पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यामध्ये सिल्धा परिसरात माओवाद्यांनी संयुक्त सुरक्षा दलाच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यात सोमवारी 24 जवान ठार झाले. मोटारसायकलींवरून आलेल्या पन्नासपेक्षा अधिक माओवाद्यांनी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अत्याधुनिक शस्त्रांनी दहा मिनिटे हल्ला केला. अनेक वर्षांपासून माओवाद, भारत-चीन, भारत-पाकिस्तान भूमीवादावरून अतिरेकी, नक्शलवादी यांचे भारतात अनेक ठिकाणी हल्ले झाले आहेत, होत आहेत. सीमेवर बिचारे जवान अहोरात्र लढताहेत. परंतु अद्याप शासन गप्प का? केवळ फाइलमध्ये किंवा कागदी घोडे नाचवून काहीच उपयोग नाही, हे नुकत्याच झालेल्या या हल्ल्याने सिद्ध केले आहे. कसाबची साक्ष देखील जवळपास पूर्ण झाली आहे. मग आता हे रेंगाळणे का? आदेश न मानणार्या लोकांना माओवादी बेदम झोडपतात ही दंडूकेशाही आणि बंदूकशाही नव्याने सावकारीसारखी सुरू होत आहे, भविष्यातल्या अराजकतेची ही नांदी आहे. पुण्यातही जर्मन बेकरी घटना ताजी आहेच.. केवळ सुरक्षा यंत्रणांना दोष देण्यात काहीच तथ्य नाही, त्या यंत्रणा आपल्या परिने कार्य करून वेळोवेळी सतर्क देखील करतात. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने आणि सर्वच विरोधी पक्षांनी त्वरीत पावले उचलून तीनही सेनादलांना कारवाईचे आदेश देण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
मार्चमध्ये पनवेल येथे चौथे राज्यव्यापी साहित्य संमेलन: कवी, गजलकारांना सहभागी होण्याचे संस्थांचे आवाहन
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. याकरिता सहभागी होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील नामवंत कवी, गजलकारांनी आपल्या स्वरचित कविता, गजल २० फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि विश्वव्यापी मराठी साहित्य, सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे. अभिजात मराठी भाषेच्या जतनाकरिता गेली अनेक वर्षे दोन्ही संस्था कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली कवी संमेलने, गजल मुशायरा, चर्चासत्रांपासून मराठी भाषेचा गोडवा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सकाळी वारकरी दिंडीतून ‘ज्ञानोबा-तुकोबा’ यांच्या गजरासह ग्रंथ दिंडीत टाळ, चिपळ्या, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पारंपरिक पद्धतीने नयनरम्य पालखी काढण्यात येईल. या परंपरेच्या माध्यमातून पनवेल शहराचे साहित्य, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जतन केला जात आहे. सकाळी दिंडी, उद्घाटन सोहळा, एक-एक तासाच्या अवधीची दोन चर्चासत्रे, कवी आख्यान, गजल मुशायरा याशिवाय अन्य ...