“We have moved from a state of nothing to everything! अर्थात- आम्ही काही नसल्याच्या अवस्थेतून सर्वकाही असल्याच्या अवस्थेत पोहोचलो आहोत.” हे वाक्य बरंच काही सांगून जातं! एक काळ होता, माणुस निरोगी, आरोग्यसंपन्न, बव्हंशी निर्व्यसनी, होता. आज याउलट चित्र दिसत असून, आरोग्यसंपन्न, खर्या अर्थाने निरोगी, निर्व्यसनी अशी, शंभरातली अगदी बोटावर मोजण्याइतकी माणसं असतील. तरूण वयातच अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले असून एक प्रकारे वृद्धत्व आल्यासारखे वाटते. मात्र, दुसरी बाजू सुद्धा पाहणे आवश्यक आहे, ती म्हणजे, विविध व्याधींवर मात करण्यासाठी स्वतःला “ फिट” ठेवणार्यां ची संख्याही कमी नाही.
मला जेव्हा थोडफार समजू लागलं तेव्हाचे दिवस आठवतात, रस्त्यावर तुरळक गर्दी, पावसाळा आणि उन्हाळ्याचे काही दिवस सोडून दवाखान्यांमध्ये गर्दी जेमतेम असायची. आजकाल तर, अबब! लहान मुलांचा असो, की मोठ्यांचा, दातांचा असो की हाडांचा... कोणताही दवाखाना पाहा, पेशंट्सनी भरलेलाच. एवढं चागलं आहे, की डॉक्टरांच्या उपचारांनी लगेच बरं वाटत असल्याने डॉक्टर आणि पेशंट दोघेही खुष..। शेवटी ही सुद्धा एक सेवाच आहे नां, आणि सेवा ही एखाद्या व्रतासारखीच असते. लोकसंख्या वाढली मग व्याधी सुद्धा वाढणारच नां? नवनवीन लोकांप्रमाणेच, स्वाईन फ्लू, डेंग्यू, बर्ड फ्लू, कावासाकी, चिकुन गुनिया असे नवनवीन रोग, व्याधी सुद्धा वाढत आहेतच. या वाढणार्या रोगांवर नियंत्रण करण्यासाठी खरंतर माणसाची प्रतिकारशक्ती वाढणे गरजेचे वाटते. काही झालं की आपण अँटीबायोटिक घेऊन मोकळे होतो, तो व्याधी तात्पुरता जातो, पण त्यामुळे इतर साईड़-इफेक्टही होतातच. ही बाब प्रत्येकानेच गांभीर्याने घ्यावी. विज्ञानांच्या चमत्कारामुळे पुर्वीप्रमाणे दळण्यासाठी जाती, पाटा-वरवंटा आता काळाच्या ओघात नाहिसा होण्याच्या मार्गावर आहे. याची जागा घेतली आहे मिक्सर, ग्राईंडर, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लिनर, इलेक्ट्रॉनिक ब्रुम अशा वस्तुंनी. दशकापूर्वी दळणासाठी महिला किमान चक्कीवर तरी जात होत्या, मात्र हे प्रमाणही आता कमी होत असून ‘रेडिमेड’ विषयावर भर दिला जातो. पीठ, चटण्या, पोळ्यांपासून अगदी उन्हाळ्यात आंब्याचा रस सुद्धा रेडिमेड आणि घरपोहोच मिळतो. मग काय, मज्जाच असते, तोपर्यंत घरीच टिव्हीवर सिरीयल पाहण्यात वेळ घालवता येतो. या टीव्हीमुळे अनेक घरांमध्ये सायंकाळी किमान दोन-तीन तास तरी परस्पर संवाद नसतात. शाळेतून घरी आलेला विद्यार्थी आई-बाबांना काहीतरी सांगण्याच्या मूडमध्ये असतो, पण अरे, जरा शांत बैस, नंतर सांग, असं सांगितलं जातं. विद्यार्थ्याचा घरी अभ्यास घेण्याऐवजी त्याला शिकवणी अर्थातच ट्यूशन लाऊन पालक मोकळे होतात. काही शाळांमध्ये तर संबंधित शिक्षक विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे ट्यूशन न लावल्यास अशा विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही काही पालक-विद्यार्थी करतात.
