मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

दत्ता पाटील यांच्या निधनामुळे सर्वसामान्यांचा आवाज हरपला- भुजबळ

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय नारायण उर्फ दत्ता पाटील यांच्या निधनामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा आवाज हरपला, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, स्वातंत्र्यलढ्यासह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत दत्ता पाटील यांनी अमूल्य योगदान दिले. 25 वर्षांहून अधिक काळ अलिबागचे नेतृत्व करीत असताना त्यांनी या विभागातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे हित कधीही नजरेआड होऊ दिले नाही. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रालाही त्यांनी मोलाचे योगदान दिले. या लोकांचा विधिमंडळातील एक कणखर आवाज म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या निधनामुळे एक सच्चा, तळमळीचा लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

खाजगीकरणांतर्गत रस्ते चौपदरीकरणाच्या चार प्रकल्पांना पायाभूत सुविधा समितीची मान्यता

मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या आज झालेल्या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खाजगीकरणांतर्गत (बीओटी) चौपदरीकरणाच्या चार महत्त्वाच्या निविदा प्रस्तावांना आज मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत एकूण 176.29 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली. मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मंजूर केलेल्या या प्रस्तावांमध्ये शिरोली (कोल्हापूर) ते सांगली, अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी, हडपसर-सासवड-बेलसरफाटा अधिक बेल्हा-पाबळ-उरुळीकांचन-जेजुरी-निरा आणि मोहोळ-कुरूल-कामती-मंद्रुप या रस्त्यांच्या चौपदरीकरण प्रकल्पांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. मंजूर झालेल्या प्रकल्पांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे : 1) शिरोली (कोल्हापूर) ते सांगली रस्ता (प्र. रा.मा. क्र.3 व रा.मा. 75) : या टप्प्यातील शिरोली ते अंकली आणि अंकली ते सांगली या 25.66 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण आणि 26.95 किलोमीटर लांबीचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. 2) अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी (रा.मा. क्र. ...

मुंबई अनुभवणार 'हवाई फॉम्युला-1' चा थरार

मुंबई, दि. 3: अनेक अभिनव उपक्रमांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात तत्पर असणाऱ्या मुंबईकरांना 'हवाई फॉर्म्युला-1' म्हणून जगभरात लोकप्रिय होत असलेल्या 'एअरो-जीपी' या विमान स्पर्धेचा थरार या वर्षअखेरीस अनुभवावयास मिळणार आहे. या स्पर्धेचे भारतातील संयोजक असलेल्या मे. आय इंडिया इनोव्हेटिव्ह मिडिया या कंपनीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) विनावित्तीय सहकार्यासाठीचे पत्र काल प्रदान केले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांची आय-इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हरभजन सिंग सहगल यांनी गेल्या सोमवारी या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात भेट घेऊन त्यांना पॉवरपॉइंट सादरीकरण दाखविले आणि मुंबईमध्ये या उपक्रमाच्या आयोजनासाठी एमटीडीसीकडून सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 'इएसपीएन-स्टार' वाहिनीच्या माध्यमातून जगभरातील 50हून अधिक देशांत या चित्तथरारक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या प्रसिद्धीच्या दृष्टीने हा अभिनव उपक्रम उपयुक्त ठरेल, असे मत श्री. भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले...

राज्याच्या पर्यटन विकासासाठी 50 कोटी रुपयांच्या योजनांना मान्यता

मुंबई, दि. 19 जुलै : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन वर्षात राज्याच्या पर्यटन विभागातर्फे विविध महत्त्वपूर्ण योजनांसाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्चाला आज प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे,  अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या निधीचे वितरण करण्यात येणार आहे. याअंतर्गत किल्ले मालिका (फोर्ट सर्किट), लोणार सरोवर परिसर विकास, एलिफंटा, अष्टविनायक, बुद्धिस्ट गुंफा/ लेणी, रायगड किल्ला आदी ठिकाणी पर्यटनविषयक सोयीसुविधा विकसित करण्याबरोबरच समुद्रकिनारे (बीच) सुरक्षा, जिल्हानिहाय पर्यटनाचा बृहत्आराखडा तयार करण्यासाठी ही तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. •        किल्ले मालिका (फोर्ट सर्किट) : थोर छत्रपती शिवरायांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात त्यांच्या महान कर्तृत्वाची साक्ष देणारे 350हून अधिक गड-किल्ले आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील प्रमुख अशा किल्ल्यांचा अभ्यास करण्यात येऊन पर्यटनदृष्ट्या चार किल्ले मालिका विकसित करण्याचा निर्धा...

उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

मुंबई ता. १६ - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर २२ जुलैचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मुंबईतील बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्युमुळे मला तीव्र दुःख झाले असून येत्या २२ जुलै रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला आहे. कार्यकर्ते आणि हितचिंतकांनीही माझा वाढदिवस साजरा करू नये. सेच वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत. बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याबरोबरच स्फोटातील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन देखील श्री. पवार यांनी केले आहे.

मुंबई येथे सिरियल ब्लास्ट १०० जखमी- १३ ठार

मुंबईचे वातावरण सुरळीत होत आहे असे वाटत असतानाच बुधवारी (ता. १३) संध्याकाळी मुंबई पुन्हा एकदा सिरियल बॉम्ब स्फोटामुळे हादरली आहे. अतिरेक्यांनी केलेल्या या हल्ल्यात सुमारे ११३ जखमी आणि २० ठार झाल्याचे आत्तापर्यंत वृत्त हाती आले आहे. दादर, झवेरी बाजार आणि ओपेरा हाऊस परीसरात सायंकाळी ६.४५ ते ७.०० दरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटामुळे मुंबई हादरली आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या थकित वीजबिलावरील व्याज माफ करणार- अजित पवार

मुंबई, ता. १२ - औरंगाबाद महानगरपालिकेने पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिलापोटीच्या महावितरणाची थकबाकी दोन महिन्यात एकरकमी भरल्यास त्यावरील २११ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्यात येईल, असे उपमुखमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज औरंगाबाद महानगरपालिकेच्या पाणी प्रश्नाबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की औरंगाबाद महानगरपालिकेकडे १९९० पासून १०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास २११ कोटी रुपयांचे व्याज झाले आहे. महानगरपालिकेने थकबाकीची रक्कम दोन महिन्यात महावितरणकडे जमा केल्यास थकबाकीवरील २११ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्यात येईल. यासाठी महानगरपालिकेने सर्व पाणी जोडण्यांना मीटर लावावे तसेच पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी पाणी वापरावरून विविध क्षेत्रांसाठीचे पाण्याचे दर ठरविणे आवश्यक आहे. यासंबंधी आमसभेचा ठराव पारित करून महानगरपालिकेने तो शासनाकडे पाठवावा. यावेळी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता, पाणीपुरवठा विभाग मुख्यसचिव मालिनी शंकर, ऊर्जा विभागाचे मुख्य सचिव सुब्रत रथो, नगरविका...

ठळक बातम्या

* पुरी एक्सप्रेस अपघात- लोहमार्गावर बॉम्बस्फोटाने पुरी एक्सप्रेस घसरली १३ जखमी * कालका एक्सप्रेस अपघात- आतापर्यंत ६२ मृतदेह काढण्यात यश * तेलंगाणा मागणी- ओस्मानिया विद्यापीठाचे विद्यार्थ्यांचे आज उपोषण

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांचा मुंबई येथे आता 14 जुलैला गौरव समारंभ

मुंबई, दि. 5 : रांची येथे झालेल्या 34 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राच्या पदक विजेत्या खेळाडूंचा राज्य शासनातर्फे करण्यात येणाऱ्या गौरव समारंभाच्या तारखेत बदल झाला असून आता हा समारंभ 14 जुलै 2011 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता येथील के. सी. महाविद्यालयात होणार आहे. पूर्व नियोजनानुसार हा समारंभ 15 जुलैला होणार होता. या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी यांनी केले आहे. महाराष्ट्राने या स्पर्धेत 41 सुवर्ण, 44 रौप्य आणि 47 कास्य अशी एकूण 132 पदके संपादन करून देदीप्यमान कामगिरी केली आहे. सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात ही कामगिरी बजावणाऱ्या 212 खेळाडूंचा आणि त्यांच्या 31 क्रीडा मार्गदर्शकांचा या समारंभात गौरव केला जाईल. सुवर्णपदक विजेत्यास 5 लाख, रौप्यपदक विजेत्यास 3 लाख, तर कास्यपदक विजेत्यास 1.50 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. क्रीडा मार्गदर्शकांना सुवर्णपदकासाठी 50 हजार, रौप्यपदकासाठी 30 हजार, तर कास्यपदकासाठी 20 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. एकूण 9.30 कोटी रुपयांची बक्षिसे दिली जातील. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या...