मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्रात ४० वर्षात २० मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस १ मे १९६० पासून ११ नोव्हेंबर २०१० पर्यंत राज्याने एकूण २० (वीस) मुख्यमंत्री पाहिले..कारकीर्द पुढीलप्रमाणे: १) यशवंतराव चव्हाण - १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२ २) मारोतराव कन्नमवार - २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ ३) वसंतराव नाईक - ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ ४) शंकरराव चव्हाण - २१ फेब्रुवारी १९७५ ते १७ मे १९७७ ५) वसंतदादा पाटील - १७ मे १९७७ ते १८ जुलै १९७८ ६) शरद पवार - १८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८० ७) अ. र. अंतुले - ९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२ ८) बाबासाहेब भोसले - २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ ९) वसंतदादा पाटील - २ फेब्रुवारी १९८३ ते १ जून १९८५ १०) शिवाजीराव निलंगेकर - ३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६ ११) शंकरराव चव्हाण - १२ मार्च १९८६ ते २६ जून १९८८ १२) शरद पवार - २६ जून १९८८ ते २५ जून १९९१ १३) सुधाकरराव नाईक - २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३ १४) शरद पवार - ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५ १५) मनोहर जोशी - १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९ १६) नारायण राणे - १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९ १७) विलासराव देशम

चव्हाण, पवार - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस  पृथ्वीराज चव्हाण यांची तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची वर्णी लागली आहे. चव्हाण यांची प्रतिमा अद्याप स्वच्छ असल्यामुळे आणि पक्षात त्यांचे वजन असल्यामुळे त्यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. अशोक चव्हाण हे आदर्श गृहनिर्माण संस्था घोटाळ्यात अडकल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद गमवावे लागले. आज सकाळी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. उपमुख्यमंत्री पदावर राज्याचे जलसंपदा व ऊर्जामंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे अजितदादा पवार यांची निवड करण्यात आली. काहीही असले तरीसुद्धा पुन्हा एकदा आणखी एका "चव्हाण" यांचीच वर्णी लागली आहेच..।

आदर्श गृहनिर्माण संस्था- चौकशीने काय साध्य होणार?

आदर्श गृहनिर्माण संस्थेत आपल्या नातेवाईकांना घरे मिळवून दिल्याचा आरोप चव्हाण यांच्यावर असल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अशोक (सध्याच्या प्रथेनुसार अशोकराव) चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी विरोधकांनी केली आहे, परंतु चौकशी झाली तरी नेमके काय साधणार आहे, ही बाब अनुत्तरित आहे. मुंबई येथे आदर्श सोसायटी ज्या भूखंडावर उभी आहे, तो भूखंड संरक्षण दलाचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. कारगिलमधील शहिदांच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या या सोसायटीतील सदनिकांवर राजकीय नेते, तसेच लष्करी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी डल्ला मारल्याच्या या प्रकरणाची गंभीर दखल संरक्षणमंत्र्यांनी घेतली. त्यांच्या आग्रहामुळेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही हात असल्याचा आरोप झाल्यानंतर श्री. चव्हाण यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींकडे यापूर्वीच राजीनामा पाठविला होता. राज्यपाल के. शंकर नारायणन यांच्याकडे पाठविण्यात आला असून चव्हाण यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगण्यात आले आहे. अनेकदा विविध प्रकर

उपमुख्यमंत्र्यांकडून दीपावलीनिमित्त शुभेच्छा

मुंबई, ता. ४- दीपावलीच्या लक्षलक्ष दिव्यांच्या प्रकाशाने आपणा सर्वांचे आयुष्य तेजोमय होवो आणि समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचो. पणतीच्या पवित्र प्रकाशाने अज्ञानाचा अंधःकार दूर होऊन संपन्नतेची दीपमाळ आपल्या आयुष्यात प्रकाशमान होवो..। पर्यावरणाचे भान राखून ध्वनी आणि वायू प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्यावर नागरिकांनी भर द्यावा या शब्दात उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