पूर्वी केवळ ढ विद्यार्थ्यालाच शिकवणी लावली जात होती अथवा शिक्षक त्याला स्वतः घरी शिकण्यासाठी, विषय पक्का करण्यासाठी बोलवत असत. हा एकप्रकारे कमीपणा वाटत असे, पण आज परिस्थिती बदलली आहे. आमच्या मुलाला ट्यूशन लावली आहे..(without tution, no education) असं आपण अभिमानाने सांगतो. याला वास्तव कारणीभूत आहेच. सातत्याने वाढणाऱ्या महागाईमुळे, मिळणारा पैसा मध्यमवर्गीयांसाठी अत्यंत तुटपुंजा असतो, तद्वतच दोघांनाही नोकरीसाठी घराबाहेर पडणे गरजेचे असते. मुलांना चांगलं शिक्षण देणं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं, यासाठी कष्ट करावे लागणारच नां? प्रामाणिकपणे, काबाडकष्ट करून पैसे मिळवणं हे सध्याच्या काळात खूप-खूप कठीण आहे, ही बाजू सुद्धा नाकारता येणार नाही. कॉर्पोरेट सेक्टरची सवय आता लहान कंपन्या, नोकर्यां मध्येही अंतर्भूत होत असून वीक-एन्ड साठी बाहेर जाऊन चायनीज्-फुड, फास्ट-फुड खाण्याच्या सवयींचा आलेख मोठा होतोय. मुलांनाही याचं आकर्षण आहेच, मग काय? पटकन् बनवता येणारे नूडल्स सारखे पदार्थ लगेच तयार होतात. अधुनमधून हे खाणे ठीक, मात्र आठवड्यातले २-३ दिवसातून एकदा न घेणेच इष्ट, असा मोलाचा सल्ला येथे द्यावासा वाटतो. नावात जरी “फास्ट” असले तरी माणसाचे शरीर यामुळे “स्लो” होते, हे विसरू नका. शाळेत जाणार्या अनेक विद्यार्थ्यांची डोळेदुखी, पाठदुखी बाबत तक्रार असते. पुस्तकांचे आणि अभ्यासासह दप्तराचे ओझे बाळगावे लागते. याचबरोबर आजकाल ‘व्हायरल इन्फेक्शन’ हा विषय सर्वसाधारण झाला आहे. टीव्हीवरच्या जाहिराती आणि सतर्कता यामुळे दवाखान्यात न जाताच मुलांना औषध दिले जाते. लहान मुलाला सर्दी झाल्यास लगेच सर्दीचे औषध देणे, जास्त खेळू न देणे, मातीत-रेतीत खेळू न देणे यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल कशी? मुलांना थोडी सर्दीही होऊ द्यावी, अभ्यासाच्या वेळांचे नियोजन करून भरपूर खेळू द्या. प्रतिकारशक्ती नक्कीच वाढेल, याची खात्री वाटते. मुलांना लहान वयातच मधुमेह होण्याचे प्रमाणही वाढते आहे. हा भाग थोडा अनुवंशिकही आहेच मात्र यावर वेळीच औषधे, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करावे, शक्यतो आयुर्वेदिक उपचार केल्यास चांगले!
समाज प्रबोधन करणार्याे अनेक संस्था पुढे येत आहेत, रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर, शंकराचार्य असे अनेक महनीय योग आणि अध्यात्माची सांगड घालून समाजप्रबोधन कराताहेत. या महनीयांचे प्रबोधन टीव्हीवर देखील आपण पाहू शकतो, केवळ पाहू नये, त्याप्रमाणे शक्य असेल तितके आचरण सुद्धा करावे.
