मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"पुस्तक दिवस" निमित्त...

माझंही एक स्वप्न होतं: मी मोठा होईन, लेखक होऊन एक छानसं पुस्तक लिहिन...वाचकांच्या खूप खूप प्रतिक्रिया मिळवेन...पण, पण, पण काय? शेवटी उलटंच झालं. या पुस्तकामुळे बरंच काही आणि सर्व काही होत असतं. खूप खूप पुस्तकं वाचली असती, तर ते सहज शक्य झालं असतं, पण तेव्हा आजच्या इतकी अक्कल नव्हती नां, पुस्तकं फाडणं जास्त माहित होतं. इतकं तरी ठीक आहे, की 'थोडी फार' नाही तरीही 'फार थोडी', पुस्तकं वाचल्यामुळे आज इतकं तरी करू शकतोय. पण बरोबरीचे मित्र कुठल्याकुठे निघून गेले याचं "शल्य" बोचतयं मनातल्या मनात, पण सांगू कोणाला? "कर्म" माझं, काही इलाज नाही. आज 'पुस्तक दिवस' या मथळ्यामुळे काहीतरी उगाच लिहावसं वाटलं, म्हणून ही गिचमिड... आज (२३ एप्रिल) सर्वत्र पुस्तक दिवस साजरा केला जातोय. खरंय। पुस्तकच आपल्याला सर्व काही देते. पुस्तकामुळे अनेक गोष्टी शक्य होतात. आजच्या या 'पेपरलेस्' होऊ पाहणार्‍या युगात अजूनही पुस्तकाशिवाय पानही हलत नाही. मानवाने कितीही प्रगती केली, तरीही पुस्तकाचे महत्व कमी होणार नाहीच. प्रगती केली तरीही पुस्तक...अधोगती केली/झाली तरीही पुस्तक....

वसुधैव कुटुंबकम्...स्वप्न कधी साकार होणार?

आज (२२ एप्रिल) वसुंधरा दिवस साजरा केला जातोय. दरवर्षीच हा दिवस साजरा केला जातो, आनंद वाटतो, परंतु संपूर्ण पृथ्वी हेच एक कुटुंब अर्थातच वसुधैव कुटुंबकम् ही संकल्पना, हे स्वप्न कधी साकार होणार ? खरंतर हे कोडंच आहे. इतकं मात्र म्हणता येईल, की अनेक पाकळ्या असलेल्या या फुलाची एक-एक पाकळी आता उलगडू लागल आहे. अनेक बडी राष्ट्र पृथ्वीचं रहस्य उलगडण्याच्या मागे सध्या लागली आहेत. यासाठी महाकाय अशी यंत्रणा सुद्धा राबवली जातेय. सुरवातीलाच यात दोष निर्माण झाला, तरीही हिंमत न हारता पुन्हा नव्याने सुरवात करून नव्या जोमाने मोहिम-शोध-कार्य सुरूच आहे. दुसरा भाग सांगायचा झाल्यास पृथ्वी एक आहे, पण इथे अनेक जाती-धर्म, भेद-भाव, राज-कारणं आहेत. अनेक देशांमध्ये हिंसा सुरूच आहे, निष्पाप मरताहेत, हिंसा करणारे मात्र हातावर तुरी ठेवून पसार होण्यात यशस्वी होत आहेत. हे सगळं का होतयं, केवळ सत्तेसाठीच नां? देशप्रेम राहिलं कुठे आता? असे अनेक प्रश्न निकाली काढण्याऐवजी माणसांऐवजी त्यांनाच जीवंत ठेवण्यात अनेक ठिकाणच्या सरकारांना स्वारस्य आहे. विविध देशांमध्ये बराच मोठा भाग नक्सलवादी, अतिरेकी, विघातक ताकदींच्या हातात आहे. ...

Ye zindagi usiki hai...

Natures Beauty

करलो दुनिया मुठ्ठीमें...।
Natures Wonder...

इंटरनेट गावोगावी पोहोचणार, पण..

अजूनही घराघरात कॉम्प्यूटर नाही.... अजूनही अनेकांकडे कॉम्प्यूटर विकत घेण्याइतका पैसा नाही.... अजूनही वीज भारनियमनाचे प्रमाण फार आहे.... अजूनही अनेकजण संगणक साक्षर नाहीत.... अजूनही अनेकांना इंटरनेट म्हणजे बाऊ वाटतो.... अजूनही अनेक शासकीय अधिकारी इंटरनेटचा वापर जेमतेम करतात.... अजूनही शासनाने ग्रामीण भागात इंटरनेटसाठी सखोल प्रयत्न केले नाहीत.... अजूनही अनेकांना कॉम्प्यूटर व्यवस्थित ऑपरेट करता येत नाही.... अजूनही............वेळ........गेलेली..............नाही...........!