मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय संघ घोषित

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सोमवारी (ता. २५) भारतीय संघाची (टीम इंडिया) घोषणा करण्यात आली. मात्र घोषित झालेल्या संघात युवराजसिंग याचा समावेश करण्यात आलेला नाही. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत हरभजन सिंगबरोबर प्रग्यान ओझा, अमित मिश्रा यांना समावेश करण्यात आला आहे. पहिला कसोटी सामना ४ नोव्हेंबरपासून अहमदाबाद येथे सुरु होईल. दुसरा १२ ते १६ नोव्हेंबर दरम्यान हैदराबाद येथे, तर तिसरा सामना २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान नागपूर येथे होईल. अशी आहे टीम इंडिया: महेंद्रसिंह धोनी (कर्णधार) सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, व्हिव्हिएस लक्ष्मण, राहुल द्रविड, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, मुरली विजय, हरभजन सिंग, झहीर खान, ईशांत शर्मा, एस श्रीसंत, चेतेश्वर पुजारा, प्रग्यान ओझा, अमित मिश्रा.

झाले इंदूरकर रसिक मंत्रमुग्ध: गीतरामायण

येथील लोकमान्य नगरमध्ये रविवारी (ता. २४) आयोजित गीत रामायण कार्यक्रमात श्रीधर फडके यांच्या गीतांनी इंदूरच्या रसिक-श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. स्व. सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे स्मरण यावेळी प्रत्येकाला झाले. श्री. श्रीधर फडके यांच्या प्रत्येक पदाला आणि गीताला रसिकांनी भरभरुन दाद दिली, विवेक घळसासी यांच्या निवेदनाने श्रोत्यांना खुर्च्यांना खिळवून ठेवले. गेले तीन दिवस घळसासी यांच्या सुरू असलेल्या रामकथेच्या प्रवचनाचा समारोप काल करण्यात आला. श्रीधर फडके यांनी सादर केलेल्या गीत रामायणाच्या सुरेल स्वरांचे श्रेय बाबूजी आणि ग.दि. माडगूळकर यांना असल्याचे सांगून आपण फक्त त्यांचे महान कार्य सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. गाताना शब्दांमागील भावनांसह स्पष्ट शब्दोच्चार करणे आणि भावगीत संगीतबध्द करताना शब्दांच्या वजनासकट त्यातला भाव, कवीची भूमिका रसिकांपर्यंत पोहोचवणे, तसेच या दोन्हींसह गाणे ‘जिवंत करणे’ या गोष्टींना आपल्या कारकीर्दीत त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिले. संगीतातली नवी वळणे आत्मसात करताना त्यांचा एक धागा परंपरेशी घट्ट जोडलेला होता, त्यामुळेच बाबुजी सुरांच्या गाभ्या

लवकरच वाचा: प्रेमा तुझा रंग कसा..

नवोदित कवी संजय सुर्यवंशी यांचा काव्यसंग्रह..प्रेमा तुझा रंग कसा।..विषयी एक कटाक्ष..

कथा ई-एज्युकेटेड चोराची...।

दिल्ली येथे राष्ट्रकुल स्पर्धेच्या संयोजन समिती मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या कार्यालयात कॉम्प्यूटरची रॅम (रँडम ऍक्सेस मेमरी) चोरल्यामुळे एका संशयित सफाई कर्मचार्‍याला ताब्यात घेण्यात आले. बिच्चारा! @ हा सफाई कर्मचारी देखील ई-एज्युकेटेड किंवा माहिती तंत्रज्ञान विषयात प्रवीण असावा, किंवा बेरोजगारीची कुर्‍हाड याच्यावरही कोसळली असावी. अनेकांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे, आपण हजारांचा भ्रष्टाचार केल्यास कुठे बिघडले? असे याला वाटले असावे आणि कार्यभाग साधला असावा. परंतु मांजर डोळे मिटुन दूध पिताना कोणी ना कोणी त्याला पाहतेच नां...। अगदी तेच केलंय क्लोज-सर्किट कॅमेर्‍यांच्या डोळ्यांनी...।