महाविद्यालयीन, पदवी, पदव्योत्तर शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी नोकरी, उद्योग-व्यवसायानिमित्त बाहेर पडतात. मुलीही यात मागे नाहीत, हे विशेष. नोकरी विषयी जाहिरातींवर कोणीही भाळून जाऊन लगेच निर्णय घेऊ नये. एखादी संस्था, व्यक्ती नोकरी लाऊन देण्यासाठी पैशाची मागणी करत असल्यास अशा व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेवू नये. पैसा कष्टाचा असतो. नोकरीनिमित्त महानगर, परदेशात गेलेल्या युवकांची फसवणूक झाल्याचेही वृत्त आपण वाचतोच... अनेक युवक पोटाच्या कोटासाठी परदेशात जातात, पण तिथेही त्यांची फसवणुक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. यामुळे Don’t become someone’s meal, when searching for food…म्हणजेच, नोकरीच्या, भोजनाच्या शोधार्थ जाताना आपण दुसऱ्याचे भोजन होणार नाही, याची काळजी घ्यावी...। आजकाल तर इंटरनेटमुळे पन्नास टक्के मुलांनी ई-मेल आयडी तरी तयार केलेला असावा. ईमेलद्वारे आलेल्या जाहिरातींवरही लगेच विश्वास ठेवू नये. आज-काल IT म्हणजेच इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (माहिती तंत्रज्ञान) क्षेत्राकडे खूप कल आहे. IT क्षेत्रात काम करणार्यांाना, वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर इ. बहुदा तासन् तास कॉम्प्यूटरवर काम करतात, डॉक्टरांची बैठक जास्तच होते. परिणामी कार्यालयीन कामकाजाचा ताण-तणाव निर्माण होऊन नसलेली डोकेदुखी आणि पोटाचे विकार जडतात. अनेक कर्मचार्यां ना तर एखादी Pain-Killer घेतल्याशिवाय डोकेदुखी बंद होत नाही. पण ही सवय चांगली नाहीच. ताण-तणाव कमी करणारी शिबिरे अटेन्ड केली पण फरक पडतच नाही, पुन्हा तसेच...हे कां होते? असा प्रश्न अनेक जण विचारतात. या प्रश्नावर खरोखर संशोधन व्हावे. यात बहुदा भोवतालचे वातावरण हा विषय कारणीभूत असावा असे वाटते. हृदयविकाराचे रुग्णही खूप उपाय-उपचार करतात. याबाबत, नियमित व्यायाम-सातत्य आवश्यक असून One of the major benefits of regular physical activity is a protection against Coronary Heart Disease. नियमित व्यायामाचा एक फायदा म्हणजे कोरोनरी हार्ट डिसीझ होत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
अति रुग्ण (पेशंट्स) मुळे स्वतःच्या प्रकृतीकडे बर्यातचदा डॉक्टरांना लक्ष देता येत नाही. मात्र भुसावळसारख्या शहरातल्या डॉक्टर मंडळींनी ही बाब गांभीर्याने घेऊन ‘केल्याने होत आहे रे’ ही उक्ती ध्यानात घेऊन, दर तीन-चार महिन्यातून एकदा मैलोगणती पदयात्रा आयोजित करून जनजागृती केली, दररोज सकाळी आपण म्हणतो तसे “मॉर्निंग वॉक” सुरू केले. नागरिकांचा याला मोठा प्रतिसाद मिळाला. स्वयंप्रेरणेने व्यायाम करणार्यां ची संख्याही कमी नाही. स्वतःस “फिट” ठेवल्यास कोणतेही कार्य, कामकाज सहज, सुखासुखी करता येऊन संबंधित क्षेत्रात आपण नावलौकिक निश्चितच प्राप्त करू शकू, आणि “हिट” होऊ हाच विश्वास!
शेवटी, इतकाच उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे-When you make a serious effort, you can achieve the extremely fast.