मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

घडवा सुंदर हस्ताक्षर उपक्रमाबाबत किशोर कुळकर्णी यांची महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याशी भेट

जळगाव दि. १९ (प्रतिनिधी) - सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शक किशोर कुळकर्णी यांनी महामहीम राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई देवीसिंह पाटील-शेखावत यांची काही दिवसांपूर्वी जळगाव दौर्‍यात भेट घेतली व शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपती महोदयांना माहिती दिली. त्यांच्या या स्पृहनिय कार्याबद्दल महामहिम राष्ट्रपतींनी जाणून घेतले व कार्याबाबत समाधान व्यक्त केले. ते जैन इरिगेशनच्या प्रसिद्धी विभागात कार्यरत आहेत.         महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या गत २३ ते २५ मार्च १२ दरम्यान जळगाव दौर्‍यावर आल्या होत्या. किशोर कुळकर्णी यांनी राष्ट्रपती महोदयांना आपल्या कार्याबद्दल माहिती व घडवा सुंदर हस्ताक्षर पुस्तक सस्नेह देण्याबाबत विनंती अर्ज केला होता. त्यानुसार २४ मार्च रोजी महामहीम राष्ट्रपतींची भेट निश्‍चित झाली. या भेटीत कुळकर्णी यांनी घडवा सुंदर हस्ताक्षर उपक्रमाबाबत माहिती दिली. गत १७ वर्षांपासून ते शालेय विद्यार्थ्यांचे अक्षर सुघड सुंदर व्हावे यासाठी निस्पृहपणे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शनाचे कार्य करीत आहेत. एकट्या धरणगा...

भिवंडी-निजामपूर, मालेगाव, चंद्रपूर, परभणी, लातूर महानगरपालिका मतदानासाठी यंत्रणा सज्ज

मुंबई, ता. १३, - भिवंडी-निजामपूर, मालेगाव, चंद्रपूर, परभणी, लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज दिली. येत्या १५ एप्रिलला या महानगरपालिकांसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले, की एकूण ३७१ जागांसाठी २ हजार ४०२ उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. १ हजार ८५३ मतदान केंद्रांवर एकूण १५ लाख १८ हजार १७३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात ८ लाख ४५ हजार ८७८ पुरुष तर ६ लाख ७२ हजार २९५ महिला मतदार हक्क बजावणार आहेत. यासाठी २ हजार ४५० मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ९१० अतिरिक्त मतदान यंत्रांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. ४३० संवेदनशील तर ७ अतिसंवेदनशील मतदानकेंद्रे आहेत. सर्व सातही संवेदनशील मतदानकेंद्रे परभणी येथील आहेत. सर्वाधिक २२४ मतदानकेंद्रे भिवंडी-निजामपूर येथे आहेत. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदारांनी अधिकाधिक संख्येने आणि निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा असे ...

Shadow

am in shadow of...

God Bless you...

गुढी-पाडवा, हिंदू नववर्ष शुभचिन्तन...

युवराज सिंगची हॉस्पिटलमधून सुट्टी...

क्रिकेटपटू युवराज सिंग याची आज बोस्टन (अमेरिका) येथील हॉस्पिटलमधून अखेर सुट्टी करण्यात आली. केमोथेरपी च्या तिसर्‍या आणि शेवटच्या चरणानंतर युवराज याला सुट्टी देण्यात आली आहे. "अखेर तिसरे चरणही संपले, आता आपण मी जाण्यासाठी जास्त प्रतीक्षा करू शकत नाही, मी मोकळा झालोय...माझ्या सर्व चाहत्यांना आणि अमिष्ट चिंतन करणार्‍यांचे आभार.." या शब्दात युवराजने आपला आनंद देखील व्यक्त केला आहे. गेल्या महिन्यात युवराज याला बोस्टन येथे केमोथेरपी करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. युवराज मैदानावर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पाऊल ठेऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. केमोथेरपीच्या उपचारांदरम्यान युवराज याचे डोक्यावरचे केस पूर्णपणे गळाले आहेत. सचिनचे शतकांचे शतक अर्थात महाशतक झळकल्यामुळे त्याने सचिन तेंडुलकरचे ट्विटर वर tweet करून अभिनंदन केले आहे.

