मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नाताळ, नववर्षानिमित्त शुभेच्छा

" लेखणी " च्या समस्त वाचक, हितचिंतकांना नाताळ आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! लेखणी वर आपले प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि सदिच्छा असेच कायम राहो, हीच प्रार्थना...

पुन्हा एकदा नापाकांचे लक्ष्य: मुंबई

मुंबईत लष्कर ए तैय्यबा चे चार अतिरेकी शिरले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिल आहे. २६-११ ची घटना अजून शमत नाही तोच पुन्हा एकदा नापाक अतिरेक्यांचे लक्ष्य शांत आणि सर्वधर्मसमभावासाठी पवित्र मानल्या जाणार्‍या मुंबईकडे आहे. शहरातील गर्दीची ठिकाणे, स्थानके, विविध धार्मिक स्थळे आणि अतीसंवेदनशील भागांना अतिरेकी लक्ष्य करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. काही तासातच नाताळ सण सुरू होत असून लवकरच नवीन वर्षानिमित्त ठिकठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव याच्या उधाणाचा उत्साह पसरेल. या पार्श्वभूमीवर पोलिसांना व विशेष पथकास पाचारण करण्यात आले असून नागरिकांनी देखील सावधगिरी बाळगण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. २६-११ घटनेतील हाती लागलेला आरोपी कसाब हा पाकिस्तानचा नागरीक असल्याचे सबळ पुरावे देखील उपलब्ध झाल्याचे न्यायालयात सिद्ध करण्यात आले आहे. विविध क्लुप्त्यांनी कसाब स्वतःची सुटका न्यायालयातून करवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप संसदेवर हल्ला करणार्‍यांना फाशीची शिक्षा जाहीर करण्यात आलेली असली तरीही अंतिम निर्णयासाठी राष्ट्रपतिंकडे प्रकरण गेले असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. क

विठ्ठल महाराज यांच्या निधनामुळे प्रबोधनाचा वारसा खंडित

मुंबई, ता. २३- जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल महाराज चौधरी यांच्या निधनामुळे भक्तीच्या मार्गाने प्रबोधनाचा वारसा पुढे नेणार्‍या व्यक्तीमत्वाला आपण मुकलो आहोत. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. श्री. पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे, की वारकरी संप्रदायाच्या शिक्षण परंपरेचा पाया घालणार्‍या आणि देशाला नवनवीन प्रवचनकार व कीर्तनकार देणार्‍या गुरुवर्य जोग महाराजांच्या संस्थेचे अध्यक्षपद चौधरी यांनी भूषविले, हेच त्यांच्या आयुष्यातील महान कार्य व महान गौरव आहे. तुकाराम महाराजांच्या गाथेचे केलेले अत्यंत सखोल व भावगर्भ असे विवेचन हे जोग महाराज संस्थेचे वेगळे वैशिष्ट्य सांगता येईल. संस्थेच्या या वैशिष्ट्यात आणि लौकिकात मौलिक भर घालण्याचे कार्य चौधरी महाराज यांनी केले आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती पुन्हा वाढल्या

गेल्या आठवड्यात कांद्याने रडविल्यामुळे, काळ्या बाजाराचे व्यापारी हसले होते. कांद्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. कांद्याचे प्रकरण ताजे असतानाच काही भागातील बाजारपेठेत टोमॅटो देखील निकृष्ट दर्जाचे  दाखल होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यासह भुईमुगाच्या तेलासह, साबुदाणा, शेंगदाणा, खोबरे, तीळ आदी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. महागाईविरुद्ध शासनाशी संघर्ष करण्याची तयारी विरोधी पक्ष करीत आहेत.

क्षण आनंदाचा...

...तर रायगड जसाच्या तसा उभारू! -भुजबळ

मुंबई, ता. २२- केंद्र शासनाने रायगडच्या पुनरुज्जीवनाची आणि सुशोभीकरणाची परवानगी दिल्यास शिवकालीन रायगड जसाच्या तसा उभा करून दाखवू, असे मत राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. "केसरी गौरव सन्मान २०१० पुरस्कार" वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, राज्याला छत्रपती शिवरायांचा थोर ऐतिहासिक वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातले सुमारे साडेतीनशे गडकिल्ले त्याची थोरवी सांगतात. पर्यटनाच्या दृष्टीने हे खूप महत्वाचे आहे. छत्रपतींचा हा वारसा जपून ठेवण्यासाठी त्यांची डागडुजी व सुशोभीकरण आवश्यक आहे. परंतु यासंदर्भात पुरातत्त्व खात्याचे नियम कडक आहेत. पडझड झालेल्या या गडकिल्ल्यांना भेट देऊन आपण छत्रपतींच्या आस्तित्वानं पावन झालेली माती अभिमानाने कपाळावर लावतो, मात्र इथे भेट देणार्‍या परदेशी पर्यटकांच्या मनात ही भावना असणं शक्य नसतं. ती निर्माण होण्यासाठी किमान तशा कल्पना येण्यासाठी तरी काही वास्तू आपण उभ्या करायला हव्यात. यासाठी प्रयोगादाखल रायगडच्या पुनरुज्जीवनाचं आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यास परवानगी देण्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामार्फत आपण व

