मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नवी मुंबई गृहनिर्माण संस्थांनी कोविड १९ साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान द्यावे- सिडको

जगभर सर्वत्र थैमान घालणाऱ्या कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूचा सामना करायला महाराष्ट्र शासनास मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपले योगदान देण्याचे आवाहन सहनिबंधक, सहकारी संस्था, सिडको यांच्यातर्फे त्यांच्या नवी मुंबईतील अधिकारक्षेत्रातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना करण्यात आले आहे. कोविड-१९ विषाणूमुळे उद्भवलेल्या पॅनडेमिकचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे औषधे व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, रोजगार गमावलेल्या मजूर, कामगार आदी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना अन्न, निवारा व अन्य सुविधा पुरविणे इ. कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांकरिता मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. याकरिता समाजातील व्यक्ती, संस्था, उद्योग समूह अशा विविध स्तरांतून येणारा आर्थिक मदतीचा ओघ हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड १९ मध्ये संकलित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून मुख्यमंत्री सहाय्यत निधीसही आपले आर्थिक योगदान देणे अपेक्षित आहे. तसेच महार

सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांचा निकाल व भूखंडांची वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध

कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांची यादी व भूखंडांच्या ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रिये अंतर्गत यशस्वी ठरलेल्या बोलीधारकांना वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नवी मुंबईतील खारघर येथील सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजने अंतर्गत शिल्लक असलेल्या ८१० घरांसाठी दि. ११ सप्टेंबर २०१९ रोजी योजना जाहीर करण्यात आली होती. सदर योजनेची सोडत २६ नोव्हेंबर २०१९ रोजी काढण्यात आली. त्यानंतर यशस्वी अर्जदारांची कागदपत्र पडताळणी करून पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी/निकाल दि. २६ एप्रिल २०२० रोजी www.cidco.nivarakendra.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर पुढील प्रक्रियेबाबत अर्जदारांना लवकरच कळविण्यात येईल. तसेच गृहनिर्माण योजना ऑगस्ट-२०१८ अंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमधील १४,८३८ परवडणाऱ्या घरांची योजना १३ ऑगस्ट २०१८ रोजी जाहीर करण्यात आली होती. सदर योजनेची सोडत २ ऑक्टोबर २०१८ रोजी काढण्यात आली व यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून प

सिडको: भूखंड वाटपदारांना अंशतः ऑनलाइन रक्कम भरण्यास मंजुरी- कोरोना लॉकडाउनमुळे निर्णय

सिडको महांडळातर्फे भूखंडांच्या विक्रीसाठी राबविण्यात येत असलेल्या ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रिये अंतर्गत सर्वोत्तम बोली लावलेल्या अर्जदारांना विहित मुदतीत हप्त्याची एकूण रक्कम टप्प्याटप्प्याने अंशत: रक्कम ऑनलाईन माध्यमातून भरण्यास मुभा देण्यात यावी, या निर्णयास सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी मंजुरी दिली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर संबंधित भूखंड वाटपदारांना दिलासा देणारा हा निर्णय सिडकोने घेतला आहे. सिडकोतर्फे आपल्या मालकीच्या भूखंड विक्रीकरिता ई-लिलाव व ई-निविदा पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. या प्रक्रिये अंतर्गत निविदा व शुल्क भरणा, कागदपत्रे सादर करणे, अर्जांची छाननी, बोली उद्धृत करणे व सोडत या सर्व प्रक्रिया या ऑनलाइन संगणकीय पद्धतीने पार पडतात. यानुसार सर्वाधिक बोली उद्धृत करणाऱ्या अर्जदारास यशस्वी म्हणून घोषित करण्यात येते. यशस्वी अर्जदारांना वाटपपत्र (Allotment Letter) पाठविण्यात येते. वाटपपत्रामध्ये अर्जदाराने भूखंडाची किंमत अदा करण्यासाठीच्या दोन हफ्त्याचे तपशील (Installments) व ते भर

'कोरोना COVID 19" विरुद्ध लढा; प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक

सध्या अवघं जग कोरोना मध्ये अक्षरशः अवघडलं आहे आणि हादरलं आहे. एक प्रकारचे हे जैविक युद्धच असल्याचे मानले जात आहे. जवळपास प्रत्येकालाच या कोरोना ने काम लावलंय...कोणत्याही कामाविना घरी बसणे, ते सुद्धा केवळ आराम करणे..हे सुद्धा एक कामच आहे असे मी मानतो... कोरोना अर्थात COVID 19 संदर्भात अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नसली, तरीही कोणत्याही रोगावर यशस्वीपणे मात करण्यासाठी प्रतिकारशक्ती उत्तम असणे ही बाब सर्वात महत्त्वाची आहे. अगदी परवाच मी संध्याकाळी दूध घ्यायला डेअरीत गेलो तेव्हा जवळपास अर्धा तास उशीरा गड्याने दूध आणले...गडी थोडा वयस्कर असल्यामुळे त्याला खांद्यावरून कॅन उतरवण्यासाठी मदत केली आणि कॅनचे झाकणही उघडून दिले. नेहमी दूध वाटप करणारे गृहस्थही तेवढ्यात घरातून माप घेऊन आले नी खुर्चीत विराजमान झाले...कॅनचे झाकण मी उघडले तेव्हा त्यांचा छोटा मुलगा समोरच होता. दुधात थोडा कचरा असल्याचे मी सांगितले. यावर, त्या गृहस्थांच्या मुलाने त्यांना सांगितले, "बाबा-बाबा दुधातला कचरा काढा बरका व्यवस्थित, यामुळे त्यांनी मुलाला प्रतिप्रश्न केला..कारे व्यवस्थित का काढायचा कचरा? यावर मुलगा उत्तरला,

