मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नवी मुंबई आणि नैना क्षेत्रातील उंचीबाबत वैध ना हरकत प्रमाणपत्र असणाऱ्या बांधकामांना मिळणार परवानगी

सिडको महामंडळाकडून नवी मुंबईमध्ये विकसित करण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) येथील ज्या बांधकाम प्रकल्पांना भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून उंचीबाबतचे वैध ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे, अशा बांधकामांना परवानगी देण्यात येणार आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रात नमूद अनुज्ञेय उंचीपर्यंतची बांधकामे विकासकांना करता येणार आहेत. ज्या विकासकांकडे बांधकाम उंचीबाबतची वैध प्रमाणपत्रे आहेत त्यांना लवकरच सिडकोकडून बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आणि भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई आणि नैना क्षेत्रांतील बांधकाम प्रकल्पांसमोरचा अडथळा दूर होऊन या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, संबंधित विकासक व नागरिक यांनाही या निर्णयामुळे निश्चितच दिलासा मिळणार आहे. डॉ. संजय मुखर्जी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको सिडकोकडून नवी मुंबईच्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात 1160 हेक्टरवर आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारण्यात येत आहे. सदर विमानतळामुळे नजीकच्य
अलीकडील पोस्ट

सिडको मेट्रो मार्ग क्र. 1अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; लवकरच करारनामा

सिडको महामंडळाकडून विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 च्या परिचालन आणि देखभाल (ऑपरेशन ॲन्ड मेन्टेनन्स) सेवांकरिता, सिडकोकडून नुकतेच महामेट्रोला स्वीकारपत्र (एलओए) देण्यात आले आहे. मार्ग क्र. १ अंमलबजावणीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.  दरम्यान, या संदर्भात लवकरच सिडको आणि महामेट्रो यांच्यात करारनामा करण्यात येणार आहे. “नवी मुंबईतील मेट्रो प्रकल्पाची नवी मुंबईकरांना अनेक वर्षे प्रतीक्षा आहे. लवकरात लवकर हा मेट्रो प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून प्रकल्पासमोरील सर्व अडथळे आम्ही दूर केले आहेत. महामेट्रोने नागपूर मेट्रो विक्रमी वेळेत पूर्ण करून दर्जेदार प्रकल्प उभा केला. पुणे मेट्रोचे काम देखील महा मेट्रो वेगाने करत आहे. त्यामुळे त्यांची आजवरची कामगिरी बघता नवी मुंबई मेट्रो देखील लवकरात लवकर कार्यान्वित करून प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल, असा मला विश्वास आहे.” - एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री, महाराष्ट्र मेट्रो मार्ग क्र. 1 च्या अभियांत्रिकी सहाय्यासाठी महामेट्रोची नियुक्ती करण्यात आल्यानंतर, या मार्गावर परिचालन आणि देखभाल सेवा पु

कोविड योद्ध्यांचा पुरस्काराने गौरव

  कामोठे: कोविड काळात अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. पनवेल महापालिका क्षेत्र आणि संपूर्ण तालुक्याचा विचार करता राज्य शासन ठामपणे आपल्या मागे उभे राहिले. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी हात आखडता न घेता आर्थिक निधी पुरविला, अशी स्पष्टोक्ती कोकण शिक्षण मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील यांनी दिली. कोकण शिक्षक मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३५ कोविड योद्ध्यांना कोविड देवदूत पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, वाढदिवस हे निमित्त आहे. सर्व कार्यक्रम रद्द करून केवळ कोविड देवदूतांचा सत्कार करण्यासाठी, त्यांच्या कामाची कदर करून शाबासकीची थाप देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कोविड काळात सरकारी आणि काही सेवाभावी खासगी डॉक्टर, समाजसेवक दिवस-रात्र राबले, परंतु कुणाचाही मोबाईल बंद नव्हता ही वाखाणण्याजोगी बाब नोंद करावीच लागेल. सर्वांचीच फार ओढाताण होत असताना, रुग्णांना दिलासा देणे, त्यांची व्यवस्था करणे अवघड असतानाही त्यात आपण सारे यशस्वी झालो, याचा अभिमान वाटत असल्याचे आ. पाटील य

एड्सग्रस्त मुलांना जयश्री फाऊंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

ख्रिसमस - नाताळ सणानिमित्त वाशी येथील डिझायर सोसायटी मधील एड्स ग्रस्त मुलांना जयश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव जाधव यांच्या तर्फे विविध जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप व नम्रता मधगायकर यांच्या तर्फे  ब्लँकेट वाटप तसेच नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशन आणि शाईन कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून एक महिने मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे, सदर कार्यक्रमासाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष मनोज महाराणा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते . सदर ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करून एक सक्षम नागरिक बनण्यासाठी प्रोत्साहन पर मोलाचे मार्गदर्शन महाराणा यांनी उपस्थित मुलांना तसेच आयोजकांना केले. सदर कार्यक्रमादरम्यान जयश्री फाऊंडेशनचे प्रथमेश मडकईकर, नीरज बोडके, आशिष सावंत, प्रियांका जाधव, अतिश खोत, प्रथम पाटील, साहिल कलांतरे, हर्ष तांडेल,श्रावणी माने आणि साक्षी गुंजाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचे सचिव अक्षय डिगे, संस्थेचे सरचिटणीस  राहुल साबळे, विद्यार्थी प्रमुख सुयेश मूढे , सरचिटणीस

