मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्जता- विमानतळ परिचालनाचा महत्त्वाचा टप्पा

 नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन विमानतळाच्या सज्जतेचा (Readiness) आढावा घेतला.  यापूर्वी नवी मुंबई विमानतळ येथे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रूमेन्ट लँडिंग चाचणी आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोतर्फे घेण्यात आलेली प्रवासी विमान लॅंडिंग चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती. या प्रसंगी विपिन कुमार, (भा. प्र. से.) अध्यक्ष, भारतीय विमानतळ प्राधिकरण, श्री. प्रकाश निकम, प्रादेशिक संचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळ (BCAS), श्री. विजय सिंघल, (भा. प्र. से.), उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, (भा. प्र. से.), सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्रीमती गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल (एनएमआयएएल) यांचे अधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भार...
अलीकडील पोस्ट

‘सिडको’ हक्काचे घर मिळालेल्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अभिनंदन

 मुंबई, ता. १९ : सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत, त्याचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. यासाठी सिडको, म्हाडा यासारख्या संस्था पारदर्शकपणे काम करत आहेत. आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पवित्र दिनी २१,३९९ सदनिकांच्या महासोडतीच्या माध्यमातून एकूण १९,५१८ नागरिकांचे सिडकोचे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ या योजनेद्वारे हे स्वप्न पूर्ण होत असल्याने हक्काची घरे मिळालेले सर्वजण भाग्यशाली असून त्यांच्या अभिनंदनाची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केली. एका क्लिकवर मा. उपमुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते १९,५१८ अर्जदारांचे हक्काच्या घराचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ या लॉटरीची ऑनलाईन सोडत काढण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी श्री. विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, डॉ. राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. गण...

जामनेर- नमो कुस्ती महाकुंभ: अमृता पुजारी, विजय चौधरी यांचे वर्चस्व

 जळगाव, (क्रीडा प्रतिनिधी)- कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर लाल मातीत झालेल्या संघर्षात भारतीय पहिलवानच भारी ठरले. नमो कुस्ती महाकुंभ २ अंतर्गत देवाभाऊ केसरी  आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलमध्ये महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह सर्वच भारतीय पहिलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी पहिलवानांना धूळ चारत आपले वर्चस्व दाखवून दिले. देवाभाऊ केसरीच्या निमित्ताने आयोजित आंतरराष्ट्रीय दंगलमध्ये महाराष्ट्र केसरी विजेत्यांनी जगभरातील 9 देशांमधून आलेल्या नामवंत पहिलवानांना पराभूत करून कुस्तीच्या मैदानी परंपरेचा अभिमान वाढवला. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेप्रमाणे कुस्तीत महिलाना समान सन्मान देताना या मैदानातील पहिली आणि अंतिम कुस्ती महिलांची लावण्यात आली. कुस्तीच्या इतिहासात प्रथमच महिला कुस्तीला हा सन्मान मिळाल्यामुळे महिला कुस्तीपटूंमध्ये आणि कुस्तीप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. आपल्या तालुक्यात कुस्तीच्या मैदानात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय पहिलवान येणार असल्यामुळे सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा अथांग जनसागर पसरला होता....

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

जामनेरमध्ये होणार ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगल: फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, जॉर्जिया, इराण, रोमानिया आणि एस्टोनियाचे पैलवान उतरणार

  मुंबई, दि. ४ -  जळगाव जिल्ह्यातील जामनेर हे गाव इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. येथील भूमीवर १६ फेब्रुवारी २०२५ रोजी 'नमो कुस्ती महाकुंभ-२' सोबत 'देवाभाऊ केसरी' ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली आहे. ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत भारतीय महिला कुस्तीला प्रोत्साहन देणे हे या दंगलीचे मुख्य उद्दिष्ट आहे. या दंगलीमध्ये हिंदुस्थान , फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया, जॉर्जिया, इराण आणि एस्टोनिया या देशांचे जागतिक विजेते, ऑलिंपियन, हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उप-महाराष्ट्र केसरी सारखे महिला आणि पुरुष दिग्गज कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. हे मोठे आयोजन मातीतील कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याबद्दल बोलताना या ऐतिहासिक कुस्ती दंगलीचे प्रमुख आयोजक महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले कि, संपूर्ण महाराष्ट्रात या आयोजनाबद्दल प्रचंड उत्साह आहे. या कुस्ती दंगलमुळे जामनेर हे गाव जागतिक कुस्ती नकाशावर ठळकपणे झळकणार आहे. या निमित्ताने उत्तर महा...

खारघर येथे पार पडले वैदर्भियांचे तिसरे स्नेहसंमेलन

 मुंबई :  मुंबई आणि परिसरात राहणा-या वैदर्भियांनी कोकणी माणसाचा आदर्श ठेवत आपली मायभूमी विदर्भाच्या संपर्कात (कनेक्ट)राहून विदर्भाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन ज्येष्ठ बांधकाम व्यावयासिक व माजी अणुशास्त्रज्ञ डॉ. सुरेश हावरे यांनी केले. आपला विदर्भ सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या तिस-या वैदर्भीय स्नेहसंमेलनात अध्यक्षीय भाषणात बोलताना त्यांनी हे आवाहन केले.  नवी मुंबई व मुंबई परिसरातील वैदर्भियांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून “आपला विदर्भ सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था’’ गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेने रविवारी वैदर्भियांचे तिसरे स्नेहसंमेलन खारघर येथील एमटीडीसी रेसिडेन्सीत आयोजित केले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश हावरे, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी चंद्रकांत डांगे उपस्थित होते. यावेळी आपला विदर्भचे अध्यक्ष एड. विजयकुमार कोहाड, सरचिटणीस प्रमोद चुंचूवार, कोषाध्यक्ष अनंत शिंदे, सचिव राजेंद्र नंदनकर, उपाध्यक्ष अश्विनी हडपे यांच्यासह सभागृहात मोठ्या संख्येने वैदर्भीय उपस्थित होते. यावेळी महिलांचा हळदी-कुंकू आणि बाळगोपाळांची लूट पार ...