सचिन शिंदे नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड

मुंबई, ता. 6- नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी सचिन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या आदेशान्वये, नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष निशांत भगत यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली. श्री. शिंदे यांची पक्षनिष्ठा आणि अद्यापपावेतो पक्ष आणि समाज यांच्यासाठी केलेले कार्य लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी सचिन शिंदे म्हणाले, की धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक विकास देणारे काँग्रेस सरकार राज्यात व देशात आण्याण्यासाठी अहोरात्र मेहनत घेईन. तसेच युवक काँग्रेसच्या मार्फत नवनवीन संकल्पना राबवून पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रचंड मेहनत व सर्वसामान्य युवकांचे हक्काचा व्यासपीठ करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेईन या साठी मी वचनबद्ध राहीन असे मी आश्वासन देतो.

Goa Kolva Beach

GOA - KOLVA BEACH...

महिलांचे हक्क व कल्याण समितीचा सिडको महामंडळामध्ये दौरा

नवी मुंबई, ता. ११ - महिलांचे हक्क व कल्याण समितीचा दौरा दिनांक 11 जुलै 2017 रोजी सिडको भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याच्या निमित्ताने महिलांचे हक्क व कल्याण समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत श्रीमती मनिषा चौधरी, विधानसभा सदस्य तथा समिती प्रमुख, श्रीमती सीमा हिरे, विधानसभा सदस्य श्रीमती दीपिका चव्हाण, विधानसभा सदस्य, श्रीमती विद्या चव्हाण, विधान परिषद सदस्य, ॲड. हुस्नबानू खलिफे, विधान परिषद सदस्य व श्रीमती सायली कांबळे, अवर सचिव आदी उपस्थित होत्या. यावेळी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी श्री. विनय कारगांवकर, सहव्यवस्थापकीय संचालक श्री. राजेंद्र चव्हाण, सहव्यवस्थापकीय संचालिका श्रीमती. प्राजक्ता लवंगारे वर्मा व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महिलांचे न्याय्य हक्क व त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी राबवण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांची पूर्तता होत असल्याची पडताळणी करून समितीद्वारे त्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे सिडकोतर्फे खास महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या सिडको मनस्वी स्त्री संसाधन केंद्र व प्रकल्पबाधित महिलांच्या सर्वांगिण विकासाच्

रामनाथ कोविंद एनडीए चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

एनडीए तर्फे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस, शिवसेनेसह सर्वच पक्षांना याबाबत लवकरच कळविण्यात येणार असून सर्व पक्षांची यास सहमती मिळेल, अशी आशा भाजपतर्फे अमित शाह यांनी व्यक्त केली आहे. देशाचे 13 वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ येत्या 24 जुलैस संपणार आहे.

Marathi Language...

Marathi, historically derived from Maharashtra (the language) of the great (maha) land/ nation (rashtra), belongs to the Indo-Aryan stock of languages. Marathi is one of the 18th official languages in India and the official language of the state of Maharashtra. At present, there are approximately sixty two million speakers of Marathi, including the speakers outside the native state of Maharashtra. Marathi is an indigenous origin and occupies a geographically unique position since it is spoken in the area which connects two major languages families: Indo-Aryan of the north, and Dravidian of the south. Like Hindi, Marathi uses the Devanagari alphabets, locally known as balbodh. For every business expansion and growth, it is mandatory to promote the products keeping in mind the target audiences. For effective business communication, there should be a good flow of language keeping in mind local people and lifestyle. The language has significantly emerged as a great business source owing

सिडकोद्वारा कोपरखैरणे नोडमधील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

मुंबई, ता. 9 - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व 2012 च्या जनहित याचिका क्रमांक 138 नुसार सिडको किंवा महाराष्ट्र शासनातर्फे कोणताही विकास परवाना न घेता बांधकाम करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयातर्फे देण्यात आले आहेत. सिडकोने व महाराष्ट्र शासनाने या अनाधिकृत बांधकाम विषयी न्यायलयात याचिका दाखल केली होती. अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. शिवराज एस. पाटील, सिडको व सिडको (उत्तर) अनधिकृत बांधकाम विभाग यांच्यातर्फे दि. 8 जून 2017 रोजी कोपरखैरणे नोड, ठाणे जिल्हा येथील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत कोपरखैरणे नोड सेक्टर-9 मधील बालाजी मल्टीप्लेक्सजवळ असलेल्या अनधिकृत गॅरेज, सर्व्हिस स्टेशन आणि फर्निचरचे दुकान यांच्यावर अनधिकृत बांधकाम विभागाने कारवाई करुन 8000 चौ.मी. परिसर अतिक्रमाणापासून मोकळा करण्यात आला. ही बांधकामे सिडकोतर्फे कोणताही विकास परवाना न घेता सिडकोच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आली असल्याने सिडकोतर्फे निष्कासित करण्यात आली. ही मोहिम अनधिकृत बांधकाम नियंत्रक (उत्तर) पी.बी.राजपूत, सहाय्यक अनधिकृत बांधक