कोरोना...! आणखी खबरदारी

सुमारे चार महिन्यांपासून कोरोना विषाणूमुळे सगळे त्रस्त झाले आहेत. भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडला. देशात सतत लॉकडाउन करूनही अनेक नागरिकांना अजून याचे फारसे गांभीर्य नसल्याचे चित्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या आलेखावरून स्पष्ट होते. शासन, पोलिस, प्रशासन, प्रिंट-इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांनीही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, फैलाव होवू नये यासाठी आपपल्या परीने शक्य तेवढी काळजी घेतली प्रयत्न केले. परंतु अद्याप देशातील एकही राज्य कोरोनामुक्त झालेले नसून शासनाने अनलॉक करून शिथीलता देऊन अर्थव्यवस्थेस गती देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र अजून सुद्धा काळजी करण्यासारखीच परिस्थिती आहे. सर्वत्र व्यवहार पूर्ववत होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे तर सूज्ञ नागरीक कोरोनापासून बचाव कसा व्हावा, आपल्याला कोरोनाची लागण होवू नये यासाठी शक्य तेवढी काळजी घेत आहेत. परंतु कोरोनाकडे दुर्लक्ष करणारे लोकही कमी नाहीत, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पोलिस कर्मचारी, शासकिय कर्मचारी, डॉक्टर, मीडियाकर्मी आदी महत्त्वाच्या घटकांना देखील त्यांनी शक्य तितकी काळजी घेऊनही कोरोनाची बाधा झाली आहे. कोर

Yoga Day

  Always compare ownself where I *am...* Do ur best and achieve the target n ur *aim...* It'll make ur future bright n shine ur *name...* Remember one thing that everyday is not *same...*

कोरोना: घ्यावयाची खबरदारी

सध्या संपूर्ण जगातच कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे. भारतात तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आणि संशयितांची संख्या वाढतच आहे. सध्याचा काळ हा महत्त्वाचा मानला जात आहे. सुमारे तीन महिन्यांपासून यावर उपाययोजना सुरू असून अद्याप कोरोनाबाबत कोणतीही लस सापडली असल्याचे अधिकृत वृत्त नाही. काही देशांनी लस सापडल्याचा दावा मात्र केला आहे. येत्या 17 मे स लॉकडाऊन संपण्याबद्दल काय घोषणा होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शासनाने शेतकरी, मजूरवर्ग, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटक, संस्थांसाठी लॉकडाऊन अटी शिथील केल्या असल्या, तरीही पूर्णपणे मोकळीक मात्र दिलेली नाही, यावरून अद्यापही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक आहे. काही ठिकाणी पोलिस आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याच्या बातम्या देखील कानावर येत आहेत. तथापि अत्यंत महत्वाच्या कामासाठी बाहेर जाणाऱ्या अनेकांना पोलिसांचा प्रसाद खाऊन परत यावे लागत असल्याचा आरोपही केला जात आहे. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम...काम करणारी मंडळीही कंटाळली आहे. लॉकडाऊन केव्हा ना केव्हा काढून घेतले जाईल हे तर निश्चित आहेच. परंतु लॉकडाऊननंतर काय घडामोडी घडतील, काय

जिंदगी...

मै तो बस, मैं हूँ , जहाँ चाहे जाता हूँ , अपनी जिंदगी जीता हूँ... जीते जीते सोचता हूँ  है कितने दिन है और जीना... तुम मनुष्य तो मनुष्य हो  लेकिन तुम्हें चाहिये , हर किसीका सर खाना  और तकलीफ देके  उनका बहूत खून पीना... अरे निकम्मों, जरा बहाओ पसीना , लाओ चार पैसे घर में... फिर समझ में आएगी , कैसी होती है जिंदगी , कैसा होता है वो जीना...

नवी मुंबई गृहनिर्माण संस्थांनी कोविड १९ साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान द्यावे- सिडको

जगभर सर्वत्र थैमान घालणाऱ्या कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूचा सामना करायला महाराष्ट्र शासनास मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपले योगदान देण्याचे आवाहन सहनिबंधक, सहकारी संस्था, सिडको यांच्यातर्फे त्यांच्या नवी मुंबईतील अधिकारक्षेत्रातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना करण्यात आले आहे. कोविड-१९ विषाणूमुळे उद्भवलेल्या पॅनडेमिकचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे औषधे व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, रोजगार गमावलेल्या मजूर, कामगार आदी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना अन्न, निवारा व अन्य सुविधा पुरविणे इ. कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांकरिता मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. याकरिता समाजातील व्यक्ती, संस्था, उद्योग समूह अशा विविध स्तरांतून येणारा आर्थिक मदतीचा ओघ हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड १९ मध्ये संकलित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून मुख्यमंत्री सहाय्यत निधीसही आपले आर्थिक योगदान देणे अपेक्षित आहे. तसेच महार