नेरूळ- येथील स्टर्लिंग महाविद्यालयाच्या वतीने नुकताच ५३ वा फार्मसी सप्ताह साजरा करण्यात आला. इंडियन फार्मा असोसिएशन व महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या फार्मसी सप्ताहामध्ये महाविद्यालयाच्या वतीने औषध साक्षरता जनजागृती अभियान देखील राबविण्यात आले. यामध्ये डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा कसा वापर करावा, कोणते औषधे सेवन करावी औषध विकत घेताना कोणती काळजी घ्यावी, त्यांची साठवण कशी करावी याविषयीची माहिती नागरिकांना देण्यात आली. या सप्ताहाच्या निमित्ताने फार्मसी विद्यार्थांसाठी महाविद्यालयाच्या वतीने शनिवारी एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उपस्थीत विद्यार्थ्यांना फार्मसी असोसिएशन चे अध्यक्ष डॉ हेमंत मोंडकर, महाराष्ट्र आरोग्य विद्यालयाचे प्र कुलगुरू डॉ शेखर राजदरेकर, प्राचार्य डॉ घाटगे, डॉ बाविस्कर व अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये फार्मसी क्षेत्रातील नामवंत मंडळी, फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच, सबंधित वेळेत याच दिवशी महाविद्यालयाच्या बाहेरील पटांगणात भाभा अणुसंशोधन केंद्रातील तंत्रज्ञानाचे प्रदर्शनही भरवि...