मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

इंदूरमध्ये थंडावली थंडी

  गेले दोन महिने इंदूरकरांना चांगलेच गार करून गरम कपडे परिधान करण्यास परावृत्त करणारी थंडी दोन दिवसांपासून थंडावली आहे. रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली असून ११ अंश सेल्सिअसवर सध्या रात्रीचे तापमान स्थिरावले आहे. वसंत पंचमीनंतर थंडीचा जोर आणखी कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. थंडीमुळे बाहेर निघालेली ब्लँकेट्स, स्वेटर धुवून पुन्हा पुढच्या थंडीत वापरता यावी म्हणून कपाटात परत ठेवली जात आहेत.

प्रतापगडच्या जीर्णोद्धारासाठी तातडीने १ कोटी ३१ लाख मिळणार

  मुंबई, ता. २ - प्रतापगड किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचे काम अतिशय समाधानकारक असल्याने तातडीने १ कोटी ३१ लाख रुपये उपलब्ध करून दिले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. येथील सह्याद्री अतिथिगृहात किल्ले प्रतापगडच्या जीर्णोद्धारासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यमंत्री सचिन अहिर आदींसह स्थानिक आमदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. पवार म्हणाले, की प्रतापगडाच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. प्रतापगड जीर्णोद्धार समिती, पर्यटन विकास निधी आणि लोकसहभागातून हे काम सुरू आहे. जीर्णोद्धाराच्या माध्यमातून पुरातत्व दृष्टिकोनातून हा विकास केला जाणार आहे. त्यात किल्ल्यावरील अवशेषांचे मूळ स्वरूपात जतन करणे, गडाची तटबंदी, दरवाजे, बुरूज यांची दुरुस्ती, मजबुतीकरण, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सोयीसुविधा पुरविणे आदींचा समावेश आहे. कामाचा आवाका प्रचंड असल्याने जीर्णोद्धार समितीने प्रतापगड विकासाच्या पहिल्या भागाचा आराखडा चार टप्प्यात तयार करून सादर करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार चार वर्षात १२ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे. या

GOLDEN HITS TO MARK ITS GOLDEN JUBILEE

Vashi: Golden Hits, a conceptual musical presentation of old melodies, has come a long way since its inception almost five years down the line. It has witnessed many ups and downs during this tedious and breathtaking journey to provide the old music buffs from city jurisdiction and beyond their dose of entertainment in accordance with ever increasing demand for inclusion of select numbers. Anmol Entertainment which is the brain behind these musical concerts of Golden Hits is all geared up to commemorate its 50 th show on February 5, Saturday, timings being from 8.30pm. The mega musical show of celebrating Golden Jubilee of Golden Hits will have who’s who from difference spheres of life which is devised to pay obeisance to music maestros that have given the Indian film industry their best shot to reckon with. “This is a much-sought after musical nite in Navi Mumbai which will have songs of almost all great musicians that have chipped in immens

आई, तू रडू नकोस...

"प्लास्टिक ऍनिमिया" झालेल्या एका सहा वर्षाच्या चिमुकल्या कृष्णाचे हे बोल आहेत...त्याला झालेल्या असाध्य रोगामुळे आणि डॉक्टरांनी त्याला आता अवघ्या एका महिन्याची मुदत दिल्यामुळे दिवसभर रडणार्‍या आणि आसुसलेल्या डोळ्यांनी आपल्या पिटुकल्याला डोळे भरून पाहणार्‍या आईला कृष्णा सारखा समजावत असतो. आपण वाचणार नाही याची जाणीव असलेला सहा वर्षांचा कृष्णा हा चिमुरडा मात्र बिनधास्त आहे. कृष्णाच्या शरीरात नवीन रक्त तयार होणे जवळजवळ बंद झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. त्याचे गरीब आई-वडील पैशाअभावी त्याच्यावर औषधोपचार करण्यात असमर्थ ठरले आहेत. इंदूरच्या अरविंदो हॉस्पिटलमध्ये कृष्णावर उपचार सुरू आहेत. चार महिन्यातून सहा वेळा त्याला "ओ पॉझिटीव्ह" रक्त देण्यात आले आहे. डॉक्टरांनी कृष्णाच्या आई-वडिलांना बोनमॅरो ट्रान्सप्लँटेशनचा आणखी एक सल्ला दिला आहे. परंतू यासाठी, त्यांच्याजवळ नसलेल्या आणि इतके जमवणे शक्य नसलेल्या १५ लाख रुपयांची गरज आहे. कृष्णाचे वडील आरएस कुशवाह मजूर असून त्यांच्या डोक्यावर अगोदरचाच सुमारे दीड लाख रुपयांचे अक्षरशः ओझे आहे. कृष्णाची बहिण नंदिनी कृष्णासाठी देवापुढे