ओबामा भारत भेट- त्रास आम्हाला कशाला..?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची तीन दिवसांची भारत भेटीची सांगता झाली. ओबामा यांच्या भारत भेटीत प्रामुख्याने त्यांच्या वाहनांचा ताफा सामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरला. मुंबई येथे विमानतळावर आगमन झाल्यानंतर नियोजित कार्यक्रमानुसार हॉटेल ताजसह सर्व संबंधित ठिकाणी त्यांचा ताफा पोहोचून ओबामांचे सभास्थळी आगमन होईपर्यंत अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. पन्नास गाड्यांच्या ताफ्यात एक गाडी ओबामा यांची...। त्यांच्या भोवती, मागे, पुढे सुरक्षा रक्षकांचे वलय..ते ज्या गाडीत बसणार ती गाडी सुद्धा अमेरिकेतून आणलेली..। हा ताफा एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाताना वाहतुक थांबविलेली..संबंधित ठिकाणचे नेटवर्क थांबवून..स्वतःचे वर्क सुरू ठेवलेले..ठिकठिकाणी जॅमर्स लावलेले..यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास आणि डोकेदुखी सहन करावी लागली. इतकी सुरक्षा व्यवस्था ठेवून वाहतुक थांबविणे म्हणजे देशाचा विकास थांबविण्यासारखे असल्याचे चंदन याने सांगितले. तर, दुसर्‍या व्यक्तीसाठी आपल्याच लोकांचे नेटवर्क, मोबाईल जॅम करणे योग्य नव्हे अशी प्रतिक्रिया सतीश यांनी व्यक्त केली. अशा प्रकारच्या लोकांच्या सुरक्

भुजबळ यांच्याकडून ओबामा यांना "स्लेव्हरी" पुस्तक भेट

मुंबई, ता. ६ नोव्हेंबवर - उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८७३ मध्ये लिहिलेले स्लेव्हरी अर्थात गुलामगिरी हे पुस्तक भेट दिले. आपल्यासाठी ही अमूल्य भेट असल्याचे ओबामा यांनी सांगितले. भारतातील सामाजिक चळवळीचे पहिले क्रांतिकारक महात्मा फुले यांनी १३७ वर्षांपूर्वी हे पुस्तक अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या गुलामगिरीविरुद्ध लढ्यासाठी योगदान देणार्‍यांना अर्पण केले आहे, हे वाचल्यानंतर ओबामा यांनी , हे पुस्तक आपल्यासाठी अमूल्य भेट असल्याचे सांगितले

मराठ्यांना आरक्षण देण्याच्या भूमिकेवर भुजबळ ठाम

मुंबई, ता. २ नोव्हेंबर- ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे ही माझी भूमिका कायम आहे. मात्र, मराठा आरक्षणासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतल्यास पुढाकार घेईन, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे केले. भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा बँकेचे संचालक ऍड. माणिकराव शिंदे, नगरसेविका उषा शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षात नव्याने आलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याला दुय्यम वागणूक दिली जाणार नाही असे सांगून भुजबळ यांनी प्रत्येक घरात पैशाची आवक होईल तेव्हाच खराखुरा विकास होईल असे प्रतिपादन केले.

दीपावली शुभेच्छा..

चला उधळू रंग छटांचे, चला उजळू दीप दिव्यांचे, उर्जेच्या या नव पर्वाचे स्वागत-गीत हे गाऊ या.. दीपावली ही तेजोमयी करण्या लक्ष दीप हो लाऊ या...

दिवाळीच्या दिव्यांची उर्जा सांभाळा-भारनियमन पुन्हा वाढण्याची शक्यता

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दीपावलीच्या दिव्यांच्या झगमगाटात लखलखटाने सुरुवात होणार्‍या प्रकाशपर्वात नव्या आशांच्या किरणांनी उर्जा मिळणार्‍या नागरीकांना ही मिळणारी उर्जा, भार-नियमन सहन करण्यासाठी सांभाळून ठेवावी लागणार आहे. पुन्हा एकदा भारनियमन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक वर्षांपासून राज्य भीषण वीज टंचाईचा सामना करीत असून, याची झळ खरंतर वीज ग्राहकांपेक्षा वीज मंडळालाच बसली आहे. इतकी प्रचंड वीज टंचाई एका दिवसात होत नाहीच, सुरवातीलाच हे जाणवल्यानंतर त्वरीत हालचाली, उपाययोजना झाल्या असत्या, तर आज हे चित्र नसते. दिवसेंदिवस लोकसंख्येबरोबरच गरजाही वाढणार हे शाश्वत सत्य आहे. वीज मंडळाने राज्यात ठिकठिकाणी असलेल्या वीज निर्मिती केंद्रांची क्षमता वाढविण्याची योजना हाती घेऊन सुद्धा आता अनेक दिवस उलटून गेले आहेत. नियोजित कालावधीत सगळ्याच प्रकल्पाचे काम पूर्ण होईल अशी सध्या तरी सुतराम शक्यता नाही. मध्यंतरी एप्रिल २०१० मध्ये राज्यात १९ हजार मेगावॅट विजेची आवश्यकता होती, परंतु प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुमारे १४ हजार पाचशे मेगावॅट झाली. उर्वरित तब्बल पाच हजार मेगावॅटची गरज अग