ख्रिसमस - नाताळ सणानिमित्त वाशी येथील डिझायर सोसायटी मधील एड्स ग्रस्त मुलांना जयश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव जाधव यांच्या तर्फे विविध जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप व नम्रता मधगायकर यांच्या तर्फे ब्लँकेट वाटप तसेच नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशन आणि शाईन कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून एक महिने मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे, सदर कार्यक्रमासाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष मनोज महाराणा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते . सदर ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करून एक सक्षम नागरिक बनण्यासाठी प्रोत्साहन पर मोलाचे मार्गदर्शन महाराणा यांनी उपस्थित मुलांना तसेच आयोजकांना केले.
सदर कार्यक्रमादरम्यान जयश्री फाऊंडेशनचे प्रथमेश मडकईकर, नीरज बोडके, आशिष सावंत, प्रियांका जाधव, अतिश खोत, प्रथम पाटील, साहिल कलांतरे, हर्ष तांडेल,श्रावणी माने आणि साक्षी गुंजाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचे सचिव अक्षय डिगे, संस्थेचे सरचिटणीस राहुल साबळे, विद्यार्थी प्रमुख सुयेश मूढे , सरचिटणीस मुकुल इंगळे,अनिल शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते.