नवी मुंबई, ता. ११ - महिलांचे हक्क व कल्याण समितीचा दौरा दिनांक 11 जुलै 2017 रोजी सिडको भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याच्या निमित्ताने महिलांचे हक्क व कल्याण समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत श्रीमती मनिषा चौधरी, विधानसभा सदस्य तथा समिती प्रमुख, श्रीमती सीमा हिरे, विधानसभा सदस्य श्रीमती दीपिका चव्हाण, विधानसभा सदस्य, श्रीमती विद्या चव्हाण, विधान परिषद सदस्य, ॲड. हुस्नबानू खलिफे, विधान परिषद सदस्य व श्रीमती सायली कांबळे, अवर सचिव आदी उपस्थित होत्या.
यावेळी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी श्री. विनय कारगांवकर, सहव्यवस्थापकीय संचालक श्री. राजेंद्र चव्हाण, सहव्यवस्थापकीय संचालिका श्रीमती. प्राजक्ता लवंगारे वर्मा व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महिलांचे न्याय्य हक्क व त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी राबवण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांची पूर्तता होत असल्याची पडताळणी करून समितीद्वारे त्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे सिडकोतर्फे खास महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या सिडको मनस्वी स्त्री संसाधन केंद्र व प्रकल्पबाधित महिलांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने राबवण्यात येत असलेल्या सिडको तारा प्रकल्पाबद्दल या बैठकीत माहिती देण्यात आली.
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.