पैठणच्या संतपीठाचा अभ्यासक्रम जूनपासून सुरू करावा-पवार

मुंबई, ता. १ - पैठण (जि. औरंगाबाद) येथील संतपीठातील अभ्यासक्रम येत्या जूनपासून सुरू करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले आहेत. मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात संतपीठाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वनमंत्री पतंगराव कदम, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक कार्यमंत्री संजेय देवतळे, राज्यमंत्री भास्कर जाधव, आमदार संजय वाकचौरे, प्रकाशमहाराज बोधले आदी उपस्थित होते. संतवाड़्मयाचे शिक्षण देणारे देशातील हे एकमेव संतपीठ असून तीनवर्षांपूर्वी या संतपीठाची स्थापना झाली आहे. सर्व पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या आहेत. संतपीठातील अभ्यासक्रम, प्राध्यापक आणि इतर कर्मचारी वर्गाच्या भरतीच्या प्रक्रियेबाबत दोन महिन्यात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कार्यवाहीस सुरवात करावी. तसेच संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे हस्तांतरीत करण्याबाबत देखील प्रक्रिया सुरू करण्यात यावी. श्री. टोपे म्हणाले, की संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे हस्तांतरीत करण्याबाबत संबंधितांना पत्र दिले जाईल. यानंतर अभ्यासक्रमाबरोबर आवश्यक त्य

नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांना मूळ संचिकेची माहिती केवळ अर्जाद्वारे मिळणार

मुंबई, ता. १ - नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वाटप करण्यात येत असलेल्या भूखंडांच्या संदर्भातील मूळ संचिकेची माहिती आता केवळ अर्जाद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकल्पग्रस्तांनी माहिती व कागदपत्रांच्या प्रती मिळवण्यासाठी भूमी व भूमापन विभागातील संबंधित नोडच्या अतिरिक्त भूमि व भूमापन अधिकारी/भूमि व भूमापन अधिकारी/सहाय्यक भूमि व भूमापन अधिकारी किंवा क्षेत्राधिकारी/ कार्यालयीन सहाय्यक, लिपीक यांचेकडे लेखी अर्ज सादर केल्यानंतर सात दिवसात माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. भूमी व भूमापन विभागाच्या अधिलेख कक्षामध्ये साडेबारा टक्के योजनेच्या संचिका ठेवण्यात आल्या आहेत. प्रकल्पग्रस्त खातेदार, त्यांचे प्रतिनिधी, विधीज्ञ व इतर व्यक्ती यांना या संचिकांची हाताळणी आवश्यकतेनुसार करण्याची अनुमती होती. परंतू अनेकदा प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या संचिकेतील काही महत्वाची कागदपत्रे गहाळ होणे, मूळ संचिका गहाळ होणे अशा बाबी निदर्शनास आल्या आहेत. हे ध्यानात घेऊन, व्यवस्थापकीय संचालकांच्या सूचनेनुसार आता संचिकांच्या प्रत्यक्ष हाताळणीवर प्रतिबंध घालण्यात आला असून याप

जातिनिहाय जनगणना जून ते सप्टेंबर

नाशिक, ता. १ - देशातील जातिनिहाय जनगणना सन २०११ च्या मुख्य जनगणनेनंतर म्हणजेच जून ते सप्टेंबर २०११ या कालावधीत टप्प्याटप्प्प्याने करण्यात येणार असल्याची माहिती खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे. श्री. भुजबळ यांनी २७ जुलै २०१० रोजी इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) जातिनिहाय जनगणनेच्या संदर्भात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना पत्र लिहिले होते. नियोजन आयोगाने अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या अहवालात ओबीसी जनगणनेची शिफारस केल्याचा दाखलाही पत्रात दिला होता. हे पत्र पंतप्रधान कार्यालयामार्फत पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय गृहविभागाच्या रजिस्ट्रार जनरल कार्यालयाच्या सामाजिक अध्ययन प्रभागाकडे पाठविण्यात आले होते. यानुसार असिस्टंट रजिस्ट्रार जनरल श्रीमती प्रतिभा कुमारी यांचे उपरोक्त माहिती देणारे पत्र आपल्याला नुकतेच प्राप्त झाले असल्याचे खासदार भुजबळ यांनी सांगितले. जून ते सप्टेंबर २०११ या कालावधीत टप्प्याटप्प्याने करावयाच्या जातिनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेचे स्वरूप निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पत्रात देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अंतिम आराखडा निश्चित झाल्यानंतर देखील आपल्याला

'नवीन पोपट' तयार होऊ न देणे 'यशवंतांसाठी' महत्वाचे...

मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जाळणार्‍या संशयित पोपट शिंदे याचा मृत्यू झाला. निर्ढावलेल्या भ्रष्टाचाराने आणि भ्रष्टाचारास पोसणार्‍यांच्या स्वैराचारामुळे पोपट शिंदेंप्रमाणेच नवीन भेसळ माफिये तयार होऊ न देणे, यशवंत सोनवणे यांच्यासारख्या चांगल्या शासकीय अधिकार्‍यांसाठी आणि भ्रष्टाचारमुक्त जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. नाशिक परिक्षेत्रातील मालेगाव जिल्ह्यातील पानेवाडी प्रकल्पाजवळ इंधनात भेसळ होत असल्याची माहिती मिळाल्यावरून यशवंत सोनवणे संबंधित ठिकाणी छापा मारण्यासाठी गेले होते. घडत असलेला भेसळीचा प्रकार गंभीर आणि त्याचे स्वरूप मोठे असलेले पाहून सोनवणे यांनी आणखी काही अधिकार्‍यांना पाचारण करण्यासाठी प्रतीक्षा करीत होते. पोपट शिंदे याला समज देतानाच परिस्थिती आणखी चिघळली, यामुळे आणखी अधिकारी, कर्मचारी आवश्यक होते. दरम्यान, सोनवणे यांच्याशी झालेल्या बाचाबाची पोपट शिंदे आणि सहकार्‍यांनी सोनवणे यांच्या अंगावर इंधन टाकून त्यांना जीवंत जाळले. यात सोनवणे यांचा घटनास्थळीवरच मृत्यू झाला होता. शिंदे याला सोनवणे यांनी पकडून ठेवल्यामुळे तो देखील सुमारे सत्तर टक्के जळाल्यामु

भुजबळ यांना गौरवपत्र...

न्यूजर्सी (अमेरिका) येथील भारतीय रहिवासी आणि इंडियन लायन्स क्लबतर्फे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांना गेल्या ऱविवारी मुंबई येथील रामटेक निवासस्थानी गौरवपत्र प्रदान करण्यात आले. अमेरिकेत गेल्या ४० वर्षांपासून स्थायिक असलेले प्रख्यात आर्किटेक्ट श्री. किशोर जोशी यांच्या हस्ते आणि श्रीमती अल्पना पेंटर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

भुजबळ ठरले "सिनिअरमोस्ट पार्टिसिपन्ट" विशेष पुरस्काराचे मानकरी

व्हिन्टेज ड्राइव्ह...आनंद लाँग ड्राइव्हचा... मुंबई, ता. ३० - मंत्री जरी असलो तरीही आपण हरहुन्नरी असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज सिद्ध करून दाखविले. येथे आयोजित 'व्हिन्टेज कार रॅली' चे उद्घाटन करून त्यांनी अचानक चक्क रॅलीमध्ये सहभाग देखील घेतला. चालवायला अत्यंत अवघड असलेल्या १९४७ ब्युईक कन्व्हर्टिबल चे स्टेअरिंग अत्यंत सफाईदारपणे हाताळले तसेच रॅलीचे संपूर्ण अंतर व्यवस्थित पूर्ण केले. अशी रॅली पूर्ण करणारे ते पहिलेच मंत्री ठरल्याने त्याचबरोबर सर्वात ज्येष्ठ ड्रायव्हर ठरल्याने त्यांना "द सिनिअरमोस्ट पार्टिसिपन्ट टू ड्राईव्ह इन द व्हिन्टेज कार रॅली" या विशेष पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले. हॉर्निमन सर्कल ते बांद्रा आणि तेथून पुन्हा परत असा मार्ग या रॅलीसाठी निश्चित करण्यात आला होता. श्री. भुजबळ यांनी हे अंतर पूर्ण केले. या गाडीचे मालक नितिन दोसा यांनी ही कार चालविण्यास अत्यंत अवघड असून लेफ्ट हँड ड्राइव्ह असल्याचे सांगितले. दरम्यान, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशनतर्फे आयोजित रॅलीमध्ये राज्याचे पोलिस महासंचालक डी. शिवान