बच्चन कुटुंबीयांकडे ४ अरब...

लखनौ- वृत्तसंस्था: बॉलीवुड चे बिग-बी आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडे ३ अरब ६१ लाख ७ हजार ३११ रुपये, तर त्यांच्या पत्नी जया बच्चन यांच्याकडे ४३ करोड ९ लाख ३० हजार २३ रुपयांची संपत्ती असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. शनिवारी (ता. १७) समाजवादी पार्टीतर्फे जया बच्चन यांनी राज्यसभेसाठी भरलेल्या नामांकनात देण्यात आलेल्या संपत्तीविषयी दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात हा खुलासा करण्यात आला आहे. या शपथपत्रानुसार, बच्चन दाम्पत्त्याकडे तीन अरब ४३ करोड ७० लाख ३७ हजार ३३४ रुपयांची चल संपत्ती असून १५० करोड रुपयांची अचल संपत्ती आहे. दागिने- अमिताभ यांच्याजवळ २६ करोड २३ लाख ७ हजार ६८८.    जया बच्चन- १३ करोड ३४ लाख ६२ हजार २९९ रुपयांचे दागिने. लग्झरी कार- अमिताभ ६ करोड ३२ लाख २६ हजार ५५४ रुपयांच्या लक्झरी कार. कृषि भूमी- अमिताभ- दौलतपूर (उत्तर प्रदेश) ५० लाख आणि मुजफ्फरपूरमध्ये २९ करोडची कृषि भूमी. जया बच्चन- काकोरी येथे १.४५ करोड आणि भोपाळ येथे ३.५ करोड रुपयांची भूमि. (सौजन्य- नईदुनिया)

छगन भुजबळ यांच्याकडून सचिन तेंडुलकरचे अभिनंदन

मुंबई, दि. 16 मार्च : शतकांचे महाशतक ही क्रिकेटच्या विक्रमादित्याकडून माझ्यासारख्या लाखो चाहत्यांना मिळालेली अमूल्य भेट आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी सचिन तेंडुलकरचे अभिनंदन केले आहे. श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, क्रिकेट आणि सचिन तेंडुलकरचे माझ्यासारखे चाहते गेले वर्षभर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते, तो रोमांचक क्षण आज मिरपूर येथे साकार झाला. सचिनने त्याचे बहुप्रतिक्षित महाशतक आज झळकावले आणि क्रिकेटच्या या विक्रमादित्याने शतकांचे शतक झळकावण्याचा आणखी एक महाविक्रम आपल्या नावावर जमा केला. त्याची ही कामगिरी भारतीय तसेच जागतिक क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोदविली जाईल, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाचे छगन भुजबळ यांच्याकडून स्वागत

मुंबई, दिनांक 16 मार्च : केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत सादर केलेल्या सन 2012-13 च्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे ग्रामीण भागाला दिलासा तसेच कृषि क्षेत्रातील वाढीला चालना मिळणार असून ग्रामीण सडक योजना गतीने मार्गी लागतील, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री श्री.छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. सन 2012-13 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भुजबळ यांनी पुढे म्हटले आहे की, देशभरातील 8,800 कि.मी. लांबीचे महामार्ग राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रमांतर्गत विकसित करण्याचे या अर्थसंकल्पात नमूद केले आहे. त्याचबरोबर, ग्रामीण सडक योजनेसाठी 24,000 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. मुलभूत तसेच पायाभूत सोयीसुविधांच्या या निर्मितीमुळे देशाच्या विकासाला गती मिळणार आहे. या अर्थसंकल्पात कृषि, परिवहन तसेच ऊर्जा या क्षेत्रावर भर दिला आहे. त्याचबरोबर कल्याणकारी योजनांची व्याप्तीदेखील वाढविली आहे. शिक्षण घेण्यासाठी झालेली समाजाची जागृती विचारात घेता उच्च शिक्षणासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांकरिता या अर्थसंकल्पात वेगळ्या निधीची तरतूद केली असल्यामुळे शैक्षणिक...