मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

“शतकी लग्नगाठ” बांधायला लावणारी...अर्धशतकी लग्नगाठ!

श्री. किशोर कुळकर्णी आणि माझा परिचय तसा ‘दैनिक तरूण भारत ’ पासूनचा..। पण त्यांच्या प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे परिक्षण करण्याइतका काही मी पात्र नाही. जेव्हा विद्यार्थ्याचा शिक्षक होतो, तेव्हा परीक्षक होऊन परीक्षा घेतली जाते, परिक्षण केले जाते, मी मात्र अद्याप विद्यार्थीच आहे. दुसरं म्हणजे माझ्या लग्नगाठीला अद्याप एक तप सुद्धा पूर्ण झालेलं नाही, आणि विविध दिग्गजांनी त्यांची मतं इथे प्रस्तुत केली आहेत परिणामी, मी या पुस्तकाविषयी काय लिहिणार? पण दिलेली जबाबदारी पूर्ण करावीच लागेल, म्हणून या क्षणी पुस्तकाचे परिक्षण करण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न...! तसं पाहिलं तर ‘किशोर’ नावाच्या व्यक्तींचा स्वभाव जरी भिडस्त वाटत असला तरीही त्यांना लोकांच्या गरजा, आवडी-निवडी यांची जाणीव असते. आपल्या कार्यानेच ते लोकप्रिय होऊन सर्वश्रृत होऊन यशस्वी होतात, त्यांच्या कार्याचा सुगंध त्रिभुवनी पसरतो. स्व. गायक किशोर कुमार यांच्या उदाहरणाने आपला या गोष्टीवर विश्वास नक्की बसावा. सुरवातीला किशोर कुळकर्णी यांचे लेख ‘दैनिक सकाळ’ मध्ये टप्प्याटप्प्याने मालिकेच्या माध्यमातून अनेक भागात प्रसिद्ध करण्यात आले. सोला...

सचिनच्या दोनशे धावांच्या निमित्ताने...

ग्वालियर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २४ फेब्रुवारीला भारताने आक्रमक खेळी करून विजयाची माळ गळ्यात तर घातलीच, मात्र, सचिन तेंडुलकर याने चक्क दोनशे धावांचा सहजगत्या विश्वविक्रम नोंदवून भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे. एक दिवसीय सामन्यात सेहेचाळीसावे शतक ठोकून सचिनने इतर कसोटीपटूंपुढे आव्हान उभे केले असून एक आदर्श देखील घालून दिला आहे. आणखी चार शतके करून आपले पन्नासावे शतक सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात करून, उन्मत्त झालेल्या कांगारूंना धूळ चारावी, हीच अपेक्षा...।

ओम् गं गणपतये नमः ।

"माओवाद" भूमीवाद अजून किती जीव घेणार...

पश्‍चिम बंगालमधील पश्‍चिम मिदनापूर जिल्ह्यामध्ये सिल्धा परिसरात माओवाद्यांनी संयुक्त सुरक्षा दलाच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यात सोमवारी 24 जवान ठार झाले. मोटारसायकलींवरून आलेल्या पन्नासपेक्षा अधिक माओवाद्यांनी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अत्याधुनिक शस्त्रांनी दहा मिनिटे हल्ला केला. अनेक वर्षांपासून माओवाद, भारत-चीन, भारत-पाकिस्तान भूमीवादावरून अतिरेकी, नक्शलवादी यांचे भारतात अनेक ठिकाणी हल्ले झाले आहेत, होत आहेत. सीमेवर बिचारे जवान अहोरात्र लढताहेत. परंतु अद्याप शासन गप्प का? केवळ फाइलमध्ये किंवा कागदी घोडे नाचवून काहीच उपयोग नाही, हे नुकत्याच झालेल्या या हल्ल्याने सिद्ध केले आहे. कसाबची साक्ष देखील जवळपास पूर्ण झाली आहे. मग आता हे रेंगाळणे का? आदेश न मानणार्‍या लोकांना माओवादी बेदम झोडपतात ही दंडूकेशाही आणि बंदूकशाही नव्याने सावकारीसारखी सुरू होत आहे, भविष्यातल्या अराजकतेची ही नांदी आहे. पुण्यातही जर्मन बेकरी घटना ताजी आहेच.. केवळ सुरक्षा यंत्रणांना दोष देण्यात काहीच तथ्य नाही, त्या यंत्रणा आपल्या परिने कार्य करून वेळोवेळी सतर्क देखील करतात. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने आणि सर्वच...

देशातल्या प्रजेचे काय होणार...?

आज आपल्या देशाचा 60 वा प्रजासत्ताक दिन आहे. येथे विविध सरकारे आली आणि गेली, प्रत्येक वेळी प्रत्येक सरकारकडून वचनं, आश्वासनं...आणि देशातल्या प्रजेस फक्त आशा, अपेक्षा...यापेक्षा दुसरं काहीही नाही. दरडोई उत्पन्न वाढल्याचा दावा होत असला तरीही दिवसेंदिवस महागाई, लोकसंख्या वाढते आहे, अंतर्गत आणि सीमेपलीकडचे शत्रूही वाढताहेत, सामान्य नागरिकाला घराबाहेर गेल्यानंतर आपण घरी परत सुखरूप येऊ अथवा नाही, जीवंत परत येऊच याची शाश्वती वाटत नाही- अशी परिस्थिती निर्माण झाली असून...जगात एक महासत्ता बनण्याची स्वप्न रंगविणार्‍या आणि शक्यता असणार्‍या या देशाच्या प्रजेचे नेमके होणार तरी काय...? देणाराचे हात हजार..., देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे, एक दिवस...या ओळींप्रमाणेच सध्याची स्थिती आहे, या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे हजार हातांनी दिले जाते, ते सुद्धा भरघोस...। भारतावर कितीतरी आक्रमणे झाल्याचा इतिहास आहेच. इंग्रजांच्या तावडीतून देशाला मुक्त करण्यासाठीही दीडशे वर्ष लागली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर लगेच देशाची पाकिस्तानरुपी फाळणी झाली, कालांतराने पाकिस्तानने काश्मिरचा बराच भाग ताब्यात घेतला, चीनन...