'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाचे निर्माते सचिन आणि बिंदीया खानोलकर तसेच दिग्दर्शक अनंत महादेवन यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार. शेजारी आमदार विनायक मेटे, आमदार विक्रम काळ मुंबई, ता. 23 - यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटसृष्टीचे नाव कोरणार्या कलाकार आणि तंत्रज्ञानांचा आपल्याला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन तसेच निर्माते सचिन आणि बिंदीया खानोलकर यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आमदार विनायक मेटे, आमदार विक्रम काळे यावेळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, दादा कोंडके यांनी मराठी चित्रपट रसिकांना खिळवून ठेवले होते. त्यांच्यानंतर अलिकडे निर्माण झालेल्या काही चांगल्या चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी दिली आहे. 'मी सिंधुताई सपकाळ' हा प्रेरणादायी चित्रपट आहे. येत्या...