मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

God Bless you...

गुढी-पाडवा, हिंदू नववर्ष शुभचिन्तन...

युवराज सिंगची हॉस्पिटलमधून सुट्टी...

क्रिकेटपटू युवराज सिंग याची आज बोस्टन (अमेरिका) येथील हॉस्पिटलमधून अखेर सुट्टी करण्यात आली. केमोथेरपी च्या तिसर्‍या आणि शेवटच्या चरणानंतर युवराज याला सुट्टी देण्यात आली आहे. "अखेर तिसरे चरणही संपले, आता आपण मी जाण्यासाठी जास्त प्रतीक्षा करू शकत नाही, मी मोकळा झालोय...माझ्या सर्व चाहत्यांना आणि अमिष्ट चिंतन करणार्‍यांचे आभार.." या शब्दात युवराजने आपला आनंद देखील व्यक्त केला आहे. गेल्या महिन्यात युवराज याला बोस्टन येथे केमोथेरपी करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. युवराज मैदानावर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पाऊल ठेऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. केमोथेरपीच्या उपचारांदरम्यान युवराज याचे डोक्यावरचे केस पूर्णपणे गळाले आहेत. सचिनचे शतकांचे शतक अर्थात महाशतक झळकल्यामुळे त्याने सचिन तेंडुलकरचे ट्विटर वर tweet करून अभिनंदन केले आहे.

बच्चन कुटुंबीयांकडे ४ अरब...

लखनौ- वृत्तसंस्था: बॉलीवुड चे बिग-बी आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडे ३ अरब ६१ लाख ७ हजार ३११ रुपये, तर त्यांच्या पत्नी जया बच्चन यांच्याकडे ४३ करोड ९ लाख ३० हजार २३ रुपयांची संपत्ती असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. शनिवारी (ता. १७) समाजवादी पार्टीतर्फे जया बच्चन यांनी राज्यसभेसाठी भरलेल्या नामांकनात देण्यात आलेल्या संपत्तीविषयी दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात हा खुलासा करण्यात आला आहे. या शपथपत्रानुसार, बच्चन दाम्पत्त्याकडे तीन अरब ४३ करोड ७० लाख ३७ हजार ३३४ रुपयांची चल संपत्ती असून १५० करोड रुपयांची अचल संपत्ती आहे. दागिने- अमिताभ यांच्याजवळ २६ करोड २३ लाख ७ हजार ६८८.    जया बच्चन- १३ करोड ३४ लाख ६२ हजार २९९ रुपयांचे दागिने. लग्झरी कार- अमिताभ ६ करोड ३२ लाख २६ हजार ५५४ रुपयांच्या लक्झरी कार. कृषि भूमी- अमिताभ- दौलतपूर (उत्तर प्रदेश) ५० लाख आणि मुजफ्फरपूरमध्ये २९ करोडची कृषि भूमी. जया बच्चन- काकोरी येथे १.४५ करोड आणि भोपाळ येथे ३.५ करोड रुपयांची भूमि. (सौजन्य- नईदुनिया)

छगन भुजबळ यांच्याकडून सचिन तेंडुलकरचे अभिनंदन

मुंबई, दि. 16 मार्च : शतकांचे महाशतक ही क्रिकेटच्या विक्रमादित्याकडून माझ्यासारख्या लाखो चाहत्यांना मिळालेली अमूल्य भेट आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी सचिन तेंडुलकरचे अभिनंदन केले आहे. श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, क्रिकेट आणि सचिन तेंडुलकरचे माझ्यासारखे चाहते गेले वर्षभर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते, तो रोमांचक क्षण आज मिरपूर येथे साकार झाला. सचिनने त्याचे बहुप्रतिक्षित महाशतक आज झळकावले आणि क्रिकेटच्या या विक्रमादित्याने शतकांचे शतक झळकावण्याचा आणखी एक महाविक्रम आपल्या नावावर जमा केला. त्याची ही कामगिरी भारतीय तसेच जागतिक क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोदविली जाईल, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाचे छगन भुजबळ यांच्याकडून स्वागत

