मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आता तरी भारतीयांना परत बोलवा...

ऑस्ट्रेलियात दिवसेंदिवस भारतीयांवर वांशिक हल्ले होण्याच्या प्रमाणात वाढ होतेच आहे. आणखी किती वाट पाहणार? केवळ चर्चा, सहानुभूती व्यक्त करणे आता बंद करावे. तेथील भारतीयांच्या सहनशक्तीचा आणखी अंत भारत सरकारने न पाहता, त्वरीत त्यांना भारतात परत बोलवावे. सर्व भारतीयांच्या सुरक्षिततेची हमी ऑस्ट्रेलियाने दिल्याशिवाय परत ऑस्ट्रेलियात पाठवू नये. 23 मे 2009 पर्यंत ऑस्ट्रेलियात 81 जणांवर हल्ला झाल्याची माहिती युपीए शासनाने राज्यसभेत दिली होती. 81 काय परंतु खरं तर एकही हल्ला होऊ नये, अशी खबरदारी घेणे महत्वाचे आहे. अनेक बाबतीत भारत आज अमेरिकेचा आदर्श घेऊन, अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेवतो, असे असताना या बाबतीत अद्याप हलगर्जीपणा का? विनाविलंब ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावास बंद करून पुढील कार्यवाही होणे गरजेचे आहे.

“फिट” ठेवा...“हिट” व्हा!

“We have moved from a state of nothing to everything! अर्थात- आम्ही काही नसल्याच्या अवस्थेतून सर्वकाही असल्याच्या अवस्थेत पोहोचलो आहोत.” हे वाक्य बरंच काही सांगून जातं! एक काळ होता, माणुस निरोगी, आरोग्यसंपन्न, बव्हंशी निर्व्यसनी, होता. आज याउलट चित्र दिसत असून, आरोग्यसंपन्न, खर्या अर्थाने निरोगी, निर्व्यसनी अशी, शंभरातली अगदी बोटावर मोजण्याइतकी माणसं असतील. तरूण वयातच अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले असून एक प्रकारे वृद्धत्व आल्यासारखे वाटते. मात्र, दुसरी बाजू सुद्धा पाहणे आवश्यक आहे, ती म्हणजे, विविध व्याधींवर मात करण्यासाठी स्वतःला “ फिट” ठेवणार्यां ची संख्याही कमी नाही. मला जेव्हा थोडफार समजू लागलं तेव्हाचे दिवस आठवतात, रस्त्यावर तुरळक गर्दी, पावसाळा आणि उन्हाळ्याचे काही दिवस सोडून दवाखान्यांमध्ये गर्दी जेमतेम असायची. आजकाल तर, अबब! लहान मुलांचा असो, की मोठ्यांचा, दातांचा असो की हाडांचा... कोणताही दवाखाना पाहा, पेशंट्सनी भरलेलाच. एवढं चागलं आहे, की डॉक्टरांच्या उपचारांनी लगेच बरं वाटत असल्याने डॉक्टर आणि पेशंट दोघेही खुष..। शेवटी ही सुद्धा एक सेवाच आहे नां, आणि सेवा ही एखाद्या व्रत...

REal Rose

पत्रकार दिनानिमित्त ...

समस्त पत्रकार बांधवांना "पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा... बुद्धिःयस्य बलं तस्य । ज्याच्याजवळ श्रेष्ठतेची बुद्धी आहे तोच खरा बलवान होय...। हे सुभाषित आपल्या पत्रकार बांधवांसाठी चपखल ठरते. या बुद्धिचा सदुपयोग करून स्व. बाळशास्त्री जांभेकरांचे स्वप्न साकार करू या...। इंटरनेटच्या युगात अजूनही विशेषतः तालुका-जिल्हा स्तरावरील पत्रकार बंधू-भगिनिंनी स्वतःला अपडेट करण्याची गरज मात्र वाटते. चला तर मग, घेऊनी हाती लेखणी, करू या उज्ज्वल क्रांती.. धरूनी हाती माऊस, साधू या ही उत्क्रांती... सुश्रुत