सिडको महामंडळाकडून नवी मुंबईमध्ये विकसित करण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) येथील ज्या बांधकाम प्रकल्पांना भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून उंचीबाबतचे वैध ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे, अशा बांधकामांना परवानगी देण्यात येणार आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रात नमूद अनुज्ञेय उंचीपर्यंतची बांधकामे विकासकांना करता येणार आहेत. ज्या विकासकांकडे बांधकाम उंचीबाबतची वैध प्रमाणपत्रे आहेत त्यांना लवकरच सिडकोकडून बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आणि भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई आणि नैना क्षेत्रांतील बांधकाम प्रकल्पांसमोरचा अडथळा दूर होऊन या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, संबंधित विकासक व नागरिक यांनाही या निर्णयामुळे निश्चितच दिलासा मिळणार आहे. डॉ. संजय मुखर्जी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको सिडकोकडून नवी मुंबईच्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात 1160 हेक्टरवर आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारण्यात येत आहे. सदर विमानतळामुळे नजीकच्य...