मुंबई, दिनांक 16 मार्च : केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत सादर केलेल्या सन 2012-13 च्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे ग्रामीण भागाला दिलासा तसेच कृषि क्षेत्रातील वाढीला चालना मिळणार असून ग्रामीण सडक योजना गतीने मार्गी लागतील, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री श्री.छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. सन 2012-13 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भुजबळ यांनी पुढे म्हटले आहे की, देशभरातील 8,800 कि.मी. लांबीचे महामार्ग राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रमांतर्गत विकसित करण्याचे या अर्थसंकल्पात नमूद केले आहे. त्याचबरोबर, ग्रामीण सडक योजनेसाठी 24,000 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. मुलभूत तसेच पायाभूत सोयीसुविधांच्या या निर्मितीमुळे देशाच्या विकासाला गती मिळणार आहे. या अर्थसंकल्पात कृषि, परिवहन तसेच ऊर्जा या क्षेत्रावर भर दिला आहे. त्याचबरोबर कल्याणकारी योजनांची व्याप्तीदेखील वाढविली आहे. शिक्षण घेण्यासाठी झालेली समाजाची जागृती विचारात घेता उच्च शिक्षणासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांकरिता या अर्थसंकल्पात वेगळ्या निधीची तरतूद केली असल्यामुळे शैक्षणिक...

आचारसंहितेतील मार्गदर्शक तत्त्वांनुसार आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकांना हरकत नाही

मुंबई, ता. १६ - भिवंडी-निजामपूर, मालेगाव, लातूर, परभणी व चंद्रपूर महानगरपालिकेची १५ एप्रिल २०१२ रोजी निवडणूक असल्याने या महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहितेमधील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून १४ एप्रिल २०१२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुका काढण्यास हरकत नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आचारसंहितेच्या कालावधीतच असल्याने त्यानिमित्त काढण्यात येणार्‍या मिरवणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे विचारणा होत आहे. त्याबाबत स्पष्टीकरण करताना श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेच्या कालावधीत येणार्‍या सार्वजनिक सण-उत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा कायम रहावा यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने २९ डिसेंबर २०११ रोजी निर्गमन केलेल्या आदर्श आचारसंहितेमधील परिच्छेद-३ (१७) मध्ये मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत. त्यांचे पालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुका काढण्यास अथवा सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास हरकत नाही. परंतु यासाठी स्थानिक पातळीवर ज्या परवानग...

श्री पूना गुजराती बंधू समाजच्या शताब्दी महोत्सवाचे रविवारी उदघाटन

पुणे (ता. १५) - येथील श्री पूना गुजराती बंधू समाज ही संस्था आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक १८ मार्च रोजी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शताब्दी महोत्सवाचे उदघाटन होणार असून यानिमित्त श्री. मोदी यांना 'गुजरात रत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती पूना गुजराती बंधू समाजचे अध्यक्ष श्री. नितिनभाई देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त श्री. भरतभाई शहा, उप कार्यकारी विश्वस्त श्री. हरीशभाई शहा, उपकार्यकारी विश्वस्त श्री. नैनेशभाई नंदू, सल्लागार समिती सदस्य हिराभाई चोखावाला आदी उपस्थित होते. यावेळी अधिक माहिती देताना श्री. नितिनभाई देसाई म्हणाले, पुण्यातील गुजराती बांधवांच्या उन्नतीसाठी झटणार्‍या श्री. पूना गुजराती बंधू समाज या संस्थेची स्थापना १९१३ साली करण्यात आली. यावर्षी संस्था शताब्दी महोत्सवात पदार्पण करीत असून त्याचा शुभारंभ गुजरातचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात येणार आहे. तसेच संस्थेतर्फे उभारण्...