शाहीर आत्माराम पाटील यांना एक लाखांच्या मदतीची भुजबळ यांची घोषणा

शाहीर आत्माराम पाटील यांच्या औषधपाण्याचा आणि उपचाराचा खर्च भुजबळ फाऊंडेशनतर्फे केला जाईल. याचबरोबर त्यांना एक लाख रुपयांची मदत देखील दिली जाईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. मुंबई येथील डॉ. शिरोडकर स्मारक मंदिरात शाहीर आत्माराम पाटील यांच्या जीवनाची कहाणी सांगणार्‍या प्रभाकर ओव्होळ लिखित, "ऐका शाहिराची कथा" या पुस्तकाचे प्रकाशन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, माहिती आयुक्त विजय कुवळेकर, डॉ. रवी बापट, मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना भुजबळ यांनी, या पुस्तकाच्या हजार प्रती शासनाच्या वतीने घेतल्या जातील असे सांगून शाहीर पाटील यांना शुभेच्छा दिल्या. शाहीर आत्माराम पाटील म्हणाले की, आपले लेखन समाजासाठी असावे अशी सूचना साने गुरुजींनी केल्यानुसार आपण आजपर्यंत हेच पथ्य पाळत आलो आहोत. यावेळी श्री. कुवळेकर यांनी हा प्रकाशन सोहळा नसून कृतज्ञता समारंभ असल्याचे मत व्यक्त केले.

money makes all

इंटरनेटमुळे बहिण-भाऊ झाले मित्र...

इंटरनेटच्या माध्यमातून दिवसेंदिवस जग जवळ येत आहे. अगदी दिल्लीपासून गल्ली देखील जवळ आली आहे. देशांतर्गत, परदेशात स्थायिक झालेली कुटुंब सुद्धा याला अपवाद नाहीत. दूर राहून एकमेकांची सुखदुःख विचारणारे बहिण-भाऊ आता एकमेकांचे मित्र बनले आहेत. एक काळ होता..महिलांनी घराबाहेर जास्त जाऊ नये, सुधारणावादी महिलांना यामुळे सासरी अथवा काही प्रमाणात माहेरी देखील त्रास सहन करावा लागत होता. शिक्षण देखील मुलांनाच जास्त दिले जात होते, अशा पूर्वीच्या काळातल्या विविध गोष्टींचा उल्लेख आता करायची गरज वाटत नाही, त्या जगजाहीर आहेतच. परंतु आता काळ बदललाय, जग खूपच जवळ आलं आहे. घरी बसून केवळ स्वयंपाक करणार्‍या महिलांचे हात आता विविध क्षेत्रात आपले करियर करताहेत. आज भारतासारख्या भावी महासत्ता म्हणून पाहिल्या जाणार्‍या देशाची धुरा देखील एक महिलाच सांभाळते आहे. शिक्षण-प्रशिक्षण आणि चालना यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांचा विकास झाला असून या यशामागे पुरुषांबरोबर महिलांचाही मोठा वाटा आहे. अनेक देश आता सैन्यातही महिलांच्या पथकांचा समावेश करण्यास धजावले आहेत. लोहमार्गावर रेल्वे चालकापासून वैमानिकाची जबाबदारी सक्षमपणे सांभा

काश्मिर प्रश्नाचा एकदाच सोक्षमोक्ष लावावा

वर्षानुवर्ष धुमसत असलेल्या काश्मिर प्रश्नाचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा, अशी देशातल्या नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे. अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या अयोध्या राम-मंदिर बाबरी मशिद यासारख्या संवेदनशील विषयावर न्यायालयाने तोडगा काढून निर्णय दिल्यानंतर ही मागणी जोर धरत आहे.

butterfly...