मुख्य सामग्रीवर वगळा

कोरोना...! आणखी खबरदारी

सुमारे चार महिन्यांपासून कोरोना विषाणूमुळे सगळे त्रस्त झाले आहेत. भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडला. देशात सतत लॉकडाउन करूनही अनेक नागरिकांना अजून याचे फारसे गांभीर्य नसल्याचे चित्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या आलेखावरून स्पष्ट होते. शासन, पोलिस, प्रशासन, प्रिंट-इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांनीही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, फैलाव होवू नये यासाठी आपपल्या परीने शक्य तेवढी काळजी घेतली प्रयत्न केले. परंतु अद्याप देशातील एकही राज्य कोरोनामुक्त झालेले नसून शासनाने अनलॉक करून शिथीलता देऊन अर्थव्यवस्थेस गती देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र अजून सुद्धा काळजी करण्यासारखीच परिस्थिती आहे.
सर्वत्र व्यवहार पूर्ववत होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे तर सूज्ञ नागरीक कोरोनापासून बचाव कसा व्हावा, आपल्याला कोरोनाची लागण होवू नये यासाठी शक्य तेवढी काळजी घेत आहेत. परंतु कोरोनाकडे दुर्लक्ष करणारे लोकही कमी नाहीत, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पोलिस कर्मचारी, शासकिय कर्मचारी, डॉक्टर, मीडियाकर्मी आदी महत्त्वाच्या घटकांना देखील त्यांनी शक्य तितकी काळजी घेऊनही कोरोनाची बाधा झाली आहे.
कोरोना प्रतिबंधक लस अद्याप तयार झालेली नाही, आणि लस तयार झाली तरीही नेहेमी औषधे, लस घेऊन चालणार नाही. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचे मत तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले आहे. यासाठी दररोज सकाळी किमान अर्धा तास तरी स्वतःच्या आरोग्यासाठी देणे आवश्यक आहे. योगासने, प्राणायाम यासारखे दुसरे माध्यम सध्यातरी नसावे. योगासने करू न शकणाऱ्या लोकांनी अगदी आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, तोंडाला मास्क व्यवस्थित लावावा, नाकाखाली मास्क जाणार नाही याची काळजी घ्यावी.

लिफ्ट वापर...
शक्य असल्यास लिफ्टचा वापर न करता जिन्याने ये-जा करावी. जिन्याच्या रेलिंगला स्पर्श करू नये. लिफ्ट वापरणे अगदी आवश्यक असेल तर हातात ग्लोज घाला किंवा कागदाने लिफ्टच्या बटणास, दरवाज्यास, हँडलला स्पर्श करावा, लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर लिफ्टसाठी वापरलेले ग्लोज, कागद कचऱ्याच्या डब्यात टाकावे किंवा डिस्पोज ऑफ करावे म्हणजे जास्त चांगले.

घर...
घरात प्रवेशद्वाराजवळच सॅनिटायझर ठेवून बाहेरुन आल्यानंतर याचा वापर करावा किंवा सोबत सॅनिटायझरची छोटी बाटली (स्टँडर्ड सॅनिटायझर तज्ञांच्या सल्ल्याने घ्यावे) खिशात ठेवावी, गरज असेल तेव्हा सॅनिटायझरने हात स्वच्छ करावा. बराच वेळ बाहेर असल्यास, भरपूर गर्दी असलेल्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी गेल्यास साबणाने घरी परतल्यानंतर स्वच्छ आंघोळ करावी. शक्य झाल्यास आपले स्वतःचे कपडे आपणच धुवून काढावे.

बाहेरील व्यक्ती...
अत्यावश्यक कामासाठी घरी प्लंबर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, वॉशिंग मशीन, फॅन आदी दुरुस्ती करणारी व्यक्ती आल्यास सर्वप्रथम त्यास आपल्यासमोर हातास सॅनिटायझर लावण्यास सांगावे, त्याच्या कामाशिवाय शक्यतो अन्य वस्तूंना हात लावू देऊ नये, आपण देखील त्याच्यापासून शक्य तेवढे दूर थांबावे.

रोग-प्रतिकारक शक्ती वाढवणे हितावह...
कोणताही रोग, विकार, आजार असो... तुमच्या प्रतिकारशक्तीवर बरेच काही अवलंबून असते. प्रतिकारशक्ती उत्तम असल्यास कोरोनासारखा महाभयंकर असा विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. प्रयत्न करणे आपल्या हातात असल्यामुळे, दररोज किमान अर्धा तास तरी योगासनांच्या मार्गदर्शकांच्या सल्ल्याने योगासने करावी.
काढा- पाण्यात (व्यक्तीपरत्वे प्रमाण ठरवून) तुळस, 4-5 काळी मिरी/मिरपूड, सुंठ, मनुका, गवतीचहा, हळद, गूळ, चिमुटभर दालचिनी इ. रकमा टाकून सर्व जवळपास निम्मे उकळवून (तज्ज्ञांचा सल्ला घेऊन) काढा घ्यावा...काढा तयार झाल्यानंतर थोडे दूध घातले तरीही चालेल. चहाऐवजी काढाच घेतला तरीही अपाय नाही. (हा काढा कोरोनासाठी नाही, मात्र याचे सेवन नियमित केल्यास प्रतिकारशक्ती वाढू शकते)

कोरोनाच्या प्रादुर्भावाने काहीगोष्टी मात्र विचारनीय ठरल्या आहेत, त्यांचा अभ्यास केला जाऊन त्यादृष्टीने दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पावसाळा म्हटला की सर्दी, पडसे, डोकेदुखी, ताप, अंगदुखी, डोळ्यांना खाज सुटणे, खोकला या गोष्टी आल्याच...! हे विकार झाल्यास शासनाची, वैद्यकीय तज्ज्ञांची काय भूमिका असेल, अशा रुग्णांना कसे ट्रीट केले जाईल याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.

राहुल गांधी यांची मुंबई भेट...

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवार दिनांक 1 मार्च 2013 रोजी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मुंबई शहरातील लोकप्रतिनिधी आणि काही निमंत्रितांशी चर्चा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. जयपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा करण्याची घोषणा केली होती. पक्षातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीशी चर्चा केली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. सकाळी 9 च्या सुमारास राहुल गांधी यांचे मुंबईत आगमन झाले. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्यांनी राहुलजी गांधी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी थेट टिळक भवनला दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम दिवंगत नेते स्व...