सिडकोतर्फे १६ मार्चपासून अर्बन हाट येथे 'वसंत मेळ्याचे' आयोजन

नवी मुंबई, ता. १६- सिडकोतर्फे सीबीडी, बेलापूर येथील सिडको अर्बन हाटमध्ये १६ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान २४ दिवसीय वसंत मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वसंत मेळ्यात राज्यासह इतर अनेक राज्यातील कलावंत सहभागी होतील. दर्जेदार हस्तकला आणि हातमागांवरील उत्पादनांच्या प्रदर्शनाच्या आस्वाद व खरेदीचा लाभ रसिकांना घेता येईल. मेळ्याचे हे तिसरे वर्ष असून यंदा मेळ्यात मध्यप्रदेश, ओरिसा, आंध्रप्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान चंदिगड या राज्यातील ज्यूट, रेशीम, कॉटनसारख्या वैशिष्ट्यपूर्ण कला उत्पादने उपलब्ध असतील. याचबरोबर लाकडी खेळणी, टेराकोटाची उत्पादने, बांबूचे फर्निचर व गृहसजावटीच्या वस्तू, चित्रकला, आयुर्वेदिक, फ्लोरिकल्चर, चामड्याची विविध उत्पादने या मेळ्यातील आकर्षणे असतील. तसेच वसंत मेळ्यात विविध भाषांमधील दर्जेदार साहित्य देखील उपलब्ध असून यात नामवंत प्रकाशने व लेखकांच्या पुस्तकांचा समावेश आहे. वसंत मेळ्याला भेट देणार्‍या रसिकांना अॅम्फिथिएटरमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटता येईल, तसेच फुडकोर्टमध्ये कोकणी-मालवणी-कोल्हापुरी खाद्यपदार्थांबरोबरच र...

cloudy climate

सूर्याला कितीही तेज असले तरीही छोटेसे ढग सूर्य झाकू शकतात...। तात्पर्य- गर्वाचे घर खाली.

सवड राजकारणातून...

मध्यप्रदेशचे वाणिज्य उद्योगमंत्री कैलाश विजयवर्गीय आणि आमदार जितू जिराती..अनुक्रमे श्री विष्णू आणि नारद यांच्या वेशभूषेत..! होळीनिमित्त इंदूरला हिन्द मालवा संस्थेतर्फे आयोजित बजरब ट्टू हास्य कवि संमेलनात या दोघे सहभागी झाले होते. विशेष म्हणजे दोघेही चांगले गातात..श्री. विजयवर्गीय अनेकदा अनेक ठिकाणी सहज माईक हातात घेतात आणि मैफलींमध्ये रमून जातात. याचबरोबर दरवर्षी होळी, दिवाळीसारख्या विविध सणांमध्ये अशाप्रकारे सहभाग घेतात. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यापासून इंदूरचे महापौर, मंत्री..असा श्री. विजयवर्गीय यांचा प्रवास आहे. (courtesy: NaiDunia)

आता आम्हीही झालोय हुश्शार...

आमच्या आजोबांच्या काळात सुद्धा पाणीटंचाई होतीच. माणसांबरोबर आमचीही संख्या वाढली आहे. माणसं जरी आमची संख्या कमी झाल्याचे सांगत असली तरीही असं नाही. अहो, आम्हीही माणसाच्या सोबतच रहातो की...! त्यामुळेच आम्हीही माणसांप्रमाणेच वेगवेगळ्या वसत्यांमध्ये विखुरले गेलोय. म्हणून आमची संख्या कमी झाल्यासारखं कदाचित वाटत असावं. माणसाप्रमाणेच आमचीही कामं वाढली आहेत. श्रद्धा-अंधश्रद्धा-श्राद्ध कायम होतात, वाढतात, होत असतातच. वृक्ष-वल्ली आम्हां सोयरी..असं फक्त आता म्हणण्यापुरतंच राहण्याच्या मार्गावर आहे. वनराई, वृक्षांच्या जंगलाचं प्रमाण कमी होऊन परिणती सीमेंटच्या जंगलात झाली आहे. आमचाही नाईलाज झाला, सीमेंटच्या जंगलाचे चटके आमच्याप्रमाणेच माणसालाही नकोसे वाटतात. म्हणूनच पंखे, वातानुकूलितं यांचा शोध माणसानं लावला..। सर्वच जीवसृष्टीला जगण्यासाठी आवश्यक असलेला आणि ज्याला जीवन असं म्हटलं जातं, अशा पाण्यासाठी आजही भ्रमंती कायम आहेच. आमच्या आजोबांच्या काळात छान माठ होते..जीवो जीवस्य जीवनम्...या उक्तीप्रमाणे आम्ही माणसाने माठातलं पाणी संपवल्यावर उरलेलं पाणी पिण्याचा प्रयत्न आमच्या आजोबांच्या काळापासून करत आल...