नवी मुंबई आणि नैना क्षेत्रातील उंचीबाबत वैध ना हरकत प्रमाणपत्र असणाऱ्या बांधकामांना मिळणार परवानगी

सिडको महामंडळाकडून नवी मुंबईमध्ये विकसित करण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) येथील ज्या बांधकाम प्रकल्पांना भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून उंचीबाबतचे वैध ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे, अशा बांधकामांना परवानगी देण्यात येणार आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रात नमूद अनुज्ञेय उंचीपर्यंतची बांधकामे विकासकांना करता येणार आहेत. ज्या विकासकांकडे बांधकाम उंचीबाबतची वैध प्रमाणपत्रे आहेत त्यांना लवकरच सिडकोकडून बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आणि भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई आणि नैना क्षेत्रांतील बांधकाम प्रकल्पांसमोरचा अडथळा दूर होऊन या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, संबंधित विकासक व नागरिक यांनाही या निर्णयामुळे निश्चितच दिलासा मिळणार आहे. डॉ. संजय मुखर्जी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको सिडकोकडून नवी मुंबईच्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात 1160 हेक्टरवर आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारण्यात येत आहे. सदर विमानतळामुळे नजीकच्य...

सिडको मेट्रो मार्ग क्र. 1अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; लवकरच करारनामा

सिडको महामंडळाकडून विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 च्या परिचालन आणि देखभाल (ऑपरेशन ॲन्ड मेन्टेनन्स) सेवांकरिता, सिडकोकडून नुकतेच महामेट्रोला स्वीकारपत्र (एलओए) देण्यात आले आहे. मार्ग क्र. १ अंमलबजावणीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.  दरम्यान, या संदर्भात लवकरच सिडको आणि महामेट्रो यांच्यात करारनामा करण्यात येणार आहे. “नवी मुंबईतील मेट्रो प्रकल्पाची नवी मुंबईकरांना अनेक वर्षे प्रतीक्षा आहे. लवकरात लवकर हा मेट्रो प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून प्रकल्पासमोरील सर्व अडथळे आम्ही दूर केले आहेत. महामेट्रोने नागपूर मेट्रो विक्रमी वेळेत पूर्ण करून दर्जेदार प्रकल्प उभा केला. पुणे मेट्रोचे काम देखील महा मेट्रो वेगाने करत आहे. त्यामुळे त्यांची आजवरची कामगिरी बघता नवी मुंबई मेट्रो देखील लवकरात लवकर कार्यान्वित करून प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल, असा मला विश्वास आहे.” - एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री, महाराष्ट्र मेट्रो मार्ग क्र. 1 च्या अभियांत्रिकी सहाय्यासाठी महामेट्रोची नियुक्ती करण्यात आल्यानंतर, या मार्गावर परिचालन आणि देखभाल सेव...

कोविड योद्ध्यांचा पुरस्काराने गौरव

  कामोठे: कोविड काळात अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. पनवेल महापालिका क्षेत्र आणि संपूर्ण तालुक्याचा विचार करता राज्य शासन ठामपणे आपल्या मागे उभे राहिले. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी हात आखडता न घेता आर्थिक निधी पुरविला, अशी स्पष्टोक्ती कोकण शिक्षण मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील यांनी दिली. कोकण शिक्षक मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३५ कोविड योद्ध्यांना कोविड देवदूत पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, वाढदिवस हे निमित्त आहे. सर्व कार्यक्रम रद्द करून केवळ कोविड देवदूतांचा सत्कार करण्यासाठी, त्यांच्या कामाची कदर करून शाबासकीची थाप देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कोविड काळात सरकारी आणि काही सेवाभावी खासगी डॉक्टर, समाजसेवक दिवस-रात्र राबले, परंतु कुणाचाही मोबाईल बंद नव्हता ही वाखाणण्याजोगी बाब नोंद करावीच लागेल. सर्वांचीच फार ओढाताण होत असताना, रुग्णांना दिलासा देणे, त्यांची व्यवस्था करणे अवघड असतानाही त्यात आपण सारे यशस्वी झालो, याचा अभिमान वाटत असल्याचे आ. पाट...

एड्सग्रस्त मुलांना जयश्री फाऊंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

ख्रिसमस - नाताळ सणानिमित्त वाशी येथील डिझायर सोसायटी मधील एड्स ग्रस्त मुलांना जयश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव जाधव यांच्या तर्फे विविध जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप व नम्रता मधगायकर यांच्या तर्फे  ब्लँकेट वाटप तसेच नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशन आणि शाईन कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून एक महिने मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे, सदर कार्यक्रमासाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष मनोज महाराणा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते . सदर ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करून एक सक्षम नागरिक बनण्यासाठी प्रोत्साहन पर मोलाचे मार्गदर्शन महाराणा यांनी उपस्थित मुलांना तसेच आयोजकांना केले. सदर कार्यक्रमादरम्यान जयश्री फाऊंडेशनचे प्रथमेश मडकईकर, नीरज बोडके, आशिष सावंत, प्रियांका जाधव, अतिश खोत, प्रथम पाटील, साहिल कलांतरे, हर्ष तांडेल,श्रावणी माने आणि साक्षी गुंजाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचे सचिव अक्षय डिगे, संस्थेचे सरचिटणीस  राहुल साबळे, विद्यार्थी प्रमुख सुयेश मूढे ,...