ब्लॉगपोस्ट वर "लेखणी" नव्यानेच प्रवेश करते आहे. नवीन लेखणी आपणां सर्वांसमोर आणताना आनंद होतोय. इंटरनेटच्या माध्यमातून आपणां पर्यंत पोहोचणे, ते सुद्धा गूगल च्या माध्यमातून, म्हणजे, सुवर्णयोगच की...। प्रिंट मीडिया चा 14 वर्षांचा अनुभव आणि अनेक वाचक, आपल्यासारख्या ज्येष्ठांनी शिकवून, शिकून एक तप गाठलं तेव्हा थोडंतरी शिकलो. अजूनही तत..पप. होतेच, हा भाग वेगळा! या ब्लॉगवरील लिखाण आपल्याला आवडेल हीच अपेक्षा, हो, आता तसा थेट पत्रकारितेचा संपर्क नसला, तरीही स्पर्श आहेच. पण वेळेअभावी बऱ्याचदा विषय थोडक्यात आटोपला आहे, असे वाटले तरीही आपण त्यामागील भावना लक्षात घ्यावी ही विनंती...।असो! लवकरच आपल्यासमोर लेखणी एक चांगला विषय सादर करेल...तोपर्यंत नमस्कार...
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.