मुंबई, ता. १९ : सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत, त्याचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. यासाठी सिडको, म्हाडा यासारख्या संस्था पारदर्शकपणे काम करत आहेत. आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पवित्र दिनी २१,३९९ सदनिकांच्या महासोडतीच्या माध्यमातून एकूण १९,५१८ नागरिकांचे सिडकोचे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ या योजनेद्वारे हे स्वप्न पूर्ण होत असल्याने हक्काची घरे मिळालेले सर्वजण भाग्यशाली असून त्यांच्या अभिनंदनाची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केली. एका क्लिकवर मा. उपमुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते १९,५१८ अर्जदारांचे हक्काच्या घराचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ या लॉटरीची ऑनलाईन सोडत काढण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी श्री. विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, डॉ. राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. गण...