मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

रमेश वांजळे यांच्या निधनामुळे धडाडीचा लोकप्रतिनिधी हरपला- भुजबळ

मुंबई, दि. 11 जून : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खडकवासला येथील आमदार रमेश वांजळे यांच्या अकाली निधनामुळे एक धडाडीचा आणि लोकप्रिय लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, 'गोल्ड मॅन' म्हणून राज्यभरात प्रसिध्द झालेल्या आमदार रमेश वांजळे यांनी आपल्या धडाडीच्या कार्यपध्दतीमुळे मतदारसंघातील जनतेची मनेही जिंकली होती. महाराष्ट्र विधीमंडळातही त्यांनी आपल्या आक्रमक शैलीत काम करत चमक दाखविण्यास सुरवात केली होती. त्यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर तसेच मतदारसंघातील जनतेवर दु:खाची कुऱ्हाड कोसळली आहे. त्या सर्वांच्या दु:खात मी सहभागी आहे. रमेश वांजळे यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थनाही श्री. भुजबळ यांनी केली आहे.

तारकर्ली, गणपतीपुळे ऑक्टोबरनंतरच गाळमुक्त होणे शक्य

तारकर्लीमधील संगम पॉईंट येथे मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे तेथे हायस्पीड बोटी चालविण्यात मोठा अडथळा येतो आहे. त्याचप्रमाणे गणपतीपुळे येथील खाडीमध्येही बराच गाळ साचलेला आहे. तो गाळ तातडीने काढण्याची आवश्यकता श्री. भुजबळ यांनी मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. त्यावर मेरिटाईम बोर्डाच्या ताफ्यात येत्या ऑक्टोबरपर्यंत चार नवीन ड्रेझर दाखल होत असून त्यानंतरच हा परिसर गाळमुक्त करता येऊ शकेल, असे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.             मुंबईला गेटवे ऑफ इंडियासमोर तरंगती जेटी तयार करण्याच्या प्रस्तावालाही लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याची माहितीही यावेळी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी श्री. भुजबळ यांना यावेळी दिली.             याखेरीज सागरी महामार्गाचे काम गतीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने मेरिटाईम बोर्डाशी संबंधित विषयही बोर्डाने तातडीने मार्गी लावावेत, अशी सूचनाही श्री. भुजबळ यांनी यावेळी केली.

एमटीडीसी कडून प्रशिक्षित व्यक्तींनाच यापुढे कोकणात स्नॉर्केलिंगचा परवाना

मुंबई, दि. 10 जून : मालवणसह कोकणात अन्यत्र सुरू असलेल्या बेकायदेशीर खाजगी स्नॉर्केलिंग व्यवस्थापनांना पायबंद घालण्यासाठी या परिसरात केवळ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत प्रशिक्षित करण्यात आलेल्या व्यक्तींनाच परवानगी द्यावी, त्याचप्रमाणे अशा व्यक्तींची शिफारस करण्याचा अधिकार (Recommending Authority) हा सुद्धा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडेच असायला हवा, असे राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी काल येथे स्पष्ट केले. श्री. भुजबळ यांच्या या मागणीशी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनीही सहमती दर्शविली. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्याकडे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विविध प्रलंबित प्रस्तावांबाबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी काल श्री. भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.डी. शिंदे, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, पर्यटन विभागाचे उपसचिव राजीव निवतकर, महाव्यवस्थापक श्री. चव्हाण, मेरिटाईम बोर्डाचे

एम. एफ. हुसेन यांच्या निधनाने रंग गहिवरले: अजित पवार

मुंबई, ता. ९ - जागतिक कीर्तीचे चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या निधनाने चित्रकला सृष्टीचे रंग गहिवरले आहेत. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या शोकसंदेशात त्यांनी म्हटले आहे की, भारताचे पिकासो म्हणून ओळखल्या जाणार्‍या पद्मविभूषण एम. एफ. हुसेन यांनी स्वतःची चित्रकला शैली निर्माण केली होती. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या या अवलिया चित्रकाराने भारतीय चित्रकलेला जगन्मान्यता मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रकलेचा एक अध्याय अस्तंगत झाला आहे.

पर्यावरणमंत्री छगन भुजबळ यांनी बोलावलेली बैठक

एम.एफ. हुसेन यांच्या निधनामुळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचा कलाकार हरपला

मुंबई, दि. 9 जून : सुप्रसिद्ध चित्रकार मकबूल फिदा हुसैन यांच्या निधनामुळे भारत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकाराला कायमचा मुकला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, आपल्या सिद्धहस्त रंगरेखांच्या माध्यमातून या कलंदर कलाकाराने जगप्रसिद्ध कलाकृती निर्माण केल्या. त्यांच्या काही कलाकृती वादग्रस्त ठरल्या असल्या तरी भारताला विशेषतः महाराष्ट्राला कलेच्या जागतिक कॅनव्हासवर नेण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैलीच्या माध्यमातून एम.एफ. हुसैन यांनी जागतिक कलाविश्वात स्वतःचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

