मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सिडको लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मृणाल गोरे यांना सिडको तर्फे श्रद्धांजली

मुंबई, ता. २० - राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून मृणालताई गोरे यांनी आपल्या सामाजिक लढ्याचा प्रवास सुरू केला तेव्हापासून गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्या सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन लढत होत्या. त्यांच्या निधनाने राज्याने एक तेजस्वी, झुंजार नेतृत्व गमावले आहे. या शब्दात सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी श्रीमती मृणालताई गोरे यांना श्रद्धांजली अपर्ण केली. ते पुढे म्हणाले, की पाण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर पाणीवाली बाई म्हणून ओळखल्या जाणार्‍या मृणालताई यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली, प्रसंगी तुरुंगवासही भोगला. स्वा. अहिल्या रांगणेकर यांच्यासोबत त्यांनी महिला आणि पीडितांच्या सेवेत स्वतःस झोकून दिले. नागरी प्रश्न, महिलांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न, भटक्या विमुक्तांचे, झोपडपट्टीवासीयांचे प्रश्न अथवा महागाईविरोधी लढा असो, मृणालताईंनी सर्वसामान्यांची साथ कधीही सोडली नाही. त्यांनी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेली पहिली महिला लोकप्रतिनिधी बनण्याचा विक्रम करून दाखविला. मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविकेपासून खासदार पदापर्यंत त्यांचा स

कल्याण परिसरातील गुणवंतांचा आज सत्कार

मुंबई, ता. १० - प्रियजन गुणगौरव समिती आणि प्रियजन महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १० जून) सायंकाळी चार वाजता कल्याण परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. कल्याण येथील मराठा ज्ञाती समाज शिक्षण मंडळ, मराठा मंदिर कार्यालय अत्रे नाट्यगृहासमोर, शंकरराव झुंजारराव चौक येथे आयोजित या कार्यक्रमात सिने-नाट्य आणि दूरचित्रवाणी तारका मृणाल कुलकर्णी प्रमुख पाहुण्या तर सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव अध्यक्षस्थानी असतील. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या-पुस्तकांचे वितरण दरवर्षी करण्यात येते. मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन प्रियजन महिला बचत गटाच्या अध्यक्षा ज्योती हिंदुराव यांनी केले आहे.

सिडको प्रदर्शन संकुलाचे विकासकार्य प्रगतीपथावर

मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भविष्यात येथे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे सहाय्यभूत व्यवसायांना चालना आणि रोजगार निर्मिती होऊन शहराच्या लौकिकात भर पडेल असे मत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी व्यक्त केले. येथील प्रदर्शन संकुल, पामबिच मार्गाच्या विस्तारातत समाविष्ट उड्डाण पूल आणि आंतरराष्ट्रीय राजदूतावास प्रकल्पांच्या विकास कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी मुख्य अभियंता केशव वरखेडकर, प्रकल्पांवर नियुक्त स्थापत्य, विद्युत, वास्तुशास्त्र विभागातील अभियंते व अधिकारी, वास्तुतज्ज्ञ सल्लागार, कंत्राटदार, यासह काही कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. प्रदर्शन संकुलाचा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून येथील सर्व स्थापत्य, विद्युत, वातानुकूलन, अंतर्गत सजावट या कामांच्या विकास प्रक्रियांमध्ये समाविष्ट सर्व साहित्य उत्तम प्रतीचे असावे, यात कोणतीही तडजोड करण्यात येऊ नये, मूळ काम उच्च दर्जाचे झाल्यास देखभाल दुरुस्तीवरील खर्च आटोक्यात ठेवता येऊ शकेल आणि चांगला दर्जा राखून नवीन

सिडकोचे शुक्रवारी (ता. 6) होणारे पारितोषिक वितरण पुढे ढकलले

मुंबई, ता. 5 - सिडकोतर्फे उद्या पनवेल नवी मुंबई येथे होणारे विविध गुणवत्ता यादीतील इ. दहावी, बारावी, सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण पुढे ढकलण्यात आले आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सिडकोतर्फे अनंतसिंग राजपूत यांनी कळविले आहे.

राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांची सिडकोस भेट

मुंबई, ता. ३ - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षमतावृद्धीसाठी तसेच विविध नियोजन संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सामायिक बाबी सोडविण्याच्या अनुषंगाने संबंधित संलग्न विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी नुकतीच विभाग प्रमुखांशी चर्चा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळ्यांवरील प्रलंबित प्रकरणे तसेच या संस्थांच्या कार्यक्षमतेच्या वृद्धीसंदर्भात उपाय योजना किंवा सूचना सादर करण्याच्या अनुषंगाने सिडकोच्या अनुभवी तज्ज्ञजनांमार्फत प्रस्ताव-निवेदन सादर करण्यात यावे, त्यानुसार उपाययोजना करणे शक्य होईल असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोला नवी मुंबई शेजारील क्षेत्रासाठी नियुक्त करण्यात येण्याची अपेक्षा व्यक्त केली. महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी मायनर मिनरल ऍक्टमधून सूट मिळावी, विशेष अनुदान मिळावे किंवा कर सवलत मिळावी याबाबत माहितीही त्यांनी दिली. बैठकीस विविध विभाग प्रमुख, जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई येथे १० मे स सिडकोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम

मुंबई, ता. ९ - सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२० जयंती कार्यक्रम होईल. सिडको एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस मिलिंद बागूल अध्यक्षस्थानी व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असतील. मंगळवारी (ता. १० मे) सिडको सभागृह, सिडको भवन, सातवा मजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सहाय्यक व्यवस्थापक अनिता पगारे, सिडको अध्यक्ष नकुल पाटील, व्यवस्थापकीय संचालक सिडको तानाजी सत्रे, विधान परिषद सदस्य व संचालक-सिडको सुभाष भोईर, संचालक सिडको नामदेव भगत, सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निलेश तांडेल उपस्थित राहतील, असे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अनंतसिंग राजपूत यांनी कळविले आहे.

नवी मुंबई येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी

मुंबई, ता. 28 - येत्या एक मे स महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर नवी मुंबई येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षस्थानी असतील. नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पातील ११.१० किमी लांबीच्या व ११ स्थानकांचा समावेश असलेल्या "बेलापुर ते पेंढार" मार्गिका क्रमांक एक चे भूमिपूजन यावेळी करण्यात येणार आहे. सेंट्रल पार्क मेट्रो रेल्वेस्थानक (नियोजित) सेक्टर - २४, खारघर, नवी मुंबई येथे रविवारी (ता. १) संध्याकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असून यावेळी, जलसंपदामंत्री व रायगडचे पालकमंत्री सुनिल तटकरे, राज्य उत्पादन शुल्क व ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, सिडको अध्यक्ष नकुल पाटील, नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्यासह खासदार गजानन बाबर, संजीव नाईक,  आमदार व सिडको चे संचालक सुभाष भोईर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विवेक पाटील, संदीप नाईक, आदी म

