मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

घडवा सुंदर हस्ताक्षर उपक्रमाबाबत किशोर कुळकर्णी यांची महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याशी भेट

जळगाव दि. १९ (प्रतिनिधी) - सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शक किशोर कुळकर्णी यांनी महामहीम राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई देवीसिंह पाटील-शेखावत यांची काही दिवसांपूर्वी जळगाव दौर्‍यात भेट घेतली व शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपती महोदयांना माहिती दिली. त्यांच्या या स्पृहनिय कार्याबद्दल महामहिम राष्ट्रपतींनी जाणून घेतले व कार्याबाबत समाधान व्यक्त केले. ते जैन इरिगेशनच्या प्रसिद्धी विभागात कार्यरत आहेत.         महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या गत २३ ते २५ मार्च १२ दरम्यान जळगाव दौर्‍यावर आल्या होत्या. किशोर कुळकर्णी यांनी राष्ट्रपती महोदयांना आपल्या कार्याबद्दल माहिती व घडवा सुंदर हस्ताक्षर पुस्तक सस्नेह देण्याबाबत विनंती अर्ज केला होता. त्यानुसार २४ मार्च रोजी महामहीम राष्ट्रपतींची भेट निश्‍चित झाली. या भेटीत कुळकर्णी यांनी घडवा सुंदर हस्ताक्षर उपक्रमाबाबत माहिती दिली. गत १७ वर्षांपासून ते शालेय विद्यार्थ्यांचे अक्षर सुघड सुंदर व्हावे यासाठी निस्पृहपणे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शनाचे कार्य करीत आहेत. एकट्या धरणगा...

भिवंडी-निजामपूर, मालेगाव, चंद्रपूर, परभणी, लातूर महानगरपालिका मतदानासाठी यंत्रणा सज्ज

मुंबई, ता. १३, - भिवंडी-निजामपूर, मालेगाव, चंद्रपूर, परभणी, लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज दिली. येत्या १५ एप्रिलला या महानगरपालिकांसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले, की एकूण ३७१ जागांसाठी २ हजार ४०२ उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. १ हजार ८५३ मतदान केंद्रांवर एकूण १५ लाख १८ हजार १७३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात ८ लाख ४५ हजार ८७८ पुरुष तर ६ लाख ७२ हजार २९५ महिला मतदार हक्क बजावणार आहेत. यासाठी २ हजार ४५० मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ९१० अतिरिक्त मतदान यंत्रांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. ४३० संवेदनशील तर ७ अतिसंवेदनशील मतदानकेंद्रे आहेत. सर्व सातही संवेदनशील मतदानकेंद्रे परभणी येथील आहेत. सर्वाधिक २२४ मतदानकेंद्रे भिवंडी-निजामपूर येथे आहेत. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदारांनी अधिकाधिक संख्येने आणि निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा असे ...

Shadow

am in shadow of...