मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोरोना...! आणखी खबरदारी

सुमारे चार महिन्यांपासून कोरोना विषाणूमुळे सगळे त्रस्त झाले आहेत. भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडला. देशात सतत लॉकडाउन करूनही अनेक नागरिकांना अजून याचे फारसे गांभीर्य नसल्याचे चित्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या आलेखावरून स्पष्ट होते. शासन, पोलिस, प्रशासन, प्रिंट-इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांनीही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, फैलाव होवू नये यासाठी आपपल्या परीने शक्य तेवढी काळजी घेतली प्रयत्न केले. परंतु अद्याप देशातील एकही राज्य कोरोनामुक्त झालेले नसून शासनाने अनलॉक करून शिथीलता देऊन अर्थव्यवस्थेस गती देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र अजून सुद्धा काळजी करण्यासारखीच परिस्थिती आहे. सर्वत्र व्यवहार पूर्ववत होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे तर सूज्ञ नागरीक कोरोनापासून बचाव कसा व्हावा, आपल्याला कोरोनाची लागण होवू नये यासाठी शक्य तेवढी काळजी घेत आहेत. परंतु कोरोनाकडे दुर्लक्ष करणारे लोकही कमी नाहीत, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पोलिस कर्मचारी, शासकिय कर्मचारी, डॉक्टर, मीडियाकर्मी आदी महत्त्वाच्या घटकांना देखील त्यांनी शक्य तितकी काळजी घेऊनही कोरोनाची बाधा झाली आहे. कोर...