतचे खेळाडू पाहिले तर या सगळ्यांची उंची जेमतेमच असल्याचे सहज जाणवते. सर ब्रॅडमन, रिकी पॉइंटिंग, सुनिल गावस्कर ही नावं यासाठी लगेच डोळ्यासमोर येतात. यांची उंची कमी असली तरीही शारीरिक आणि बौद्धिक उंची फारच उंच आहे. तिथपर्यंत पोहोचायला अजून अनेकांना बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नूतनवर्षाभिनंदन...

प्रिय वाचकबंधूंनो... आमचे भारतासह समस्त युनायटेड स्टेट्स, नॉर्वे, तैवान, कॅनडा आदी देशांमधील वाचकबांधव, हितचिंतक, मार्गदर्शक, अभ्यागतांना इंग्रजी नववर्ष 2012 च्या हार्दिक शुभेच्छा...!