अंधेरी येथील शिल्पग्रामसाठी एमटीडीसीची महापालिकेकडे जागा हस्तांतराची मागणी

मौजे मजासगाव, ता. अंधेरी येथे उपलब्ध असलेल्या 15 एकर जागेवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून `शिल्पग्राम` विकसित करण्यात येणार आहे. तथापि, सातत्याने पाठपुरावा करूनही ही जमीन मुंबई महानगरपालिकेने महामंडळाकडे अद्यापही हस्तांतरित व केल्यामुळे या कामासाठी केंद्राकडून आलेला 5 कोटी 55 लक्ष रुपयांचा निधी वापरता येऊ शकलेला नाही. ही जागा महामंडळाला देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेचे आयुक्त सुबोध कुमार यांना केली. सदर जमिनीचे मूळ आरक्षण हे मनोरंजन मैदान असे होते. मात्र नगरविकास विभागाने ते बदलून `शिल्पग्राम` असे केले आहे. या जमिनीच्या ताब्यासाठी सन 2007पासून महामंडळाकडून महापालिका आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती यावेळी एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी दिली. हरियाणातील सूरजकुंडच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त असा शिल्पग्राम प्रकल्प उभारण्याचा महामंडळाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. जोगेश्वरी गुंफा जवळच असल्याने या शिल्पग्रामला त्याचा निश्चितच लाभ होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त क

मुंबईमधील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीने सल्लागार कंपनीची नियुक्ती करावी

मुंबई , दि. 9 जून : मुंबईमधील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन मंडळाने तातडीने सल्लागार कंपनीची नियुक्ती करावी आणि त्यांच्याकडून सर्वंकष विकास आराखडा तातडीने तयार करून घ्यावा , असा आदेश राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिला. श्री. भुजबळ म्हणाले , मुंबईच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाबरोबरच या कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मुंबई महानगरपालिका , दोन जिल्हाधिकारी आणि त्यांच्या जिल्हा नियोजन समित्या , केंद्रीय व राज्य पुरातत्त्व विभाग , वन , पर्यावरण आणि तत्सम अन्य सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व संस्थांनी एकमेकांशी योग्य समन्वय साधून प्रयत्न करण्याची गरज आहे. या विविध यंत्रणांमधील प्रतिनिधींची एक समन्वय समितीही स्थापन करावी. तसे झाले तरच त्यांच्या विकासासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या बाबतीतही सुसूत्रता प्रस्थापित होईल आणि मुंबईचा खऱ्या अर्थाने पर्यटन विकास साधणे शक्य होईल , असेही मत त्यांनी व्यक्त केले. या बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सुबोध कुमार , मुंबई शहर जिल्हाधिकारी चंद्रशेखर ओक , मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निर्मलकुमार देशमुख

पाण्यावर सहज उतरु शकणाऱ्या विमानसेवेच्या सादरीकरणाने पर्यटन मंत्री छगन भुजबळ प्रभावित

मुंबई, दि. 9 जून : जमिनीवरुन पाण्यावर किंवा पाण्यावरुन नोकेवर अशा प्रकारे सर्व सहज संचार करण्यास सक्षम असणाऱ्या आणि तरीही प्रचलित हेलिकॉप्टर अथवा विमानापेक्षाही स्वस्त असणाऱ्या विमानसेवेचे (अँफिबियन विमान) सादरीकरण पाहून राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ आज अत्यंत प्रभावित झाले. ही सेवा पुरविणाऱ्या `मेहेर` या कंपनीने जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्य शासनाला ठोस प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना श्री. भुजबळ यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. मेरिटाइम एनर्जी हेलि एअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (MAHAIR) ही अशा प्रकारची सेवा पुरविणारी भारतातली पहिली विमानसेवा कंपनी आहे. अंदमान व निकोबार बेटांवर त्यांनी ही अँफिबियन विमानसेवा पुरविण्यास सुरवात केली आहे. या कंपनीच्या वतीने आज श्री. भुजबळ यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ शर्मा यांच्यासह महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, पर्यटन विभागाचे उपसचिव राजीव निवतकर आदी यावेळी उपस्थ

आचार्य रत्नानंद यांच्या निधनाबद्दल भुजबळ यांना शोक

मुंबई, ता. ८ - आर्ट ऑफ लिव्हिंग चे संस्थापक असलेले अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांचे वडिल आचार्य रत्नानंद जी (वय ८७) यांचे बंगळुरू येथे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला आहे. श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, योग व अध्यात्मिक गुरू असलेल्या श्री श्री रवीशंकरयांचे अनुयायी जगभरात आहेत. सदैव हसतमुख असणार्‍या या महान गुरूच्या जीवनावर त्यांचे वडिल आचार्य रत्नानंद जी यांच्या मानवतावादी विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. आचार्य रत्नानंद यांच्या निधनामुळे श्री श्री रवीशंकर यांच्यासह त्यांच्या संपूर्ण शिष्यपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांना लाभावे व आचार्य रत्नानंद जी यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना श्री. भुजबळ यांनी केली आहे.