मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

HAPPY DASRA!!!

सोनेरी क्षणांनी यावी हाती सोनेरी पाने... वेचुन घेण्यासाठी आपले हात पुढे "पसरा"... झाले आहे सुरू आता सुवर्ण युग नवे, साजरा करू या चला सारे "दसरा"... दसर्‍यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. Soneri Kshananni yavi haati Soneri Pane. Vechun ghenyasathi aaple haat pudhe "pasra". Zale aahe suru aata 'Suvarn Yuug' nave, Sajara Karu Ya Sare "Dasra"! Happy Dasra!!!

wonder of nature...

can anybody guide/help me to identify this flowers name/type?

कर्णकुंडलं...की...कॅप्सूल...?

ग्रामपंचायत निवडणुकांकरिता नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यासाठी 6 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढ

मुंबई, दि. 4 : राज्य शासनाने ग्रामपंचायत निवडणुकांबाबतच्या जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भातील निकषात बदल केला आहे. मागासवर्गीय उमेदवारांना याचा लाभ मिळावा म्हणून 21 ऑक्टोबर 2012 रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 5 ऑक्टोबर ऐवजी 6 ऑक्टोबर 2012 पर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे दिली. राज्यातील 4 हजार 637 ग्रामपंचायतींसाठी 21 ऑक्टोबर 2012 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने 25 सप्टेंबर 2012 रोजी केली होती. त्यावेळी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियममधील कलम 10-1अ मधील तरतुदीनुसार आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने नामनिर्देशनपत्रासोबतच जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते; परंतु त्यात आता राज्य शासनाने सुधारणा केली आहे. त्यानुसार जात वैधता प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नसल्यास संबंधित उमेदवाराने जात पडताळणी समितीकडे जातीचे प्रमाणपत्र तपासणीसाठी दिल्याची पावती किंवा पुरावा नामनिर्देशनपत्रासोबत जोडावा...

colour of nature...

दहा नगरपरिषदांसाठी ४ नोव्हेंबरला मतदान- आजपासून आचारसंहिता लागू

मुंबई, ता. १- डहाणू, जव्हार, इगतपुरी, त्र्यंबक, नंदुरबार, तळोदा, नवापूर, किनवट, चिखलदरा, आणि पांढरकवडा या दहा नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ नोव्हेंबर २०१२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केली आहे. या नगरपरिषदांच्या क्षेत्रात आज (ता. १ ऑक्टोबर) रात्री बारापासून आचारसंहिता लागू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या निवडणुकांसाठी चार ते दहा ऑक्टोबर २०१२ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जाणार नाहीत. ११ ऑक्टोबरला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत २५ ऑक्टोबररोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. २७ ऑक्टोबरला निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरित्या निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्याची दिवशी मतदान केंद्रांची आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. चार नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. मतदानाच्या दिवशी सायंकाळी साडेसहानंतर किंवा सर्व मतदान केंद्रांवरील मतदान संप...