"सावित्रीचे सावित्रीपण" पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई येथे मंगळवारी (ता. २१) प्रकाश धुळे यांच्या "सावित्रीचे सावित्रीपण" या पुस्तकाचे प्रकाशन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री सचिन अहिर, श्री. धुळे, नंदकुमार वाघ आदी.

उपमुख्यमंत्र्यांकडून पहिलवान बुचडे यांचे अभिनंदन

मुंबई, ता. २२- पंजाब येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत मानाचा "रुस्तम-ए-हिंद" किताब पटकावून सुवर्ण अक्षरात नोंद करण्यासारखी कामगिरी बजावलेल्या पहिलवान अमोल बुचडे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. राज्याच्या क्रीडा क्षेत्रात अलिकडच्या काळात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. श्री. बुचडे यांनी ही कामगिरी बजावून महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. यामुळे राज्यात कुस्तीच्या प्रचार आणि प्रसारात मोलाची भर पडून नवोदितांना निश्चितच प्रोत्साहन मिळेल. या शब्दात श्री. पवार यांनी बुचडे यांचे अभिनंदन केले.

देशात पाचव्या पिढीची विमाने तयार होणार

भारत आणि रशियात नुकतेच विविध ३० करार झाले आहेत. यात प्रामुख्याने रशियाचे अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनीही रशियाच्या अर्थकारणाच्या दृष्टीनेच भर दिलेला दिसतो. दोन्ही देशांमध्ये येत्या दोन वर्षात सुखोई सारखीच लढाऊ विमानांची पाचवी पिढी तयार करण्याचा प्रस्ताव असून सन २०३० पर्यंत अशा प्रकारची सुमारे तीनशे विमाने तयार होतील. ही विमाने तिसर्‍या देशास दोन्ही देश मिळून विकणार आहेत. यापूर्वी अशाच प्रकारे ब्रह्मोस मिसाईल देखील तयार करण्यात आले आहे. यासह अणुभट्टी तंत्रज्ञान क्षेत्रातीस सहकार्याचा देखील महत्वपूर्ण करार करण्यात आला. भारतातील वैज्ञानिकांचे एक पथक लवकरच रशियात जाणार आहे. एक पथक यापूर्वीच रशियात दाखल झाले असून डिझाईन आणि संशोधन दोन्ही देशांच्या वैज्ञानिकांनी संयुक्तपणे सुरू केले देखील आहे.

सिडकोतर्फे गुणवंतांचा सत्कार संपन्न

मुंबई, ता. २२- नवी मुंबई येथील सिडको भवनमध्ये सिडकोतर्फे नुकताच नवी मुंबईतील गुणवंत विद्यार्थी, उत्कृष्ट शिक्षक व शाळांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील होते. यावेळी श्री. पाटील म्हणाले की, शिक्षण हा एक यज्ञ असून त्यात आपल्या श्रमाची आहुती टाकल्यानंतर त्यातून येणारी निष्पत्ती ही देशाचे भाग्य असते. गुणवंत विद्यार्थ्यांनी परदेशात जाऊन आपली कारकीर्द घडविण्यापेक्षा आपल्या देशाच्या महासत्तेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशातच आपले योगदान द्यावे. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या विचारवंतांनी सांगितल्याप्रमाणे दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध करणे हे कल्याणकारी राज्यांचे धोरण असावे. नोडल क्षेत्रासाठी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार नेरूळ येथील अपीजय स्कूलच्या चंद्रिका एरी, दिल्ली पब्लिक स्कूल, नेरूळच्या मोनिका शर्मा, खारघरच्या अपीजय स्कूलच्या कुसुम प्रजापती, ज्युडिथ जॉन यांना देण्यात आला. प्रकल्प क्षेत्रासाठी बेलापूर येथील विद्या प्रसारक हायस्कूलचे विश्वास ठाकूर, कोपरखैरणे येथील ज्ञान विकास संस्था हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या शोभा पाटील, ज्युनियर कॉलेजचे अशोक