संकटांना घाबरू नका, त्यावर मात करायला शिका: सिंधुताई सपकाळ

अंधार झाल्याशिवाय पहाट उगवतच नसते म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात एक अंधार येत असतो, एक रात्र येते अंधारी त्याचं नाव संकट असतं, पण आता बायानो तुम्हाला सांगते, जर तुमच्यावर संकट कोसळलं तर त्यावर पाय देऊन उभं राहिला शिका. संकटाची उंची तुमच्यापेक्षाही कमी होईल म्हणून संकटाला घाबरू नका, मरू नका, डरू नसा त्यावर स्वार व्हायला शिका आणि संकट त्याच्यावरच येतात जो सहन करू शकतो. असे मनोगत सिंधुताई सपकाळ यांनी सिडको भवनमध्ये आयोजित, शंभराव्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, समारंभात व्यक्त केले. सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील अध्यक्षस्थानी होते. सिंधुताई सपकाळ यांनी श्रोत्यांना हासू व आसू यांच्या हिंदोळ्यावर सर्वांना खिळवून ठेवत, स्त्री हीच सर्वांना सावरणारा स्तंभ असतो हे स्पष्ट करून स्त्रीची तुलना सायकलच्या मागच्या चाकाशी केली. कारण पुढचं चाक स्त्री-पुरुषाच्या हाती देते. कारण मागच्या चाकावर पूर्ण प्रवास अवलंबून असतो हे ती जाणते. कुटुंबाच्या जबाबदार्‍या सांगताना त्यात सायकलला गती देणारी चेन, ओझे सावरणारी कॅरियर, प्रकाश दाखविणारा डायनामो तसेच आधार देणारे स्टँड अशा अनंत पातळ्यांवरच्या जबाबदार्‍या साय

विमानतळ प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के भूखंडांच्या वाटपाकरिता सिडकोची विशेष मोहिम

मुंबई, ता. ६- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या अंतर्गत येणार्‍या गावातील प्रकल्पग्रस्तांच्या संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात द्यावयाच्या साडेबारा टक्के योजनेचे भूखंड वाटपाकरिता भूमी व भूमापन विभागातर्फे विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. २२ डिसेंबरला प्रकल्प बाधीत कृती समितीच्या बैठकीत ही विशेष मोहिम प्राधान्याने राबवून वाटपाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याबाबतचा निर्णय व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी जाहीर केला होता. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रात येणार्‍या कोंबडभुजे, तरघर, उलवे, गणेशपुरी, वाघीवली वाडा, ओवळे (मुळगाव) कोली, कोपर, चिंचपाडा आणि वाघीवली या दहा गावांमधील पूर्वी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात १२.५ टक्के भूखंड वाटप केलेले नाही अशा प्रकल्पग्रस्तांसाठी या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी तीन स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून त्यात तीन सहाय्यक भूमी व भूमापन अधिकारी आणि १० कर्मचार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. बैठकीनंतर सुरू केलेल्या कार्यवाहीत आतापर्यंत १०० प्रकरणांची प्रक्रिया सुरू केली असून ३० प्रकरणात वाटपपत्रेही देण

केंद्रीय माहितीचा अधिकार : जनतेला सिडको प्रशासनातर्फे आवाहन

सिडको महामंडळातील विविध विभागांकडे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्जदारांकडून अर्ज प्राप्त होत असतात. परंतु काही अर्जदार आपल्या अर्जावर वा अपिलांवर फक्त माहिती अधिकारी एवढेच नमूद करून, संबंधित अधिकार्‍याचा हुद्दा अथवा विभागाचे नाव नमूद न करता अर्ज सादर करीत असतात. यामुळे संबंधित विभागाकडून विहीत कालावधीत अपेक्षित असलेली माहिती ही एकापेक्षा अधिक विभागांशी संबंधित असल्याने संकलन करण्यास अधिक कालावधी लागतो. यामुळे संबंधित विभागाकडून विहित कालावधीलत माहिती उपलब्ध करून देण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाच्या निर्दर्शनास आले आहे. उपरोक्त बाब लक्षात घेऊन, सिडको प्रशासनाच्या वतीने माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत सादर करायचे अर्ज/अपील- महाव्यवस्थापक (प्रशासन) सिडको भवन, तळमजला, यांच्या कार्यालयात स्वीकारले जातील. जनतेच्या सुविधेकरता ही तरतूद येत असून जनतेने कृपया याची नोंद घ्यावी, असे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे. सहाय्यक जनमाहिती अधिकारी जनमाहिती अधिकारी, आणि अपीलिय माहिती अधिकार्‍यांची सुधारित यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबतचा विस्तृत फलक सिडको भवनाच्य