नवी मुंबई, ता. १६- सिडकोतर्फे सीबीडी, बेलापूर येथील सिडको अर्बन हाटमध्ये १६ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान २४ दिवसीय वसंत मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वसंत मेळ्यात राज्यासह इतर अनेक राज्यातील कलावंत सहभागी होतील. दर्जेदार हस्तकला आणि हातमागांवरील उत्पादनांच्या प्रदर्शनाच्या आस्वाद व खरेदीचा लाभ रसिकांना घेता येईल. मेळ्याचे हे तिसरे वर्ष असून यंदा मेळ्यात मध्यप्रदेश, ओरिसा, आंध्रप्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान चंदिगड या राज्यातील ज्यूट, रेशीम, कॉटनसारख्या वैशिष्ट्यपूर्ण कला उत्पादने उपलब्ध असतील. याचबरोबर लाकडी खेळणी, टेराकोटाची उत्पादने, बांबूचे फर्निचर व गृहसजावटीच्या वस्तू, चित्रकला, आयुर्वेदिक, फ्लोरिकल्चर, चामड्याची विविध उत्पादने या मेळ्यातील आकर्षणे असतील. तसेच वसंत मेळ्यात विविध भाषांमधील दर्जेदार साहित्य देखील उपलब्ध असून यात नामवंत प्रकाशने व लेखकांच्या पुस्तकांचा समावेश आहे. वसंत मेळ्याला भेट देणार्या रसिकांना अॅम्फिथिएटरमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटता येईल, तसेच फुडकोर्टमध्ये कोकणी-मालवणी-कोल्हापुरी खाद्यपदार्थांबरोबरच र...