खारघर, द्रोणागिरी व उलवे परिसरात १२ व १३ मार्च रोजी पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई, ता. १०- सिडकोतर्फे हेटवणे धरणातून खारघर, द्रोणागिरी व उलवे परिसरात पाणीपुरवठा करण्यात येतो. हेटवणे धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी येत्या १२ व १३ मार्चला वरील नोडमध्ये पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. १२ व १३ मार्चला सकाळी नऊपासून (९.००) हेटवणे धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल. हे काम दुसर्‍या दिवशी म्हणजेच १३ मार्च दुपारी ३.०० पर्यंत चालणार असल्यामुळे सिडको क्षेत्रातील खारघर, द्रोणागिरी व उलवे परिसरात या कालावधीत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्यामुळे नागरिकांनी पुरेसा साठा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अखेर अखिलेश च्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब

वृत्तसंस्था- उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर अखेर, समाजवादी पक्षाची धुरा यशस्वीपणे पार पाडणारे आणि सांभाळणार्‍या अखिलेश यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यासारखे आहे. समाजवादी पक्षाच्या बैठकीत अखिलेश यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येईल. अत्यंत कमी वयात (वय ३९) उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याचा मान अखिलेश यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री पदाबाबत वडील मुलायमसिंग की मुलगा अखिलेश विराजमान होणार याबाबत संभ्रम होता. अखिलेश यांनी त्यांचे वडील मुलायमसिंग हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु पक्षाला मिळालेल्या यशामध्ये अखिलेश यांचा सिंहाचा वाटा असून मुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांनीच सांभाळावी अशी मागणी होती. सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुलायम यांचे बंधू आणि जसवंतनगरचे आमदार शिवपालसिंग यादव तसेच रामपूरचे आमदार आझम खान अखिलेश यांचे नाव पक्षाच्या बैठकीत सुचवतील. पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बलराम यादव यांचे सुपुत्र आणि आमदार डॉ. संग्राम यादव तसेच हर्दोईचे आमदार नितिन अगरवाल हे अनुमोदन देतील. अखिलेश यांच्या नावाचा प्रस्ताव आमदारांकडू...

प्रतीक्षा नवरदेवांची...

कमलादेवी आवटे यांना डॉक्टरेट

सोलापूर: येथील लेखिका, अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ प्राचार्या कमलादेवी आवटे यांना शिवाजी विद्यापीठाने शिक्षणशास्त्र विषयातील डॉक्टरेट ( पीएच. डी.) नुकतीच प्रदान केली. शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण देण्यासाठी नव्या युगातील माध्यमांचा कसा उपयोग करता येऊ शकतो, याविषयी त्यांनी केलेल्या संशोधनास विद्यापीठाने मान्यता दिली असून, या संशोधनामुळे एका नव्या अध्यापन पद्धतीकडे लक्ष वेधले गेले आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.जी.अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन पूर्ण केले. कमलादेवी आवटे सध्या उस्मानाबाद येथील जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य असून, शिक्षणशास्त्र अभ्यासक आणि लेखिका-वक्त्या म्हणून त्या सर्वज्ञात आहेत. पर्यावरणशास्त्र या विषयात एम.एस्सी. केल्यानंतर आवटे यांनी पुण्यातून एम.एड. पूर्ण केले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्या सर्वप्रथम आल्या. त्यानंतर सोलापूर जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य म्हणून त्यांनी प्रशासकीय कारकीर्दीची सुरुवात केली. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोध निबंधांचे लेखन- वाचन त्या...

चलन फुगवटा...?